आयुष्य

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Jun 2019 - 9:31 am

आयुष्य खूप साधे आणी सरळ आहे पण दिसते इतके सोपे पण नाही..
आयुष्य समजावून घेण्याच्या भानगडीत न पडलेले बरे..
मस्त जगत राहणे हाच एक मार्ग आहे..
ब्रह्मांडातल्या अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करायला उत्सुक आहेत..
तुमचा ज्या प्रमा्णात विश्वास व श्रद्धा आहेत त्या त्या प्रमाणात तुम्हाला मदत मिळत असते.
*
आयुष्याचा उद्देश काय? मी इथे का आलो आदी प्रश्नाच्या जंजाळात अडकू नका..
कारण त्याची उत्तरे आपणास मिळणार नाहीत..
जीवन जगण्यासाठी आपण कारण निर्माण करायचे असते..
एखादी कला..विचार छंद यात स्वतःला झोकून द्या,,जीवन जगण्याचा तो उद्देश बनू शकतो..त्यांतूनच जीवनाचा अर्थ उमगत असतो.
जीवनाला उद्देश आकार देणे तुमचे काम आहे..जीवनाचे नाही..
*
अपयश हा जीवनाचा एक भाग आहे..
भविष्य कालात तुम्हाला मोठ्या जबाबदा-या उचलण्या साठी परमेश्वराने केलेली ती एक योजना आहे..
प्रयत्न करत राहणे त्यात कुचराई न करणे हाच उद्देश ठेवणे आवश्यक असते.
अपयशाचे फटके खाल्ल्या नंतर मिळालेल्या यशाची चव मधुर असते
*
प्रार्थने मध्ये मोठी ताकद असते..
आपदा संकटे आली की प्रार्थनेचा सहारा घेऊ नका..
प्रार्थनेला जीवन शैलीचाच एक भाग बनवणे गरजेचे आहे..
प्रार्थनेचा अर्थ आपण काय म्हणता ते परमेश्वराने ऐकणे नसून तो दयाघन काय म्हणतो हे ऐकणे आहे..
*
परमेश्वराचे अस्तित्व हा अनुभूती चा भाग आहे..ते समजवून सांगणे खूपं कठीण आहे..
या ना त्या रूपात तो प्रभू आपल्या अवती भोवती असतोच..
ज्या प्रमाणे चोरी करणा-याला आपल्या आजूबाजूला पोलिस आहे हे जाणवत नाही त्याच प्रमाणे नास्तिकांना त्यांच्या बाजूलाच असलेल्या परमेश्वराचे अस्तित्व जाणवत नाही...
*
भीती एक काल्पनिक बागलबुवा आहे जो आपणास खरा नसताना खरा वाटू लागतो...
तुमची श्रद्धा अटळ असेल तर भीती तुम्हाला घाबरवू शकत नाही...
भीती ला श्रद्धे पेक्षा मोठी बलवान होऊ देऊ नका.
*
जीवनात योग्य तो निर्णय घेण्यास महत्त्व आहे..
तुमचे मन हृदय सांगते त्या प्रमाणे निर्णय घ्या..
पण तो निर्णय अमलांत आणून यशस्वी करण्या साठी डोके व बुद्धीचा वापर करा..
*
सत्य बोलणे हा जीवनाचा भाग असू देणे गरजेचे आहे
तो कठिण मार्ग व सवय आहे..
सत्य बोलण्याचा फायदा म्हणजे काय वा आधी काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही..
सत्याचा विजय अटळ असतो..
*
जीवना बाबत जास्त विचार करण्यावेळ घालवू नका..मुखाने त्या आराध्य दैवताचे नामस्मरण करत कर्म करत राहणे हा एक सुखी आनंदी होण्याचा मार्ग आहे.

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

Yogesh Sawant's picture

5 Jul 2019 - 4:53 pm | Yogesh Sawant

हे सगळं तुम्ही स्वतः करता का? का फक्त "लोकहो करा" अशा अविर्भावात इथे जनतेसाठी मोफत ज्ञान वाटताय?

अभ्या..'s picture

5 Jul 2019 - 5:45 pm | अभ्या..

मस्त कॉपीमॅटर.
ए फोर साईज कलर प्रिंटऑट काढून लॅमिनेट करुन अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरला ठेवा. लै डिमांड आहे.

जॉनविक्क's picture

6 Jul 2019 - 3:22 pm | जॉनविक्क

खाडकन मुस्काटात बसून डोळे उघडावेत असे तुम्ही वाचकांना केले आहे. जे जागे झाले ते राहिले, बाकींच्याकडे दुर्लक्ष करा व लिहते रहा.

Bhakti's picture

5 Aug 2020 - 5:48 pm | Bhakti

जीवना बाबत जास्त विचार करण्यावेळ घालवू नका..मुखाने त्या आराध्य दैवताचे नामस्मरण करत कर्म करत राहणे हा एक सुखी आनंदी होण्याचा मार्ग आहे.