हिंदीला पर्याय असू शकतो?

Primary tabs

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
30 May 2019 - 12:08 pm
गाभा: 

मराठी तसेच अन्य हिंदीतर भाषांवर हिंदीचे आक्रमण वाढते आहे.आपल्या मराठी बाबत सांगायचे झाले तर तरसणे,बातचीत असे कितीतरी मराठी नसलेले शब्द वृत्तवाहिन्यांमुळे मराठीत शिरतायत.हिंदी व्याकरणाचाही प्रभाव पडून 'मी बोलली',मी आली,मी गेली,आवाज दिला का?(हाक मारली का?) हे असे कितीक हाल मराठी सोसतेय.वर्धा महाराष्ट्रात असूनही तिथे हिंदी विद्यापीठ आहे.

केवळ मराठीच नव्हे तर बाकीच्याही हिंदीतर भारतीय भाषांबाबतही होतंय.फेसबुकवर या हिंदीच्या आक्रमणाची खंत मांडणारी पाने,समूह सुरु झाली आहेत.खालील दुव्यांवर आपण ते पाहू शकता.

मातृभाषेबाबत आग्रही राहण्याचं एक उदाहरण म्हणून तामिळनाडूचं नाव नेहमी पुढं केलं जातं.त्याच कट्टर अशा तामिळनाडूतल्या बांधकाम व अन्य क्षेत्रातल्या अभियंत्याना,कंत्राटदारांनाही या हिंदीनं वाकवलेलं आहे.दि हिंदूमधील ही ९ वर्षांपूर्वीची बातमी वाचा.यावरुन आता तिकडे किती हिंदी पसरली असेल याचा विचार करा.

T Selvakumar

Chennai

Posted: 10 May 2010 by 00:00 IST

Tamil architectures and field engineers are learning Hindi in order to work in 80% of North Indian workers engaged in construction work in Tamil Nadu. Hindi, Polytechnic, ITI, and those who come to work in Hindi are preferred.

A large number of North State workers are working in various industries, including the construction industry, hotels, small shops and the supermarket, beauty products and sales centers. There are substantial numbers of Bihar, Odisha and Rajasthan. There are also workers in Andhra Pradesh.

Particularly 70 to 80 percent of North Indian workers work in the construction industry. Since they know only Hindi language, there is a great deal of difficulty for the Tamil-speaking maestro, field engineer, project engineer, project manager and contractor during construction. So they have been forced to learn Hindi. At the same time, interested North American workers are also learning Tamil.

Tamil and Telugu

In this regard, Sivagurunathan, Vice Chairman of the Chennai Real Estate Corporation Association (Gretai)

The workforce in Tamil Nadu is about 70 to 80 percent of the workers from the North. It is inevitable that they speak Hindi. The remaining 20 percent are Tamils ​​and Telugu people.

Most of them do the same as a field supervisor, manager, and a senior officer. Therefore, Hindi has to know the building designer, field engineer, project engineer and project manager to work with the Northern state workers during construction. It is essential that the Knight Engineer and the field engineer in particular need to know Hindi.

Last 5 years ago, the architect did not know Hindi. Let's say that there is no magician who does not speak Hindi today. The field engineers who come to work after completing the PE, Polytechnic and ITI have become basic knowledge in Hindi because of the priority in the work. Thus, there are no restrictions on 400 construction projects in Tamil Nadu that cost around Rs 28,000 crore.

He said so.

Job integration

Nandakumar, former head of the Tamil Nadu unit of the Federation of Real Estate Management Societies (Gretai) said, "The integration of work in the construction industry is essential. Most of the people in the industry are in the Northern province, and even 10 to 15 years of professional experience, even building materielals can not afford them to work properly. The Hindi masters have learned to speak half-spoke to them, since they have learned Hindi to be able to easily work in the North. But they do not know how to write Hindi. "

या उत्तर भारतीय,बिहारी कामगारांना स्थानिक भाषा शिका म्हटलं तर ते शिकत नाहीत.आपली हिंदीच सुरु ठेवतात."अरे भैय्या हम तो पेट भरने के लिए आए हैं।ये नई भासा वगैरा सीखना हमसे तो ना हो पाएगा।" अशी उत्तरं मिळतात.कंत्राटदारसुद्धा कुठं यांना समजावत बसता? कमी दरात मजूर मिळतोय त्याबदल्यात मोडक्या तोडक्या हिंदीत का असेना संवाद साधा आणि काम उरकून घ्या असा विचार करतात.

तामिळनाडूतल्या शाळांमधेही आता हिंदी शिकवा असा सूर उमटू लागला आहे.हा व्हिडिओ पहा.

https://youtu.be/18ilO98UhUg

हिंदीच्या आक्रमणामुळे कट्टर असा तमिळनाडूसुद्धा आता हळूहळू असा बदलतोय.

थोडक्यात हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसूनही ती भारतात वेगानं हातपाय पसरते आहे.

नोटा,सेन्सॉरकडून मिळणारं प्रमाणपत्र या गोष्टी सर्व भारतीयांसाठी आहेत.पण यांवरचा मुख्य मजकूर हा फक्त हिंदीत असतो.हे कशाकरता? एकीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही म्हणायचं आणि दुसरीकडून असा प्रचार आणि लादणूक करायची,शासकीय बँकांमधून हिंदी दिन साजरा करण्याची सक्ती करायची.कस्टमर केअरवाले थेट हिंदीतंच सुरु करतात.

याबदल्यात हिंदी भाषिक काय करतात ते बघा.ते दुसर्‍या राज्यात गेल्यावर स्थानिक भाषा शिकत नाहीत.त्रिभाषासूत्रातून हिंदी आपल्या माथी मारली आहे.पण हे लोक स्वत:च्या हिंदी पट्ट्यात मात्र हिंदीतर भारतीय भाषा जसे की मराठी, तामिळ, तेलुगू , बंगाली, कन्नड शिकवत नाहीत.असं का?

ज्यांना भारतातल्या भारतात बराच प्रवास करावा लागतो त्यांना प्रत्येक राज्याची भाषा शिकणं शक्य नाही.किंवा हल्ली फेसबुक,व्हॉटसअॅप अशा समाज माध्यमांद्वारा बहुभाषिक लोक मित्र म्हणून जोडले जाणे शक्य होते.त्या प्रत्येक मित्राची मातृभाषा शिकणं काही शक्य नाही.

सर्वांना जोडणारी भाषा म्हणून हिंदी स्विकारल्याचे दुष्परिणाम म्हणजे हिंदीची दादागिरी आणि हिंदीभाषिकांचा वरचष्मा, स्थानिक भाषा न शिकणे,हिंदी राष्ट्रभाषा आहे असा खोटा प्रचार करणे.

