DTH vs Firestick

Primary tabs

नजदीककुमार जवळकर's picture
नजदीककुमार जवळकर in काथ्याकूट
15 Jul 2019 - 4:41 pm
गाभा: 

नमस्कार मित्रहो,
DTH कि Firestick ह्या विषयी माहिती अर्धवट आहे,त्यामुळे चर्चेतून माहिती मिळेल ही अपेक्षा
Sports, Infotainment, Movies-Music( English, मराठी आणि हिंदी) आणि मुलांचे चांगले channels/series पाहायचे आहेत. HD विशेष आवडते.

सध्या D2H (आधीचे Videocon) चे connection आहे. Trai च्या नवीन rule मुळे आधीचे package जे चांगले होते ते cancel करावे लागले.काहीकेल्या पहिले सारखं package जमत नाही विशेषतः HD
महिन्याचा खर्च ₹400 पर्यंत गेला आहे.

OTT Apps बद्दल ऐकून आहे. Tatasky आणि Dish ने Binge आणि Smartstick बाजारात आणल्यात पण D2H ह्या बाबतीत मागे आहे

तर मंडळी
- Amazon Fire Stick चा अनुभव सांगा ? महिन्याचा साधारण खर्च सांगा ?
- कोणी Binge किव्हा Smart Stick वापरली असेल तर कळवा ? आणि खर्च किती ?
- ह्या व्यतिरिक्त अजून काही पर्याय आहेत ? Chromcast ? पण हे mobile हुन cast करावे लागेल
OTT Tv Box ? कोणी वापरला आहे ?

घरी सध्याचा Tv - Sony Bravia Led 80 cm : आहे ह्यात internet पाहण्याची व्यवस्था नाही.

तर कृपया चर्चा होऊद्या !

Mobile वरून type केल्या मुळे नीटनेटकेपणा नाही त्या बद्दल क्षमस्व !
धन्यवाद !!

प्रतिक्रिया

कंजूस's picture

15 Jul 2019 - 5:40 pm | कंजूस

कृपया थोडं थांबा. जिओ गिगाफाइबर ( वायर्ड इंटरनेट १५० एमबिपिएस), ओवरद एर (एमबिपिएस) दोन कनेक्शनस कधीही लॉन्च होतील. रिलायन्स एजीएम किंवा १५ ओगस्टला. तेव्हा कोणताही टिव्ही स्मार्ट होणारे. शिवाय इंटरनेट त्यातच.

नजदीककुमार जवळकर's picture

15 Jul 2019 - 7:44 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद ! ह्या आधी बाबतीत विचारणा केली आणि नाव नोंदवलं आणि मग त्यांचा sms आला कि अजून तुमच्या शेजाऱ्यांना नावं नोंदवायला सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टींना 6-8 महिने लागतील. आणि त्यांच्या offerings-limitations बघाव्या लागतील. घाई नाही थांबू शकतो

कंजूस's picture

15 Jul 2019 - 5:41 pm | कंजूस

ओवरद एर (५० एमबिपिएस)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 5:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्याकडे टाटा स्कायचे कनेक्शन असले तर आता Amazon Fire Stick आणि बरेच काही (निदान पहिले काही महिने तरी) चकटफू मिळणारी स्कीम चालू आहे. अधिक माहितीसाठी टाटास्कायच्या कस्टमर केअर वर विचारणा करा.

नजदीककुमार जवळकर's picture

15 Jul 2019 - 7:48 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद ! Tatasky नाही D2H आहे त्यामुळेच घोळ आहे. Tatasky आणि dish tv वर प्रत्येकी binge आणि smartstick आहे. त्यांच्यासाठी खरोखर मस्त option आहे

अमर विश्वास's picture

15 Jul 2019 - 7:20 pm | अमर विश्वास

मुळात फायरस्टिक हा DTH ला पर्याय होऊ शकत नाही . फायरस्टिक साठी वायफाय आवश्यक आहे .

