.

श्री. अमर्त्य सेन यांच्या लेखाचा अनुवाद व त्यावर (मराठी व इंग्रजी) प्रतिसाद

Primary tabs

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in काथ्याकूट
4 Jun 2019 - 1:41 am
गाभा: 

वाचकहो,

श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप व मोदींच्या निवडणुकीतल्या विजयावर वैचारिक संग्राम ही पार्श्वभूमी धरून काही भाष्य केलं आहे. मूळ इंग्रजी लेख येथे आहे :
https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html

या लेखाचा मी केलेला अनुवाद खाली दिला आहे. त्यावरील माझा (इंग्रजी व मराठी) प्रतिवाद धाग्याखालील टिप्पणीत आहे.

---------------- अनुवाद सुरू ----------------

मोदींनी सत्ता जिंकली वैचारिक संग्राम नव्हे

----------------

हिंदू राष्ट्रवादी जिंकले. ही घटना भारताबद्दल काय सांगते?

- लेखक : अमर्त्य सेन. हे एक नोबेल पारितोषिक धारक असून हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.
२४ मे २०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हिंदूराष्ट्रवादी भारतीय जनता पक्षास सार्वत्रिक निवडणुकांत घवघवीत विजय प्राप्त करवून दिला. त्यास ५४३ पैकी ३०० हून अधिक जागा , तसेच आजून पाच वर्षं शासन चालवायची अर्हताही प्राप्त झाली.

ही एक उठावदार कामगिरी आहे हे खरं, मात्र मोदींना हे केलं तरी कसं? आणि भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केवळ ५२ जागांपाशी का अडकली आहे? या प्रश्नांची उत्तरं धुंडाळतांना काहीजण संकल्पना व मतप्रणालींच्या क्षेत्रांत स्पष्टीकरण शोधायला जावंसं वाटलं. विशेषत: भारतातल्या प्रबळ हिंदू अस्मितेशी निगडीत असलेल्या मतप्रणालींत.

तथाकथित समजानुसार भारत बदलंत असून काँग्रेस पक्षाची (व त्यातल्या गांधी, टागोर, नेहरू, आझाद आदि दिग्गजांची) जुनी, अनेकोक्त (=puralist), सेक्युलर मतप्रणाली हा काही फारसा प्रभावी पर्याय उरलेला नाही. यात तथ्य असू शकतं.

भारतात जरी २० कोटी म्हणजे १४ % मुस्लिम असले तरी भाजपला मिळालेल्या पाठिंब्यापैकी प्रमुख्य हिस्सा हिंदूंकडून आलेला आहे.

मात्र संकल्पना एकाकीपणे वावरंत नसतात. आपल्या कल्पनांवर प्रभाव टाकणाऱ्या घटना आयुष्यांत घडतातंच ना ? मोदी भरघोस मतांनी निवडून आलेत. हे तथ्य आहे, म्हणजेच ही एक घडलेली घटना आहे. हिच्यावरून हिंदू उत्थानाची संकल्पना कसकशी उत्क्रांत होत गेली याचा अंदाज बांधता येतो. मात्र घटनेवरून संकल्पनेचा वेध घेऊ जाता आपलं अन्वेषण म्हणजे उशिरा जाग आल्याचं लक्षण आहे. कारण की 'भाजपला काही वर्षांपूर्वीच्या मानाने आज खूपंच जास्त निष्ठावान समर्थक का आहेत', हा प्रश्न अनुत्तरित राहतोय.

मोदी विलक्षण कुशल व करिष्मावान राजकारणी नेते आहेत हे निर्विवाद. भाजपच्या झळाळत्या उत्थानात मोदींनी बजावलेल्या भूमिकेचं परीक्षण होणं अर्थातंच अगदी साहजिक आहे.

द्वेष व तिरस्काराचा राजकीय लाभ उठवण्याची तत्परता असल्याने त्यांना आपल्या ज्वलंत वक्तृत्वाच्या साहाय्याने समोरच्यावर प्रभाव टाकता आला. हा द्वेष व तिरस्कार भिन्न जीवनशैली धारकांचा ( डावे, तर्कवादी, उदारमतवादी बुद्धीजीवी) होताच, त्याप्रमाणे भिन्न उगम व धार्मिक समजुती असलेल्यांचा उदा. : मुस्लिम यांचाही होता. अटलबिहारी वाजपेयींसारखे आधीचे मवाळ भाजप नेते, तुलनेने जवळपासही फिरकंत नाहीत.

मोदींनी निवडबाजीत जसा करिष्मा वापरला तसाच भरपूर पैसाही ओतला. तो काँग्रेस व इतर राजकीय पक्षांच्या कित्येक पटीने होता. शिवाय माध्यमांतील छबीदर्शनाचं व्यस्त प्रमाण आहे ते वेगळंच. दूरदर्शनने ऐन निवडणुकीच्या मे महिन्यात भाजपला काँग्रेसच्या दुप्पट प्रक्षेपणसमय अदा केला.

फेब्रुवारीत भारतीय सैन्यावर काश्मिरात दहशतवाडी हल्ला झाल्यावर मोदींनी पाकिस्तानात हवाई हल्ला केला. या प्रत्युत्तराचा भाजपला अफाट फायदा झाला. निवडणुकांत मोदींनी भयावडंबर अतिशय प्रभावीपणे वापरले.

मोदींच्या स्वत:च्या संक्रमणात बदल दिसून येतो. २०१४ साली मोदी जिंकले होते तेव्हा त्यांनी दिलेल्या वचनांचा लाभ झाला होता. या आश्वासनांत भ्रष्टाचार व लालफीतीपासून मुक्त अशी व्यवस्थितपणे चालणारी बाजारी अर्थव्यवस्था, सर्वांसाठी रोजगाराच्या अमाप संधी, सरसर पसरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या फळांचं न्याय्य वाटप, प्राथमिक आरोग्य व शाळांची तत्काळ सुविधा, इत्यादिंचा समावेश होता.

आत्ताच्या प्रचारमोहिमेत मात्र मोदींना आपल्या कामगिरीबद्दल बढाया मारता आल्या नाहीत. त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती फारंच किरकोळ आहे. बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांतला उच्चांक गाठलाय, आर्थिक वाढ विषम असून जराशी डगमगतीच आहे, किमान आरोग्यसुविधा साकल्याने दुर्लक्षित आहेत आणि लालफीत व भ्रष्टाचारात उल्लेखनीय घट नाही.

त्याउलट मोदींनी भारतीय नागरिकांच्या भीती व आशंकांवर भर दिला : आतंकवादाची भीती, पाकिस्तानकरवी घातपाताचं भय, भारतातल्या हान्योत्सुक प्रभृतींच्या भीषण कृत्यांचं भय. जसा १९८२ साली फॉकलंड युद्धाच्या वेळेस मार्गारेट थॅचर यांना पाठींबा मिळून त्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला, तस्संच फेब्रुवारीतल्या पाकवरील सीमापार हल्ल्याचं मोदींना निवडणुकीत अफाट सहाय्य मिळालं.

हे घटक भारतीय राजकारणात कथन पूर्ण करतात. बऱ्याच जणांना वाटतं की भाजपने काँग्रेसविरुद्ध 'मतप्रणालीचा युक्तिवाद' जिंकला. मात्र हा काही हिंदुराष्ट्रवादी तत्त्वज्ञानाचा काही खास विजय नाही. आणि गांधी टागोर नेहरूंची सर्वसमावेशी विचारधारा नष्टनाभूत झाल्याची लक्षणीय ग्वाही नाही.

भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या राजवटीत भारतातली धार्मिक फूट वाढंत आहे हे पुरेसं स्पष्ट झालं आहे. अल्पसंख्याकांची विशेषत: मुस्लिमांची हालत झपाट्याने डळमळीत होऊ घातलीये.

हिंदुराष्ट्रवादी चळवळीने सत्तास्पर्धेत थोडीफार बाजी मारलीये, पण विचारसंग्रामात कसलीही गंभीर आगेकूच नाही. एक भाजपची चळवळी प्रज्ञा ठाकूर हिने म्हंटलं की महात्मा गांधींचे मारेकरी गोडसे हे एक देशभक्त होते. यामुळे भाजपला देखील अवघडल्यासारखं झालं आणि म्हणून ठाकूर बाईंना औपचारिक क्षमायाचना करावयास लावली.

परंतु, मध्यप्रदेशातनं निवडणूक लढवणाऱ्या ठाकूर बाई निवडणूक जिंकल्या व त्या संसदेत विधायक ( = कायदे बनवणारी ) होणार. हे सत्ताप्राप्तीची रस्सीखेच जिंकणं असून वैचारिक संग्रामातली जीत नव्हे.

गेलाबाजार विरोधकांकडून का होईना, पण हा वैचारिक अभिसंग्राम विशेषकरून ध्यानी न येणं हे खेदजनक आहे. यासाठी बऱ्याच व्यापक संवादाची गरज आहे. पण पहिली पायरी या दोन लढायांची गल्लत न करणं ही आहे.

---------------- अनुवाद समाप्त ----------------

हुश्श ! झाला एकदाचा अनुवाद. पार घामटा निघाला. अतिश तसीरच्या लेखाच्या वेळेस 'अक्षरनामा'चा आयता अनुवाद हाती लागला होता. या वेळेस मात्र स्वत:च परिश्रम घ्यावे लागले. वैचारिक लेख असल्याने ढोरमेहनत म्हणवंतही नाही. सालं गुरासारखं राबायचं पण तशा अर्थाचं लेबलही चिकटवता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात तो हाच. कुठे गेले अच्छे दिन !

फुकट गिळायला मिळालं नाही की हे असं होतं. मोदींनी ल्युटेनच्या लुटारूंचं फुकट गिळणं थांबवलं. म्हणून ते कसे मोदींवर दात धरून असतात. त्याच धर्तीवर माझा फुकट गिळायचा अधिकार संपुष्टात आणल्यामुळे मी अक्षरनामावर चडफडावं का ? हा एक घोर तात्त्विक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे.

असो.

मूळ इंग्रजी प्रतिसाद व त्याचा मराठी तर्जुमा या लेखाखाली आहेत. तो / ते वाचून आपलं मत अवश्य कळवणे. धन्यवाद !

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

4 Jun 2019 - 1:44 am | गामा पैलवान

Hello Mr Amartya Sen,

I saw your article about Modi's winnig power, but not battle of ideas. The url is : https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html

Here are my comments :

1.

