सॅनिटरी नॅपकिन चॅलेंज

Primary tabs

vcdatrange's picture
vcdatrange in काथ्याकूट
26 May 2019 - 4:38 am
गाभा: 

दहा पंधरा वर्षा अगोदरच्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिराती आठवतायेत का? काचेच्या बरणीतल्या निळ्या शाईत खडू बुडवताना दाखवायचे. . केवळ सुचकतेने मांडणी करुन निम्या लोकसंख्येच्या अपरिहार्य बाबी बद्दल अजुनही म्हणावं त्या खुलेपणानं बोलणं,वागणं होत नाही.

आपल्याकडे तर मासिक पाळी सारख्या किरकोळ शारिरीक घटनेला धार्मिक कोंदण जोडलय. इतरांचं तर दूर राहील, आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा पदोपदी जाणवलाय! व्यक्तिगत बाब म्हणुन दुर्लक्षित केलं तरी जेव्हा आपणचं अजुनही मासिक पाळी दरम्यानच्या शिवाशिवीबद्दल ठाम भुमिका घेणार नसू तर समोर येणार्‍या रुग्णास काय समुपदेशन करु शकणार आहोत? अज्ञान, गैरसमज आरोग्यशिक्षणाने दूर होतिलही पण हा अंधश्रद्धांचा अन् चालिरितींचा पडदादेखिल फाडावाच लागणार आहे.

मागे आदिवासी आश्रमशाळातील शिक्षकांकरीता प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेत असताना एका सत्रादरम्यान मासिक पाळीविषयी बोलताना, पुरुष प्रशिक्षकांना सहज विचारलं की "तुमची आई, बहीण, पत्नी वापरत असलेल्या सॅनिटरी नॅपकिनचा ब्रांड कोणता आहे?" वर्गभर सन्नाटा छा गया. शेजारच्या टेबलवरचं डेमो करिता आणलेला सॅनिटरी नॅपकिनचा पुडा हाताळायला त्यांच्याकडे सरकवला. ४०प्रशिक्षकांकडुन फिरुन जसाच्या तसा पुडा परत आला. एकानेही पुडा फोडुन नॅपकिन हाताळायची हिम्मत दाखवली नाही. .

२८ मे 'वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजिन डे'
सर्व पुरुष मित्रांनो! माझं चॅलेंज स्विकारालं?
मागच्याच महिन्यात बोटं काळं केलेला जसा एक सेल्फी अपलोडवला तसाच आजही सोशल मिडियावर तुमचा एक सेल्फी सॅनिटरी नॅपकिन, सॅनिटरी कप सोबतचा . . .

चला मासिक पाळी बद्दलची अळीमिळी गुपचिळी मोडुयात .

(सॅनिटरी नॅपकिन हा काही एकमेव व सर्वोत्तम पर्याय नाही. निसर्गपुरक सस्टेनेबल मेन्स्ट्रुएशन बद्दल सविस्तर बोलायचंच आहे, पण पुन्हा कधीतरी )

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

26 May 2019 - 10:26 am | आनन्दा

खरं आहे. पण आपली बुवा हिंमत नाही सोशल मिडियावर फोटो टाकायची.

आणि भीती पुरुषांची नाही, तर मित्रयादीतील बायकांचीच आहे :)

प्रान्जल केलकर's picture

29 May 2019 - 8:58 pm | प्रान्जल केलकर

असा फोटो अपलोड केला तर पुरुषांपेक्षा महिलाच जास्त अस्वस्थ होतील

मला काही काळ जॉन्सन आणि जॉन्सन ह्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. ही कंपनी केअर फ्री आणि स्टे फ्री ह्या दोन प्रसिद्ध सॅनिटरी नॅपकिन च्या उत्पादनांची निर्मिती करते. मी जेंव्हा ह्या उत्पादनाशी निगडीत कामात कार्यरत होतो तेंव्हा माझे सॅनिटरी नॅपकिन ह्या विषयाचे ज्ञान शून्य होते. आता मात्र सॅनिटरी नॅपकिन बनवायला लागणारा कच्चा माळ ( वूड पल्प) , सॅनिटरी नॅपकिन ची निर्मिती , वितरण, बाजारा मधील किमंत, दर्जा आणि स्पर्धा ह्या विषयी तरबेज म्हणण्या इतकी माहिती आहे. हे उत्पादन अक्षरशः टनावारी होते. उत्पादनात अनेक स्त्री पुरुष कामगार सहभागी होते. सॅनिटरी नॅपकिन हाताळताना सुरवातीला संकोच वाटत असे पंरतु काही दिवसात सराव झाला. काही महिला कर्मचारीसॅनिटरी नॅपकिन विषयो बोलताना ऐकणे अवघडल्या सारखे व्हायचे पण तो धीर इतका चेपला कि प्रश्न विचारणे सहज होऊन गेले इतक्या उत्पादन , दर्जा ह्या संदर्भातील चर्चा खुल्या दिलाने होत असत. जॉन्सन आणि जॉन्सन ही एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे . ह्या कंपनी मध्ये वारंवार स्टे फ्री चे प्रमोशन , सर्वे , परिसंवाद सुरु असे आणि हा कामाचा एक भाग झाला होता. त्यामध्ये स्त्रियांना मासिक पाळी मध्ये कशाची जास्त लाज वाटते? सॅनिटरी नॅपकिन ची बाजारातील उपलब्धता , वापर ह्यामधील समस्या कोणत्या ? इत्यादी बारकावे समजले होते.