ही दादागिरी टाळण्यासाठी काय करता येईल? किंवा हिंदीला पर्याय म्हणून कोणत्याच राज्याची किंवा भाषिक पट्ट्याची स्थानिक भाषा नसणारी 'भारती' किंवा असंच काहीतरी चांगलंसं नाव देऊन नवीन भाषा व लिपी निर्माण करावी का? जिच्यात प्रत्येक राज्यातले शब्द समान संख्येने असतील? कारण भारत जोडला गेला पाहिजे हे खरं असलं तर तो एकाच भाषेच्या मिंध्यात राहणेही चांगले नाही.ही मक्तेदारी मोडून काढणे कसे शक्य व्हावे? तुम्हाला काय वाटतं? पर्याय निर्माण होऊ शकतो हिंदीला?

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

30 May 2019 - 1:12 pm | उगा काहितरीच

शेवटचा परिच्छेद दोनदा वाचला. तुम्हाला नक्की नवीन भाषा निर्मिती हा उपाय वाटतो का या समस्येवर ?
डोथ्राकी चालेल का ? हाय वलेरीयन पण आहे बरी.

उपयोजक's picture

30 May 2019 - 2:44 pm | उपयोजक

अवघड असेल.अशक्य नव्हे!

विजुभाऊ's picture

30 May 2019 - 1:31 pm | विजुभाऊ

१) हिंदी भाषीक पट्ट्यातील राज्यांचा विकास करणे जेणे करून तेथील मजूर इतर राज्यात जाणार नाहीत.
२) हिंदी भाषीकांना इतर राज्यात स्थलांतर करायला आडकाठी करणे. ( याला उत्तरभारतीय आक्षेप घेतील)
३) संघराज्य रचना करुन प्रत्येक राज्याने स्वतःचे मनुष्यबळ विकसीत करायचे. आंतर राज्य स्थलांतर टाळायचे. ( युरोपीयन युनीयनमधे देखील स्थलाम्तरीतांचे हे प्रॉब्लेम्स वाढत आहेत)
४) या सर्वांचे मूळ कारण म्हणजे हिंदी भाषीक राज्यांचा विकास झालेला नसणॅ , तेथेनोकर्‍या उपलब्ध नसणे ,तेथे होत असलेली लोकसंख्या वाढ, तेथे असलेले शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण . हे जो पर्यंत दूर होत नाही तोवर हिंदी भाषीक लोक इतरत्र जात रहाणारच. ( प्रत्येक राज्य जर वेगळा देश म्हणून पुढे आला तर विसा , वर्क परमीत यामुळे स्थलांतर रोखता येवू शकेल . पण हा अती शेवटचा पर्याय होऊ शकेल )

उपयोजक's picture

30 May 2019 - 2:46 pm | उपयोजक

हिंदी भाषेचं आक्रमण,दादागिरी हा मुद्दा आहे.

सर्व हिंदी भाषा नसलेल्या राज्यातील लोकांना असे वाटत आहे की हिंदी चे वादळ जे देशभर घोगावत आहे त्याचे चक्रीवादळ मध्ये रुपांतर होवून बाकी सर्व भाषा नष्ट होतील .
पण ह्या हिंदीच्या वादळाचे चक्रीवादळ त रुपांतर न होताच ते कमजोर होईल .
आपण विचार केला तर असे लक्षात येईल उच्य शिक्षण साठी कोणत्याच भारतीय भाषेचा वापर केला जात नाही
दहावी नंतर भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र अशी सर्वच शास्त्र इंग्लिश मध्ये शिकवली जातात .
डॉक्टर ,इंजिनिअर,कॉम्प्युटर क्षेत्रात कुढेच भारतीय भाषेला स्थान नाही .
भारतीय भाषा ह्या फक्त संभाषण करण्यासाठी च वापरल्या जातात त्या पेक्षा त्यांना किंमत नाही
कॉर्पोरेट ऑफिसेस,संशोधन
करणाऱ्या संस्था,. वरिष्ठ पातळीवर काम करणारे सरकारी अधिकारी ह्यांनी कधीच भारतीय भाषांना राम राम ठोकला आहे .
अजुन काही वर्षांनी फक्त गरीब आणि कमी दर्जाचे काम करणारे हेच फक्त भारतीय भाषेचं वापर करतील आणि इंग्लिश सिंहासन वर बसलेली असेल.
जपान,कोरिया,चीन,आणि बाकीचे देश ह्यांनी स्वभाषा ही सायन्स आणि टेक. ची भाषा बनवली आहे
तसे आपण करू शकलो नाही

उपयोजक's picture

30 May 2019 - 2:50 pm | उपयोजक

भाषा ही फक्त शिक्षणाचं माध्यम म्हणूनंच वापरली जाते का?

पुणेरी राघूमैना's picture

3 Jun 2019 - 10:50 am | पुणेरी राघूमैना

You are absolutely right sir.

चौथा कोनाडा's picture

30 May 2019 - 1:36 pm | चौथा कोनाडा

छान प्रस्ताव. उत्तम लेख !

गेल्या काही वर्षात हिंदी ही वेगाने "कॉमन कम्यूनिकेशन लँग्वेज" म्हणून उदयास येत आहे.
दक्षिणेकडे विशेषतः तामिळनाडू मध्ये ठराविक राजकारणी व कट्टरभाषिक सोडले तर सामान्य जनतेला हिंदी शिकायचीच होती, आहे कारण ही भाषा त्यांचा उदरनिर्वाह करून त्यांना जगवणार आहे. तेथील उच्चभ्रू लोक, सरकारी बाबू, आयपीएस वै लोकांना तर हिंदी शिकावीच लागते.
चेन्नईमध्ये काही ठिकाणी "स्पोकन हिंदी" क्लासच्या पाट्या पहिल्या होत्या.

थोड्यात हिंदी ही भारतीय खंडात वेगाने "कॉमन कम्यूनिकेशन लँग्वेज" म्हणून स्वीकारली जात आहे, जरुरीचे सॉफ्ट स्किल.
याला दादागिरी म्हणता येणार नाही. ती उदरनिर्वाहाची भाषा आहे, जशी इंग्रजी जगभर वापरली जाते.

नवीन भाषा लिपी तयार करणे अवघड काम आहे. काही दशके जावी लागतील. तेंव्हा काय परिस्थिती असेल माहीत नाही.
हिंदी, इंग्रजी वगळता अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक भाषेने कणखर पणे आपली स्थानिक भाषा वापरणे हाच एक पर्याय उरतो.

हिंदी ही फक्त संपर्क भाषा आहे आणि इंग्लिश ज्ञान भाषा आहे .
हिंदी का वाढण्यास मर्यादा आहेत .
जोपर्यंत हिंदी ज्ञान भाषा बनत नाही तोपर्यंत तिला जास्त किंमत नाही .
मेरा जुता लेके आणा .
एवढीच किंमत असेल

उपयोजक's picture

30 May 2019 - 2:59 pm | उपयोजक

इंग्रजी बहुतांश भारतीयांना सहजपणे येत नाही तोपर्यंत हिंदी वेगाने पसरत राहील.