.... Modi (of India) has led his Hindu nationalist Bharatiya Janata Party to a major victory ....

Sorry to say, but there is no word Hindu in BJP. The BJP was never a Hindu party in a traditional sense.

2.

And why has the Indian National Congress, the old national party, been restricted to a mere 52 seats?

Today's Indian National Congress is not same as the old national party. The old congress which was with Nehru, broke up in 1969 into two factions syndicate and indicate. The Syndicate Congress later merged with Janata Party in or around 1977. The Indicate Congress, under the leadership of Indira Gandhi, became Indira Congress in 1978. The old congress had electoral symbol of pair of bullocks. The Janata Party campaigned under cow and calf symbol. Indira Congress had palm facing hand as a symbol. After Indira's assassination the party was renamed as The Indian National Congress, which continues with the same name today. These are rough details of the history of congress party.

The point is today's national congress is not the one Nehru had.

3.

.... old, pluralistic and secular ideology of the Congress Party and of India’s great leaders — Mohandas Gandhi, Rabindranath Tagore, Jawaharlal Nehru and Maulana Abul Kalam Azad — is no longer an effective option.

Firstly, Congress is anti Hindu. Congress showing any support to anything Hindu is viewed with suspision. Let me explain you the reason.

After 1920, Congress portrayed itself as a secular party. Fair enough. When british decided to quit, Congress suddenly became 'Hindu'. Despite having no mandet from Hindus, it played a leading role in splitting India. Narayan Bhaskar Khare accused congress of misappropriating Hindu identity.

Second point is about the leaders you mentioned. Ravindranath Tagore was never secular. Abul Kalam Azad was never secular. Please do not club these people together. They have more differences than commanalities. Gurudev Ravindranath had nothing to do with congress. Nehru was not pluralist. Gandhi was not even a member of the Congress Party.

4.

.... political support for the victorious B.J.P. comes disproportionately from the Hindus.

Utterly wrong assertion. In Gujarat and Rajasthan, BJP won ALL seats including Muslim majority ones. The same thing happened in 2014 elections. After 5 years of Modi's rule BJP still enjoys muslim's support. Let me explain the reason.

The reason is Congress used, abused, overused and reused muslims as a vote bank. BJP's clean sweep shows that the muslims are seeing through congress's scam.

5.

.... why the B.J.P. today has many more loyal supporters than only a few years ago.

Wrong question. Majority of BJP's loyal supporters are actually Modi's voters. There is a difference between supporting BJP and voting for Modi.

6.

.... make political use of hatred and loathing — for people with different ways of life (leftists, rationalists, liberal intellectuals) and for those with different origins and religious beliefs, such as Muslims.

Forget Modi, let me tell you how I view these groups.

I am a Hindu. I dislike leftists because they are nazi. Nazi means national socialist movement, right? So nazis are as left as a socialist could be. Now you know why I dislike leftists.

I am a Hindu. I disagree with rationalists because, the so called rationalists fail to comprehend that experience leads to logic. For them logic is a fait accompli. For me logic is a tool to achieve my vison.

I am a Hindu. I don't see anything useful in liberal intellectualism. The so called liberals are too much concerned about rights and previlages. But I, as a Hindu, am more concerned about my duties. Like me a billion-full of indians want to lead a duty-centric life. Life in not a bonanza to keep enjoying whatever imaginable rights whenever you want to.

7.

The state-owned television network, Doordarshan, gave the ruling B.J.P. twice the amount of airtime than it offered to the Congress Party in the important month of May.

This point looks legitimate only in America. In India this point loses its context. Let me explain the role of the indian mainstream media in recent elections.

There are myriads of private channels. They were busy in propogating falsehood against BJP. Not a single private channel accepted exit polls results, because they favoured BJP. Such is the state of indian mass media.

As a result people discredited the mainstream media. That's why Modi used social media in 2014. He never bothered about the mainstream media. Still they refused to learn. No wonder Modi repeated his success in 2019.

8.

.... India’s general election was dominated by scaremongering rhetoric, used very effectively by Mr. Modi.

It's definitely not scaremongering. Balakot response is tit for tat.

9.

.... his campaign greatly benefited from his promises of a well-functioning market economy free of red tape and corruption, plentiful employment opportunities for all, fair sharing of the fruits of speedy economic expansion, and ready availability of primary health care and school education.

Here is the link to BJP's 2014 manifesto : http://cdn.narendramodi.in/wp-content/uploads/2014/04/Manifesto2014highl...

I don't see promises of well-functioning market economy, plentiful employment opportunities, fair sharing of the fruits of speedy economic expansion, and ready availability of primary health care and school education.

Please get your facts straight.

10.

.... He has accomplished little of what he had promised. Unemployment is very high, a 45-year peak, economic growth is faltering and uneven in its impact, elementary health care remains comprehensively neglected, and there has been no striking decrease of red tape and corruption.

Your points are basically useless from a comman man's point of view. What Modi delivered is far more meaningful to him/her. For example, the Jandhan (public wealth) accounts enabled comman man to get money straight from the government. No middle men. As simple as that.

11.

.... fear of terrorism, fear of sabotage by Pakistan, fear of apparently terrible deeds perpetrated by hostile elements within India.

This is not a rhetoric. This is a grim reality for countless indians. Everyday a city dweller goes out to work. What's the guarantee that he returns home in one piece? Modi addressed it. After he came to power, the terroists acts suddenly were limited to only Kashmir.

No more random bomb blasts. No more 26/11s. I voted for Modi. Done and dusted!

12.

But there has been no particular victory for the philosophy of Hindu nationalism and no noticeable vanquishing of the idea of inclusiveness and unity championed by Gandhi, Nehru and Tagore.

That is because Hindu nationalism is built upon idea of inclusiveness. Gandhi and Nehru are not viewed as unifying forces. They split india for personal gains.

Tagore is an internationalist. Indian culture needs to be spread across the globe. Hindu nationalism has no conflicts with Tagore.

13.

What is clear enough is that during the past five years of B.J.P. rule, India has become much more divided along religious lines, making more sharply precarious the lives of minorities, particularly Muslims.

Obviously not. Since indian muslims too voted for Modi, your statement is factually incorrect.

14.

The Hindu nationalist movement has won something in terms of power but nothing particularly serious in the battle of ideas.

That is so because Hindu Nationalism can easily assimilate any foreign idea. That means there are no conflicts eventually. Now you know how Hindu Nationalism operates.

15.

Pragya Thakur, a B.J.P. activist, said recently that Mohandas Gandhi’s assassin, Nathuram Godse, was a patriot.

Of course Nathuram was a patriot. Patriotism is not exclusively reserved for congressmen.

16.

This embarrassed even the B.J.P., which made her formally apologize.

Since Sadhvi Pradnya was contesting an election, she had to be politically correct.

17.

That is victory in terms of power but not in the battle of ideas.

So, the question you should ask is : Why people of Bhopal (where Sadhvi Pradnya won election) neglect battle of ideas?

The answer is Hindu Nationalism is not an idea, but way of life inseperable from a billion of indian people.

18.

It is regrettable that this larger battle has not received more emphasis even from the opposition.

To make a battle you need two opposite camps. But there is no opposition to Hindu Nationalism. Now that's your problem. Not mine.

19.

There is need for much more engagement there.

Yes, finally a correct and meaningful statement. To engage with Hindu Nationalists like me, you need to read into the indian public. Are you willing to?

20.

But the first thing is not to confuse the two battles.

I beg to differ. First thing is your willingness to skilfully engage with indian public like Modi does.

---- end of comments ----

Thanks for reading.

Humbly yours,
-Gamma Pailvan

लोकहो,

श्री. अमर्त्य सेन यांनी २४ मे २०१९ च्या द न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्रात मोदींच्या विजयास उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. मोदींनी सत्ता जिंकली तरी संकल्पनांचे युद्ध नव्हे, असा आशय आहे.

मूळ लेख : https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html

मराठी अनुवाद : https://www.misalpav.com/node/44623

मूळ लेखावरचा इंग्रजी प्रतिसाद : https://www.misalpav.com/comment/1034693#comment-1034693

या लेखावर प्रतिसाद द्यायचं मनात होतं. मूळ प्रतिसाद इंग्रजीत आहे. त्याचा मराठी तर्जुमा चालू टिपणीत आहे.

धन्यवाद! :-)

आपला नम्र,
-गामा पैलवान

-------------- प्रतिसाद सुरू -----------------------------

नमस्कार अमर्त्य सेन,

तुमचा २४ मे २०१९ च्या द न्यूयॉर्क टाईम्स वर्तमानपत्रात मोदींच्या निवडणुकीतल्या विजयासंबंधी इंग्रजी लेख वाचला. जालनिर्देश असा आहे : https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html

तुमच्या लेखावर भाष्य करू इच्छितो. ते येणेप्रमाणे :

१.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हिंदूराष्ट्रवादी भारतीय जनता पक्षास सार्वत्रिक निवडणुकांत घवघवीत विजय प्राप्त करवून दिला.

भाजप कधीच हिंदू पक्ष नव्हता. हिंदू हा शब्द त्याच्या नावात नाही.

२.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केवळ ५२ जागांपाशी का अडकली आहे?

आजची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जुनी काँग्रेस नव्हे. नेहरूंच्या वेळेचा जुना काँग्रेस पक्ष १९६९ साली फुटून त्याचे सिंडिकेट व इंडिकेट असे दोन तुकडे पडले. सिंडिकेटक काँग्रेस पुढे १९७७ च्या आसपास जनता पक्षात विलीन झाला. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली १९७८ साली इंडिकेट काँग्रेसचं इंदिरा काँग्रेसमध्ये रुपांतर झालं. जुन्या पक्षाचं निवडणूक चिन्ह बैलजोडी होतं. जनता पक्षाने गायवासरू या चिन्हावर निवडणुका लढवल्या. इंदिरा काँग्रेसचं चिन्ह हाताच्या पंजा होतं. इंदिराहत्येपश्चात इंदिरा काँग्रेसचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं बारसं केलं गेलं. तेच नाव आजपर्यंत टिकून आहे. ही काँग्रेस पक्षाच्या इतिहासाची साधारण रूपरेखा आहे.

सांगयचा मुद्दा असा की आजचा काँग्रेस पक्ष नेहरूंच्या वेळचा पक्ष नव्हे.

३.

