हा संभ्रम माझा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
23 Jul 2019 - 8:45 pm

नकळत ओढून नेतो
मिचकावत सोडून देतो
स्वतःशीच खिन्न हसतो
हा संभ्रम माझा

स्वप्नांच्या झुळूकी मनाला
तप्त पाऊलवाटा पायाला
अनवाणी चालू पाहतो
हा संभ्रम माझा

अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

नाखु's picture

23 Jul 2019 - 10:28 pm | नाखु

दुसरं कडवे तीन तीनदा वाचले तर प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ लागला, नक्की काय आहे ते पुन्हा पुन्हा सुसंगत वाचावे लागेल असे दिसते.

वाचकांची पत्रेवाला नाखु

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jul 2019 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार

जिओ चांदणे पैलवान जिओ
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2019 - 4:33 pm | चौथा कोनाडा

वाह, सुरेखच ! वेगळ्याच विषयावरची कविता वाचली !


अवखळ विचारांच्या वाऱ्यात
दात-ओठांच्या माऱ्यात
क्षणासाठी मलम होतो
हा संभ्रम माझा

हे विशेष आवडले ! सुंदर कल्पना !

चांदणे संदीप _/\_

जॉनविक्क's picture

24 Jul 2019 - 4:35 pm | जॉनविक्क

एकदम मस्त कडवं आहे ते