लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे.

Primary tabs

shashu's picture
shashu in काथ्याकूट
10 Jun 2019 - 6:55 pm
गाभा: 

लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे.
(प्रश्न उत्तरे सदरात लिहावयास अडचण येत असल्या कारणाने चर्चा या सदरात लिहीत आहे. क्षमस्व)

बायकोच्या गरोदर पणात २० आठवडे व ३ दिवसाच्या सोनोग्राफी मध्ये बाळाच्या संदर्भात खालीलप्रमाणे निदर्शनं नोंदविले होते.
Abd- stomach bubble
Right kidney : 19 mm. Left kidney : 22 mm.
Prominent left renal pelvis seen. Measures 4.9 mm in AP
Bladder normal.
No ascitis or cystic lesion seen.

तसेच २९ व्या आठवड्यातील सोनोग्राफी मध्ये खालीलप्रमाणे निदर्शनं नोंदविले होते.
Left fetal renal pelvis measures 8.7 mm in AP diameter.

दोन्ही वेळेस डाव्या बाजूची किडणी उजव्या बाजूच्या किडनी पेक्षा थोडी मोठी होती.
दोन्ही सोनोग्राफी मध्ये बाकी सर्व निरीक्षणे नॉर्मल होती.

डॉक्टरांचे म्हणणे होते की विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही आहे. जन्मानंतर बाळाने शी/सू व्यवस्थित केली तर त्याला काहीच प्रॉब्लेम नसावा.
बाळ जन्मल्यानतर डॉक्टरांनी तपासले व सर्वकाही ठीक आहे असे सांगितले. जर तुम्हास सोनोग्राफी करायची असेल तर १० दिवसांनी करू शकता, अगदी आवश्यक आहेच असे नाही.

आता बाळ १ महिना २० दिवसांचे आहे. बायकोचे म्हणणे आहे की तो सू खूप वेळा करतो. कालच डॉक्टर ना दाखवून आलो. त्यांचे म्हणणे आहे की सू कितीही केली तरी काही चिंता नाही बाळाचे वजन वाढते आहे. जन्मावेळी ३ किलो होते व आता ४ किलो ६०० ग्राम आहे. तरीसुद्धा तुमची शंका दूर करण्यासाठी १-२ महिन्यांनी स्पेशालिस्ट ला दाखवा. ( तसा त्यांनी reference दिलेला आहे). तसेच ते म्हणाले की बाळाचे वय जसे जसे वाढेल तसे हा फरक कमी होईल.

माझे प्रश्न
१. किडणी संदर्भातील निदर्शने ही नॉर्मल आहेत का? म्हणजे एका बाजूची किडणी थोडी मोठी असते किंवा आहे हे कितपत काळजी करण्यासारखे आहे?
२. यामुळेच बाळाला सू जास्त प्रमाणात होत आहे का?
३. या सर्वाचे योग्य निदान होत आहे का? होत नसल्यास आणखी काही चाचण्या करावयाची आवश्यकता आहे का?

जाणकारांनी यावर (किंवा याशिवाय) आपले मत व काही पूर्वानुभव असतील तर ते सांगावेत ही विनंती.

प्रतिक्रिया

आपल्याला यातले काही कळत नाही, पण पुण्यात असाल तर आनंद देशपांडे म्हणून चांगले डॉक आहेत.
त्यांना दाखवू शकता

सुबोध खरे's picture

10 Jun 2019 - 8:21 pm | सुबोध खरे

Left fetal renal pelvis measures 8.7 mm in AP diameter.

Left fetal renal pelvis हे साधारण पणे ५ मिमी पेक्षा कमी असते पण १० मिमी पर्यंत फारसे काळजीचे कारण नसते. बहुतांश वेळेस (९९%) हे स्वतःहून ठीक होऊन जाते.

परंतु आपण एकदा बाळाची सोनोग्राफी जवळच्या केंद्रात करून आल्यास आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल.

डावी किडनी व्यवस्थित आहे हे त्यात स्पष्ट होईल.

एक किडनी(येथे उजवी) व्यवस्थित काम करत असेल तरीही बाळाला शु व्यवस्थित होईलच)

(आपल्या मानसिक शांतीची किंमत किती हे ज्याचे त्याने ठरवावे).

बालरोग तज्ज्ञांकडे गेलात तरी ते आपल्याला सोनोग्राफी करून घ्या असे सुचविण्याची शक्यता भरपूर आहे.

कंजूस's picture

10 Jun 2019 - 9:19 pm | कंजूस

सर्व काही ठीक होईल.
-------
घाम,मल,मूत्र,कफं, वगैरे बाहेर टाकल्या जाणाऱ्या गोष्टी कमी करणारी कोणतीही औषधे बाळाला द्यायची नसतात.
-------
घाबरण्याचे कारण नाही, मला तीन किडनी आहेत (एक जरा डब्बल आहे.)

