शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी

srahul's picture
srahul in जनातलं, मनातलं
23 Jul 2019 - 4:32 pm

शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी
१)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते.
२) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात येताच तत्काळ त्यांना त्या पद वरून बडतर्फ करून ते पद मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना दिले गेले.
३)खंडोजी खोपडे , मावळातील एक देशमुख , अफझल खानाला फितूर झाला म्हणून त्याचा उजवा हात व डावा पाय कलम करण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला आणी त्याची अंमल बजावणी तत्काळ झाली.
४).मुधोळ चे बाजी घोरपडे , शहाजी महाराजांना आदिलशाही तर्फे कपटाने कैद करण्यात यांचा हात होता. भोसले घराण्याशी हाडवैर बाळगणारा माणूस.मुधोळ वर अचानक छापा घालून , सामोरा समोर लढत देऊन त्याचा वध शिवाजी महाराजांनी केला.
५)नेताजी (नेतोजी?) पालकर , स्वराज्याचे सरलष्कर , पुरंदर च्या तहा नंतर शिवाजी महाराजांना मुघलांचे मांडलिकत्व पत्करावे लागले. त्या दरम्यान त्यांनी पन्हाळ गडा वर स्वारी केली. त्या वेळी नेताजी पालकर काही कारणाने उशीरा पोहोचले . या चुकीबद्दल त्यांना बडतर्फ करण्यात आले , आणी ते पद कुड्तोजी (प्रतापराव )गुजर यांना देण्यात आले.
६)याच प्रतापराव गुजर यांनी उमराणी च्या लढाईत आदिलशाही सरदार अब्दुल करीम बेह्लोल खान याचा पराभव केला , पण त्याला न पकडता धर्मवाट दिली (जिवंत जाऊ दिले) , त्यावर शिवाजी महाराजांनी “सला काय निमित्त केला?” अशी पत्राद्वारे त्यांची कान उघाडणी केली.
७) शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन महाराजांची धडपड सुरु होती. प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?" (याच वाक्याचा चुकीचा संदर्भ देऊन काही विद्वान(?)अभ्यासक(?)नव इतिहासकार(?) समाजात गैरसमज पसरवत असतात त्यासाठी हा संदर्भ)
८)दक्षीण दिग्विजयाच्या वेळी बेलवडी या ठिकाणी एका गढीत प्रभू देसाई सुभेदार होता.लढाईत तो मारला गेला. ती गढीजिंकली . त्या नंतर त्या सुभेदाराच्या पत्नीने शिवाजी महाराजांकडे सखुजी गायकवाड या सरदाराने आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार केली. त्या वर शिवाजी महाराजांनी सखुजी गायकवाड याचे डोळे काढून टाकण्याची आणी पन्हाळा किल्ल्यावर आजन्म अंधार कोठडीत डांबण्याचीशिक्षा दिली.
९)जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी अपार प्रयत्न केले त्यात एक धाडसी प्रयत्न असा केला गेला की लाय पाटील (जो त्या भागातील स्थानीक कोळी होता) यांनी रात्री जंजिरा किल्ल्याच्या तटाला शिड्या लावायच्या , मोरोपंत यांनी ठराविक वेळी सैनिक पाठवायचे. ते शिड्यांवरून तटा वर चढतील आणी किल्ला जिंकतील. पण काही कारणाने हे झाले नाही , तेव्हा महाराज मोरोपंतांना म्हणाले “कोताई केलीत , कार्य राहून गेले”
