बाईसाहेब अक्का लेडी बॉस

Primary tabs

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
28 Jul 2019 - 8:20 am
गाभा: 

आजकालच्या आधुनिक युगात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किंबहुना कित्येकदा तर पुरुषांच्या पुढे निघून गेल्याचे निदर्शनात येत आहे. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेली कित्येक क्षेत्रे स्त्रियांनी काबीज केली आहेत आणि त्यात कर्तृत्व गाजवत आहेत. काही ठिकाणी तर स्त्रियांचीच मक्तेदारी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ सगळ्याच कार्यालयांमध्ये तसेच खाजगी व्यवसायामध्ये स्त्रियांची संख्या वाढते आहे. नोकरी, व्यवसाय करून सुपर मॉम किंवा सुपर वूमन बनून घर देखील समर्थपणे सांभाळत आहेत (सेकंड शिफ्ट सिंड्रोम). अर्थार्जन करून संसाराला हातभार लावत आहेत. त्यामुळे इडलीडोसाविनर किंवा प्राठा / भाकरीविनर ह्या पुरुषांच्या पूर्वपार भूमिकेचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

लैंगिक समानतेच्या आजच्या जगात स्त्री पुरुषांना नोकरी व्यवसायामध्ये एकत्र काम करावे लागणे अपरिहार्य आहे. ती काळाची गरज आहे. कित्येक ठिकाणी स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी टार्गेट्स दिलेली दिसून येतात. काही विशिष्ट परिस्थिति स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीने हाताळू शकतात किंवा पुरुषांपेक्षा चांगले मल्टाय टास्किंग करू शकतात. स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायाची प्रगती पुरुष प्रमुख असलेल्या व्यवसायापेक्षा अधिक जोमाने होते असे निरीक्षण असल्याने कित्येक गुंतवणूकदार स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायामध्ये तुलनेने जास्त गुंतवणूक करतात.

मात्र असे असले तरी अजूनही उच्चपदस्थ स्त्रियांची संख्या कमी दिसून येते. खालच्या श्रेणीमध्ये स्त्रिया भरपूर प्रमाणात असल्यातरी वरच्या श्रेणीमध्ये तितक्या प्रमाणात स्त्रिया दिसत नाहीत. कदाचित स्त्रिया संसार, मुलेबाळे यांना अधिक प्राधान्य देत असतील किंवा इतर काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे ( उदाहरणार्थ ग्लास सिलिंग, स्टीकी फ्लोअर?) असे होत असावे. त्यामुळे सगळ्याच पुरुष कर्मचाऱ्यांना स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याचा अनुभव असू शकतो, असतो परंतु वरिष्ठ स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याची संधी कमी मिळते. आणि त्याही पुढे जाऊन बाईसाहेब अक्का लेडी बॉस च्या हाताखाली प्रत्यक्ष काम करणारे / केलेले पुरुष कर्मचारी आणखी कमी असतील.

स्त्रिया ह्या निसर्गतः केअर टेकर असल्याने हाताखालील कर्मचाऱ्यांची काळजी घेणे, शिस्त लावणे, कामे करून घेणे (कमी बुलीइंग), एकाचवेळी अनेक गोष्टींचे व्यवधान राखणे करू शकतात त्यामुळे बऱ्याच पुरुष मंडळींना स्त्री बॉस च्या हाताखाली काम करायला आवडते असे दशावतारातील साडेनव्वा सर्वआंजाव्यापी, सर्वज्ञानी आंग्ल अवतार श्री. गोगलदेव सांगतो. मला स्वतःला माझ्या करियर मध्ये कधीही स्त्री बॉस बरोबर काम करायची संधी अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही परंतु आपल्या पैकी कोणा पुरुष मिपाकराला अशी संधी मिळाली आहे का? असेल तर आपला अनुभव कसा आहे / होता हे समजून घ्यायला आवडेल. आता हे सांगू नका की कार्यालयात नाही परंतु घरी मात्र लेडी बॉस आहे ते ! हा अनुभव सार्वत्रिक असल्याने सर्व जण परिचित आहेत. मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमेन आर फ्रॉम व्हीनस या सुप्रसिद्ध सिद्धांताप्रमाणे मंगळे विरुद्ध शुक्रे असा काही संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो का? बऱ्याचदा उच्चपदस्थ पुरुष बॉस मंडळी एम सी पी च्या आरोपाला घाबरून स्त्री कर्मचाऱ्यांना सौहार्दपूर्ण वागणूक देतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्री बॉस कडून हाताखालील पुरुष कर्मचाऱ्यांना ब्लॅक विडो स्पायडरची वागणूक मिळते का? या आणि अशा अनेकविध गोष्टींबद्दल आपले अनुभव वाचायला / ऐकायला आवडतील. काळाची पुढची पावले ओळखण्यासाठी याचा कदाचित उपयोग होऊ शकेल.

प्रतिक्रिया

रोचक. अनुभव वाचायला आवडतील.

