दिल्ली-चावडी बाजार मंदिर घटना ३०-जुन-२०१९

वडगावकर's picture
वडगावकर in काथ्याकूट
5 Jul 2019 - 8:00 am
गाभा: 

कुठेतरी एकदोन बातम्या वाचनात आल्या....तीस जून च्या रात्री घडलेली घटना आहे म्हणे

तीन चारशे शांतता प्रिय लोकांचा एक जमाव अल्ला हो अकबर आणी पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देत मंदिरात घुसला आणी तोडफोड सुरु केली...

"दिल्ली के चावड़ी बाजार में मंदिर पर हमला, अल्लाह हो अकबर नारे के साथ मूर्तियों को पहुंचाया नुकसान |"

"पुरानी दिल्ली के चावड़ी बाजार क्षेत्र में एक स्कूटर खड़ा करने को लेकर हुए झगड़े ने साम्प्रदायिक रंग ले लिया है एक मंदिर के अंदर की मूर्तियों को ध्वस्त कर दिया गया है, मंदिर के अंदर की मूर्तियां तोड़ने का आरोप समुदाय विशेष पर लग रहा है. उसके बाद सोमवार को क्षेत्र में तनाव रहा। पुलिस ने बताया कि चावड़ी बाजार के लाल कुआं क्षेत्र में किसी अप्रिय घटना को टालने के लिए सुरक्षा बढ़ा दी गई है।"

काही प्रश्न...

१-मीडिया, सेक्युलर्स ,बॉलिवूड कुणालाच ही खबर माहीत नसेल का? की त्यांनी शहामृग व्हायचं ठरवलंय.?
२-कोणत्याही पेपर मध्ये हि घटना का आली नसावी.
३-हिंदू अल्पसंख्याक असलेल्या भागात ते अ-सुरक्षित असतात का ?
४- अचानक तीन चारशे लोकांचा जमाव रात्री बारा एक वाजता जमा होतो म्हणजे हि घटना पूर्व नियोजित होती का
५-धरना किंग केजरीवाल सुमडी मध्ये कुठे बसलेत (अशा काही घटना इतर समुदाया बरोबर घडल्या की त्यांना भयंकर चेव येतो )

तुम्हाला काय वाटतं?,वरच्या एखाद्या प्रश्नच उत्तर सापडतंय का ?

प्रतिक्रिया

या बातम्या कुठे वाचनात आल्या? त्या बातम्यांचे दुवे मिळू शकतील का? नाहीतर काही काळाने या लेखनाला अपप्रचार म्हटले जाऊ शकते -- (समजा) जरी ते खरं असलं तरीही.

तीच तर खरी गंमत आहे ताई ,थिस ईज द ब्युटी ऑफ इंडियन मिडीया,
मानो सारी मीडिया को सांप सुंघ गया हो किसी को कुछ पता नही.
एनीवे , काही की वर्ड्स घेऊन गुगल केलं तर दोन तीन बातम्या आणी एक दोन व्हिडीओ सापडतील.

जालिम लोशन's picture

5 Jul 2019 - 12:46 pm | जालिम लोशन

शंकासुर!

युट्युब वर सुदर्शन न्युज, राहुल केडिया चे व्हिडियो पहा

mayu4u's picture

5 Jul 2019 - 11:16 am | mayu4u

Chawri Bazar temple vandalism: Fourth person arrested, Delhi police chief meets Amit Shah
https://www.thehindu.com/news/cities/Delhi/chawri-bazar-temple-vandalism...

Chawri Bazar tense following scuffle over parking
https://www.thehindu.com/news/cities/Delhi/scuffle-over-parking-in-delhi...

Traders return to Chawri Bazar; six more nabbed for vandalism
https://www.thehindu.com/news/cities/Delhi/traders-return-to-chawri-baza...

इरामयी's picture

5 Jul 2019 - 7:07 pm | इरामयी

अरे बाप रे! भयानक प्रकार दिसतोय. हा व्हिडियो जरूर पहा:

माहितगार's picture

6 Jul 2019 - 1:15 pm | माहितगार

चावडी बाजार दिल्ली येथील मंदिराच्या निषेधार्ह तोडफोडीची बातमीची मिपा ताज्या घडामोडी धाग्यात ४ जुलैला दखल घेतली गेलेली दिसते पण मुख्यधारेतील बातमी माध्यमांवर अवलंबून असलेल्यांना हि बातमी उशिराने आणि वॉटर्ड डाऊन करून पोहोचवली गेली त्यामुळे कदाचित अद्यापही बर्‍याचजणांना बातमीची कल्पना नसावी.