१०) जावळीचे मोरे हे स्वराज्य विघातक कारवाया करत असत. स्वराज्यातील गुन्हेगारांना आश्रय देत असत. वारंवार समजावून पण काही उपाय चालेना तेव्हा शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकून घेतले त्यानंतर मोरे हे रायगडावर (रायरी) पळाले . मग रायगड जिंकून त्यांना कैदेत ठेवले. तिथे पण त्यांनी आदिलशाहीशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांचा(यशवंतराव मोरे) आणी त्यांचा मुलगा कृष्णाजी यांचा शिरच्छेद करण्यात आला. दुसरा मुलगा बाजी मात्र पळून गेला.
११) जेजुरीला घडशी आणि गुरव यांच्यात वाद निर्माण झाला होता. परंपरेने पूजेचे काम ह्या दोन गटांकडे होते. घडशी (कोळी समाजातील पुजारी.) यांच्यावर गुरव दबाव आणत होते सतत. याप्रकरणात चिंचवडच्या देवांना मध्यस्थी करण्याची काहीही गरज नव्हती,पण मध्यस्थी केली. निकाल गुरवांच्या बाजूने दिला आणि घड्शींना तुरुंगामध्ये टाकले. खरोखर त्या किल्लेदाराने त्या घड्शींना पकडले आणि तुरुंगामध्ये डांबले. हा प्रकार शिवरायांना जेव्हा कळला तेव्हा असे काही संतापले कि , चिंचवडकर देवांचा खरपूस समाचार घेतला. महाराज म्हणाले, “तुमची बिरुदे आम्हासी द्या आणि आमची बिरुदे तुम्ही घ्या.” तुम्ही आता सत्ता संभाळा आणि आम्ही पूजापाठ करतो. त्यामुळे शिवराय राजकारणामध्ये कोणालाही लुडबुड करू देत नसत. सर्व कोळ्यांना मुक्त केले आणि त्या किल्लेदाराला (शिदोजी प्रतापराव गुजर) कामावरून काढून टाकले. महाराजांनी शिदोजी गुजराला जाब विचारला की , ‘ तू चिंचवडकर देवमहाराजांच्या सांगण्यावरून एका गरिबाला गडावर तुरुंगात डांबतोस ? हा अधिकार तुला कोणी दिला ? तू चाकर कोणाचा ? छत्रपतींचा की चिंचवडकर देवांचा ?’
१२)अफझल खान भेटीच्या वेळी नंतर च्या चकमकीत अफझल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर वार केला , महाराजांनी त्याला तीन वेळा वार परतवून समज दिली पण , नंतर मात्र तो ऐकेना तेव्हा मात्र त्यांनी एका घावात त्याला यमसदनाला धाडले.
१३)अफझल खान भेटीच्या वेळी प्रेमाने भेट होणार असे ठरले होते ,परंतु अफझल खानाने दगा करायचा प्रयत्न केला/किंबहुना दगाच केला , अल्पावधीतच त्याचा कोथळा शिवाजी महाराजांनी (वाघनखे कि बिचवा? वापरून) बाहेर काढला....
१४) महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता हेन्री रेव्हिंग्टन व गिफर्ड या इंग्रज अधिकाऱ्यांनी मराठ्यान बरोबर झालेला करार धुडकावून सिध्दी जोहरला तोफा तसेच दारुगोळा पुरविला व पन्हाळगडावर तोफाचा मारा केला. यामुळे इंग्रजाना अद्दल घडविण्यासाठी १६६१ मध्ये राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली व इंग्रज अधिकारी हेन्री रेव्हिंग्टन व गिफर्ड यास कैद करून खारेपाटण किल्ल्यात ठेवण्यात आले.नंतर वासोटा किल्ल्यावर बराच काळ त्यांना कैदेत ठेवले. पैकी एक जण कैदेत च मेला. बाकीच्यांची नंतर बऱ्याच अर्ज विनन्त्यांवरून (ब्रीटीशांन्च्या)सुटका झाली
१५)सूर्यराव सुर्वे आणी जसवंत राव दळवी यांना शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील होण्याचे आवाहन केले होते. परंतु महाराज जेव्हा पन्हाळगडाहून सिद्दी जोहर च्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे येत असताना विशाळगडाच्या पायथ्याशी या दोघांनी आदिलशाहीचे नोकर या नात्याने महाराजांना अडवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.या खेरीज सूर्यराव सुर्वे यांनी संगमेश्वर येथील महाराजांच्या लष्करी छावणीवर रात्री हल्ला चढवला . तो हल्ला पण सुभेदार तानाजी मालुसरे यांनी भक्कम पणे परतवून लावला.यानंतर मात्र महाराजांनी या दोघांच्या जाह्गीरीप्र देशांवर स्वारी करून ते आपल्या ताब्यात घेतले. पैकी सूर्यराव सुर्वे यांची शृंगारपुर येथे असलेली मसनद (राजगादी)लाथेने उडवून लावली असा इतिहासात उल्लेख आहे.