हिंदी ही फक्त संपर्क भाषा आहे आणि इंग्लिश ज्ञान भाषा आहे .
हिंदी का वाढण्यास मर्यादा आहेत .
जोपर्यंत हिंदी ज्ञान भाषा बनत नाही तोपर्यंत तिला जास्त किंमत नाही .
मेरा जुता लेके आणा .
एवढीच किंमत असेल

उपयोजक's picture

30 May 2019 - 2:56 pm | उपयोजक

धन्स! आणि सहमत.

मी स्वत: एका WhatsApp ग्रुपात तमिळभाषिकांना हिंदी शिकवायचो.पण आता बंद केले. कारण हिंदी भाषिक तितक्या आत्मियतेने इतर भाषा शिकत नाहीत.त्याच तमिळ भाषिकांना मी आता मराठी शिकवण्यास सुरुवात केली आहे. :)

जालिम लोशन's picture

30 May 2019 - 2:44 pm | जालिम लोशन

सिधुंदुर्ग कोकणीला राष्ट्रभाषा बनवली तर?

अगे बाय माझ्या! ह्या केलंस तर बरा होइत बाबा/ बाये! सोप्या काम मग एकदम सगळा! नाय?

भंकस बाबा's picture

1 Jun 2019 - 9:08 am | भंकस बाबा

वेगळ्या भाषा आहेत वो!

मुळातूनच नवीन भाषा निर्माण करण्याच्या पर्यायाविषयी.

जे लोक आपली सोडून अन्य कोणतीही भाषा शिकू इच्छित नाहीत ते लोक ही नवी प्रस्तावित भाषा मात्र नव्याने शिकतील आणि बोलतील अशी आशा कशाच्या आधारे करावी?

आणि ही नवी भाषा ज्यांना येते अशा लोकांची दादागिरी किंवा गटबाजी होणारच नाही का?

अस्तित्वात असलेल्या भाषांपैकीच एक जी एकाहून अधिक राज्यांत किंवा मोठ्या भूभागात वापरली जाते तिलाच देशाची सामुदायिक भाषा म्हणून स्वीकारणं सोपं नाही का? भले ती याक्षणी अधिकृत राष्ट्रभाषा म्हणून नोंदवलेली असो वा नसो.

उपयोजक's picture

30 May 2019 - 10:10 pm | उपयोजक

>

आपली सोडून अन्य भाषा शिकू न इच्छिणारे म्हणजे कोण?

>

कोणत्याच राज्याची नसल्याने गटबाजीची शक्यता कमी वाटते.
ज्यांचं इंग्रजी चांगलंय त्या भारतीयांनी ज्यांचं चांगलं नाही त्यांच्यावर दादागिरी केल्याचं पाहण्यात आहे का?

>

यातूनच दादागिरी होते,अडेलतट्टूपणा होतो, आपलीच भाषा इतरांनी शिकावी हा दुराग्रह होतो.

------ आपली सोडून अन्य भाषा शिकू न इच्छिणारे म्हणजे कोण?

लेखातील वाक्ये:

उत्तर भारतीय,बिहारी कामगारांना स्थानिक भाषा शिका म्हटलं तर ते शिकत नाहीत.आपली हिंदीच सुरु ठेवतात."अरे भैय्या हम तो पेट भरने के लिए आए हैं।ये नई भासा वगैरा सीखना हमसे तो ना हो पाएगा।" अशी उत्तरं मिळतात.

ते दुसर्‍या राज्यात गेल्यावर स्थानिक भाषा शिकत नाहीत.

------ज्यांचं इंग्रजी चांगलंय त्या भारतीयांनी ज्यांचं चांगलं नाही त्यांच्यावर दादागिरी केल्याचं पाहण्यात आहे का?

हो.

उपयोजक's picture

31 May 2019 - 12:26 pm | उपयोजक

गवि!
पोट भरण्यासाठी देशांतर्गत कुठेही जावं लागणार असेल तर जी कोणती नवी भाषा बनवली जाईल ती या उ.भा ना झक मारत का होईना शिकावीच लागेल.

वामन देशमुख's picture

30 May 2019 - 6:16 pm | वामन देशमुख

भारत सरकारने आणि सर्व राज्य सरकारांनी इंग्लिश या भाषेला अधिकृत राजभाषा असा दर्जा द्यावा आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी.
म्हणजे सगळा सरकारी कारभार केवळ इंग्लिश भाषेत आणि त्या-त्या राज्याच्या भाषेत (म्हणजे, मराठी, तमिळ, हिंदी इत्यादी) असावा म्हणजे गैर हिंदी भाषकांना हिंदी शिकण्याची गरज भासणार नाही आणि इंग्लिश भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होईल.

BTW: इंग्लिश भाषेत संवाद साधून शकणारे भारतीय, इतर भारतीयांच्या तुलनेत ३१% अधिक कमाई करू शकतात एका सर्वेक्षणात मी वाचलं होतं.

हुप्प्या's picture

30 May 2019 - 9:50 pm | हुप्प्या

भारतात निदान ७५% लोक इंडो युरोपियन जातकुळीच्या भाषा बोलतात. आणखी १०% लोक दुसरी किंवा तिसरी भाषा इंडो युरोपीय परिवारातील बोलत असतील. मराठी, हिंदी व उर्दू, गुजराथी, बंगाली, असमी,ओरिया ह्या सगळ्या ह्या गटात आहेत. अशा भाषा बोळणाऱ्यांना हिंदी समजणे व बोलणे तसे सोपे असते. लिपी ही तशीच सोपी वाटते, उर्दू अपवाद.,
हिंदी सिनेमा मुळेही हिंदी जास्त लोकप्रिय बनली आहे. हे बदलणे अवघड आहे

९ कोटी लोकांची मातृभाषा ही मराठी आहे .
९ कोटी संख्या काही कमी नाही. भारता मधील तिसरी सर्वाधिक बोलणारी भाषा म्हणून मराठी भाषेला मान आहे .
देशातील महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची ही राजभाषा आहे .
अत्यंत उत्तम दर्जाचे साहित्य मराठी मध्ये निर्माण झाले आहे .
संगीत,चित्रपट ह्या मध्ये सुधा मराठी ने यशाचे झेंडे रोवले आहेत .
मराठी भाषिक लोकांनी स्वतःला विनाकारण कमजोर समजू नये .
उलट आपण देशात चांगल्या स्थिती मध्ये आहोत गर्व असला पाहिजे .
देशात जास्त रोजगाराच्या संधी इथे उपलब्ध असल्यामुळे देशभरातील लोक इथे आले आहेत .ही विविध भाषा असलेली लोक एकमेकाशी संपर्क भाषा म्हणून हिंदी चा वापर करतात कारण कामगार वर्ग हा इंग्लिश समजणारा नाही त्या मुळे एक कॉमन भाषा म्हणून हिंदी इथे वाढली आहे .
पण त्या मुळे मराठी धोक्यात आली असे म्हणणे अतिशोक्ती पणाच होईल.
आपण मराठी भाषिक च आपले मराठी पण सोडत आहोत .
मुंबई आणि पुणे सारख्या शहरात जेव्हा दोन मराठी भाषिक जेव्हा हिंदी मध्ये बोलतात तेव्हा असे वाटते मराठी च्या पाठीत खंजीर आपणच खुपसत आहोत .
हिंदी भाषा असलेल्या राज्यांची बोली भाषा सुधा हिंदी नाही भोजपुरी,मैथिली,राजस्थानी अशा खूप साऱ्या बोली भाषा आहेत म्हणजे हिंदी जेवढी आपल्याला परकी तेवढीच त्यांना सुधा परकी च आहे .

