सुपरनॅचरल - भाग 3

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
11 Jul 2019 - 6:13 pm

भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619

भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807

जॉनची पत्नी मेरीला अझाझेल या डेमनने मारलं . त्याचा बदला घेण्याचा जॉनने निश्चय केला . त्यातून तो अमानवी अस्तित्वांना शोधून संपवणारा हंटर बनला ..असे अनेक हंटर त्याच्याआधीही होते पण जॉन मात्र अमानवी अस्तित्वांबाबत पूर्ण अनभिज्ञ होता . मेरीच्या मृत्यूनंतर शोध घेता घेता त्याचा इतर हंटर्सशी परिचय झाला .. त्यांच्या मदतीने आणि स्वतः अनुभव घेत तो लवकरच एक कुशल एक्स्पर्ट हंटर बनला . त्याने आपल्या 2 मुलांनाही लहानपणापासून तेच ट्रेनिंग देत वाढवलं .

त्याच्या पत्नीला मारणारा अझाझेल हा नरकातल्या 4 प्रमुख शक्तिशाली डेमन्सपैकी एक आहे . त्याचं नाव समजेपर्यंत त्याला यलो आईड डेमन या नावाने संबोधलं जातं ... सामान्य डेमन्सना एक्सॉर्सिजमने तात्पुरतं पुन्हा नरकात घालवता येऊ शकतं

पण अझाझेलवर एक्सॉर्सिजमचा काही परिणाम होणार नाही ..... जॉन त्याला मारण्याचा मार्ग शोधण्याच्या बराच जवळ पोहोचला आहे ... त्याला पूर्ण ठार मारू शकेल अशी एकमेव गन जी काही शतकांपूर्वी बनवली गेली होती आणि त्यानंतर बराच काळ बेपत्ता होती ती शोधून काढण्यात तो यशस्वी झाला आहे ..... या गनला कोल्ट असं नाव आहे . या कोल्टमध्ये वापरण्याच्या विशिष्ट गोळ्याही मर्यादित म्हणजे 6 -7 च आहेत ... त्यामुळे प्रत्येक गोळी जपून वापरणं त्यांना आवश्यक आहे .. या गोळीने सामान्य डेमनही मरतात पण गोळ्या संपल्या तर अझाझेलला संपवणं अशक्य आहे .

या बाप मुलांना कोल्ट मिळाली हे समजल्यावर डेमन्स जॉनला ट्रॅप करून किडनॅप करून एका हॉटेलच्या रूम मध्ये नेतात . गन त्याच्या मुलांकडे म्हणजे सॅम आणि डीन यांच्या ताब्यात असते . वडील जिवंत हवे असतील तर गन आपल्या हवाली करा असा निर्वाणीचा इशारा सॅम आणि डीन यांना दिला जातो .

दोघे मोठ्या कुशलतेने डेमन्सच्या पहाऱ्यातील जॉनला सोडवून आणतात . डेमनने त्याच्या शरीरात प्रवेश तर केलेला नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याच्यावर होली वॉटर शिंपडतात ... कारण होली वॉटर हे डेमन्ससाठी ऍसिडसारखं वेदनादायी असतं . पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्यामुळे तो पझेस झालेला नाही याची खात्री होते .

त्या प्रयत्नात सॅमचा जीव वाचवण्यासाठी डीनला कोल्टमधली गोळी वापरून एका सामान्य डेमनला मारावं लागतं . याआधीच अशाच जीवनमरणाच्या प्रसंगी गनचा वापर करावा लागल्याने आता फक्त 3 - 4 च गोळ्या शिल्लक असतात .

सॅम आणि डीन जॉनला घेऊन त्यांच्या लपण्याच्या केबिनमध्ये येतात ... आता काही वेळातच डेमन्स त्यांच्या मागावर येतील अशी परिस्थिती असते . डीन जॉनला विचारतो , मी गोळी वापरली त्याबद्दल तुम्ही रागावला तर नाहीत ना ? सॅमला वाचवण्यासाठी गोळी वापरण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता .

जॉन उत्तर देतो की तो रागावलेला नाही , उलट त्याला डीनचा , त्याच्या धाडसाचा अभिमान आहे ..

डेमन येत आहेत असं खिडकीतून दिसू लागतात जॉन डीनकडे कोल्ट गन मागतो . पण डीनला संशय आलेला आहे ... गोळी वापरली कळल्यावर खरंतर जॉन संतापला असता आणि डीनला उभा आडवा तासला असता ... असा त्याचा कडक / तिरसट स्वभाव डीन पुरेपूर ओळखून आहे .... त्यामुळे किडनॅप झालेला असताना डेमनने त्याला पझेस केलं असावं असा त्याला दाट संशय येतो ... होली वॉटरचा परिणाम झाला नसला तरी ... डीन गन द्यायला नकार देतो .. सॅमसुद्धा डीनच्या बाजूने उभा राहतो ... जॉन आपण पझेस नसल्याचं पटवण्याचा प्रयत्न करतो पण भाऊ ऐकत नाहीत ... मग एवढी तुला खात्री आहे झाड गोळी असा डीनला भावनाविवश करणारा पवित्रा जॉन घेतो .
डीनची दुविधा मनस्थिती होते ... आणि त्याचा फायदा घेऊन जॉनच्या शरीरात असलेला अझाझेल दोघांना उडवून भिंतींवर खिळवून ठेवतो , गन हातातून पडते .

https://youtu.be/srnMqERpf0Y

अझाझेल सांगतो की मी इतका पुरातन आणि शक्तिशाली आहे की होली वॉटरसारखी गोष्ट माझ्यासारख्यावर परिणाम करू शकत नाही .... डीन अझाझेलचा अपमान करतो . त्याबरोबर डीनच्या छातीतून रक्ताच्या धारा वाहू लागतात ... डीन जॉनला डॅड अशी हाक मारून जागृत करण्याचा प्रयत्न करतो .. जॉन मोठ्या प्रयत्नाने स्वतःच्या शरीराचा काही क्षणांसाठी ताबा घेतो आणि सॅम आणि डीन अझाझेलच्या बंधनातून मुक्त होतात , लगेच सॅम गनचा ताबा घेतो आणि जॉन / अझाझेलवर रोखतो .

https://youtu.be/sk-NYlWJq9Q

तू मला मारलंस तर तुझा बापसुध्दा मरणार , अशी दर्पोक्ती अझाझेल करतो ... सॅम जॉनच्या छातीत गोळी घालण्याऐवजी पायात गोळी घालतो . शरीराचा ताबा अझाझेलकडून जॉनकडे येतो . तो सांगतो की डेमन शरीर आता सोडेल कोणत्याही क्षणी..... मी फार तर काही क्षण त्याला धरून ठेवू शकतो ... तेव्हा छातीत गोळी घाल ... ह्यालाच शोधण्यात मी माझं पूर्ण आयुष्य खर्च केलं आहे , ह्यानेच तुमच्या आईला आणि सॅमच्या गर्लफ्रेंडला मारलं आहे .... छातीत गोळी घालण्यासाठी जॉन अक्षरशः भीक मागतो .... तिकडे जखमी अवस्थेत डीन वडील मरता कामा नयेत म्हणून काही झालं तरी गोळी घालू नको अशी विनवणी करत असतो ... शेवटी सॅम गन खाली घेतो आणि डेमन जॉनच्या शरीरातून बाहेर पडतो .... जॉन हताश होऊन सर्व काही हरल्यासारखी त्याची मनस्थिती झालेली असते .

तिथून बाहेर पडताना त्यांच्या गाडीला डेमन्स अपघात घडवून आणतात . डीनला गंभीर इजा होते ... त्याला वाचवण्यासाठी जॉन स्वतः त्याच यलो आईड डेमनला म्हणजे अझाझेलला आवाहन करून त्याच्याशी डील करतो ... डीनला वाचवण्याच्या बदल्यात गन त्या डेमनला द्यावी लागते शिवाय जॉनचा आत्मासुद्धा . त्याला 10 वर्षंपण मिळणार नाहीत ... डीन बरा झाला की लगेच जॉनचा मृत्यू होणार .... पण जॉन ते डील स्वीकारतो ....