+१ स्वानुभव नाही, पण इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.

मुक्त विहारि's picture

28 Jul 2019 - 11:54 am | मुक्त विहारि

मी गुलामगिरी करत असतांना, स्त्रीचे हुकूम झेलायची पाळी आली नाही..कार्या निमित्ताने 3-4 वेळा स्त्री सहकारी मिळाले आणि त्याही अत्यंत कार्यक्षम होत्या.

व्यक्ती ज्ञानी असणे आवश्यक आहे......

ज्ञानी व्यक्तीचे वय आणि इतर गोष्टी (जातपात, धर्म, भाषा आणि ती स्त्री आहे का?) बघणे, मला तरी जमणार नाही....

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 1:51 pm | जॉनविक्क

मी स्त्री बॉसच्या हाताखाली काम केले आहे

धूर्त परंतु हाताखालच्या लोकांना संभाळुन घेणारी, सपोर्ट देणारी, अगदी कौटुंबिक नातं वाटेल इतके मैत्रीपूर्ण अनौपचारिक वागणारी पण तितकाच व्यवसायीक दृष्टिकोण बाळगून भरपूर काम करून घेणारी व्यक्ती म्हणूनच तिची आठवण आहे. स्त्रिया अशा ठिकाणी एक्स्ट्रा काँशिअस असतात पण तसे भासवून द्यायचा प्रयत्न करत नाहीत.

साधारण स्त्रीपुरुष संख्येने समान असतील अथवा पुरुष जास्त असतील तर पुरुषाला फार सहजपणे दुजाभाव वाट्यास येत नाही पण हे इक्वेशन समान नसेल तर आपण बरे आणि आपले काम बरे हा द्रुष्टीकोण ठेवल्यास विशेष मनस्तापही होत नाही.

मी स्वतः हाताखाली स्त्री कर्मचारी असण्यापेक्षा डोक्यावर स्त्री बॉस असणे 200% प्रेफर करेन

मुक्त विहारि's picture

28 Jul 2019 - 11:02 pm | मुक्त विहारि

पण. ...शेतात स्त्री कामगार उत्तम. ...तंबाखू खाणे, फालतू गप्पा ..ह्यात वेळ घालवत नाहीत. ...

आय.टी. तले मित्र मात्र स्त्री कामगार नकोच. ..असे म्हणतात. ..ऐनवेळी दगा देतात. ...

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 1:46 pm | जॉनविक्क

पण. ...शेतात स्त्री कामगार उत्तम. ...तंबाखू खाणे, फालतू गप्पा ..ह्यात वेळ घालवत नाहीत.

वाह, हा विचारच मी केला न्हवता...

तर दुसरे पाऊल आदीमानव जीवनशैलीत....

फार मोठा कॅनव्हास आहे.....त्यामुळे सरसकटपणे एखादे विधान कुणीही करू शकत नाही...

इथे अक्युमॅन पण आहे आणि थॅनाॅस पण आहे...टारझन पण आहे आणि बॅटमॅन पण आहे....

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 4:11 pm | मुक्त विहारि

अजूनही पदरातच अडकून बसलात?

पदर कधीच सुटून, चौदा चौकड्या पार करून गेला.

आता चला चंद्रावर. ..

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 4:39 pm | जॉनविक्क

म्हणून जे आहे त्यात समाधान मानणे जास्त बरं, चंद्राचा पदर पकडायची सध्या इच्छा नसल्याने इथंच ठीक आहे

दादा कोंडके's picture

28 Jul 2019 - 5:13 pm | दादा कोंडके

या बाबतीत माझा अनुभव जवळ जवळ पाच-सात वर्षांचा आहे. दोन मॅनेजर होते. दे वर वन ऑफ दी बेस्ट बॉसेस आय एव्हर हॅड. सांभाळून घेणं, चांगली संभाषण कला, ऑर्गनाइज्ड असणं वगैरे अनेक चांगले मुद्दे सांगता येतील. पण दुर्दैवानं या क्षेत्रात 'एक्स्ट्रा मैल' साठी कराव्या लागणार्‍या कामात कमी पडतात. रात्री-अपरात्री प्रवास आणि मिटींग्ज, टीम मेंबर्सना स्वतः ड्राइव्ह करून सोडवणं (दरवेळी कंपनीची टॅक्सी बूक करणं शक्य नसतं) वगैरे. पण हा दोष त्यांचा नसून कंपनीचा आणि एकंदर समाजाचा आहे असं म्हणू शकतो. आणि आश्चर्यकारकपणे या दोघींही टीम्स मध्ये बायका घेण्याला फारश्या उत्सुक नसत आणि एक तर अगदी उघडपणे तसं सांगे. त्यामागं थोड्यावेळ जास्त थांबायला टाळाटाळ करणं, कंपनीची बस चुकली की टॅक्सीचं बील क्लेम करणं, निकड असली तरी सप्लायरकडे न जाणं वगैरे असंत.