देशातील महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची ही राजभाषा आहे.

गोव्याची अधिकृत भाषा कोकणी आहे, मराठी नव्हे. कोकणी भाषेव्यतिरिक्त गोव्यात पोर्तुगीज, मराठी, कन्नड ह्या भाषा बोलल्या जातात. हिंदी सुद्धा. आता मल्याळी सुद्धा वाढेल.

कानडाऊ योगेशु's picture

30 May 2019 - 11:40 pm | कानडाऊ योगेशु

>उलट आपण देशात चांगल्या स्थिती मध्ये आहोत गर्व असला पाहिजे .
तुम्हाला अभिमान म्हणावयाचे असावे कदाचित. अभिमान च्या जागी गर्व असणे असा शब्दप्रयोग करणे हे हि हिंदिचे मराठीला एक जबरदस्तीचे देणे आहे.

हरवलेला's picture

1 Jun 2019 - 11:24 pm | हरवलेला

अगदी याच कारणासाठी ते हिंदी विरोधी आहेत.

Rajesh188's picture

30 May 2019 - 11:49 pm | Rajesh188

आपण म्हणजे मराठी भाषिक स्वतः लाच का कमी समजतो ते काही समजत नाही .
प्रसार माध्यमे हेतुपूर्वक आपले मानसिक खच्चीकरण करत आहे आणि आपण त्याला बळी पडत आहोत .
म्हणून मराठी भाषिक एकमेकाशी महानगर मध्ये हिंदीत बोलून मराठी पण लपवत आहेत .
पारंपरिक महाराष्ट्रीयन मेनू हॉटेल मध्ये जावून खाणे आपण कमी समजतो मग इडली, डोसा, पराठा,पनीर,असले मराठी नसलेले पदार्थ ऑर्डर करण्याचे आणि तेच खाण्याची स्पर्धाच मराठी लोकांत लागली आहे हे सुद्धा मानसिक दुर्बलता असण्याचे उदाहरण आहे .
ज्वारीची भाकरी tipin मध्ये किती लोक ऑफिस मध्ये घेवून जातात स्वतः ला सुद्धा विचार हा प्रश्न तर जास्त करून भाकरी घेवून जात नाहीत लाज वाटते (कशाची लाज वाटते)
पण south ची लोक इडली सांबार च आणतील त्यांना त्याची लाज वाटतं नाही आम्हाला वाटते .
सकाळी नाश्ता पारंपरिक maharshtrian कोणाकडे बनतो ह्याचे उत्तर पण नाहीच आहे लाज वाटते आपल्या ला आपल्याच पोष्टिक आणि उच्च दर्जाच्या पदार्थांची .
आपण च nalike आहोत दुसऱ्या ना दोष देवून आपण पळपुटा मार्ग स्वीकारतो आहोत

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2019 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

शुद्ध मराठी वापरण्याची सवय आपण स्वतःपासून सुरू करूया. मग, इतर सवयी एकमागोमाग एक अंगवळणी पाडूया.

स्वतः लाच* स्वतःलाच

महानगर मध्ये* शहरामध्ये / महानगरामध्ये

महाराष्ट्रीयन मराठी

ऑर्डर करण्याचे मागवण्याचे / मागविण्याचे

tipin (tiffin) डबा

स्वतः ला* स्वतःला

south ची लोक दाक्षिणात्य (दक्षिणेकडील) लोक

maharshtrian मराठी

आपण च* nalike आपणच नालायक

=======================

* मराठीत प्रत्यय शब्दाच्या शेवटी चिकटवला जातो; हिंदीत तो शब्दानंतर स्वतंत्रपणे लिहिला जातो. ही हिंदीची सवय मराठीत आणू नये... ती व्याकरणदृष्ट्या चूक आहे.

भंकस बाबा's picture

1 Jun 2019 - 9:15 am | भंकस बाबा

आणि हा फलंदाजाने पुढे येत चौकार मारलेला आहे. तंत्रशुद्धता आणि आक्रमकपणा यांचे अप्रतिम मिश्रण!

फेरफटका's picture

31 May 2019 - 12:17 am | फेरफटका

हिंदी ला पर्याय कशासाठी? हिंदी सुद्धा भारतीय भाषा आहे आणी जवळ जवळ निम्मा भारत (४५%) हिंदी 'बोलतो'. मराठी (६%), तमिळ (५%) वगैरे भाषांची तुलना हिंदीशी होऊच शकत नाही. प्रत्येक राज्याची वेगळी भाषा असताना, भारतात एक सामाईक बोलीभाषा म्हणून हिंदी चा वापर सोयिस्कर आणी थोड्याफार प्रमाणात आवश्यक सुद्धा आहे. भारताबाहेर भेटलेल्या भारतीय माणसाला (समान मातृभाषा नसेल तर) हिंदी बोलता येत असेल, तर संवाद सुखकर आणी सोयिस्कर होतो. परदेशी माणसांसमोर दोन भारतीय इंग्लिश मधे बोलताना पाहून, तुमच्याकडे इतक्या भाषा असताना, तुम्हा दोघांना समजेल अशी एकही भाषा नाही का?' ह्या प्रश्नाचं उत्तर देताना सारवासारवी करावी लागते. किंबहूना सगळ्यांना थोडीफार तरी हिंदी बोलता यावी. भाषा जितकी विस्तारत जाते तितकंच त्या भाषेत पर-भाषेचे शब्दांची भर पडणे हे सुद्धा स्वाभाविक आहे.

सोन्या बागलाणकर's picture

31 May 2019 - 3:39 am | सोन्या बागलाणकर

+१०० सहमत.
अगदी इंग्लिशसुद्धा १००% शुद्ध राहिलेली नाहीये. तिनेही टिक्का,करी, गुरु,काऱीस्मा (करिष्मा) असे अनेक हिंदी शब्द आपलेसे केले आहेतच.