तिकडे जबरदस्त दुखापत झालेला डीन आऊट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स घेत असतो ....

https://youtu.be/1ic1AvlP1bo

त्याला मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार करायला आलेली रिपर / मृत्यूनंतर आत्म्याला न्यायला आलेली कर्मचारी एंजल त्याला समजावत असते .... त्याचवेळी यलो आईड डेमन म्हणजे तिने धारण केलेल्या शरीराचा ताबा घेऊन डीनला परत आपल्या शरीरात पाठवतो ,

https://youtu.be/h5j2JF_6Abg

त्याच्या सर्व इंटर्नल जखमा भरून आलेल्या असतात .. त्यानंतर डीनशी बोलून झाल्यानंतर काही वेळाने जॉन मृत अवस्थेत सॅमला आढळतो ....

https://youtu.be/xQSKQFz_MQw

कलानाट्यप्रकटनलेख

प्रतिक्रिया

भाग दोन मध्ये लिहिलेला काही भाग इथे रिपीट झाला आहे.

हो , मुद्दामच रिपीट केला आहे ..

यशोधरा's picture

11 Jul 2019 - 6:48 pm | यशोधरा

मी भयपट बघत नाही. मला भीती वाटते जाम.

या मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत .... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ... भयपटांमध्ये बऱ्याच वेळा नुसतं दचकावून वगैरे घाबरवण्याच्या तंत्राचा वापर केलेला असतो .. कॅरॅक्टर डेव्हलपमेंटला त्यात फारसं महत्व नसतं .

या सिरिअल मधली अनेक पात्रं प्रेक्षकांच्या अगदी आवडीची बनून जातात .... उदाहरण म्हणजे बॉबी हे पात्र - बॉबी हा हंटर दाखवला आहे , बॉबीला स्वतःची मुलं नाहीत , पत्नी मरण पावली आहे .. जॉनची हंटिंगच्या निमित्ताने बॉबीशी ओळख आणि मैत्री होते ... जॉन ज्या पद्धतीने मुलांना वाढवत असतो कडक मिलीटरी शिस्तीत, सतत ट्रेनिंग ते बॉबीला पसंत नसतं .. जेव्हा जेव्हा जॉन मुलांना बॉबीकडे सोडून हंटिंगला जात असे तेव्हा बॉबी त्यांना लहान मुलासारखं खेळता , मजामस्ती करता येईल याकडे लक्ष देत असे . दोघे मोठे होऊन स्वतः हंटर्स झाल्यावरही बॉबीशी असलेली त्यांची मैत्री टिकून राहिली .. त्यांच्यावर तो स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करतो ..... बॉबी हंटिंगसाठी लागणाऱ्या माहितीचा एक्स्पर्ट आहे , त्याची अनेक हंटर्सना आणि सॅम आणि डीन यांनाही अनेकदा मदत होते ... जॉनच्या कडक स्वभावाच्या तुलनेत काहीसं सॉफ्ट केअरिंग कॅरॅक्टर दाखवलं आहे . जॉन आणि त्याच्या मुलांमधले वाद , त्याचा दृष्टीकोन , त्याचा हुकूम गाजवण्याचा स्वभाव , सॅम मोठा झाल्यावर त्याने जॉनला झुगारून घराबाहेर पडणं , डीनची त्या दोघांच्या मध्ये होणारी घालमेल ... एकीकडे वडिलांचा प्रत्येक शब्द ऐकायचा हे त्याच्या रक्तात भिनलेलं आहे दुसरीकडे भावाला गमवावं लागण्याचं दुःख आहे , काही करून तिघांचं लहानसं कुटुंब परत एकत्र आणायची त्याची इच्छा आहे पण लहान भाऊ आणि वडील यांच्यात सतत खटके उडतात त्यात मध्यस्थी करताना त्याचा जीव मेटाकुटीला येतो ...