थोडक्यात झाले काय तर दिल्लीतील हिंदू अल्पसंख्य असूनही १०० वर्षे जुने मंदिर व गेली तीसेक वर्षे पुरेसा धार्मीक सौहार्द असलेल्या परिसरात पार्किंगवरून झालेल्या बाचाबाचीवरून, बाचाबाची करणार्‍या दोघांनाही पोलीसांनी आत घेतले. योगायोगाने दोघांचे धर्म वेगळे होते. त्या बातमीचे वृत्त व्हॉट्सापवरून 'विशीष्ट समुदायात' लिंचींगचे वृत्त या अफवेच्या स्वरुपात पसरले. मागच्या काळातील लिंचिंगच्या इतरत्रच्या बातम्यांमुळे असेल का काय पण पोलीस स्थानकावर पहाता पहाता शेकडोच्या संख्येचा समुदाय जमा झाला, त्यातील बहुतांश समुदायाला समजावून परत पाठवण्यात पोलीसांना यश आले असावे. पण तरीही त्यातील एका जमावाने जरा उशिराने ज्या माणसाशी बाचाबाची झाली त्याच्या घराच्या विरुद्ध दिशेस असलेल्या मंदिराची हकनाक तोडफोड केली.

व्यक्ती आणि घटनांचा मंदिर आणि त्यातील मुर्तींशी संबंध नसताना अशी तोडफोड निषेधार्हच ठरते.

मुख्य धारेच्या माध्यमांचे लक्ष्य क्रिकेट शिवाय मुंबईतील पाऊस आणि कुणि भाजपा नेतापूत्र आकाश विजयवर्गीय यांच्या कारनाम्यांकडे लागले होते. मुख्य धारेच्या माध्यमांनी दाबलेल्या मंदिराची तोडफोड बातमीचा व्हिडीओ सर्वप्रथम सुदर्शन नावाच्या चॅनलने रिलीज केला व त्यानंतर ट्विटरवर दिल्लीटेम्पल टेरर अटॅक असा हॅशटॅग सकाळी ५०० ला असणारा संध्याकाळार्यंत दिडलाख ट्विट पर्यंत पोहोचल्या नंतर मुख्य धारेतील माध्यमांना जन आक्रोश वाढणार असल्याचे लक्ष्यात आले तो पर्यंत अगदी भाजपा खेम्यातील टिव्हीवरून बातमीची दखल टाळली गेली,

कायदा हातात घेणारे चुकीचे कृत्य चुकीचे असते मग ते बहुसंख्यकांनी केले काय अथवा अल्पसंख्यकांनी केले काय, दोन्हीचा सारखाच निषेध केला जावयास हवा. लोकांची माथी लगोलग भडकू नयेत म्हणून संवेदनशील बातम्या भडकाऊ शीर्षके न वापरता समतोल स्वरुपात दिल्या जावयास हव्या. नेमकी ती काळजी न घेता एका समुदायाने दुसर्‍या समुदाया बद्दल केलेल्या चुकीच्या कृत्यांची दखल घ्यायची पण विरुद्ध बाजूच्या समुदायाच्या चुकीच्या कृतींची दखलच घ्यायची नाही ही काही आदर्श स्थिती नव्हे.

मंदिर तोडफोड घटनेनंतर पोलीसांनी स्थानिक सामाजिक सौहार्दाचा यथोचित उपयोग करून घेत परिस्थिती यशस्वीपणे नियंत्रणात ठेवली हे कौतुकास्पदच होते. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना गुन्हेगारांना शिक्षा होते आहे आणि मौन राखून परिस्थिती नियंत्रण पडद्या आडून पहाणे जरूरी होते हे समजण्यासारखे आहे.