उपयोजक's picture

31 May 2019 - 12:34 pm | उपयोजक

कानडाऊ योगेशु आणि डॉ. म्हात्रे यांचे तुमच्याच प्रतिसादावरचे उपप्रतिसाद वाचल्यावर तरी हिंदी मराठीवर कशी आक्रमण करतेय ते लक्षात आलं असेल अशी आशा करतो. :-))

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 May 2019 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

हिन्दी आणि इंग्लिशचा दुस्वास करणार्‍या तुमच्या मराठी भाषेवर त्या भाषांनी यशस्वी आक्रमण केले आहे हे नि:संशयपणे तुमच्या लेखनाकडे पाहिले की स्पष्ट दिसते... असे म्हणतात की, आधी घर सुधारावे मग जगाकडे लक्ष द्यावे. =)) =)) =))

आमची मराठी अजून ठीकठाक आहे, हेवेसांन. :)

हरवलेला's picture

1 Jun 2019 - 11:32 pm | हरवलेला

डॉक्टरसाहेब या यशस्वी आक्रमणामुळे ते रागावले आहेत. त्यांना त्याचा प्रतिकार करायचा आहे. म्हणून हा सगळा उपदव्याप. त्यात तुम्ही दुसऱ्या बाजूने हल्ला चढवला...

मुद्दा काय आहे तो समजलाय का?

हिंदीचा त्रास नाहीये तर हिंदीमार्फत होणार्‍या हिंदी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्या दादागिरीचा आणि तिच्या लादणूकीचा आहे.हिंदीचा मराठीवरचा प्रभाव नको इतका वाढतोय त्याला आक्षेप आहे.आपले मराठी शब्द आधीच उपलब्ध असताना हिंदी शब्दांची गरज का पडावी?नुसते दसब्दच नव्हे तर हिंदीमुळे मराठीचं व्याकरणही बदलतंय. आलेत शब्द हिंदीतून तर घ्या सामावून ही शरणागती कशासाठी? ते जातात का असे मराठीच्या चरणी लीन व्हायला?वागतात ना अडेलतट्टूपणाने?

चौथा कोनाडा's picture

31 May 2019 - 1:37 pm | चौथा कोनाडा

हिंदीचा त्रास नाहीये तर हिंदीमार्फत होणार्‍या हिंदी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्या दादागिरीचा आणि तिच्या लादणूकीचा आहे

भाषा आणि दादागिरी हे वेगळे विषय आहेत.

नका ना बोलू त्यांची भाषा ! आपल्या मायबोलीत ठणकावून सांगा. कोणी अडवलंय ?
त्यांनी कितीही हिंदी बोलली तरी आपण नाठाळपणे मराठीच बोलायचं.

आणि राहताराहिलं दादागिरीचं. त्यांच्या शक्तिवान आहे आणि आर्थिक नाड्या त्यांच्या हातात असतील तर वर्चस्व गाजवणारच.
खरं तर ते आक्रमक, ताकदवान आहेत म्हणूनच वर्चस्व गाजावतायत, दादागिरी करताहेत, आणि त्या भाषिकांची बहूसंख्यात्मता या मुळे इतर भाषा दडपल्या जाताहेत.

भाषा काय, माणसं काय, समूह काय, जाती काय, धर्म काय जो सक्षम असेल तोच टिकेल !

Rajesh188's picture

31 May 2019 - 2:10 pm | Rajesh188

हिंदी ज्यांची मातृभाषा आहे त्यांची संख्या हिंदी ज्यांची मातृभाषा नाही त्यांच्या पेक्षा कमी आहे.
देशाच्या आर्थिक नाड्या हिंदी भाषिक राज्याकडे किंवा लोकांकडे सुद्धा नाहीत .तर गैरहिंदी भाषिक राज्य आणि लोक ह्यांच्या हातात आहेत त्यात आपला महाराष्ट्र सुधा आहे
.गुजराती , मारवाडी हे दोन महत्त्वाचे घटक हिंदी भाषिक नाहीत .
त्या मुळे दादागिरी हा विषय नाही तर त्यांनी इथे घुसखोरी केली आहे आणि आपले ज्वलंत देशप्रेम आपल्या ला कमजोर करत आहे त्या मुळे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे ह्याची वकिली मराठी लोकच जास्त प्रमाणात करतात
आपण taktvan आहोत कमजोर नाही फक्त त्याची जाणीव आपण विसरून गेलोय

उपयोजक's picture

1 Jun 2019 - 7:46 pm | उपयोजक

नका ना बोलू त्यांची भाषा ! आपल्या मायबोलीत ठणकावून सांगा. कोणी अडवलंय ?
त्यांनी कितीही हिंदी बोलली तरी आपण नाठाळपणे मराठीच बोलायचं.

हा प्रतिसाद वाचा.काय बोलावं मराठीप्रेमींनी अशावेळी?

http://www.misalpav.com/comment/1000305#comment-1000305

चौथा कोनाडा's picture

5 Jun 2019 - 5:52 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा .... !
हे भलतंच विनोदी बुवा, नेहमीचं.

आपला साधा उपाय एकच :
त्यांनी कितीही हिंदी बोलली तरी आपण ठामपणे मराठी बोलत राहायचं,
आपलं म्हणणं अधिक खोलपणे समजावे यासाठी वापरायचे काही हिंदी इंग्लिश शब्द, पण मराठी सोडायची नाही.
हे असं कळतं बऱ्याच जणांना.

फेरफटका's picture

1 Jun 2019 - 1:13 am | फेरफटका

दादागिरी माणसं करतात, भाषा नाही. तुम्ही 'हिंदीला पर्याय' विचारलात, 'हिंदीभाषिकांच्या दादागिरीला' नाही. शुद्ध भाषा - मग ती कुठलीही असेल तरी - बोलावी / लिहावी ह्याबद्दल दुमत नाही. किंबहूना धेडगुजरी भाषेचा त्रासच अधिक होतो.