१६)संभाजी मोहिते , हे शिवाजी महाराजांचे सावत्र मामा (शहाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी तुकाबाई यांचे बंधू) , शहाजी महाराजांच्या जहागीरीतील सुपे परगण्यात त्यांनी आपली दादागिरी , लाच खाउन चुकीचे निवाडे देणे , निरपराध लोकांवर अन्याय करणे , मालमत्ता बळकावणे असे प्रकार सुरु केले. या तक्रारी शिवाजी महाराजांपर्यंत येऊन पोहोचल्या.शिवाजी महाराजांनी सुपे भागावर छापा घालून संभाजी मोहिते यांची गढी ताब्यात घेतली , त्यांना कैद केले आणी पुढील निर्णया साठी बंगळूर ला शहाजी महाराजांकडे रवाना केले. विशेष म्हणजे या त्यांच्या कृतीला शहाजी महाराजांनी पण आक्षेप घेतला नाही.
१७)हिरोजी फर्जंद , शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना मोलाची कामगीरी बजावणारा हां निष्ठावंत सेवक....भविष्यात संभाजी महाराजांच्या काळात मात्र राजद्रोही कारवायांमध्ये सापडला आणी हत्तीच्या पायी मृत्युदंड भोगून गेला.
१८)आण्णाजी दत्तो प्रभूणीकर , शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याचा प्रामाणीक पाईक , शिवाजी माहाराजांच्या काळात कुठलाही भ्रष्टाचार , लाचखोरी किंवा राजद्रोह वगैरे चा उल्लेख या माणसाच्या बाबतीत आढळत नाही , पण दैवदुर्विलास भविष्यात संभाजी महाराजांच्या काळात मात्र राजद्रोही कारवायांमध्ये सापडला आणी आणी आपल्या कर्माने आपला भाऊ सोमाजी दत्तो याच्या सह हत्तीच्या पायी मृत्युदंड भोगून गेला.
१९)बाळाजी आवजी चित्रे – चिटणीस ......शिवाजी महाराजांच्या काळात अत्यंत एकनिष्ठ , कर्तव्यनिष्ठ , स्वामिनिष्ठ माणूस , पण संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत तोही अण्णाजी दत्तो , हिरोजी फर्जंद यांच्या सह कटात असल्याचे आढळले , आणी हत्तीच्या पायी दिला गेला. नंतर तो दोषमुक्त होता असे कळले पण वेळ निघून गेली होती. स्वत: महाराणी येसू बाईंनी ही खंत छत्रपतींना बोलून दाखवली असे उल्लेख मिळतात.
तात्पर्य :- शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या समोर आलेले गुन्हेगार किंवा दोषी लोकं आणी त्यांना झालेल्या शिक्षा किंवा कानउघाडणी या प्रकारात सर्व “आडनावे” आलेली दिसतात , त्या मुळे अमुकच एक लोक फक्त महाराजांच्या बरोबर होते आणी तमुकच एक लोक फक्त महाराजांच्या विरोधात होते असं काही नाही तसेच महाराज फक्त अमुकच लोकांचे आणी अमुकच लोकं फक्त महाराजांचे असंही काही नाही. जो स्वराज्याशी निष्ठावंत होता तो महाराजांचा होता , जो स्वराज्याशी निष्ठावंत न्हवता तो महाराजांचा न्हवता. आणी महाराज हे विश्ववंद्य आहेत , ते सर्वांना सदैव पूजनीय च होते , आहेत आणी राहतील.
बाकी काल्पनीक टी व्ही मालिका , कथा , कादंबऱ्या यांच्या सुरस पणा विषयी आणी सत्यते विषयी काय बोलावे?वाचक सुज्ञ आहेत.......
राहुल साखवळकर
सातारा