पण माध्यमांनी आणि विशेषतः उठता बसता केवळ बहुसंख्यांकाच्या नावाने बोटे मोडणार्‍या राजकारणी, तथाकथीत विचारवतं आणि पत्रकारांची भूमिका समन्यायी ठरली नाही हे ह्या निमीत्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. भाजपेतर राजकारणी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी बोटचेपेपणा आणि लांगुलचालनात्मक भूमिका वठवतात या बहुसंखय्कांच्या दाव्यात तथ्य असण्यास ठसठशीतपणे अधोरेखित करणारे वर्तन या राजकारणी मंडळींनी पुन्हा एकदा केले. माध्यमांनी समतोल बातम्या न देता बातम्या दाबण्याने अफवांना अधिक उत येतो अन्यायाची भावना अधिकच व्यापक होऊन अफवा आणि परस्पर हिंसेचे चक्र वाढू शकते हे समजण्यास अती विद्वत्ता लागते असे नसावे.

अरविंद केजरीवालांचे आमदार घटनास्थळी होते. त्यांच्या वर्तनाच्या योग्यायोग्यतेची खातरजमा काळाच्या ओघात होईल पण अरविंद केजरीवालांनी गैरकृत्याबद्दल साधा निषेधही न नोंदवणे ह्याचे समर्थन अरविंद केजरीवालाम्च्या समर्थकांनाही जड जाणारे असावे. बातमी दाबली तर आज नाही उद्या लोकांपर्यंत पोहोचते. आधी विश्वासार्हता उडवून घ्यायची मग मी सेक्युलर आहे म्हणत फिरायचे हे जनता स्विकारणार नाही तथाकथित सेक्युलरांनी जनमानसातील सेक्युलॅरीझमची विश्वासार्हता उडवण्याचा विडाच उचलला आहे.

राहुल गांधीचेही मौन तेवढेच प्रश्नकारक होते नाही म्हणण्यास काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून खेद प्रकट केला गेला अभिषेक मनु सिंघविंनी घटनेबद्दल खेद व्यक्त करून बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भले नेतेपदाच्या राजीनामा पत्राची त्या दिवशी तयारी करत असोत आणि ३ जुलैला ट्विटर राजीनामा दिला असेल . राजीनाम्यातून भाजपाच्या पेक्षा आपण वेगळे असल्याचे दावा करणारे राहुल गांधी योग्यवेळी दुसर्‍या बाजूच्या धर्मांधतेचा निषेध करण्यास कमी पडले. जे अभिषेक मनु सिंघवींना जमु शकते ते अरविंद केजरीवाल किंवा राहुल गांधींना न जमण्यासारखे काय होते. दंगली होण्यासारखी वक्तव्ये करू नका पण गैरकृत्याच्या इतर बातम्यांचा निषेध करताना तुम्ही नमेका याच बातमिबद्दल खेदही व्यक्त करण्यास कमी पडता?? .

ओवेसीसुद्धाबरे ज्यांनी घटनेचा निषेध करण्याचे तारतम्यतरी दाखवले. बहुसंख्यातील तथाकथित सेक्युलर नेत्यांएवजी जनतेनी मोदींवर भरवसा दाखवला त्यात नवल नाही.

काही वेळा कुकृत्ये घदवून आणि अफवा पसरवून शांतता भंगात काही वेळा नाराज व्यापारी, विरोधीपक्ष ते शत्रुराष्ट्रे यांचा हात असू शकतो. इम्रान खानची निवडणूकपुर्व काही वक्तव्ये पाहील्यास त्यांना भारतातील शांततेस नख लावण्यात रस असू शकतो. त्यामुळे अशा बातम्यांची वृत्ते दाबू नयेत पण जनतेनेही सरकारवर कारवाईसाठी रचनात्मक मार्गांनी दबाव वाढवावा पण बदल्याच्या भवना मनात बाळगून कायदा हातात घेऊन शत्रुराष्ट्राम्ची अप्रत्यक्षपणे भारतात अशांतता माजवण्याची इच्छा नकळत पूर्ण करणारी कृत्ये करू नयेत असे मला वाटते.

आजही दोनएक निषेधार्ह वृत्ते दिसताहेत अशा सर्वच कृत्यांविरुद्ध सरकारे यथोचित कार्यवाही करतील अशी अपेक्षा करूया.

वडगावकर's picture

6 Jul 2019 - 1:25 pm | वडगावकर

माझ्या एका मित्रानी हा लेख वाचला आणी मलाच झाप,झाप, झापलं.
झालं गेलं पार पडलं तु उगीच विषय उकरुन काढतोयेस, तिथला इमाम सुद्धा मंदिर पुन्हा बांधून द्यायला तयार आहे , तिथली सगळी परिथिती सुद्धा सुरळीत झालीये आता.
एक गोष्ट फार बरी झाली ,मीडिया ने उगीच आगीत तेल टाकलं नाही ,वगैरे वगैरे.....