पुढे जॉनने त्याची माफी मागताना दिलेलं स्पष्टीकरण - की तुमच्या आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला सुरक्षित ठेवणं , स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम बनवणं हे माझं उद्दिष्ट बनलं , ते साध्य करत असताना मी तुमचा ड्रिलमास्तर बनत गेलो आणि वडील बनण्यात कुठेतरी कमी पडलो .....

असे खूप इमोशनल प्रसंग , गुंतागूंंती दाखवल्या आहेत ... ते बघताना रंगून जायला होतं .

हंटिंग साठी जाताना कुठे कशासाठी जात आहोत याचं कारण न सांगता जॉन सॅम आणि डीन यांना एके ठिकाणी ड्राइव्ह करायला सांगतो . कुठे , कशासाठी जात आहोत असे प्रश्न विचारायची डीनला गरज वाटत नाही , डॅड आवश्यक ती माहिती योग्य त्या वेळी सांगणारच हे त्याला माहित आहे .... पण सॅमला राग येतो , की पार्टनरसारखं न वागवता जॉन अजूनही आपल्याशी बरोबरीच्या नात्याने माहिती शेअर करत नाही , आपलं मत विचारात घ्यायची तसदी घेत नाही ... हुकूम सोडतो ... दोघांत खटका उडतो . म्हणूनच मी घर सोडून गेलो असं सॅम म्हणतो तर आम्हाला तुझी गरज असताना तू सोडून गेलास ( इतका तू स्वार्थी आणि बेजबाबदार आहेस ) असा आरोप जॉन करतो , यावर उसळून - घरातून बाहेर गेल्यावर परत येऊ नकोस , तुझा आमचा संबध संपला असं जॉनने म्हटल्याची आठवण सॅम करून देतो . डीन कसंतरी त्यांना शांत करतो आणि सगळे पुढच्या कामासाठी निघतात .

https://youtu.be/T1aSCXK_lF4

डीन एक काम करायला गेलेला असतो , जॉन आणि सॅम त्याची वाट पाहत असतात ... तेव्हा जॉन सॅमला सांगतो , ज्यावेळी त्याचा जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक महिन्याला 100 डॉलर्स काढून त्याच्या नावाने अकाउंट मध्ये ठेवले .. डीन साठी सुद्धा तसंच - दोघांच्या शिक्षणासाठी म्हणून .... हे मेरीचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे सॅम सहा महिन्यांचा होईपर्यंत .... म्हणजे तो सांगू इच्छितो की हे हंटिंगचं आयुष्य त्याला आपल्या मुलांसाठी अपेक्षिलेलं नव्हतं ... पण मेरीच्या मृत्यूनंतर त्याचा बदला घेणं आणि मुलांना सुरक्षित ठेवणं या विचाराने तो एवढा झपाटून गेला की त्यांना काय हवं आहे याचा विचार करणं बंद झालं ... तू जेव्हा कॉलेजला जायचं म्हणालास तेव्हा माझ्या डोक्यात आधी हा विचार आला की तिकडे तू एकटा असणार , असुरक्षित , काही झालं तर वाचवायला आम्ही नसणार म्हणून मी विरोध केला .... तुझी स्वप्नं - आकांक्षा यांचा मी विचारच करत नव्हतो .... तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस हे मी समजून घेऊ शकलो नाही ... सॅम म्हणतो मी वेगळा नाही , माझी प्रेयसीही त्यांनी आईला मारलं तशीच मारली .. मी तुम्हाला समजू शकतो ... मग मस्करीत त्या कॉलेजसाठी ठेवलेल्या फंडचं काय झालं म्हणून विचारतो , त्यावर जॉन ते पैसे बंदुका , गोळ्या आणि इतर शस्त्रांवर खर्च होऊन गेले म्हणून सांगतो आणि दोघे हसू लागतात ... तेवढ्यात डीन येतो आणि मगाशी भांडण झालेलं असून आता दोघे हसत आहेत हे बघून आश्चर्यचकित होतो पण दाखवत नाही .

https://youtu.be/LEoLDiPtYJw