तथाकथित समजानुसार भारत बदलंत असून काँग्रेस पक्षाची (व त्यातल्या गांधी, टागोर, नेहरू, आझाद आदि दिग्गजांची) जुनी, वैविध्योत्सुक (=puralist), सेक्युलर मतप्रणाली हा काही फारसा प्रभावी पर्याय उरलेला नाही.

पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस हिंदुविरोधी आहे. काँग्रेसने हिंदूंची बाजू घेणं संशयास्पद आहे. त्यामागचं कारण सांगतो.

१९२० नंतर काँग्रेसने स्वत:स सर्वधर्मसमभावी ( = सेक्युलर) म्हणवून घेतलं. भले ठीक. ब्रिटिशांनी भारत सोडून जायचं ठरवल्यावर मात्र काँग्रेस अचानक 'हिंदू' झाली. हिंदू लोकांचा जन्देश नसतांनाही, काँग्रेसने भारताची फाळणी करण्यात पुढाकार घेतला. नारायण भास्कर खरे यांनी काँग्रेसवर हिंदू अस्मिता बळकावल्याचा आरोप केला आहे.

दुसरा मुद्दा तुम्ही नावं घेतलेल्या नेतेलोकांसंबंधी आहे. रवींद्रनाथ कधीच सेक्युलर नव्हते. अबुल कलम आझादही कधीच सेक्युलर नव्हते. या लोकांची मोट आजीबात बांधू नका. यांच्यात साम्यापेक्षा भेद जास्त आहेत. गुरुदेव रवींद्रनाथांचा काँग्रेसशी कसलाही संबंध नाही. नेहरू वैविध्योत्सुक ( = pluralist) नव्हते. गांधी तर काँग्रेसचे साधे सभासदही नव्हते.

४.

.... भाजपला मिळालेल्या पाठिंब्यापैकी प्रमुख्य हिस्सा हिंदूंकडून आलेला आहे.

साफ चुकीचं विधान. गुजरात व राजस्थानात भाजपने अगदी मुस्लिमबहुल जागांसह सर्वच्यासर्व जागा जिंकल्या आहेत. २०१४ सालीही नेमकं हेच घडलं होतं. मोदींच्या ५ वर्षांच्या राजवटीनंतर भाजपला मुस्लिमांचा पाठींबा कायम आहे. त्यामागचं कारण सांगतो.

काँग्रेसने मुस्लिमांचा मतपेढी म्हणून वापर, गैरवापर, अतिवापर आणि पुनर्वापर केला. भाजपचा सुपडासाफ विजयाचा अर्थ असा की मुस्लिम लोकं काँग्रेसच्या बनवाबनवीच्या आरपार पाहू लागलेत.

५.

.... 'भाजपला काही वर्षांपूर्वीच्या मानाने आज खूपंच जास्त निष्ठावान समर्थक का आहेत', ....

चुकीचा प्रश्न आहे. भाजपचे बहुतांश पाठीराखे खरंतर मोदींचे मतदार आहेत. भाजपला पाठींबा देणे आणि मोदींना मत देणे यांत फरक आहे.

६.

.... द्वेष व तिरस्काराचा राजकीय लाभ उठवण्याची तत्परता असल्याने त्यांना आपल्या ज्वलंत वक्तृत्वाच्या साहाय्याने समोरच्यावर प्रभाव टाकता आला. हा द्वेष व तिरस्कार भिन्न जीवनशैली धारकांचा ( डावे, तर्कवादी, उदारमतवादी बुद्धीजीवी) होताच, त्याप्रमाणे भिन्न उगम व धार्मिक समजुती असलेल्यांचा उदा. : मुस्लिम यांचाही होता.

मोदींचं जाउद्या. मी या लोकांकडे कसं बघतो ते सांगतो.

मी एक हिंदू आहे. मला डावे आवडंत नाहीत कारण की ते नाझी आहेत. नाझी म्हणजे नॅशनल सोशालिस्ट ( म्हणजेच राष्ट्रीय समाजवादी ) चळवळ, बरोबर ? मग नाझी हे एखाद्या समाजवाद्या इतकेच डावे झाले. डावे मला का आवडंत नाहीत ते तुम्हांस आता माहित पडलं.

मी एक हिंदू आहे. माझी तर्कवाद्यांसोबत मतं जुळंत नाहीत. कारण, अनुभवातनं तर्क विकसित होतो हेच मुळी या तथाकथित तर्कवाद्यांना कळंत नाही. त्यांच्यामते तर्क हेच साध्य आहे. माझ्या दृष्टीने तर्क हे उद्दिष्ट प्राप्त करावयाचं साधन आहे.

मी एक हिंदू आहे. मला बुद्धीजीवींच्या उदारमतवादात उपयुक्त असं काहीच सापडंत नाही. या तथाकथित उदारमतवाद्यांना हक्क व अधिकारांची बरीच काळजी पडलेली असते. पण, एक हिंदू म्हणून, मला माझ्या कर्तव्यांची चाड अधिक आहे. माझ्याप्रमाणे शंभर कोटी भारतीयांना कर्तव्यकेंद्रित जीवनप्रणाली अंगिकारायची आहे. आयुष्य म्हणजे वाट्टेल तेव्हा वाट्टेल तसे मन:पूत अधिकार उपभोगण्यासाठी मिळालेलं घबाड नव्हे.

७.

दूरदर्शनने ऐन निवडणुकीच्या मे महिन्यात भाजपला काँग्रेसच्या दुप्पट प्रक्षेपणसमय अदा केला.

हा मुद्दा अमेरिकेत ठीक आहे हो. भारतात हे तथ्य निरर्थक ठरतं. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत प्रमुख्य प्रसारमाध्यमांची भूमिका काय होती ते थोडक्यात सांगतो.

भारतात बऱ्याच खाजगी वाहिन्या आहेत. त्यातल्या बहुतांश भाजपविरुद्ध अपप्रचार करण्यात गुंतल्या होत्या. एकाही खाजगी वाहिनीने उत्तरचाचणीचे निकाल गांभीर्याने घेतले नाहीत. कारण की ते निकाल भाजपला अनुकूल होते. भारतीय प्रसारमाध्यमांची ही दु:स्थिती आहे.

साहजिकंच लोकांनी मुख्यधारेतल्या माध्यमांना अविश्वासार्ह मानलं. म्हणूनंच मोदींनी २०१४ साली मेळामाध्यमं ( = सोशल मीडिया) वापरली. त्यांनी मुख्यधारेतल्या माध्यमांची कधीच पत्रास बाळगली नाही. तरीपण त्यातून काही शिकण्याची माध्यमांची इच्छा नाही. २०१९ साली मोदींच्या यशोवर्धनात नवल ते काय !

८.

निवडणुकांत मोदींनी भयावडंबर अतिशय प्रभावीपणे वापरले.

हे भयाचं अवडंबर माजवणे निश्चितंच नव्हे. बालाकोटचा प्रतिहल्ला हे जशास तसे उत्तर आहे.

९.

२०१४ साली मोदी जिंकले होते तेव्हा त्यांनी दिलेल्या वचनांचा लाभ झाला होता. या आश्वासनांत भ्रष्टाचार व लालफीतीपासून मुक्त अशी व्यवस्थितपणे चालणारी बाजारी अर्थव्यवस्था, सर्वांसाठी रोजगाराच्या अमाप संधी, सरसर पसरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या फळांचं न्याय्य वाटप, प्राथमिक आरोग्य व शाळांची तत्काळ सुविधा, इत्यादिंचा समावेश होता.

भाजपच्या २०१४ च्या जाहीरनाम्याचा दुवा इथे आहे : http://cdn.narendramodi.in/wp-content/uploads/2014/04/Manifesto2014highl...

मला बाजारावर आधारित सुफळ अर्थव्यवस्थेबद्दल काहीच आश्वासन सापडलं नाही. तसेच रोजगाराच्या अमाप संधी, विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या फलितांचे न्याय्य वाटप, प्राथमिक आरोग्य व शाळांची तत्काळ सुविधा यांविषयी खास तरतुदी आढळल्या नाहीत.

कृपया आपली तथ्ये तपासून घेणे.

१०.

त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती फारंच किरकोळ आहे. बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांतला उच्चांक गाठलाय, आर्थिक वाढ विषम असून जराशी डगमगतीच आहे, किमान आरोग्यसुविधा साकल्याने दुर्लक्षित आहेत आणि लालफीत व भ्रष्टाचारात उल्लेखनीय घट नाही.

सामान्य भारतीयाच्या नजरेतनं तुमचे मुद्दे निरुपयोगी आहेत. मोदींनी जे दिलं ते त्याच्या/तिच्या साठी बरंच अर्थपूर्ण आहे. उदाहरणार्थ : जनधन खाती उघडणे. यांमुळे सामान्य माणसाला शासनाकडून थेट मदत मिळू लागली. दलालांचा पत्ता कट झाला. सामान्य माणूस अशा साध्यासोप्या सुविधांच्या प्रतीक्षेत होता.

११.

.... आतंकवादाची भीती, पाकिस्तानकरवी घातपाताचं भय, भारतातल्या हान्योत्सुक प्रभृतींच्या भीषण कृत्यांचं भय.

हे केवळ शाब्दिक बुडबुडे नव्हेत. हे असंख्य भारतीयांसाठी गंभीर वास्तव आहे. आज दररोज शहरातला माणूस कामाला घराबाहेर पडतो. तो अखंड अवस्थेत परतण्याची खातरी काय आहे ? मोदींनी त्याची तड लावली. ते सत्तेत आल्यावर आतंकी हल्ले अचानक फक्त काश्मीरपुरते सीमित होऊन गेले.

फटाक्यांसारखे स्वैर बाँबस्फोट गायब. २६/११ सारखे हल्लेही नाहीत. मी मोदींना मत दिलं. काम तमाम.

१२.

हा काही हिंदुराष्ट्रवादी तत्त्वज्ञानाचा काही खास विजय नाही. आणि गांधी टागोर नेहरूंची सर्वसमावेशी विचारधारा नष्टनाभूत झाल्याची लक्षणीय ग्वाही नाही.

यामागील कारण म्हणजे हिंदू राष्ट्रवाद सर्वसमावेशाच्या पायावर उभा आहे. गांधी व नेहरू या एकीकारक शक्ती म्हणून बघितल्या जात नाहीत. त्यांनी वैयक्तिक लाभासाठी भारताची फाळणी केली.

टागोर आंतरराष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृती जगभर पसरली पाहिजे. म्हणूनच हिंदू राष्ट्रवाद टागोरांच्या विरोधात नाही.

१३.

भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या राजवटीत भारतातली धार्मिक फूट वाढंत आहे हे पुरेसं स्पष्ट झालं आहे. अल्पसंख्याकांची विशेषत: मुस्लिमांची हालत झपाट्याने डळमळीत होऊ घातलीये.

अर्थातंच नाही. ज्याअर्थी भारतीय मुस्लिमांनीदेखील मोदींना मतं दिली, त्याअर्थी तुमचं विधान वास्तविकरीत्या चुकीचं आहे.

१४.

हिंदुराष्ट्रवादी चळवळीने सत्तास्पर्धेत थोडीफार बाजी मारलीये, पण विचारसंग्रामात कसलीही गंभीर (आगेकूच) नाही.

याचं कारण म्हणजे हिंदू राष्ट्रवाद परकीय कल्पना सहजपणे आत्मसात करू शकतो. म्हणजेच, अंतिमत: तेढ उरंत नाही, असाही याचा अर्थ होतो. आता तुम्हांस हिंदू राष्ट्रवाद कसा कार्य करतो ते उमजलं असेल.

१५.

एक भाजपची चळवळी प्रज्ञा ठाकूर हिने म्हंटलं की महात्मा गांधींचे मारेकरी गोडसे हे एक देशभक्त होते.

अर्थात, नथुराम हे देशभक्त होतेच. देशभक्तीवर काँग्रेसींचा एकाधिकार नाही.

१६.

यामुळे भाजपला देखील अवघडल्यासारखं झालं आणि म्हणून ठाकूर बाईंना औपचारिक क्षमायाचना करावयास लावली.

साध्वी प्रज्ञा निवडणूक लढवीत होत्या. त्यांना राजकारणोचित वक्तव्य करणं भाग आहे.

१७.

हे सत्ताप्राप्तीची रस्सीखेच जिंकणं असून वैचारिक संग्रामातली जीत नव्हे.

तर मग, प्रश्न असा विचारायला हवा की : भोपाळच्या लोकांना वैचारिक संग्रमाकडे का दुर्लक्ष करावंसं वाटलं?

उत्तर असंय की, हिंदू राष्ट्रवाद ही केवळ कल्पना नसून जीवनप्रणाली आहे. ती शंभर कोटी भारतीयांपासून वेगळी काढता येत नाही.

१८.

गेलाबाजार विरोधकांकडून का होईना, पण हा वैचारिक अभिसंग्राम विशेषकरून ध्यानी न येणं हे खेदजनक आहे.

संग्रामासाठी दोन पक्षांची गरज असते. परंतु, हिंदू राष्ट्रावादास कसलाही वैचारिक विरोध संभवत नाही. आता मात्र ही तुमची समस्या झाली, माझी नव्हे.

१९.

यासाठी बऱ्याच व्यापक संवादाची गरज आहे.

शेवटी एकतरी यथोचित व अर्थपूर्ण विधान तुमच्याकडून आलं. माझ्यासारख्या हिंदू राष्ट्रावाद्यांशी संवाद साधण्यासाठी तुम्हांस प्रथम हिंदू जनमानस वाचावं लागेल. आहे तयारी ?

२०.

पण पहिली पायरी या दोन लढायांची गल्लत न करणं ही आहे.

माझी असहमती दर्शवतो. मोदी जसे भारतीय जनतेची पकड घेतात, तशी तुमची संवाद साधण्याची मनीषा पाहिजे. ही पहिली पायरी आहे.

-------------- प्रतिसाद समाप्त -----------------------------

वाचल्याबद्दल धन्यवाद.

आपला नम्र,
-गामा पैलवान

दिगोचि's picture

4 Jun 2019 - 7:41 am | दिगोचि

Shri. GP, I have often read your comments elsewhere which I found to be always balanced and to the point and so are these on Prof. Sen’s article. To those comments I would add that while commenting on PM Modi’s past five years Sen writes that Modi has accomplished little. IMHO, he seems to ignore the provision of toilets and LPG cylinders which is more important to many. He also has not taken into account the fact that by introducing NYAY scheme Congress alienated the middle class who saw it as an additional tax burden on them. (I am making these comments on the translation you have provided)

श्वेता२४'s picture

4 Jun 2019 - 11:11 am | श्वेता२४

He also has not taken into account the fact that by introducing NYAY scheme Congress alienated the middle class who saw it as an additional tax burden on them.

अगदी अगदी . न्याय योजना जाहिर झाली तेव्हा पहिला विचार हाच आला की किती वर्ष मी भरलेल्या टॅक्समधून इतर लोक फायदा घेणार ?(कॉग्रेसचे गरीब मह्णजे दारिद्र्य रेषेखालील लोक ज्यांना 3-4 मुले जन्माला घालायला परवडतात.) माझ्यासारख्या कित्येक नोकरदारांनी त्याच वेळेला या योजनेबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. कधी नव्हे तो मिडल क्लास राजकारणाबाबत आता संवेदनशील होताना दिसत आहे.

गामा पैलवान's picture

4 Jun 2019 - 5:41 pm | गामा पैलवान

दिगोचि,

तुमचं मत व्यक्त केल्याबद्दल आभार. तसं करावंसं वाटणं हाच माझा हेतू आहे.

आ.न.,
-गा.पै.

जयंत कुलकर्णी's picture

4 Jun 2019 - 8:47 am | जयंत कुलकर्णी

मस्त उत्तर !. माझे तर मत आहे की....जऊ देत... :-)

गामा पैलवान's picture

10 Jun 2019 - 1:49 am | गामा पैलवान

धन्यवाद, जयंतराव!
आ.न.,
-गा.पै.

खरे तर मोदी जिंकून येण्यास एकच बाजू मांडणारे विचारवंत जबाबदार आहे .
हिंदू हा सर्वसमावेशक धर्म असून सुद्धा नेहमी हिंदू धर्माला आरोपी chya पिंजऱ्यात उभे करणारे विचारवंत एकतर जनतेला मूर्ख समजत असले पाहिजेत,किंवा स्वतःला अती हुशार .
भारतात हिंदू विचाराचे सरकार आले तर काय मोठं पाप घडलय.

रविकिरण फडके's picture

4 Jun 2019 - 10:58 am | रविकिरण फडके

नथुराम गोडसेंनी केलेल्या महात्मा गांधीजींच्या खुनाचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही. गोडसेंना (त्यामुळे) देशभक्त म्हणणे ही तर असंवेदनाशीलतेची परमावधी झाली. असल्या बेजबाबदार विधानांचे फार अनिष्ट असे दूरगामी परिणाम होऊ शकतात ह्याचा विचार करावा, ही नम्र विनंती.

एकूणच, ऐतिहासिक घटनांवर पुरेशा अभ्यासावाचून भाष्य करू नये अशा मताचा मी आहे. सदर लेखकाने तसा अभ्यास केला असेल तर मी जे काही लिहिले आहे ते मागे घेतो, with apology.

चौकटराजा's picture

4 Jun 2019 - 3:07 pm | चौकटराजा

एका देशाचा देशभक्त हा दुसऱ्या देशाचा देशद्रोही असतो यात गृहीत असे की दोन्ही देशाचे हितसंबंध परस्पराविरोधी आहेत. नथुराम गोडसे यांनी मानले की गांधी ही एक प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती निसर्गात नसते ती प्राणीमात्रात नसते त्यामुळे माणूस प्राणी नष्ट केला पाहिजे असे देशाचा कायदा ही मानतो .त्यासाठी तर फाशीची शिक्षा आहे. एक देशाचा सैनिक शत्रू राष्ट्राचा सैनिक मारून टाकतो ते देशभक्ती पायी की नोकरीची टर्म कंडीशन म्हणून ? त्याचे समोरच्या अनामिकाशी माणूस म्हणून काय वैर असते. ?महात्माजींना या राष्ट्राने मनापासून राष्ट्रपिता मानले आहे . पण त्यासाठी मतदान करून बहुमत घेतले व कायदा केला असे झाले आहे काय ? तर राष्ट्रपिता ही पदवी, लोकमान्य ही पदवी , बालगंधर्व ही पदवी लोकांच्या तेसुद्धा निवडक लोकांच्या भावनेचे प्रतिक असते व ते प्रतीकच असावे. थोर गायक के एल सैगल ही गायक म्हणून कितेकाना आवडत नाहीत .आमच्य सारखे म्हणतील " अरे देवा, तू त्यांना क्षमा कर " पण त्यांचे कान कापून टाका " असे आम्ही म्हणालो तर ते काही खरे नाही. नथुराम हे म्हणे फाशी जाताना " भारत माता की जय " असे म्हणत गेले . एखादा खुनी असा आहे का की जो फाशी जाताना असे म्हणाला असेल. बियांत सिंग इंदिराजी ना मारून जेव्हा फाशी गेला त्यावेळी त्याची काय भूमिका होती ? तो " भारता माता की जय म्हणाला की खलिस्तान की जय म्हणाला की काहीच नाही. ? ज्यांना नथुराम यांना माथेफिरू , खुनी ,जल्लाद वाटतात त्या पैकी किती जणांनी त्यांचे सुप्रीम कोर्टातले प्रतिपादन अभ्यासले आहे.? मी तरी नाही त्यामुळे ना मी त्यानं देशभक्त मानीत नाही. गांधींना राष्ट्रपिता मानण्याचे माझ्यावर कायदेशीर बंधन नाही . सबब माझ्या मते देशातील कायद्याने गोडसेंना अपराधी खुनी मानले आहे. माथेफिरू वगैरे ठरविले नाही .गांधी गोडसे यांच्यापेक्षांनी आपल्याला देशाचा कायदा वंद्य असला पाहिजे .त्यामुळे आपण त्यांना फक्त " फाशी झालेले खुनी " मानू . तेच युक्त आहे. कुणीतरी कुणाला " मौतका सौदागर " म्हणून चालत नाही तसा शिक्का कायद्याने सदर व्यक्तीवर बसावा लागतो ,नाहीतर त्या व्यक्तीला प्रधानमंत्री पद व अमेरिका विसा ही मिळू शकतो .

प्रसाद_१९८२'s picture

4 Jun 2019 - 11:42 am | प्रसाद_१९८२

राजीव गांधींबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुमचा आयडी उडाला होता ना ? परत कसा काय अ‍ॅक्टिव्हेट झाला ?
की हा डुप्लिकेट आयडी आहे ?