उपयोजक's picture

31 May 2019 - 12:46 pm | उपयोजक

*शब्दसंपत्तीचे खूळ*

आपल्यातील जुन्या शब्दांनी शक्य तितके काम भागवावें या म्हणण्यावर पुष्कळदा असे विचारण्यांत येते की, अुपानह, जोडा अित्यादि जुने शब्द असतांहि “ शु " शब्द वापरण्यांत आल्याने हानि कोणती ? त्यानें शब्दसंपत्ति वाढते.पण ह्याच दृष्टीने पाहिले तर मग आजकाल अिंग्रजी शिकलेले लोक शिष्टपणाची भाषा समजून "वाअिफ सिक आहे" म्हणून जे पाहुण्यास सांगतात तेंहि क्षम्यच म्हणावे लागेल कारण पत्नी,अर्‍धांगी,बायको,मंडळी,कुटुंब अित्यादि वाटेल तितके संस्कृत - प्राकृत शब्द मराठींत असताहि तो कुटुंबास वाअिफ म्हणून जे नवीन नाव देतो त्याने तदर्‍थक शब्दसंपत्ति वाढते असेच म्हटले पाहिजे . अितकेंच काय पण बाप, पिता, वडील, जनक अित्यादि शब्दांस सोडून ," फादरनी गेस्टनां रिसीव्ह केले " म्हणून सांगणारी पोरेंहि फादर , मदर , सिस्टर अित्यादि शब्द भाषेत आणून मराठीची शब्द संपत्ति वाढविण्याचे महत्कार्‍य करीत आहेत असे म्हणावे लागेल.त्याही पुढे अेक पाऊल टाकून असेहि म्हणतां येईल कीं , अुत्तरेकडचे हिंदु , बापास सभ्यपणाचा शब्द म्हणून अुर्‍दू ' वालिद ' शब्द लावितात ; अीश्वरास मालिक म्हणून लिहितात ; तेहि शब्दसंपत्ति वाढवीत आहेत . तर मग पिता , बाप , वडील , जनक आणि संस्कृतांतील अनेक तदर्‍थक शब्दसि सोडून शब्दसंपत्ति वाढविण्यासाठीं अन्दू वालिद वा इंग्रजी फादर शब्द वापरूनच कां थांबा ?आपल्या मराठींत जर्‍मन, फ्रेंच , बुशिटो, अंदमानीज अित्यादि सर्‍व भाषांतून बापास जितके शब्द असतील तितके सर्‍व पाळीपाळीने वा लहरीलहरींने अुपयोगांत आणून आपल्या पितृचरणी त्यांची माला अर्‍पण कां करूं नये ? असला दिग्विजय करून तो करभार जर आपण अेखाद्या रघुप्रमाणे आपल्या भाषेच्या भांडारांत ओतूं लागलों तर त्याने शब्दसंपत्ति वाढेल , परंतु तो शब्दरत्नाकर आपल्या भाषेचा न राहतां जगाच्या भाषेचा अेक नवा धेडगुजरी कोश काय तो होअील ! घराची मर्‍यादा वाढविण्याकरितां सर्‍व भिंती पाडून टाकून ते खुप विस्तृत होत आहे म्हणून स्वतःचे अभिनंदन करून घेणार्‍या वेड्या धन्यासारखेच भाषेत भरमसाट अुर्‍दू वा अिंग्रजी शब्द घुसडणार्‍या शब्दसंपत्तिवर्‍धकांचे समाधान फारच हास्यास्पद आहे!

अगदी नवीन आणि ज्यांना भाषेत शब्द नाहींत किंवा शोधितां येणे अशक्य आहे तेवढ्या पदार्‍थाचे वाचक शब्द मात्र परक्या भाषेंतून घ्यावेत नि घेतलेले तसेच ठेवावेत.बाकीं केवळ शब्दसंपत्ति वाढविण्याकरितां म्हणून आपले जुने शब्द असताहिं वा साधित होण्यासारखे असूनहि परकी शब्द भाषेत घुंसू देणे वा घुसलेले टिकूं देणे चुकींचे आणि भाषेच्या प्रकृतीस आणि स्वाभिमानास हानिकारक आहे.

*- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*

टवाळ कार्टा's picture

31 May 2019 - 3:08 pm | टवाळ कार्टा

आयला सगळ्या सोशल मीडियावर हा विषय सुरू आहे....माझ्या काही शंका

1. हिंदी भाषेची दादागिरी चालते
का चालते? आपण चालवून घेतो म्हणून....मराठी लोकांनी प्रत्येकवेळी प्रत्येक ठिकाणी मराठीत बोलायला सुरू करा....झक मारत सगळ्या दुकानात मराठी बोलणारे दिसतील....मराठी नसणारासुद्धा मराठी शिकेल....कारण ग्राहक हा राजा असतो (मराठी टक्का अगदी 10% इतका घसरला तरी 10% ग्राहक घालवणे कोणालाही आवडणार नाही)
दक्षिणेत त्यांच्या भाषाच बोलल्या जातात...100% वेळा....अगदी परदेशी क्लायंट मिटींग असेल तरीसुद्धा (जे जरा अतिच आहे ;) )

2. हिंदी नको इंग्रजी चालेल
असे का? म्हणजे भारतीय भाषा नको पण परदेशी भाषा चालेल? तद्दन गुलाम मानसिकता....इंग्रजी यायलाच हवी कारण जगाची ज्ञानभाषा पण देशांतर्गत संपर्क भाषा आपलीच एखादी भाषा हवी...लोकसंख्येनुसार (आणि बॉलिवूडमुळे) हिंदी सगळ्यात जास्त लोकांना समजते मग प्रॉब्लेम काय

3. हिंदीमुळे बाकी भाषा मरतील
भाषा मरण्याचे कारण ती भाषा जाणणारे लोकच भाषा वापरात नाहीत हे असते.

माझ्यामते हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे मुख्य कारण हिंदी सिनेमांची अफाट लोकप्रियता हे आहे. भारतातील कोणतीही भाषा बोलणारे लोक हिंदी सिनेमे बघतात, एवढेच काय युरोपियन, रशियन, अफगाणी आणि इतर अनेक देशातील लोकही हिंदी सिनेमे आवडीने बघतात. परदेशात टॅक्सीने जाताना टॅक्सीचालकाला भारतातले कोण लोक ठाऊक आहेत असे विचारले तर अमिताभ बच्चन आदिंचे नाव ऐकायला मिळते, तसेच 'बॉलिवुड डान्स' सुद्धा आवडत असल्याचे ते सांगतात. याउलट मराठी, तेलगु, बंगाली आदि भाषेतील सिनेमे फक्त ते ते भाषिकच (क्वचित अपवाद वगळता) बघतात.
आपण मराठी मंडळींनी घरात आणि कोणत्याही मराठी व्यक्तीशी फक्त मराठीच बोलायचे, मराठी साहित्य अवश्य वाचायचे आणि मराठी सिनेमा-नाटके तिकीट काढून बघायची, एवढे जरी कटाक्षाने पाळले, तरी मराठी भाषा टिकून राहू शकते.

उगा काहितरीच's picture

1 Jun 2019 - 11:22 am | उगा काहितरीच

मी काय म्हणतो , हिंदी भाषेचे नाव बदलून मराठी केलं तर चालेल का ?

उद्या म्हणाल हिंदी भाषेचं नाव बदलून मराठी ठेवा .
आणि उत्तर प्रदेश आणि बिहार चे नाव बदलून महाराष्ट्र ठेवा मग बघा कसे सर्व समस्येचं निराकरण होईल

उद्या म्हणाल हिंदी भाषेचं नाव बदलून मराठी ठेवा .
आणि उत्तर प्रदेश आणि बिहार चे नाव बदलून महाराष्ट्र ठेवा मग बघा कसे सर्व समस्येचं निराकरण होईल

उगा काहितरीच's picture

1 Jun 2019 - 1:41 pm | उगा काहितरीच

ओके ! प्रस्ताव मागे. हाकानाका ;-)
रच्याकने तुम्ही आल्यापासून मज्जा येतीये मिपावर. धन्स !