जालिम लोशन's picture

10 Jun 2019 - 9:38 pm | जालिम लोशन

भित्यापाठी ब्रम्हराक्षस. जेंव्हा तुम्हाला बालरोगतज्ञाने काळजीचे.कारण नाही म्हणुन सांगितले आहे तेंव्हा तुम्ही त्यांचेवर विश्वास ठेवायला हवा.

भित्यापाठी ब्रम्हराक्षस
या सर्व बाबींमध्ये अनभिज्ञ असल्या कारणाने तो मागे लागला असावा.

पिंट्याराव's picture

11 Jun 2019 - 8:18 am | पिंट्याराव

बाळाला त्रासाला antenatal hydronephrosis असे नाव आहे (घाबरून जाण्यासारखं काही नाही). जन्मापूर्वी 4 mm पेक्षा कितीही मोठ्या AP diameter (किडनीच्या बाहेर ureter निघण्याच्या जागेचं मोजमाप) जास्त असेल तर त्याला antenatal hydronephrosis म्हणतात.
तुमचं बाळ *जरी व्यवस्थित सुसू करत असेल अन वजन छान असेल तरी* अश्या बाळाची जन्मानंतर किमान दोन वेळा (ठराविक वेळा असतात त्या) सोनोग्राफी करायला हवी असते. बाळाच्या बालरोगतज्ञांना याविषयी अधिक विचारा अथवा दुसऱ्या एखाद्या बालरोगतज्ञाचा सल्ला घ्या.

मी मिपावर नवखा आहे अन फार सरावलेला नाही, खरडवही वगैरे प्रकार अजूनतरी मी वापरलेला नाही. तस्मात उपयोजक यांच्या through माझ्याशी संवाद साधू शकता (मिपावरच्या माझ्या मोजक्या ओळखीच्या लोकांपैकी ते एक आहेत म्हणून) किंवा इथेच शंका विचारलीत तरी चालेल. अन्यथा तुम्ही कुठे राहता हे सांगितलंत तर, तिथे माझ्या ओळखीचे कुणी बालरोगतज्ञ असतील तर संदर्भ देऊ शकेन.

ढिस्क्लेमर - मी व्यवसायाने बालरोगज्ञच आहे... पण ही काही जाहिरात वगैरे नाही.

shashu's picture

12 Jun 2019 - 8:29 am | shashu

धन्यवाद.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे (अश्या बाळाची जन्मानंतर किमान दोन वेळा (ठराविक वेळा असतात त्या) सोनोग्राफी करायला हवी असते.) सोनोग्राफी कधी करावयाच्या असतात. मी पनवेल (नवी मुंबई) परिसरात राहतो. माझी मिसेस व बाळ सध्या तिच्या माहेरी अलिबाग येथे आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Jun 2019 - 9:44 am | श्री गावसेना प्रमुख

३ वर्षा पुर्वी मला लाल लघवी होत असल्या कारणाने मी सोनो ग्राफी केलि असता त्यात मला एकच किडनी आहे असे डॉ.ने सांगितले.त्याने आज पर्यन्त मला काहीही त्रास झाला नाही फक्त माहीत नव्हते एव्हढेच.

सुबोध खरे's picture

11 Jun 2019 - 11:01 am | सुबोध खरे

Unilateral renal agenesis हि स्थिती २००० मध्ये एकाला असते. असे जन्मापासून असले कि दुसरे मूत्रपिंड थोडी मोठी होऊन त्या मूत्रपिंडाचे काम व्यवस्थित करत राहते आणि या माणसाचे आयुष्यमन इतर माणसांइतकेच असते.
लष्करात असे सैनिक मी डझनांनी पाहिलेले आहेत. काही दुसऱ्या कारणासाठी तो सोनोग्राफीसाठी आला असताना एक मूत्रपिंड नाही असे दिसून येते. ( हे मूत्रपिंड पोटात दुसरीकडे कुठेच नाही हे तपासूंन पाहावे लागते). अशा सैनिकांना मी धीर देत असे( तेवढीच गरज असते)
एका अशा घाबरलेल्या सैनिकाला मी सांगितले कि तू सियाचेनला राहून आलास राजस्थानात सुरतगढला ३ वर्षे काढलीस तिथे काही झाले नाही तर पुण्यात काय होणार आहे?
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जेंव्हा आई मुलाला मूत्रपिंड दान करते तेंव्हा तिच्याजवळ एकच मूत्रपिंड राहते (आणि मुला जवळ एक) त्या एका मूत्रपिंडाने तीचे आयुष्य व्यवस्थित चालू शकते.

चौथा कोनाडा's picture

12 Jun 2019 - 1:28 pm | चौथा कोनाडा

+१ डॉक्टर सुबोध खरेसाहेब.

shashu's picture

12 Jun 2019 - 8:15 am | shashu

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
खरे साहेब व पिंट्याराव तुमच्या मोलाच्या सल्ल्यासाठी खूप खूप धन्यवाद.