आहे चविष्ट तरीही ( आहे मनोहर तरीही ...)

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
27 Jun 2019 - 11:23 am

बऱ्याच परदेशी प्रवास वर्णनात ( मिपा आणि इतर) जेव्हा प्रवासातील खाणे यावर लिहिले जाते तेव्हा जरा नाराजी चा सूर असतो, कधी असा उल्लेख असतो कि - "काय हे गारढोण खातात हि लोक" किंवा "काय बुवा मसालाच नव्हता !"
केवळ एक खादाड आणि भटक्या म्हणून हे लिहीत आहे आणि हेतू फक्त हा कि नाण्याची दुसरी बाजू हि दाखवावी
पहिले स्पष्टीकरण: यात माणसाने काय खावे किंवा खाऊ नये किंवा शाकाहारी किंवा मांसाहारी असावे यावर काही म्हणणे नाही
जगात अन्न हे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते एवढेच ते आपल्याला आवडेलच असे नाही फक्त डोळस असावे जाणून घयावे आणि जमल्यास वेगळा प्रयत्न करावा

तर हे झाले namanache घडाभर आता काही उदाहरणे
गार (ढोण) : जगात बहुतेक पदार्थ हे कोमट किंवा गरम गरम खातात हे खरे आहे परंतु थोडे थन्ड किंवा कोमट आणि कधी कधी कच्चे सुद्धा खाण्यात एक मजा असू शकते
- शाकाहारी अँटी पासतो - व्हिनेगर मध्ये मुरवलेल्या भाज्या ( लोणच्या सारखी पण बाकी मसाला नाही ) छोटी काकड्या, आर्टीचोक , बेल पेपर मिरच्या आणि त्यात भरलेले रिकोटा चीज
- थंड मासाचे काप ( कोल्ड मीट कट्स ) त्यात हॅम, सलामी, प्रोशूतो बहुतेक करून डुकराचे मास
- ऑयस्टर ( शिंपले) ( कच्चे , खारे पाणी थोडे असलेले वर लिंबू पिळून)
- लॉबस्टर किंवा खेकड्याचे सूप ( त्यात साय - क्रीम असते
- बिट चे किंवा तांबड्या भोपळ्याचे सूप
- जपानी सुशी किंवा साशिमी
- जपानी समुद्र शेवाळे ( सी वीड) त्यात तीळ भुरभुरलेले
सामन माशाचे पातळ काप ( कच्चे)
- ग्रीक पद्धतीचे डॉलमीदो ( द्राक्षाचं वेलीचं पानात भात घालून शिजवलेले रोल

२) धुरी दिलेले ( स्मोकइड)
सामन माशाचे काप नुसते किंवा खुसखींत सावर डो पावावर + सावर क्रीम + केपर नावाच्या बिया ( व्हिनेगर मधील)

३) मसाला ना घालून सुद्धा मजा येते
हजारो रुप्ये प्रति किलो असलेला लॉबस्टर माफक प्रमाणातील पाश्चिमात्य मसाल्यात खावा म्हणजे वाईन मध्ये केलेलं सार, रॉसमेरी, पार्सली ओरेगॅनो इत्यादी वनस्पती ( ताज्या , कोरड्या नको ) , मिरची / लसूण भरपूर मसाला घालून त्याचा पंचनामा करू नये, त्याचा मूळ मास खोबऱ्या सारखे असते
असो तूर्तास एवढेच सुचले

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

27 Jun 2019 - 11:32 am | mrcoolguynice

मस्त लेख,
मिपावर असे सोनाराकड़न कान टोचले जाणारे लेख कमीच....

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2019 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

प्रत्येक देशातील पदार्थ त्या त्या देशाच्या वहिवाटीप्रमाणेच बनवावे आणि खावे.

एखादी पाकृ अनेक दशके/शतके तेव्हाच नावाजली जाते, जेव्हा तिला काही खास चव असते... ती चव दर वेळेस आपल्या मायभूमीच्या पदार्थांच्या चवीशी मिळती-जुळती असायलाच पाहिजे, हा दुराग्रह मनातून काढून टाकला की, जगभरच्या पाकृंची विविधता चाखण्यात वट्ट मज्जा येते. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2019 - 12:31 pm | ज्ञानोबाचे पैजार

भारतिय जेवण मस्तच असते हे मान्यच आहे पण परदेशात सुध्दा खाण्यापिण्याची चंगळच असते.

सॅलेड हा सुध्दा बाहेरच्या देशांमधे मिळणारा एक वेगळा प्रकार. यात अनेक प्रकार (शाकाहारी आणि मांसाहारी) मिळतात.