अर्थात TV ला इंटरनेट कनेक्शन देण्याचा एक सोप पर्याय :

HDMI केबल आणा आणि लॅपटॉप TV ला जोडा .... सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय

नजदीककुमार जवळकर's picture

15 Jul 2019 - 7:53 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद ! होय इंटरनेट-wifi आहे. आणि laptop जोडून वापरतोय कधी कधी. पण laptop जोडुन ott app येत नाही. Tatasky Binge आणी Dishtv Smartstick हे DTH + Firestick (OTT) सारखे आहेत

लई भारी's picture

17 Jul 2019 - 8:57 am | लई भारी

हे २ आधीचे धागे बघा. बरीच चर्चा झाली आहे.
https://www.misalpav.com/node/44151
https://www.misalpav.com/node/44167

जवळपास सगळे हिंदी मराठी शो/सिरीयल मिळतात स्ट्रीमिंग ऍप वर. बहुधा थोड्या उशिराने येतात लाईव्ह शो.

voot - कलर्स हिंदी/मराठी (मोफत आहे)
zee 5 : झी मराठी आणि झी वर आलेले नवीन चित्रपट. बहुधा झी(हिंदी) चे पण आहे कंटेन्ट. (५० रु महिना बहुधा, पण बरेच शो मोफत पण मिळतात)
हॉटस्टार - स्टार नेटवर्क च्या सिरीयल/शो आणि बऱ्यापैकी स्पोर्ट्स (९९९ रु. वार्षिक)
sony liv : सोनी मराठी, सब, सेट(केबीसी, कपिल शर्मा शो दिसतंय). वापरलं नाही.
ही सगळी ऍप(इतर पण आहेतच, प्राईम, नेटफ्लिक्स आणि युट्युब सह) फायर टीव्ही स्टिक वर मस्त चालतात.

Jio TV -चिक्कार कंटेन्ट दिसतंय पण बहुधा फक्त मोबाईल वरच चालतंय

आपल्या सोयीनुसार बघता येतात हा खूप मोठा फायदा आहे. आणि साधारण १००० रुपयांमध्ये चांगल ब्रॉडबँड कनेक्शन मिळू शकत आजकाल.
१५-२०Mbps पुरतो स्पीड(प्रत्यक्षात यायला हवा).
भरपूर वेळ(४ तास?) घालवणार असाल, ते पण HD मध्ये तर महिन्याला किमान २००-३००GB चा प्लॅन पाहिजे.

आता 4G मोबाईल डेटा वर कितपत नीट चालतंय हे बघायला हवं, कारण दिवसाला १-१.५GB जवळपास सगळ्यांच्या प्लॅन मध्ये आहेच. त्यामध्ये तस तासभरच चालेल म्हणा.

अलीकडेच ऍमेझॉन आणि गुगल च साटंलोटं झालेलं दिसतंय. त्यांचे अँप्स दुसऱ्याच्या डिवाइस वर दिसू लागलेत.

नजदीककुमार जवळकर's picture

17 Jul 2019 - 2:45 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद ! बरीच मदत झाली.

सतिश गावडे's picture

21 Jul 2019 - 3:51 pm | सतिश गावडे

अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असेल तर Firestick उत्तम पर्याय आहे. वर म्हटल्याप्रमाणे जवळपास सर्व प्रमुख टीव्ही वाहिन्यांचे एप्स असून काही तास उशिराने सर्वच कार्यक्रम पाहता येतात.

बरेच न्यूज चॅनल युट्युबवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग करतात.

मी दीड वर्षांपूर्वी डिटूएच बंद करुन फायरस्टिक घेतली त्यानंतर टीव्ही कनेक्शनची गरजच भासली नाही.

जाता जाता: क्रोमकास्ट हा थर्ड क्लास प्रकार आहे. त्याचा विचारही करु नका.

कंजूस's picture

21 Jul 2019 - 3:34 pm | कंजूस

Gigafiber 12 Augustला जहिर होणार बहुतेक ( रिलायन्स एजिएममध्ये)

"जाता जाता: क्रोमकास्ट हा थर्ड क्लास प्रकार आहे. त्याचा विचारही करु नका."

गेले काही वर्ष क्रोमकास्ट वापरत आहे , थर्ड क्लास वेगैरे काही नाही वाटलं उलट फोन वरून कास्ट करणं फारच सोयीस्कर वाटतं

तुमची आवड , तुमची निवड ठरवते तसाच काही प्रकार आहे firestick vs chromecast