जालिम लोशन's picture

4 Jun 2019 - 4:13 pm | जालिम लोशन

रामचंद्र 'गु,हा हे सगळे वशिल्याचे तट्टु , स्वंयघोषित बुध्दिवान, परोपजीवी आहेत. त्यांचे विचार गंभीरपणे घ्यायची गरज नाही आहे.

भंकस बाबा's picture

4 Jun 2019 - 5:50 pm | भंकस बाबा

परखड उत्तरे.
चला येथील काही आयडी मानतात त्याप्रमाणे गोडसे देशभक्त नाहीत. मग हाच न्याय शिखांचा जो नरसंहार झाला होता , त्यावेळी असलेला राज्यकर्ता पक्ष त्याची जबाबदारी का घेत नाही?
मला तर गोडसे देशभक्त वाटतात.
कारण त्यांनी दिलेले निवेदन हेच नसून , त्यांच्या बंधुनी लिहिलेली पुस्तके पण आहेत. पण चरखा चालवून स्वराज्य आले म्हणनारे थोडीच ती वाचणार आहेत? विचार करा गोड़सेना न्यायालयाने त्यानी केलेल्या हत्येबद्दल दोषी मानले आहे व त्यांना फाशी देखिल दिली आहे. तीच न्यायसंस्था खटला चालवून अफझल गुरुला फाशी देते , त्या अफजल गुरुला काही लोक हुतात्मा ठरवतात आणि सेन साहेब ह्याच लोंकाची री ओढतात. गोष्ट स्पष्ट आहे की आतापर्यंत जी सेकुलरिज्म झापडे भारतीय जनतेला सत्य बघू देत नव्हती ते नागड़े सत्य जनता मतपेटित बंद करू लागले आहे. हा ईवीएम घोटाळा वेगेरे बोलायचे असेल तर वेगळा धागा काढावा

भंकस बाबा's picture

4 Jun 2019 - 5:51 pm | भंकस बाबा

परखड उत्तरे.
चला येथील काही आयडी मानतात त्याप्रमाणे गोडसे देशभक्त नाहीत. मग हाच न्याय शिखांचा जो नरसंहार झाला होता , त्यावेळी असलेला राज्यकर्ता पक्ष त्याची जबाबदारी का घेत नाही?
मला तर गोडसे देशभक्त वाटतात.
कारण त्यांनी दिलेले निवेदन हेच नसून , त्यांच्या बंधुनी लिहिलेली पुस्तके पण आहेत. पण चरखा चालवून स्वराज्य आले म्हणनारे थोडीच ती वाचणार आहेत? विचार करा गोड़सेना न्यायालयाने त्यानी केलेल्या हत्येबद्दल दोषी मानले आहे व त्यांना फाशी देखिल दिली आहे. तीच न्यायसंस्था खटला चालवून अफझल गुरुला फाशी देते , त्या अफजल गुरुला काही लोक हुतात्मा ठरवतात आणि सेन साहेब ह्याच लोंकाची री ओढतात. गोष्ट स्पष्ट आहे की आतापर्यंत जी सेकुलरिज्म झापडे भारतीय जनतेला सत्य बघू देत नव्हती ते नागड़े सत्य जनता मतपेटित बंद करू लागले आहे. हा ईवीएम घोटाळा वेगेरे बोलायचे असेल तर वेगळा धागा काढावा

सुबोध खरे's picture

4 Jun 2019 - 7:10 pm | सुबोध खरे

त्या अफजल गुरुला काही (हरामखोर पुरोगामी) लोक हुतात्मा ठरवतात आणि सेन साहेब ह्याच लोंकाची री ओढतात.

मला हाच दुटप्पीपणा समजत नाही.

जर महात्मा गांधीना मारणारा खुनी आहे आणि त्याला खटला जलदगतीने चालवून एक वर्षात फाशी पण दिले तर जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांनी दिल्ली मध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर २७०० शिखांचे हत्याकांड केले. १०( अक्षरी दहा फक्त) कमिट्या आणि आयोग बसवून न्यायाचा भयानक देखावा उभा केला पण त्यांचा ३६ वर्षे खटला चाललाच नाही आणि शेवटी २०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली.

जेवढे काँग्रेस विरोधी तेवढेच गुन्हेगार आणि काँग्रेसची माणसे तेवढी साव हा शुद्ध दुटप्पी हलकट पणा लोकांच्या लक्षात येत नाही कि महात्मा गांधी यांचे आयुष्य २७०० निरपराध शीख व्यक्तींपेक्षा जास्त मोलाचे आहे? (मी राजकीय फायद्याच्या दृष्टीने बोलत नाही).

काँग्रेसी एवढे जर लोकशाही वादी होते तर नथुराम गोडसे यांचे मृत्यूपूर्व कथन सहा दशके प्रसिद्ध का होऊ दिले नाही.
आपण भारतीय लोक अत्यंत दांभिक आहोत हेच खरे.

महात्मा गांधी यांचे आयुष्य २७०० निरपराध शीख व्यक्तींपेक्षा जास्त मोलाचे आहे?

ह्याचा काय संबंध आहे?
दंगली आणि खून - हे एकाच मापात तोलता येते?
सामान्य माणसांच्या खुनाचे खटलेही गांभीर्याने घेतले जातात आणि खुन्यांना शिक्षा होते. हे सर्वाना माहिती आहे.
ह्याउलट दंगली (मग ती १९८४, १९९३, २००२) असोत - हे खटले रेंगाळतात कारण त्यात "जमाव" समाविष्ट असतो आणि इतर अनेकांचे हितसंबंध असतात,
१९८४ च्या शीखांविरोधी झालेल्या गुन्ह्यांना जसं गाम्भीर्याने घ्यायला हवं तसंच मग १९९३ का नाही ?

तेव्हा मुद्दा असा आहे की ही तुलना अनाठायी आणि चुकीची आहे.
तुमचा काँग्रेसला विरोध आहे हे उघड आहे आणि तो ग्राह्यही असेल. पण म्हणून "नथुरामने गांधींचा खून केला" ह्या सत्याशी त्याची तुलना का करावी?

भंकस बाबा's picture

5 Jun 2019 - 8:56 am | भंकस बाबा

घेतले नाही हे तुम्ही कोण ठरवनार?
1993 ला सुरुवात कोणी केली होती?
2002 ला कारण क़ाय होते?
2002 खटला कोर्टात चालून निकाल लागून दोषिना सजा पण झाली.
अफझल गुरु, याकूब मेमन यांना गुन्ह्याबद्दल सजा झाली, तरीही एक विशिष्ट विचारसरणी त्यांना फाशीपासुन वाचवायचा प्रयत्न करत होती. म्हणजे या लोंकाचा व तुमचा भारतीय न्यायालयावर विश्वास नाही आहे का? गोड़सेना फाशी देण्याचे दुःख नाही, पण गांधीवधानंतर एका विशिष्ट समाजाला टारगेट केले गेले त्याबद्दल त्यावेळच्या सरकारने खोटी तरी का होईना माफी मागितली का? क़ाय दोष होता हो त्या निरपराध जीवांचा?
ज्या गुजरात दंगलीचा दाखला तुम्ही देत आहात त्या दंगलित कारवाई करताना गुजरात पोलिसानी 200 च्या(हा आकड़ा जास्त असू शकतो) वर हिंदू दंगलखोराना मारले. पण कोंग्रेसने कोणत्याही जाहिर सभेत वा पत्रकार परिषदेत या बाबतीत ना विचार प्रकट केले वा ना खंत केली वा खेद! उलट अतिरेकी प्रतिबन्धात्मक कार्रवाइत मारल्या गेलेल्या शांतिप्रिय समाजाच्या लोंकाना राह भटके हुवे नौजवान म्हणून नावाजले. या न्यायाने कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या गोड़सेनी एक स्पष्ट कारण देऊन हत्या केली तर त्यांना भूले भटके ही पदवी का नाही लावली?
बादवे गांधीनी भगतसिंगना सोडण्यासाठी जी सह्यांची मोहिम चालली होती त्याला पाठिंबा द्यायला विरोध केला होता. हे सत्य जर तुम्ही स्विकारत असाल तर इथेच भगतसिंग देशभक्त होते की अतिरेकी होते हे स्पष्ट करा.

तुमच्या मते काँग्रेसने चुका केल्या आहेत. बरं.
पण ह्या मुद्द्याचा "गोडसे आणि गांधीवधाशी काहीही संबंध नाही". इतकंच मला म्हणायचं आहे.
गांधी वारले १९४८मध्ये आणि वर उल्लेखलेल्या दंगली घडल्या १९८४ मध्ये.

नथुराम गोडसे ह्यांना काँग्रेसने खुनी ठरवलं नाहीये. कायदयाने त्यांना खुनी ठरवून शिक्षा दिली आहे.
नथुराम गोडसे खुनी होते ह्यात काडीइतकाही वाद नाही. त्यांना झालेली शिक्षा रास्त आहे.

१९८४ च्या दंगलींचा गांधींच्या खुनाशी संबंध अगदीच बादरायण आहे.

बाकी काँग्रेसने कुठे आणि कशी माती खाल्ली त्याच्याशी मला देणं घेणं नाही.

भंकस बाबा's picture

5 Jun 2019 - 12:56 pm | भंकस बाबा

गोड़सेनी गांधीचा वध केला.
मदनलाल धींगरानी वायलीचा वध केला. वायलीने असा कोणता गुन्हा केला होता? जरा इतिहासाची पाने चाळा. गांधीचा गुन्हा वायलिपेक्षा पुष्कळ मोठा होता.
आणि साहेब तुम्ही फक्त तुम्हाला सोइस्कर असलेल्या प्रश्नाला उत्तरे देत आहात. जरा इतिहास वाचा आणि मत मांडा.
परत एकदा विचारतो, भगतसिंग, चाफेकर बंधु, मदनलाल धींगरा हे कोण होते? देशभक्त की अतिरेकी?

गांधींचे सर्वात मोठे विरोधक आंबेडकर होते, जिना नव्हेत.
आंबेडकरांनी गांधींवर कठोर टीका केली आहे.
बोसांनीही गांधींवर कठोर टीका केली आहे.

पण त्यांनी गांधींचा खून नाही केला. (हे वध प्रकरण भंकस आहे. खुनाला खूनच म्हणावं.)

भगतसिंग, चाफेकर बंधु, मदनलाल धींगरा हे कोण होते? देशभक्त की अतिरेकी?

भारतीय माणसाला विचारलात तर देशभक्त. इंग्रजाना विचारलं तर अतिरेकी.