तसेच विविध प्रकारचे चीज, उदा बकरीचे आणि उंटाचे चीज आपल्या कडे सहज मिळत नाही. गायीच्या चीज चे सात आठ प्रकार तर मलाच माहीत आहेत. अजून किती असतील कोण जाणे.

भारतात मिळणारा पिझा आणि खरा खुरा इटालियन पिझा यात जमिन आसमानाचा फरक असतो. (तसा तो चायनिज पदार्थातही असतो, पण आपल्या कडे पिझा बवण्याच्या साहित्या पासून सगळेच वेगळे आहे)

चॉकलेटच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. केवढ्या विविध प्रकारची / चवीची चाकलेटे असतात की नुसते पहाताना देखिल पोट भरुन जाते.

शुध्द मांसाहार, दारु आणि तंबाखुच्या विविधतेबद्दल तर बोलायलाच नको.

पैजारबुवा,

अभ्या..'s picture

27 Jun 2019 - 12:35 pm | अभ्या..

तंबाखुच्या विविधतेबद्दल तर बोलायलाच नको.

आपल्या काऊस्टँपागत परदेशातीलही काही स्टँपाबाबत, त्याच्या सेवनाबाबत, पॅकिंगबाबत, उपलब्धतेबाबत काही अनमोल माहिती आम्हा अज्ञ वाचकांना विषद करुन आम्हास उपकृत करावे ही पैजारचरणी लम्र प्रार्थना.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jun 2019 - 2:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

एका मित्रा बरोबर सिगार घ्यायला गेलो होतो. तो पर्यंत सिगार म्हणजे जाडी सिगरेट अशीच माझी कल्पना होती.

पण त्या दुकानात इतके विविधप्रकारचे सिगार उपल्ब्ध होते की पाहूनच मी गार झालो. सिगार भरण्याच्या सुध्दा वेगवेगळ्या पध्दती आहेत तसेच सिगार वरच्या आवरणातही वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या मुळे मिळणार्‍या आनंदातही फरक पडतो अशी माझ्या ज्ञानात भर पडली.

मी आपला ओळखिचा वाटला म्हणून चर्चिल सिगार घेतला. पण मित्राने त्याच्या वाट्याला जाउ नकोस असे सांगत तो ठेउन द्यायला लावला. माझ्यासाठी त्याने जो घेतला त्याचे नाव लक्षात नाही. (जमले तर फोटू शोधून टाकतो.) १५-२० मिनिटे झाली तरी तो संपेचना. त्या सिगारचे अयुष्य म्हणे कमीत कमी २ तास होते. शेवटी मी कंटाळून विझवून टाकला.

त्याच दुकानात मिळालेला (आणि नंतर भारतातही मिळतो हा शोध लागला ) अजून एक प्रकार म्हणजे
ABC

आपली क्लोरोमींट या पुढे झक मारते.

पैजारबुवा,

Nitin Palkar's picture

27 Jun 2019 - 1:20 pm | Nitin Palkar

देश तसा वेष तद्वतच जेथे जाऊ तेथील खाऊ ही वृत्ती अंगीकारल्यास बाहेरगावी/परदेशी देखील फक्त उदरभरण न राहता यज्ञकर्म होऊ शकते. गरज भासल्यास थोडीशी तडजोडही करावी... अर्थात मांसाहार वर्ज्य नसल्याने बाहेरगावी/परदेशी खाण्याचे हाल झालेत असे कधी झाले नाही. केरळ प्रवासात केळीच्या आडव्या पानावरील केरळीय शाकाहारी भोजनाचा आनंद घेऊ शकलो. दुबईत फिरताना सहज दिसलेल्या लेबनीज खाद्यगृहात मिळालेला अप्रतिम शॉर्मा क्षुधाशांती बरोबरच रसना तृप्तीचाही आनंद देऊन जातो.

जालिम लोशन's picture

28 Jun 2019 - 6:57 pm | जालिम लोशन

रुचकर

शेखरमोघे's picture

2 Jul 2019 - 7:54 pm | शेखरमोघे

छान विषय आणि मांडणी !

....... तसा तो चायनिज पदार्थातही असतो, पण आपल्या कडे पिझा बवण्याच्या साहित्या पासून सगळेच वेगळे आहे

भारतातील "अमेरिकन चोप सुए" भारताखेरीज कुठेही मिळत नाही - अमेरिकेत आणि चीनमध्ये तर मुळीच नाही.