किवी काजू रोल by Namrata's CookBook : १३

Primary tabs

Namokar's picture
Namokar in पाककृती
1 Aug 2019 - 4:51 pm


लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:

२ किवी
१/२ वाटी साखर
१/२ वाटी मिल्क पावडर
१ वाटी काजू (जाडसर बारीक करून घ्या)
सुक्या खोबऱ्याचा किस
तुप
खाण्याचा हिरवा रंग

क्रमवार पाककृती:
१. किवीची साल काढून घ्या
२. किवीचे छोटे तुकडे करुन मिक्सर करुन घ्या

३. बारीक केलेली किवी पॅन मध्ये घ्या आणि ५ मि. बारीक गॅसवर परतून घ्या ,एकसारख हलवत रहा

४. आता त्यामध्ये साखर घालून एकत्र करुन घ्या , मिश्रण हलवत रहा

५. ५ मि. झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर , बारीक केलेली काजूची पावडर घालून एकत्र करुन घ्या

६. खाण्याचा हिरवा रंग आणि थोडस तुप घालून छान एकत्र करुन घ्या , एकसारख १० ते १५ मि हलवत राहा
जेव्हा मिश्रण पॅनपासून पूर्ण वेगळ होईल तेव्हा गॅस बंद करा

७. एका ताटाला थोडेसे तुप लावून मिश्रण ताटात घ्या

८. मिश्रण थोडेसे थंड होत आलेकी थोडेसे तुप ताट/फरशीला तुप लावून मिश्रणाचे आवडीप्रमाणे छोटे/मोठ्या आकारात रोल करुन घ्या

९. किवी काजू रोल खोबऱ्याचा किसमध्ये सर्व बाजूने फ़िरवून घ्या

१०. हे रोल फ्रिजमध्ये १ तास सेट करायला ठेवा
कीवी काजू रोल तयार आहेत

वाढणी/प्रमाण:
अधिक टिपा:
* साखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करु शकता
* रोल ऐवजी आपल्या आवडीप्रमाणे आकार दिला तरी चालेल
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/-PvajTCaJow

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

1 Aug 2019 - 5:09 pm | जॉनविक्क

खायलाच हवे

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2019 - 12:58 pm | अत्रुप्त आत्मा

https://i.postimg.cc/wjkwKXss/kiwi-kaju-roll1-1.jpg
..........http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

प्रसाद_१९८२'s picture

3 Aug 2019 - 4:50 pm | प्रसाद_१९८२

"किवी" काय असते ?

जॉनविक्क's picture

3 Aug 2019 - 6:38 pm | जॉनविक्क

रच्याकने म.गा. रस्त्यावर ज्यूसवर्ल्डमधे याचे खूपच मस्त ज्यूस बनवून देतात.

श्वेता२४'s picture

4 Aug 2019 - 7:17 am | श्वेता२४

तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात. ही ट्राय करुन बघते

जेम्स वांड's picture

4 Aug 2019 - 12:00 pm | जेम्स वांड

खूप आवडली अर्थात इतक्या क्लिष्ट मिठाया मी घरी बनवेल का नाही ही जराशी शंकाच आहे पण रेसिपी भारीच आहे.

Valentine Chocolate

चौकस२१२'s picture

11 Aug 2019 - 3:12 pm | चौकस२१२

किवी फळात २ प्रकार असतात एक सर्वसाधारण आणि एक "गोल्डन " किवी, हे जास्त चविष्ट असते
त्यातील कोणते आपण वापरलेत ?
किवी फळाचा असा उपयोग निश्चितच नावीन्यपूर्ण आहे पण दोन तीन शंका आहेत
1) साखर रंग आणि काजू + गरम होण्याची प्रक्रिया यामुळे किवी फळाची चव यात उतरते का?
२) यातील हिरवा रंग नाही घातला तर?
३) किवी प्रकारे इतर ( स्रवबेरी , ताजे जर्दाळू ) अशी फळे वपरून पण हे जरूर करता येईल
४) काजू ऐवजी ग्लुटॅनस तांदूळ ( चिकट जातीचा तांदूळ) घालून केले तर?

-आतून हिरवी असलेली किवी वापरली आहे
-चालेल ( हिरवा रंग नाही येणार काजु किवी रोल ला)
- नक्की वापरुन बघता येईल

-आतून हिरवी असलेली किवी वापरली आहे
-चालेल ( हिरवा रंग नाही येणार काजु किवी रोल ला)
- नक्की वापरुन बघता येईल

पैलवान's picture

11 Aug 2019 - 3:58 pm | पैलवान

लै भारी

किवी हाताशी नसल्याने सफरचंद आणि लाल रंग वापरून ही रेसिपी करून बघितली, एकदम हीट्ट आहे!!

- (खवय्या) सोकाजी

Namokar's picture

14 Aug 2019 - 1:44 am | Namokar

अरे वा... छान ...

धन्यवाद जॉनविक्क, अत्रुप्त आत्मा ,श्वेता२४ ,जेम्स वांड ,पैलवान,सोत्रि

चौकस२१२'s picture

19 Aug 2019 - 7:55 am | चौकस२१२

"साखर रंग आणि काजू + गरम होण्याची प्रक्रिया यामुळे किवी फळाची चव यात उतरते का?"

विचारण्याचे कारण हे कि, तशी चव खूप उग्र नसते त्यामुळे जर या पदार्थात मूळ किवी ची चव येत नसेल तर ती नुसती काजू बर्फी होईल म्हणून

वामन देशमुख's picture

2 Dec 2019 - 12:37 pm | वामन देशमुख

माझ्या मुलींनी किवी काजू रोल्स काल बनवले, मस्त जमलेत.
रेसिपी बद्धल धन्यवाद Namokar.

किवी काजू रोल १
किवी काजू रोल १

किवी काजू रोल २
किवी काजू रोल २

रच्याक, या रेसिपीत काजूऐवजी शेंगदाणे घातले तर?