गोडसेंनी भारतीय असून भारतीय माणसाचाच खून केला - ह्यात देशभक्ती नाही आणि अतिरेकही नाही. हा केवळ एक सामान्य खून.

गोडसेंच्या अविचारी कृतीने महाराष्ट्राचं राजकारण किती मागे गेलं ते पहा. १९४७ नंतर उभ्या भारतात एक तरी राष्ट्रीय नेता उभा राहू शकला का?
१९४७ च्या आधी जिथे काँग्रेसच्या राष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्र आणि मराठी नेत्यांचा बोलबाला होता, ती कामगिरी गोडसेंनी आपल्या आततायी कृतीने धुळीस मिळवली.
गंमत म्हणजे ज्या गांधींना त्यांचा विरोध होता ते तसेही म्हातारे झाले होते आणि राजकारणातून बाहेरच पडणार होते.
गोडसेंनी त्यांचा खून करून गांधींना वाजवीपेक्षा मोठं केलं, काँग्रेसला देव्हाऱ्यात बसवायला एक व्यक्तिमत्व दिलं आणि ज्या हिंदुत्वासाठी गोडसे लढत वगैरे होते, त्या हिंदुत्वाला राष्ट्रीय राजकारणातून फेकून दिलं.
गोडसेंच्या कृतीची टोटल अशी शून्य नव्हे, तर ऋण आहे.

त्याउलट भगतसिंग हे केवळ "इंग्रजांना मारलं" इतक्या कारणासाठीच देशभक्त नव्हेत. त्याव्यतिरिक्त ठोस अशी काही कामगिरी त्यांच्या नावे होती आणि त्या सकारात्मक कृतीसाठी आपण त्यांना देशभक्त मानतो.

भंकस बाबा's picture

5 Jun 2019 - 11:12 pm | भंकस बाबा

गांधीजी म्हातारे होऊन जाणार होते हे तुम्ही कसे ठरवणार?
जर त्यांची हत्या झाली नसती आणि अजून चारपाच वर्षे जगले असते तर भारतीय राजकारणाची काय वाट लावली असती याची कल्पना करवत नाही आहे.
गमतीची गोष्ट अशी आहे की तुम्ही देखिल गांधीच्या चुकलेल्या नीतीबद्दल एकप्रकारे प्रकाश टाकत आहात. जो माणूस चारपाच वर्षाच्या मुलाप्रमाणे हट्ट करून राजकारण अल्पसंख्याक तुष्टिकरणाकड़े वळवतो असा माणूस कधीही धोकादायकच! स्थलांतरामधे मारले गेलेले लाखो निर्वासित, ज्या अबलांच्या इज्जत लुटल्या गेल्या, ज्यानी आपले सर्वस्व गमावले यांचा आक्रोश तुमच्या कानावर कधी पडला नाही काय?
आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तर न बोललेले चांगले.
पार अटकेपार झेंडे लावलेल्या आमच्या मराठा साम्राज्याला कधीच पूर्ण हुकूमत गाजवायशी वाटली नाही. अगदी पनिपतावर देखील पेशवे वरचढ होतील म्हणून कूटनीति वापरली गेली. 1857च्या स्वातंत्र्यसमरातदेखिल लढनारे मराठा सरदार असताना दिल्लीच्या गादिवर बहादुरशाह जफरसारख्या नालायक माणसाला बसवण्यात आले. त्यामुळे मराठ्यांची कचखाऊ वृत्ति हा स्वभाव आहे. गोडसे त्याला कारण आहे हे हास्यास्पद वाटते

भृशुंडी's picture

6 Jun 2019 - 12:06 am | भृशुंडी

जर त्यांची हत्या झाली नसती आणि अजून चारपाच वर्षे जगले असते तर भारतीय राजकारणाची काय वाट लावली असती याची कल्पना करवत नाही आहे.

????
उद्या तुम्ही म्हणाल की अमुकतमुक विरोधक फार आवाज करताहेत आणि आणखी १० वर्ष जगले तर काय होईल कुणाला ठाऊक.
म्हणून काय तुम्ही तुमच्या विरोधकांचा खून करणार? खरंच? ह्याला राजकारण , देशभक्ती वगैरे गोंडस नावं देणार असाल तर द्या बापडे,पण सामान्य लोक ह्याला खून म्हणतात.
.
गांधी काही ठिकाणी चूक होते ह्यात वादच नाही.
आंबेडकर, नेताजी हे आणि इतर अनेक लोकही हेच सांगत होते. अगदी पटेल आणि नेहेरूंचेही गांधींसोबत टोकाचे मतभेद झाले आहेत.
मुद्दा इतकाच आहे की हे काही नथुराम गोडसेंसारख्या खुन्याने केलेल्या खुनाचं समर्थन नाही होऊ शकत.
गांधींमुळे स्थलांतर झालं ही फालतू आणि उथळ समजूत इतक्या वेळा इतक्या लोकांनी सप्रमाण खोडून काढली आहे की मला इथे पुन्हा त्यावर लिहायचं नाही.
तरी तुम्ही स्थलांतर, पाकिस्तान वगैरे सगळं गांधींच्या माथ्यावर मारणार असाल तर ठीकच आहे.

आणि महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तर न बोललेले चांगले.
पार अटकेपार झेंडे लावलेल्या आमच्या मराठा साम्राज्याला कधीच पूर्ण हुकूमत गाजवायशी वाटली नाही. अगदी पनिपतावर देखील पेशवे वरचढ होतील म्हणून कूटनीति वापरली गेली. 1857च्या स्वातंत्र्यसमरातदेखिल लढनारे मराठा सरदार असताना दिल्लीच्या गादिवर बहादुरशाह जफरसारख्या नालायक माणसाला बसवण्यात आले. त्यामुळे मराठ्यांची कचखाऊ वृत्ति हा स्वभाव आहे. गोडसे त्याला कारण आहे हे हास्यास्पद वाटते

अहो तुम्ही कुठून कुठे उड्या मारताय?
१९४७ नंतर भारतात एकही राष्ट्रीय नेता झाला नाही त्याचा पेशवाई, पानिपत, १८५७ ह्याच्याशी काय संबंध?
राष्ट्रीय नेत्यांचा शोध करायला एकदम राजेमहाराजे शोधायला नकोत.
२०व्या शतकाच्या पूर्वार्धातच असणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे वगैरेंचा विसर पडला?
हेही मराठीच होते आणि तुम्ही म्हणताय तसे "कचखाऊ" वगैरे बिलकूलच नव्हते.
२०व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी नेत्यांचा राष्ट्रीय पातळीवर असलेला अभाव का आहे ते जाहीर आहे.
१९२० नंतर लागलेलं हिंदुत्ववादी वळण आणि मग देशाच्या राजकारणाशी घेतलेली फारकत.
असो.
तुमच्या मते गोडसे देशभक्त असतील आणि त्यांचं कृत्य देशभक्तीचं तर ते तुमचं मत आहे. To each his own.

भंकस बाबा's picture

6 Jun 2019 - 10:32 am | भंकस बाबा

टिळकांनंतर भारतीया राजकारणावर प्रभाव टाकणारा एक मराठी नेता दाखवा. सावरकर होते. त्यांनी तर पतितपावन मंदिर उभारुंन गांधीजीच्या हरिजन चळवळीची हवा काढली होती. पण त्यांची हिंदुत्वाला धरून चालणारी देशभक्ति कोंग्रेसच्या पचनी पडणार नव्हती, परिणाम त्यांची मते कधी ग्राह्य धरली गेली नाहीत. खिलाफत चळवळ व कॉंग्रेसची त्याबद्दल भूमिका है काल्पनिक नाही तर खरा इतिहास आहे.
गोडसे जर माझ्यासाठी देशभक्त असतील तर ते आहेतच. पण कोंग्रेसच्या चमच्याना ओरंगाबाद, निजामुद्दीन एक्सप्रेस, अहमदाबाद ही देशभक्ताच्या नावाने मिरवलेली शहरे वा रेल्वे चालतात.अल्पसंख्याक तुष्टिकरण बंद व्हावे म्हणूनच गांधीजीची हत्या झाली. जरतरची भाषाच जर वापरायची झाली तर आता आपले प्रतिसाद उर्दूत आले असते जर गांधीजी अजून 10 वर्षे जगतात. आठवा जीनाना पंतप्रधान बनवायला चालले होते

भृशुंडी's picture

6 Jun 2019 - 11:44 am | भृशुंडी

विषय काय आणि बोलता काय?
सगळीकडे काँग्रेस मधे आणली म्हणजे मुद्दे सर होत नाहीत हो.
But I get it. this is the flavor of the season.
\_/

भंकस बाबा's picture

6 Jun 2019 - 3:02 pm | भंकस बाबा

धागा अमर्त्य सेन यांच्या लिखाणावर आहे. जो माणूस कोंग्रेसच्या नितीला डोळे झाकुन पुरस्कृत करतो त्या माणसाला कोंग्रेसचे संदर्भ देऊनच हाणला पाहिजे की नाही?
तुमचे आणि माझे वैयक्तिक वैर नाही. मला गोडसे आवडतात हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. गांधीना राष्ट्रपिता हा दर्जा दिल्यामुळे गोडसे देशद्रोही ठरत नाही हेच माझे म्हणणे आहे.

भृशुंडी's picture

6 Jun 2019 - 10:03 pm | भृशुंडी

वैयक्तिक होण्याचा प्रश्नच नाही- म्हणूनच तो peace outचा स्मायली टंकलेला :)

गांधीना राष्ट्रपिता हा दर्जा दिल्यामुळे गोडसे देशद्रोही ठरत नाही हेच माझे म्हणणे आहे.

मान्य आहे. देशद्रोही म्हणायची गरज नाही.

जो माणूस कोंग्रेसच्या नितीला डोळे झाकुन पुरस्कृत करतो त्या माणसाला कोंग्रेसचे संदर्भ देऊनच हाणला पाहिजे की नाही?

हे मला अमान्य आहे. कल्याणकारी अर्थशास्त्र अशी सेन ह्यांची थिअरी आहे - ज्यात समाजाचा "human development index" हा महत्त्वाचा मानला जातो.
त्यामुळे सहाजिकच त्यांचे मोदींशी मदभेत आहेत. पण म्हणून ते काँग्रेसधार्जिणे होत नाहीत -
असो!
आपनम्रगामापैलवानांच्या धाग्यावर इतके विषयांतर पुरे.

