खास मत्स्यप्रेमींसाठी एक शोध

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
27 Jun 2019 - 12:14 pm

प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांना मत्स्यआहार खूप प्रिय होता हे बहुतेक लोकांना माहिती असेल
त्यांच्या एका पुस्तकात ?( लेख किंवा छोट्या कथा ) त्यांनी "पावसाळ्यातील मत्स्यआहार " यावर एक लेख लिहिलेला आहे
कोणत्या पुस्तकात? त्याचा शोध घेत आहे , कोणास माहिती असल्यास कृपया कळवावे हि विनंती

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

27 Jun 2019 - 12:23 pm | अभ्या..

मलाही आठवते ते वर्णन. सुक्या बोंबलाच्या चुर्‍याखाली निखारा ठेवून त्यावर थोडेसे तेल सोड्ण्यासारखी तत्सम पाकृ होती कैतरी.
.
.
बादवे जॉकी कंपणीच्या पॉप कलर्स नामक पुरुषांच्या इनरवेअर्स आल्या होत्या काही दिवसापूर्वी. त्यात निऑन ग्रीन आणि ऑरेंज हेच दोन कलर्स होते. आणखीन काही रंग त्यात मिळू शकतात का? मिळत असल्यास कुठे? जे स्टोअर्स आणि जॉकीचे ऑटलेट्स बघून झाले आहेत, कोणास माहिती असल्यास कृपया कळवावे हि विनंती

पैलवान's picture

27 Jun 2019 - 8:37 pm | पैलवान

एक कपड्यांचा दुकानदार आहे, तो रोडवर आणि दुकानाजवळ बोर्ड लावतो.
काळं कापड, त्यावर फ्लोरोसंट नारिंगी, पोपटी रंगाची फर्राटेदार अक्षरे.
तसे बोर्ड वीसेक वर्षांपूर्वी सगळीकडे असायचे. मग फ्लेक्स आले आणि असले बोर्ड दिसेनासे झाले. आमच्या पंचक्रोशीत तसा कापडी बोर्ड दुसरीकडं कुठं पाहिला नाही.

बादवे, प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस, त्याकरिता निरोगी पुरुषांनी आपापल्या अंतरचड्डीचा रंग समाजमाध्यमांवर सांगायचा अशी काही स्कीम येतेय का?

आतल्या चड्डीच्या रंगाबाबत इतकी चिकित्सा पाहून शंका आली इतकेच. ;-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2019 - 2:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

दळवींचा लेख मी सुध्दा वाचला होता.

माझा मामा पावसाळ्यात भिंतीवर उगवणारे शेवाळे आणि बुरशीसाठी एक औषध वापरायचा. आता त्याचे नाव आठवत नाही. कोणास माहिती असल्यास कृपया कळवावे हि विनंती.

@ अभ्या..
तुला कोणते रंग हवे आहेत? (आपल्या कडे रंगाचे लै डबे आहेत हा का ना का. लाल हवा असेल तर फुकट मारुन देतो )

पैजारबुवा,

ऋतुराज चित्रे's picture

27 Jun 2019 - 11:45 pm | ऋतुराज चित्रे

ब्लिचिंग पावडर ने शेवाळ आणि बुरशी साफ होते.

जालिम लोशन's picture

21 Jul 2019 - 11:16 pm | जालिम लोशन

मेडिकलमध्ये विस रुपयाला मिळेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर (खूप खूप) जुने रंग परत पाहून लैच आणंद जाहला ! =)) =)) =))

आपला पास.

गड्डा झब्बू's picture

27 Jun 2019 - 9:52 pm | गड्डा झब्बू

कढी गोळ्याचा hangover अजून उतरत नाही तर एकामागून एक बुस्टर डोस मिळत चाल्लेत. (मिपा हे, दर्जेदार, लेखनाचे, म्हणे व्यासपीठ आहे) परत परत वाचून उतारा घ्यावा म्हणतोय :-))

सावधान स्वामि१, हस्तर, अविनाश कुलकर्णी...तुम्हाला काट्याची टक्कर देणारा आणखीन एक खेळाडू मिपा मैदानात उतरलाय. एकाच दिवशी त्याने यथातथा सहा धागे काढून दाखवल्याने तुम्च्यासमोरील आव्हान किती तगडे आहे याचा विचार करा.

चौकस२१२'s picture

28 Jun 2019 - 5:39 am | चौकस२१२

ह्यो काय , मच्छी बद्दल लिव्हला अन लोक बोलत्यात चड्डी रंगावर ...आणि बुरशी वर! ( तसा एकाच वाक्यात ह्ये तीन शबूद एकत्र अनु नये ) jalla इसकाळ चा मुक्तपीठ चालू झाला काय
"परत्क्रियाच" लै भारी असत्यात तिकडं !

विशाल थाकुर's picture

20 Jul 2019 - 7:16 pm | विशाल थाकुर

वर नमूद केलेला लेख जयवंत दळवींनी दादरचे दिवस या नावाने साप्ताहिक सकाळ मध्ये लिहिला होता.
नंतर तो त्यांच्या आत्मचरित्राऐवजी नावाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला.
अतिशय सुरेख असा हा लेख पुस्तकाच्या 115 व्या पानावर आहे.

ओ विशाल सर, तुम्ची गल्ली चुक्ली राव.

इथे जॉकीचे बनॅणं, प्रोस्टेटचे कढी गोळे, अंतरचड्डीवरची बुरशी अश्या गहन विषयांवर चर्चा चालू आहे ब्र.
तुमी दादऱ्याचे दिवस कुढनं आंल्ये ?

विशाल थाकुर's picture

21 Jul 2019 - 8:39 am | विशाल थाकुर

इथं बी चड्डी बन्यान गँग हाय व्हय .... त्ये बी खाज खूजलीवाली ....आरारारा...दिस ह्ये अशे पावसाळ्याचे त्येंना बी काय म्हणावं म्हणा...जे मनात अस त्येचं जनात दिस

... https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/fish-1426675/ हाही लेख वाचा. मी मासेखाऊ नसूनही मनापासून (बहुदा लाळ गाळत!) लिहिलेला तो लेख वाचताना मजा आली. तुम्ही माशेखाऊ असलात तर तुमका तो वाचाक कठीण जातलो !! दळवीनी 'भंडार्‍यांच्या खानावळीं'वर पण सुरेख लेख लिहिला आहे. चटकन आठवत नाहीये कुठल्या पुस्तकात ते. कदाचित "आत्मचरित्राऐवजी" मधेच सुद्धा असेल. वाचला नसलात तर सांगा, शोधाशोध करतो.