पारा असा चढला

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jun 2019 - 4:49 pm

१
पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते
माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ?
नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली
उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला
काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली
कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला
सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला
सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली
सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता
तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला
वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली
इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले
अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले
जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना
"साप डाल तडका " खायला मिळाला असता
मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चटपूट

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2019 - 4:54 pm | टवाळ कार्टा

परत???

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2019 - 5:00 pm | अविनाशकुलकर्णी

माफ करा नहर चुकीने पुन्हा पोस्टल
क्षमा

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

5 Jun 2019 - 5:03 pm | प्रलयनाथ गेंडास...

ओ टकाजी ,
स्पायडरमॅन वैग्रेंचे रिबूट तुम्हाला चालतात ..
पण आमच्या अकुंचे रिबूट लेख (विथ डिजिटली मास्टर्ड फोटो ) डोळ्यात खुपतात काय ??

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2019 - 11:58 pm | टवाळ कार्टा

ते स्पायडीवग्रे डोके बाजूला ठेउन बघायचे असतात म्हणून चालून जाते ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2019 - 4:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

पातेलीमध्ये डाळ नाही, पिवळे वाटाणे दिसत आहेत... की सापाच्या विषाने डाळीचे वाटाणे झाले ?! =))

धर्मराजमुटके's picture

9 Jun 2019 - 1:06 pm | धर्मराजमुटके

सापड्याच्या विषाने डाळीचे पिवळे वाटाणे झाले. जर नागड्याने स्पर्श केला असता तर कदाचित हिरवे किंवा काळे वाटाणे झाले असते :)

ज्योति अळवणी's picture

5 Jun 2019 - 8:35 pm | ज्योति अळवणी

मस्तच

जॉनविक्क's picture

5 Jun 2019 - 8:38 pm | जॉनविक्क

-/\_

खिलजि's picture

6 Jun 2019 - 3:43 pm | खिलजि

काका आता खालील फोटो पण पाठवा कारण मलातरी त्यांना बघावास वाटतेय.

नागनंदिनी सोसायटी

नागनाथ सर्प मित्र

प्रसाद_१९८२'s picture

6 Jun 2019 - 3:50 pm | प्रसाद_१९८२

कुकर मधील साप कोणत्या जातीचा आहे ?

झेन's picture

7 Jun 2019 - 9:48 am | झेन

कदाचित रबर मण्यार असावा

झेन's picture

7 Jun 2019 - 9:49 am | झेन

कदाचित रबर मण्यार असावा

कल्लाकार's picture

7 Jun 2019 - 4:40 pm | कल्लाकार

मण्यार