सुबोध खरे's picture

5 Jun 2019 - 10:03 am | सुबोध खरे

@भृशुंडी

मुद्दा समानतेचा आहे.

१)मारवाह आयोग
२)मिश्रा आयोग
३)कपूर मित्तल समिती
४)जैन बॅनर्जी समिती
५)पोट्टी रोशा समिती
६)जैन अगरवाल समिती
७)आहुजा समिती
८)धिल्लोन समिती
९)नरुला समिती
१०)नानावटी आयोग

अशा दहा समित्या आणि आयोग कसे हो नेमले जातात?

आणि एवढे करून खटला ३६ वर्षे न्यायालयासमोर येतच नाही?

आपल्या माणसांना वाचवण्यासाठी कायद्याचा पोरखेळ कसा चालवलेला आहे हे समोर आणणे हा हेतू होता.

२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंग्यांमध्ये श्री मोदीना गोवून खटल्यावर खटले दाखल होऊनहि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने नि:संदिग्ध शब्दात निर्दोषी घोषित केले आहे.

यात जमाव समाविष्ट नव्हता का? कि यात हितसंबंध नव्हते. तेथे आयोगावर आयोग समित्यांवर समित्या का नेमल्या गेल्या नाहीत?

या दुटप्पी हलकटपणासाठीच माझा काँग्रेसला विरोध आहे.

गामा पैलवान's picture

5 Jun 2019 - 12:48 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमच्या या संदेशाशी पूर्णपणे सहमत आहे. न्यायव्यवस्था ही आपली खाजगी बटीक असल्याच्या अविर्भावात भारतद्रोही शक्ती वावरतात.

किंचित दुरुस्ती म्हणजे मोदी कुठल्याही खटल्यात गोवले गेले नाहीत. मोदींच्या वाईटावर टपलेल्यांनी जंग जंग पछाडूनही हा हेतू साध्य झाला नाही. न्यायालयाने मोदींवर आरोपपत्र ठेवण्यास नकार दिला.

आ.न.,
-गा.पै.

भृशुंडी's picture

5 Jun 2019 - 7:58 pm | भृशुंडी

समानतेचा मुद्दा समान वर्गातल्या गुन्ह्यांना लागू होतो, नाही का?
व्यक्तीचा दुसर्याने केलेला खून - ह्याला अगणित साक्षीदार, स्वतः खुन्याची कबुली इतका पुरावा असताना फाशी न दिली तरच नवल.

उदा. धनंजय चॅटर्जी ह्याला हेतल पारेख खून प्रकरणात फाशी दिली गेली. इथे संशयाला जागा असतानाही (असा प्रवाद आहे) धनंजयला फाशी दिली गेली.
ह्याची तुलना करता येईल.

पण दंगल ही सामूहिक हिंसाअसते - त्याचा तपास, पुरावे आणि खटले इतके सोपे नसतात.
तुम्हाला १९८४ च्या शीख संहाराशी तुलना करायचीच असेल तर मग १९४७-४८ च्या संहाराची करता येईल.

काँग्रेसने गांधींना त्यांच्य मृत्यूपश्चात स्वतःसाठी वापरून घेतलं आहे ह्यात शंका नाही.
बाकी १९९३ च्या दंगलीतलया बळींना तरी कुठे अजून न्याय मिळालाय? श्रीकृष्ण समिती वगैरेंचे अहवाल तर पब्लिशही होऊ दिले नाहीत.
असो.

सुबोध खरे's picture

6 Jun 2019 - 10:03 am | सुबोध खरे

समानतेचा मुद्दा समान वर्गातल्या गुन्ह्यांना लागू होतो,

कशाला या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताय?

दहा चौकशी आयोग आणि समित्या स्थापन करून नुसता कालापव्यय केला आणि खटला न्यायालयासमोर यायला ३६ वर्षे लावली आणि गुजरातचे दंगे मात्र तातडीने चौकशी करून धसास लावण्याचा प्रयत्न केला ( त्यात श्री मोदी हे निर्दोष आहेत असे सर्वोच्च न्यायालयीन समितीनेच सांगितले त्यामुळे गोची झाली हा भाग वेगळा)

या गोष्टीं समान नाही म्हणताय?

एवढे सत्य धडधडीत पणे दिसत असतानाही काँग्रेसचीच भलामण करायची असेल तर ठीक आहे त्यात अजून बोलण्यासारखे काहीच नाही.

बाकी नथुराम गोडसे यांनी गांधीजींचा वध केला त्याबद्दल त्यांना फाशी दिली यात अयोग्य असे काहीच नाही.

पण ज्या तर्हेने स्व. सावरकर(जे गांधी नेहरू यांचे वैचारिक विरोधक होते) याना त्यात गोवण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत हीन होतं यातहि शंका नाही.

भृशुंडी's picture

6 Jun 2019 - 11:38 am | भृशुंडी

लोल.
अहो आता ह्यात काँग्रेसची भलामण काय? की जे आहे ते मांडलं म्हणजे माणूस काँग्रेसचा होतो?
इतिहास म्हणजे क्रिकेट मॅच नाही की काँग्रेस आणि भाजप अशा दोन टीम्समध्ये खेळला जावा.

बोटावरची थुंकी वगैरे शब्दप्रयोग .. असो.
माझा मुद्दा प्रथमपासून आणि आताही इतकाच आहे की कुणा एकाचा खून आणि दंगल - ह्यांची तुलना होऊ शकत नाही.
पण तुम्ही काँग्रेस आणि भाजपाच्या रंगांमध्ये जग पाहात असाल तर पुढे बोलणं कठीण आहे.

बाकी नथुराम गोडसे यांनी गांधीजींचा वध केला त्याबद्दल त्यांना फाशी दिली यात अयोग्य असे काहीच नाही.

थॅक्स.

वामन देशमुख's picture

5 Jun 2019 - 9:12 am | वामन देशमुख

अमर्त्य सेन यांनी मांडलेल्या ख-या-खोट्या मुद्यांचा खूप चांगला प्रतिवाद केला आहे पैलवान साहेब!

गामा पैलवान's picture

5 Jun 2019 - 12:44 pm | गामा पैलवान

वामन देशमुख,

प्रसंसेबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

पाश्चिमात्य देश खूप पैसा खर्च करून भारतीय कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी मेहनत करत आहे t त्यामुळे समाज विघातक भूमिका घेणाऱ्या आणि स्त्री चा लढा
आहे असा भास निर्माण करणाऱ्या बोगस संस्था खूप पैदा झाल्यात इथे .
हिंदू हा महत्त्वाचा घटक आहे भारतात त्या मुळे इतिहास चुकीचा सांगण्यासाठी बाहेरचे देश खूप पैसा खर्च करतात आणि त्यांचे हस्तक पुरोगामी,कम्युनिस्ट आहेत .
सरकारनी सर्व ngo ना पैसा कोण पुरवते ह्याची चोकशी करावी आणि काही चुकीचं आढळलं तर सरळ सर्व कायदे धाब्यावर बसवून त्यांना सार्वजनिक फाशी द्यावी

भृशुंडी's picture

6 Jun 2019 - 12:10 am | भृशुंडी

Rajesh188,

पाश्चिमात्य देश खूप पैसा खर्च करून भारतीय कुटुंब व्यवस्था नष्ट करण्यासाठी मेहनत करत आहे

पण का? ह्यातून पाश्चिमात्य देशाना काय मिळणार आहे? तेही भरपूर पैसा खर्च करून?

सरकारनी सर्व ngo ना पैसा कोण पुरवते ह्याची चोकशी करावी आणि काही चुकीचं आढळलं तर सरळ सर्व कायदे धाब्यावर बसवून त्यांना सार्वजनिक फाशी द्यावी

NGO ला फाशी देणार म्हणजे काय करणार नक्की ?

आपल्या संयत आणि प्रगल्भ विचारसारणीवर कुणाचा प्रभाव आहे?

डँबिस००७'s picture

6 Jun 2019 - 11:06 am | डँबिस००७

श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप व मोदींच्या निवडणुकीतल्या विजयावर वैचारिक संग्राम ही पार्श्वभूमी धरून काही भाष्य केलं आहे.

श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप सरकारच्या पहिल्या पाच वर्षांत (२०१४-२०१९) मध्ये बरीच टिका केलेली होती. २०१९ निवडणुकीचे निकाल येई पर्यंत भाजप ही निवडणुक जिंकु शकेल हे ह्या
श्री. अमर्त्य सेन सारख्यांना मान्य नव्हत !! त्यांच्या सिलेक्टीव्ह बघण्यामुळे भाजपा सरकारने प्रत्यक्ष जनतेसाठी काही काम केले असल्याचे त्यांना दिसले नाही ! मोदीला कांउंटर म्हणुन कॉंग्रेसने न्याय नावाची जी योजना आणली होती त्याचे जनक हे अमर्त्य सेनच !!

मोदी सरकारवर अमर्त्य सेन ईतके खार खाउन का आहेत याची कारण मिमांसा करण्यासाठी तुम्हाला गेल्या काही दशकांचा ईतिहास बघावा लागेल !!
अमर्त्य सेन व मनमोहन सिंग ह्या दोघांची दोस्ती १९८० च्या आसपास सुरु होते !
Rothschild हे दोन शतकांपासुन जगातील सर्वात श्रिमंत कुटुंब आहे ! कित्येक देशातील रिझर्व बँकांवर , शेअर बाजारावर ह्यांची हुकुमत चालते ! अमर्त्य सेन हे ह्या कुटुंबाचे जावई आहेत !!
केंब्रिज विद्यापिठात मनमोहन सिंग यांच्या नावाने तिथे शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृृृत्ती २००८ पासुन दिली जाते. Rothschild Foundation ह्या शिष्यवृृृत्तीसाठी फंड देतो.
नालंदा विद्यापीठ :The left ecosystem got entrenched in India with the advent of the Jawaharlal Nehru government in the 1950’s. Supported with state patronage, it has been systematically driving out opposing viewpoints from social institutions. Academics have been the biggest victims of this ‘organized genocide’ so much so that by 1990’s, the presence of views in oppostion to the left were virtually non-existent in the country’s institutions.

However accompanying this ‘organized genocide’ was the rampant misappropriation of funds; where the resources meant for the education of the poor and needy were diverted off by ‘champagne socialists’ to lead comfortable lives while the Indian youth was kept away from the much needed quality education.