उपयोजक's picture

1 Jun 2019 - 7:19 pm | उपयोजक

सर्व शाळांमधे हिंदीसक्तीची ही बातमी आज या वाहिनीनं दाखवली आणि आमच्या एका बहुभाषिक व्हॉटसप ग्रुपातले काही तामिळ खवळून उठलेत.हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही म्हणतायत;तर काही तामिळ म्हणतायत येऊ दे हिंदी तामिळनाडूत.आमची पोरं भारताच्या अन्य भागापासून तुटल्यासारखी झालेत.आम्ही भोगलं ठीकै. आमच्या मुलांनी ते भोगू नये.

hindi

उपयोजक's picture

1 Jun 2019 - 7:32 pm | उपयोजक

तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.हिंदी सिनेमांमुळेच हिंदीचा प्रसार जास्त झालाय. अन्यथा ५वी ते ७ वी फक्त ३ वर्ष शाळेत हिंदी शिकून नंतर कधीही शिक्षणात हिंदी येत नाही तरीही ती आपल्याला बर्‍यापैकी येते याचं कारण हिंदी सिनेमे हेच आहे.

सैराटमुळे हे दिवस पालटायला सुरुवात झाली आहे.

कोणी ही उघड विरोध करत नाही ह्याचा अर्थ बिगर हिंदी राज्याचा हिंदी ला पाठिंबा आहे असे समजायची गरज नाही .
स्फोट होण्यासाठी वात पेटने गरजेचं असते .आणि तमिळ नाडू वात आहे तिथे दडपशाही झाली की असंतोष चा स्फोट बिगर हिंदी राज्यात होवू शकतो

सतिश गावडे's picture

1 Jun 2019 - 11:02 pm | सतिश गावडे

हिंदी भाषेबद्दल इतकी अढी का आहे तुमच्या मनात?

भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा आहे तिथे इतर राज्यातील वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधायचा म्हटलं की एका सामायिक भाषेची गरज भासते. सुशिक्षितांमध्ये ही गरज इंग्रजी पूर्ण करते. मात्र ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अशा वेळी हिंदी उपयोगी पडते. जो महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत जातो त्या प्रत्येकाला हे जाणवते.

तुमचा राग हिंदी भाषिक राज्यातील लोकांवर असावा असं वाटते. काही नगण्य अपवाद वगळता हे लोक आडमुठेपणा करतात, हिंदीवर अडून बसतात. पुण्यासारख्या मराठी भाषिक शहरात दहा बारा वर्षे राहूनही मराठी न येणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत.

मात्र हे होतंच राहणार. त्यासाठी नवी भाषा तयार करणे हा पर्याय होऊ शकत नाही.

जाता जाता, उत्तरेकडील हिंदीभाषिक राज्य वगळता जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी भाषा आहे आणि तरीही आपल्या पंतप्रधानाना देशाला संबोधित करताना "मेरे प्यारे देशवासियों" म्हणावे लागते.

आणि शेवटी, वृत्त वाहिन्यांवरील या ठिकाणी, त्या ठिकाणी, हे आहे, जे आहे, ते आहे प्रकाराबद्दल काय मत आहे?

उपयोजक's picture

2 Jun 2019 - 8:52 am | उपयोजक

ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांना अशा वेळी हिंदी उपयोगी पडते.

दक्षिणेतल्या लोकांना हिंदी समजत नाही.अगदी व्यवस्थित इंग्रजी येणार्‍या, शिकलेल्या द.भारतीयांनासुद्धा! मी स्वत: तमिळ लोकांना हिंदी शिकवायचो.त्यांच्या चुका आणि घाबरत घाबरत हिंदी शिकणं पाहिल्यावर हे लोक का अट्टहास करतायत हिंदी शिकायचा असा प्रश्न पडायचा.
हिंदी न आल्यामुळे इतका न्यूनगंड येण्याचं खरंतर काही कारण नाहीये.
मी ज्यांना शिकवायचो ते चेन्नई,बंगळूर,कोईंबतूर अशा दक्षिण भारतीय शहरांमधलेच लोक होते.म्हणजे हिंदी आलीच पाहिजे अशी काही सक्ती नव्हती त्यांच्यावर.मोठ्या शहरात ही अवस्था असेल तर छोट्या शहरात काय अवस्था असेल याचा विचार करा.तामिळनाडू वगळता अन्य चार द.भा राज्यांत हिंदी भाषा शाळांमधे शिकवली जाते तरीही ही अवस्था आहे.उत्तर भारतातल्या नेत्यांना प्रचारासाठी दक्षिण भारतात जागोजाग दुभाषा घ्यावा लागतो.अगदी जिथे हिंदी शाळेत शिकवली जाते त्या केरळ,कर्नाटक,आंध्र,तेलंगणातसुद्धा!
आता मला सांगा दक्षिण भारतीय राज्ये येतात की नाही येत भारतात? हिंदी तिथल्या शाळेत शिकवूनही व्यवस्थित बोलता येत नसेल,समजत नसेल तरीही हिंदी ही देशाला जोडणारी भाषा आहे हा दावा कशाच्या आधारे?

पुण्यासारख्या मराठी भाषिक शहरात दहा बारा वर्षे राहूनही मराठी न येणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत.

मात्र हे होतंच राहणार.

तुमच्याच राज्यात येऊन अनेक वर्षे राहून ते लोक त्यांची भाषा तुमच्यावर लादत राहणार.वर तुम्ही म्हणता हे होतंच राहणार.इतकी लाचारी का करावी हिंदी भाषिकांची?कारण कळेल का?

जाता जाता, उत्तरेकडील हिंदीभाषिक राज्य वगळता जवळपास प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी भाषा आहे आणि तरीही आपल्या पंतप्रधानाना देशाला संबोधित करताना "मेरे प्यारे देशवासियों" म्हणावे लागते.

ते जे काही म्हणतात ते फक्त जिथपर्यंत हिंदी समजते तिथपर्यंतच पोहचतं.जिथं पोहचत तिथं काय?का ती राज्य,तो प्रदेश भारतातून काढून टाकायचा?"हिंदी समजत नसेल तर वेगळे व्हा भारतापासून" असं सांगायचं का?