शेवटी मलाच वाटलं की मीच अ-सहिष्णू ,धर्माध झालोय कि काय की काय ?

माझ्या पुरता हा विषय आता बंद, पूर्ण विराम
लॉग आउट.

माहितगार's picture

6 Jul 2019 - 1:43 pm | माहितगार

माझे लेखन अनेक कारणांनी अनेक जण वाचत नाहीत आणि धागा लेखकाने माझा प्रतिसाद वाचला नसेल तर नवल नाही.

संबधित समुदायातील खर्‍या अर्थाने शांतता प्रेमी मंदिराचे नुकसान भरूनही देतील पण धागा लेखकाचा माहिती दडपऊ इच्छिणारा मित्र असो वा मौन धारणारे इतर मौनव्रती असोत तुमच्या मौनाने शांततेत भरपडत नाही तुमच्यावरचा त्याही पेक्षा स्मन्यायी नसलेल्या धर्मनिरपेक्षतेवरचा विश्वास उडतो.

राजकीय व्यवस्था बहुजनांच्या विश्वासावर चालते आणि एकतर्फी मौन हे जनतेच्या धर्मनिरपेक्षतेवरील विश्वासास मोठा सुरुंग लावते. जनतेचा असा विश्वास उडाल्यानेच सेक्युलरांना जनतेनी दूर केले. असेच दुटप्पी वागत राहीले तर कागदोपत्रीतरी असलेला सेक्युलॅरीझम संपण्यास वेळ लागणार नाही हे धागालेखकाने तथाकथित धर्मनिरपेक्ष मित्रास सुनावले असते तर धागालेख काढण्याचा उद्देश्य खर्‍या अर्थाने सफल झाला असता असे आमचे व्यक्तिगत मत. असो.

अभ्या..'s picture

6 Jul 2019 - 8:50 pm | अभ्या..

माझे लेखन अनेक कारणांनी अनेक जण वाचत नाहीत आणि धागा लेखकाने माझा प्रतिसाद वाचला नसेल तर नवल नाही.

साधु.....
अखेर मिपाच्या रुपाने बोधीवृक्ष गवसला म्हणायचा...
.
आम्हालाहि असे दिव्य आत्मज्ञान प्राप्त व्हावे हि सर्वशक्तीमान जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना.
एक इसेन्शिअल सबप्रार्थना: हे दिव्यज्ञान कायम राहो.
;)

यशोधरा's picture

6 Jul 2019 - 8:55 pm | यशोधरा

माहितगार, वाचतच नाही, असे नाही. काही लेख जरुर वाचते. काही प्रतिसादही वाचते. काही, काही उगाच जड बंबाळ लिहिलेले वाटते (मला), तेवढे सोडून देते.

नाखु's picture

7 Jul 2019 - 9:36 am | नाखु

दहा धाग्यात पुरेल इतका मजकूर एकाच प्रतिसादात देत असल्यामुळे होत असावे असा कयास आहे.
मिपाकरांना शतशब्द कथा वाचनामुळे दीर्घकथा वाचण्यात रुची नाही तर कादंबरी कशी वाचतील??

वाचकांचीच पत्रेवाला नाखु

boomlive.in/ नावाच्या छोटे खानी वेबसाईटवर अफवेच्या प्रसाराचा घटनाक्रम अधिक समतोल पद्धतीने दिलेला दिसतो. प्रॉपर फॅक्ट चेकसह समतोल माहिती दिली तर लोकांचा विश्वास रहातो. केवळ अर्धवट सेंसॉरशीप केली तर अफवांना अधिकच बळ मिळते.

समतोल आणि समन्यायीपणाकडे तथाकथित सेक्युलरांकडून होणार्‍या दुर्लक्षाचे आणखी एक उदाहरण, इथे एका समुदायाच्या डोळक्याने केलेला धार्मिक स्थानावर केलेला हल्ल्याची बातमी वॉटरडाऊन करण्याचा आग्रह होतो.