Recently surfaced facts regarding Nalanda University, Rajgir, Bihar during the Manmohan Singh government , raise hard questions on his supposed clean image and the conduct of Left wing ‘intellectuals’. Times of India journalist, Bharti Jain, has made shocking claims about the management of Nalanda University and the utilization of funds. She tweeted:

“Two more faculties were appointed, honorary, Daman Singh & Amrit Singh. Middle & youngest daughters of Manmohan Singh.They stayed in USA while drawing salary.”

ह्या नालंदा विद्यापिठ घोटाळ्यातली रक्कम आहे तब्बल २७२९ कोटी रु

२०१४ ला अमर्त्य सेनना ह्या कुलगुरु पदावरुन काढुन टाकल !

आपल्या लोकांसाठी बनवलेली कुरणे बंद झाल्यामुळे अमर्त्य सेन व मनमोहन सिंग दोघेही खवळुन उठले !
https://www.google.ae/amp/s/rightlog.in/2019/04/amatya-sen-manmohan-sing...

गामा पैलवान's picture

6 Jun 2019 - 5:23 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

माहितीबद्दल धन्यवाद. मनमोहन सिंग व अमर्त्य सेन कमालीचे भ्रष्ट आहेत असं नालंदा घोटाळ्यातून सूचित होतंय.

मला अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्रीय नोबेल पारितोषिकावर शंका होतीच. तिचं खात्रीत रुपांतर होतंय. काहीतरी जुमलेबाजी करून मिळवलेलं वाटतंय. शांततेच्या नोबेलला मी कधीच किंमत दिली नाही. तीच वेळ अर्थशास्त्राच्या नोबेलवर येणार बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

डँबिस००७'s picture

6 Jun 2019 - 1:54 pm | डँबिस००७

अमर्त्य सेन व मनमोहन सिंग दोघेही १९६० ते १९७० च्या दरम्यान दिल्ली स्कुल ऑफ ईकॉनॉमिक्स मध्ये प्रॉफेसर होते.

अमर्त्य सेन ह्यांच लग्न एम्मा रॉथ्सचाईल्ड हिच्याशी १९९१ मध्ये झाल. आणी १९९८ मध्ये अमर्त्य सेन ह्यांना नोबेल प्राईस मिळाले.
रॉथ्सचाईल्ड खानदानातील जावयाला नोबेल मिळणे हे काही विषेश नाही. पण ह्या खानदानातील जावयाला अमर्त्य सेनला नोबेल पारितोषक हे गरीब लोकांवर विषेश काम केल्याबद्दल मिळणे हे हास्यास्पद आहे. कारण रॉथ्सचाईल्ड खानदान हे गेल्या २०० वर्षांतील जगातील सर्वात श्रिमंत खानदाना पैकी एक आहे. जेंव्हा भारतीय रिझर्व बँक बनवली गेली होती त्यावेळेला ब्रिटीश सरकारला त्यावेळेच्या
सर रॉथ्सचाईल्डनी रिझर्व बँकेला स्वायत्त करावे अशी शिफारीश करण्यात आली होती. अश्या प्रकारे स्वायत्त केलेली रिझर्व बँक ही पुढे
रॉथ्सचाईल्ड खानदानाच्या हातात गेली असती. पण ब्रिटीश सरकारने रिझर्व बँकला आपल्या नियंत्रणात ठेवले. रॉथ्सचाईल्ड खानदानाने
जगातील अनेक देशाच्या रिझर्व बँकना , सेंट्रल बँकांना आपल्या कंट्रोल मध्ये ठेवलेले आहे.

Amartya Sen. Amartya Sen, (born November 3, 1933, Santiniketan, India), Indian economist who was awarded the 1998 Nobel Prize in Economic Sciences for his contributions to welfare economics and social choice theory and for his interest in the problems of society's poorest members.

नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुच्या पदावर अमर्त्य सेन यांना मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारने नेमले होते. ह्या पदावर अमर्त्य सेन यांना अमर्याद अ धिकार देण्यात आलेले होते. अमर्त्य सेन याम्नी आपल्या स्टाफ मध्ये मनमोहन सिंग ह्याच्या तिन्ही मुलींना फुल पगारावर ठेवले होते. सलग ९ वर्षे अमर्त्य सेन हे ह्या पदावर राहीले दर महा ५ लाखाच्या वर पगार घेत होते पण ते स्वतः ह्या नालंदा विद्यापिठात कधीही आले नाहीत. अमेरिकेत बसुन पगार घेत राहीले. तीच गोष्ट मनमोहन सिंग ह्याच्या तिन्ही मुलींना सुद्धा लागु होती.

२०१४ साली भाजपा सरकार आल्यावर नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुच्या पदावर अमर्त्य सेन यांना बरखास्त करण्यात आले.

त्याची काही खात्रीलायक लिंक देऊ शकाल का?

डँबिस००७'s picture

7 Jun 2019 - 1:38 pm | डँबिस००७

त्याची काही खात्रीलायक लिंक देऊ शकाल का?

? ? , खात्रीलायक लिंक म्हणजे काय ? कश्याची लिंक पाहिजे तुम्हाला ?

https://rightlog.in/2019/04/amatya-sen-manmohan-singh-daughters-nalanda-...
हि लिंक दिलेली आहेच, मुळातुन ही लिंक वाचली असती तर असे प्रश्न पडले नसते.

मनमोहन सींग व अमर्त्य सेनचे चेहर्यावरचे सभ्यतेचे मुखवटे गळुन पडलेले आहेत.

अश्या गोष्टी उघडपणे होत नसतात पडद्या मागुन होत असतात. त्या मुळे जेंव्हा भारती जैन (Times of India journalist, Bharti Jain) हीने ही बातमी ब्रेक केली तीच्यावर तिखट हल्ला मिडीया कडुन केला गेला. आता सुद्धा द प्रींट , द वायर स्क्रोल द हिंदु सारखे
अती डावे मिडीया मनमोहन सींग व अमर्त्य सेनचे पाठीराखे आहेत. ह्या मिडीया हाऊस कडुन अस पसरवल जात आहे की मनमोहन सींग व अमर्त्य सेन ह्या दोघावरचे आरोप खोटे आहेत.

९ वर्षे अमर्त्य सेन हे ह्या युनिवर्सीटीचे कुलगुरु नियुक्त केले गेले. ह्या ९ वर्षात अमर्त्य सेन पगार घेत राहीले पण नालंदा ईथे यायला त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांनी स्व:ता मनमोहन सींगांची कन्या उपिंदर सीगला प्रोफेसर म्हणुन नियुक्त केले. तिने पुढे आपल्या बहीणींना ऑनररी नियुक्त केले . ह्या दोन बहीणी अ मेरिकेत राहुन पगार घेत होत्या.

“Two more faculties were appointed, honorary, Daman Singh & Amrit Singh. Middle & youngest daughters of Manmohan Singh.They stayed in USA while drawing salary.”

Further investigation has revealed that the controversy is not only limited to the appointment of family members of ex- PM Manmohan Singh and Amartya Sen but according to an audit report by CAG, several incidents indicate towards the accommodation and perpetuation of benefits to certain individuals. According to the report of the Comptroller and Auditor General of India for the financial year ending in March 2016.

“Regular Governing Board was not constituted by the Ministry as provided in the Act. The endowment committee, though formed was ineffective. The University failed to frame rules and regulations for appointment of academic staff and there were irregularities in appointment of Vice Chancellor and OSD (University Planning). The Vice Chancellor and OSD (University Planning) were given undue reimbursement of income tax amounting to 57.40 lakh. The University failed to establish schools in time and could not start the construction of University campus work.”

This is a striking example of quid pro quo that has existed between the Left ecosystem and the Congress, where Congress has turned a blind eye to the blatant misappropriation of funds to benefit certain selected individuals. The probability of the misappropriation of funds in Nalanda university being an isolated incident is low. This surely calls for an inquiry in this case and other cases which could have been shoved under the carpet under previous regimes.

डँबिस००७'s picture

7 Jun 2019 - 1:49 pm | डँबिस००७

मन मोहन सींगच्या नावाने कँब्रिज विद्यापिठात २००८ पासुन शिष्यवृत्ती (३ - ४ लेव्हलच्या विद्यार्थ्यांना) दिली जाते. https://en.m.wikipedia.org/wiki/Dr_Manmohan_Singh_Scholarship

ह्या अश्या शिष्यवृत्ती देण्यासाठी फार मोठी रक्कम दर वर्षी लागते ती रक्कम कोण पुरवत ? ह्या वर प्रश्न पडला पाहीजे !

कँब्रिज विद्यापिठात अश्या शिष्यवृत्ती देण्यामागे फार मोठी यंत्रणा काम करत असते. अश्या शिष्यवृत्ती देऊन बरेच ईतर फायदे मिळवले जातात हे जग जाहीर आहे.

डँबिस००७'s picture

7 Jun 2019 - 2:03 pm | डँबिस००७

Amartya Sen should be prosecuted: Swamy

Five days after Nobel laureate Amartya Sen withdrew his candidature for a second term as Chancellor of Nalanda University, BJP leader Subramanian Swamy on Tuesday demanded that he be prosecuted under the Prevention of Corruption Act.

In a letter to members of the university’s Governing Board on February 19, Dr. Sen said there was a unanimous resolution in January that he should have another term, but the President as Visitor was not able to give his assent to it as he had not got the government’s approval.

Dr. Swamy has levelled several accusations against Dr. Sen, including the claim that about Rs. 3,000 crore of tax payer’s money has been “recklessly” spent by him during his tenure.

“The former President of India, Dr. Abdul Kalam resigned from the post of Visitor of the University in 2011 in disgust, objecting to Sen’s arbitrariness and malafide actions,” Dr. Swamy said, adding that the Finance Ministry had also earlier objected to the arbitrary way in which Dr. Sen was operating the Special Dispensation Fund.

Dr. Swamy said Dr. Sen was paid an annual salary of Rs. 50 lakh despite the fact that he lived in America and only briefly visited India.

A CAG report on the expenses incurred for construction of the University points to many irregularities, he alleged.

He demanded that the Government initiate prosecution, failing which he would file a public interest litigation petition.

https://www.thehindu.com/news/national/amartya-sen-should-be-prosecuted-...

गामा पैलवान's picture

8 Jun 2019 - 3:36 pm | गामा पैलवान

आयशप्पत,

अमर्त्य सेन या घोटाळेबाजाच्या वक्तव्यावर प्रतिसाद कशाला लिहिला असं वाटून राहिलंय मला. पण ठीके. निदान भारतीयांची बाजू तरी मांडता आली.

-गा.पै.