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

एकुलता एक डॉन's picture

23 Jul 2019 - 9:36 pm | एकुलता एक डॉन

चांगला अभ्यास
पुलेशु

मुक्त विहारि's picture

24 Jul 2019 - 12:15 am | मुक्त विहारि

आमच्या गावातील राजे आता नौकरी करतात आणि लोटी घेऊन आलेली मारवाडी जनता, मुंबईवर आर्थिक राज्य करतात.

असो.....

हस्तर's picture

24 Jul 2019 - 11:22 am | हस्तर

तसे काही नाही ,मुख्य मंत्रांना विठ्ठल पूजे पासून रोखणारे पण मराठा च होते

मुक्त विहारि's picture

29 Jul 2019 - 7:37 pm | मुक्त विहारि

आणि मलिदा खातोय बिगर मराठी....

असो. ....

विनोदपुनेकर's picture

25 Jul 2019 - 9:55 am | विनोदपुनेकर

खरेतर शिक्षा देताना थोरल्या महाराजांनी त्यांची जात पात नाही तर त्यांचे दुष्कर्म किंवा स्वराज्य शी केलेली गद्दारी पाहून केली होती परंतु संभाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेबद्दल जास्त चर्चिले जाते हे बरोबर आहे ?

पूर्ण लेख वाचलात तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर या लेखाच्या शेवटी आपल्याला निश्चीत सापडेल..धन्यवाद

मंदार कात्रे's picture

26 Jul 2019 - 9:54 am | मंदार कात्रे

अतिशय कालसमर्पक लेख .आणि व्यवस्थित मांडलेले मुद्दे , धन्यवाद

हे नेटवर आधी वाचलेलं वाटत आहे...
असो, चांगली माहीती.

प्रसाद_१९८२'s picture

29 Jul 2019 - 7:09 pm | प्रसाद_१९८२

धाग्यात लिहिलेल्या चुका व शिक्षा याआधीच श्रीमान योगी कादंबरीत लिहिलेल्या आहेत, मग या धाग्यात नविन काय आहे ?

३)खंडोजी खोपडे , मावळातील एक देशमुख , अफझल खानाला फितूर झाला म्हणून त्याचा उजवा हात व डावा पाय कलम करण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला आणी त्याची अंमल बजावणी तत्काळ झाली.

कान्होजी जेधे यांनी शिवाजी महाराजांकडे मध्यस्थी करुन , खंडोजी खोपड्याचे प्राण वाचवले होते. पुढे शायिस्तेखान प्रकरणात खंडोजी खोपड्यांनी, कान्होजी जेधे यांची कागळी राजांकडे केली तेंव्हाच राजांनी खोपड्याचा एक हात व एक पाय तोडायची आज्ञा केली. खरेतर राजांनी त्याला गारदच केले असते मात्र जेध्याना दिलेल्या वचनापायी त्याचे प्राण वाचले.

" शायिस्तेखान प्रकरणात खंडोजी खोपड्यांनी, कान्होजी जेधे यांची कागळी राजांकडे केली तेंव्हाच राजांनी खोपड्याचा एक हात व एक पाय तोडायची आज्ञा केली. खरेतर राजांनी त्याला गारदच केले असते मात्र जेध्याना दिलेल्या वचनापायी त्याचे प्राण वाचले." हा श्रीमान योगी मधील कल्पनेचा भाग आहे. इतिहासात अशी नोंद नाही

योगविवेक's picture

4 Oct 2019 - 12:18 am | योगविवेक

आजकाल सारखे पुर्वी कोर्टात काळे कोटवाले मधेपडून स्टे ऑर्डर मिळवायची सोय नसावी..