आता दुसर्‍या बाजूला दुसर्‍या समुदायाच्या टोळक्यांनी केलेले उपद्व्याप चघळणे टाळले जाते का तर तसेही नाही. ते ही असो एन डी. टिव्ही च्या २००२ गुजराथ कव्हर करणार्‍या पत्रकार रेवती लॉलच्या नव्या पुस्तकाचा रिव्ह्यू आला आहे. (कथित) क्राऊड फंडींग मिळवून पत्रकार बाईसाहेबांनी २००२ गुजराथी दंगलीत सहभागी व्यक्तिंचा अभ्यास करून पुस्तक लिहिले. दंगलीत प्रत्यक्ष सहभागी व्यक्तींच्या सहभगावर संशोधन आणि अभ्याकरून भारतात लेखन अगदीच अत्यल्प झाले असावे. तत्वतः कल्पना चांगली आहे, पण या पत्रकार महिलेने तब्बल आठ लाखांचे फंडींग मिळवून किती व्यक्तींचा अभ्यास केला तर केवळ ३ फक्त .

केवळ तीन व्यक्ति तर तीन व्यक्ति पण त्यात दुसर्‍या बाजूच्या समाजातील दंगलीत सहभागी एकातरी व्यक्ती वर संशोधन आणि अभ्यास नको का ? पत्रकार आणि माध्यमांचा सातत्यपूर्वक असलेला एकांगीपणा डोक्यात जातो. त्यांच्या एकांगी भूमिका दीर्घकाळात अल्पसंख्यकांना मदत दूर राहिली समन्यायाच्या अभावामुळे बहुसंख्यांकांचा जेव्हा निरपेक्षतेवरचा विश्वास उडतो तेव्हा अल्पसंख्यकांचे अधिक नुकसान होते.

'तथाकथित' धर्मनिरपेक्ष केवळ कथित अल्पसंख्यांकाकडून होणार्‍या चुका झाकून नेणार किंवा वॉटरडाऊन करणार आणि केवळ बहुसंख्यकांकडुन होणार्‍या चुकांचा बोभाटा करणार . कथित अल्पसंख्य कांची काही टोळकी एकाच बाजूच्या असमतोल बातम्यावाचून स्वतःला खतरे मध्ये समजून पुन्हा कायदा हातात घेणार , अल्प संख्यांच्या बाबत बोटचेपेपणा केलेला बातम्या दाबल्यातरी हस्ते परहस्ते बहुसंख्यां पर्यंत आज ना उद्या पोह्चतोच तेही मग निरपेक्षता बाजूस ठेवण्याची मागणी करणार . एक मेकांना कायदा हातात घेऊन प्रतिउत्तरे देण्याची भाषा होणार काही युवक या भाषेच्या भावनेच्या आहारी कायदा हातात घेऊन परस्पर हिंसेचे चक्र चालवणार.

जनतेस धार्मिक गोष्टीचे राजकारण करणारे पक्ष कमित कमी राजकारण न लपवता करतात हे एकांगी अणि दिखाऊ तथाकथित धर्मनिरपेक्षांपेक्षा बरे वाटावयास लागते. त्यामुळे अत्यल्पसंख्य शुद्ध धर्मनिरपेक्ष कुठे असले तरी लोक त्यांनाही गिनत नाहीसे होतात, कारण लोकांचा एकुणच धर्म निरपेक्षतेवरचा विस्वास उडालेला अस्तो. असो.

जालिम लोशन's picture

6 Jul 2019 - 5:31 pm | जालिम लोशन

सहमत

माहितगार,

कारण लोकांचा एकुणच धर्म निरपेक्षतेवरचा विस्वास उडालेला अस्तो.

अगदी बरोबर बोललात. या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांचं फक्त एकंच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे हिंदू व मुस्लिमांत भांडणं लावणं. हेच धोरण इंग्रज राबवायचे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे उघडपणे इंग्रजांची गुलामगिरी नसली तरी छुपेपणाने तिच्याकडे भर वेगात मार्गक्रमण करणं आहे.

आ.न.,
-गा.पै.

भंकस बाबा's picture

7 Jul 2019 - 10:40 am | भंकस बाबा

हे धर्मनिरपेक्षता वेगेरे सगळे थोतांड आहे.
आम्हाला लढण्याची धमक नाही हीच गोष्ट खरी!
शहामृग बनलेले बरे

जोपर्यंत हि कीड स्वतःच्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू जागा होत नाही पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.