समीरसूर's picture

29 Jul 2019 - 12:16 pm | समीरसूर

माझ्या आतापर्यंत पाच महिला बॉस होत्या. एकूण बारा वर्षे माझी बॉस महिला होती. सध्या माझा बॉस पुरुष आहे. माझा अनुभव खूपच चांगला आहे. सगळ्या हुशार, मेहनती, सिन्सिअर, आणि सपोर्ट करणार्‍या होत्या. आमच्या विभागात आम्ही डायरेक्ट बॉससाठी काम करत नाही; त्यामुळे एकत्र काम करण्याचा अनुभव जास्त नाही पण पुरेसा आहे. कामात मदत करणार्‍या, मनमोकळे बोलणार्‍या, कौतुक करणार्‍या अशा माझ्या सगळ्या महिला बॉस होत्या. राजकारण वगैरे करणार्‍या कुणीच नव्हत्या. सगळ्या फ्रेंडली पण एक विशिष्ट अंतर ठेवून वागत-बोलत असत. काही अडचणी असतील तर सोडवण्यासाठी प्रामाणिक मदत करत असत. चुकलं असेल तर स्पष्टपणे सांगत असत पण कडवटपणे वागणारं कुणीच नव्हतं.

माझीही शॅम्पेन's picture

29 Jul 2019 - 2:52 pm | माझीही शॅम्पेन

ह्या डेंजर विषयाला आम्ही हात घालून स्वतःच घात करून घेतला आहे :)

अर्थात बराच गदारोळ झालेला , घ्या !!!

https://www.misalpav.com/node/30364

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 3:23 pm | जॉनविक्क

असे जर प्रतिसादवले गेले नसेल तर गदारोळ झालाच नाही असे खात्रीने समजून घ्या

माझीही शॅम्पेन's picture

29 Jul 2019 - 7:19 pm | माझीही शॅम्पेन

तुम्हाला आया बहिणी नाहीत का

हा हा हे भारी आहे हहपुवा

आता फक्त तुम्हाला बाप भाऊ नाहीत का? असा प्रतिसाद यायचा राहिलाय :)

अख्खा धागा वाचला. कुठेच काही गदारोळ वाचण्यात आला नाही. सगळ्यांनी व्यवस्थित मते मांडली आहेत.

माझीही शॅम्पेन's picture

29 Jul 2019 - 7:21 pm | माझीही शॅम्पेन

थोडा मार्केटिंगचा जमाना आहे :) समजून घ्या

पण खर सांगू का माझाच धागा मी परत वाचला तेव्हा मला जाणवलं कि माझं मत बऱयापैकी बदललं आहे आता

यशोधरा's picture

29 Jul 2019 - 7:29 pm | यशोधरा

होता है, होता है!

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2019 - 7:04 pm | टवाळ कार्टा

इतरवेळी ठीक पण जर मनासारखे काम नाही केले तर आपली चूक आपल्यालाच शोधावी लागते =))

चामुंडराय's picture

29 Jul 2019 - 9:27 pm | चामुंडराय

टका भाऊ जाणूनबुजून पंगा घेताय का?
अनाहितांशी पंगा घेण्यात हित नाही बर का !

जॉनविक्क's picture

29 Jul 2019 - 10:09 pm | जॉनविक्क

अनाहितांशी पंगा घेण्यात हित नाही बर का !

कोण आहेत या अनाहिता ? येथिल संपादक वगैरे आहेत काय ? जपूनच रहाणे श्रेयस्कर...

.

कसली गुगली टाकताय थोडं मराठीत समजेल असं सांगाकी :(

_°/\°_

झेन's picture

4 Aug 2019 - 10:21 am | झेन

पूर्वी हा विषय निघाला असता तर मधमाशांचं मोहोळ उठलं असतं

अनाहिताजी आपल्या वैयक्तिक परिचयाच्या भासतात. असो कोणाला या महोदया अथवा त्यांच्या लिखाणाची लिंक देता आली तर आंनदच वाटेल. बरेच प्रसिद्ध व्यक्तिमत्व वाटत आहे. इत्यलम.

संग्राम's picture

4 Aug 2019 - 4:54 pm | संग्राम
जॉनविक्क's picture

4 Aug 2019 - 5:48 pm | जॉनविक्क

मग यात प्रॉब्लेम काय आहे ?

म्हणजे जी व्यक्ती अनाहिता मधे सामील होते ती स्वतः ची ओळख जाहीर करून मगच सामील होते पण हीच ओळख पुरुष सदस्यांपासून लपवली जाते हा लिंगभेद सोडला तर छान आहे की सगळं

ह्या धाग्यावर फक्त दोन ते तीन मिपाकरांनी लिहिलय कि त्यांना स्त्री बॉस बरोबर काम करण्याची संधी मिळाली म्हणजे महिला वर्गाला उचपदस्थ जागांसाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागतील असे दिसते आहे.

Homo sapiens sapiens च्या अर्ध्या प्रजातीला पुढील प्रगती साठी शुभेच्छा