सतिश गावडे's picture

2 Jun 2019 - 9:06 am | सतिश गावडे

कुण्या हिंदी भाषिकाने तुमची ठासलेली दिसते. त्याचा राग ईथे धाग्यावर मत व्यक्त करणाऱ्या लोकांवर नका काढू :)

उपयोजक's picture

2 Jun 2019 - 6:15 pm | उपयोजक

वगैरे शब्द वापरावे लागले यातूनच कळालं राग कुणाला आलाय ते! :-))
बाकी हिंदीच्या पायावर लोळण घ्यायची ठरवलंच असेल तर चालू द्या! :))

हिंदी न समजणारे / बोलता येणारे द. भारतीय हे प्रामुख्यानं तमिळ आहेत. बाकी तेलगू, मल्याळी आणी कानडी लोकं हिंदी समजू / बोलू शकतात. ज्यांना हिंदी येत नाही त्यांच्यासारखं बनायचं ध्येय ठेवण्यापेक्षा, बहूभाषिक बनायचा प्रयत्न करावा. बरेचदा अशा 'विविधतेनं नटलेल्या' ग्रूपमधे केवळ हिंदी समजत नाही म्हणून गप्प राहिलेले तमिळ मित्र आहेत आणी त्यांना त्याची हळहळ सुद्धा वाटते. असो. भारतभर वापरता येण्यासारखी एक भाषा असावी आणी जर ती हिंदी असेल, तर ती बोलता, लिहीता, वाचता यावी.

Rajesh188's picture

2 Jun 2019 - 3:56 pm | Rajesh188

हिंदी ला विरोध नाही .
पण हिंदी पाठोपाठ ज्या अप्रवृती हिंदी भाषिक पट्ट्यात आहेत त्या देशभर पसरतील ह्याची भीती सर्वांना वाटत आहे.
हिंदी सर्व देशात शिकवण्याचा अगोदर काही गोष्टी केंद्राने स्पष्ट करावीत आणि तशी हमी द्यावी .
भविष्यात कधीच कोणत्याही राज्याची राजभाषा बदलता येणार नाही . अल्पसंख्य लोक बोलत असतील तरी सुधा .
कोणत्या ही राज्याच्या भौगोलिक सीमा बदलता येणार नाहीत.
राजभाषेचा अनादर कोणत्या ही सरकारी खात्याने केला तर असा गुन्हा करणारा व्यक्ती आजन्म करावासा साठी पात्र राहील.
बिगर हिंदी राज्यात फक्त संपर्क भाषा एवढीच तिची किंमत असेल कोणत्याही राज्य सरकारच्या कारभारात तिचा वापर करायची मागणी करता येणार नाही असे खास कायदा केंद्रांनी करावा
आणि नंतर देशभर हिंदी शिकवावी

उपयोजक's picture

2 Jun 2019 - 6:20 pm | उपयोजक

The Government of India has invited comments and suggestions till June 30th 2019 from the public .

So I request all the members to send the mail to the government of India mail id:
NEP.EDU@NIC.IN

The Draft National Education Policy 2019 has been released and can be accessed at https://mhrd.gov.in/relevant-documents.

Comments and suggestions are invited till 30th June, 2019 on
NEP.EDU@NIC.IN

हिंदी भाषा महत्वाची राज्य यूपी आणि बिहार सर्व प्रकारच्या संकटात आहेत .
बेरोजगारी,लोकसंख्या वाढ.
गुंडगिरी,ठिसूळ प्रशासन,जातीयवाद .
ह्यांचा कडे कोणताच प्लस पॉइंट नाही तरी उसने अवसान आणून त्यांचे पुढारी सिंह गर्जना करत आहेत .
ह्या दोन्ही राज्यावर प्रगत राज्यांनी शेवट चा एकच प्रहार केला पूर्ण बंदी चा व तर ही दोन्ही राज्य नेस्तनाबूत होतील

भंकस बाबा's picture

2 Jun 2019 - 11:16 pm | भंकस बाबा

पहिल्यांदा एक काहीतरी नक्की करा.
कोणाला संपवायचे आहे?
हिंदी भाषेला , हिंदी भाषिकाना का हिंदी बोलण्यार्या राज्याना?

धर्मराजमुटके's picture

6 Jun 2019 - 1:42 pm | धर्मराजमुटके

जब बी हिंदी बोलने/ लिखने का टायम आयेगा तो बाबुराव जैसा बोलने का रे बाबा !
हम जैसा घाणेरडा इंग्रजी बोलके इदर से इंग्रज लोक को पळव्या ऐसाच हिंदी लोक को भी पळव सकता है !
वो नही पळ्या तो कमसे कम उनके कान के केस तो जळ जायेंगे !

तुम को ऐसा हिंदी बोलने का ट्रेनिंग होना तो हिंदी न्युज चॅनेल पे महाराष्ट्र के दुष्काळी भाग का रिपोर्टींग देखना, वो शेतकरी भाऊ का बो लना चालना देखकर तुम भी शिक जायेगा ! है क्या न नय क्या !!

नायतर ये विडिओ देख लेना

बाबूभैय्यासे डायरेक्ट बाबूराव?

लगता है तुम्हारा भाडा बढाना पडेगा रे बाबा..

;-)

लग्नात बूट चोरणे नवऱ्या मुलाची ही आपली रीत नाही .
पण ती रीत आली ना महाराष्ट्रात हिंदी सिनेमा बघून .
बहिणीच्या नवऱ्याला दाजी किंवा काही ठिकाणी भावजी सुधा म्हणतात .
जिजू जिजु जे बोलतात ते सुधा हिंदी सिनेमाची च देणं आहे .
असे रीतिरिवाज भाषे बरोबर बदलतात आणि संस्कृती नष्ट होते म्हणून च स्वभाषा टिकणे खूप गरजेचं असते .

चौथा कोनाडा's picture

6 Jun 2019 - 9:00 pm | चौथा कोनाडा

दिदी हे संबोधन पण मराठी नाहीय.
जबाबदारी हा शब्द देखील मराठी नाहीय.
कबूल हा शब्द देखील मराठी नाहीय.
सुधा हा हा शब्द देखील मराठी नाहीय.

फेरफटका's picture

7 Jun 2019 - 1:09 am | फेरफटका

संस्कृती ही कालानुरूप बदलत जाणारी असते. आणी तशी ती बदलते म्हणूनच टिकते. ज्ञानेश्वरांच्या काळातली - ७०० वर्षं जुनी मराठी सुद्धा आता कळणार नाही वगैरे उदाहरणं जाऊ द्या, पण २५-३० वर्षापूर्वीचे संदर्भसुद्धा आता लागत नाहीत. त्यामुळे त्या संदर्भासहित, काळाबरोबर अबदलत जाणार्या गोष्टींनाच त्या त्या काळची संस्कृती म्हणतात.

आता भाषेविषयी आणी शुद्धता / प्रमाणभाषा वगैरे विषयाकडे गाडी वळतेच आहे तर हे सुद्धा नमुद करेन की, 'जिजू जिजू बोलत' नाहीत, 'म्हणतात'.