कोणाला ह्याचा उत्पादनविषयीची जिज्ञासा असेल तर जरूर व्य. नी. करावा.

पुढे हिंदुस्तान लिवर ने " विस्पर " ह्या सॅनिटरी नॅपकिन द्वारे जॉन्सन आणि जॉन्सन च्या सर्वमान्यतेला आव्हान दिले. त्यावेळी "सास भी कभी बहु थी" ही मालिका कमालीची लोकप्रिय होती . त्यामधील बहू ला ,स्मृती इराणी यांना मग जॉन्सन आणि जॉन्सन ने स्टेफ्री ह्या सॅनिटरी नॅपकिन चा प्रसारा करता घेतले होते.
योगायोग असा कि आज त्या राहुल गांधीना अमेठी मध्ये हरवून संसदेत पोहोचल्या आहेत.

इतके असले तरीही आजही सॅनिटरी नॅपकिन सह सेल्फी काढून खुल्या माध्यमांवर टाकणे हे मला अप्रस्तुत वाटते. ह्याचा संकोच न वाटणे , मोकळी चर्चा करणे वेगळे आणि मला संकोच वाटत नाही ह्याचे प्रदर्शन करणे वेगळे असे माझे मत आहे . कोणी आरोग्य व्यावसायिकाने कामाकरिता , लॉक शिक्षणाकरता असे केले तर त्याचे स्वागत आहे.
पण काही कारण नसताना असे फोटो टाकणे मला प्रशस्त वाटत नाही हे खरे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2019 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रतिसाद.

इतके असले तरीही आजही सॅनिटरी नॅपकिन सह सेल्फी काढून खुल्या माध्यमांवर टाकणे हे मला अप्रस्तुत वाटते. ह्याचा संकोच न वाटणे , मोकळी चर्चा करणे वेगळे आणि मला संकोच वाटत नाही ह्याचे प्रदर्शन करणे वेगळे असे माझे मत आहे . कोणी आरोग्य व्यावसायिकाने कामाकरिता , लॉक शिक्षणाकरता असे केले तर त्याचे स्वागत आहे.
पण काही कारण नसताना असे फोटो टाकणे मला प्रशस्त वाटत नाही हे खरे.

याला १००% सहमती.

या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही आणि ती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, यात अजिबात संशय नाही. अश्या विषयांवर सामाजिक माध्यामांवर चर्चा होणेसुद्धा आवश्यक आहेच.

कोणत्याही नाजूक/खाजगी विषयावरील सामाजिक मोहिमेत आयोजित केलेली प्रत्येक कृती; लक्ष्य असलेली जनता आणि कृती करणारे कार्यकर्ते; या दोन्हींना मनमोकळेपणे आणि कोणत्याही संकोचाशिवाय (किंबहुना, जमल्यास उघड अभिमानाने) आचरण्याजोगे असल्यासच, जास्तीत जास्त सहभाग, आणि पर्यायाने, यश अपेक्षित असते.

भारतातील या विषयासंबंधातील सद्य परिस्थितीकडे (पक्षी : उघड चर्चेसाठी असलेला सामाजिक मोकळेपणा किंवा त्याच्या अभावाकडे) पाहता, मोहिमेतीतील एक किंवा अनेक कृतींनी सीमारेषा ओलांडल्यास, सर्वसामान्य भारतिय स्त्री आणि पुरुषांना, इच्छा असूनही, त्या मोहिमेत सहभागी होण्यास कसनुसे (ऑकवर्ड) वाटेल, हे नक्की. याचा परिणाम मोहिमेत भाग घेणार्‍यांची संख्या फार कमी होऊन, मोहिमेला यश मिळण्याऐवजी विपरित परिणाम (पक्षी : चेष्टा आणि/किंवा दुर्लक्ष) होण्याचीच जास्त शक्यता आहे.

अश्या मोहिमांची सुरुवात सावगिरीने करून, मग लोकांची मनोवस्था जसजशी जास्त तयार होत जाईल त्याप्रमाणे मोहिमेत अधिक धाडसी बदल करत गेल्यास, यशाची जास्त खात्री असेल.

एमी's picture

28 May 2019 - 8:41 am | एमी

> कोणाला ह्याचा उत्पादनविषयीची जिज्ञासा असेल तर जरूर व्य. नी. करावा. >त्यापेक्षा वेगळा लेख/लेखमाला लिहा, सगळ्यांनाच वाचता येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 May 2019 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

सेल्फी टाकल्याने काय साध्य होईल?

जालिम लोशन's picture

26 May 2019 - 6:01 pm | जालिम लोशन

मी पॅडस विकतो. सर्वत्र त्या बाबत जागृकता आहे. बायको नवर्‍याला घरी येतांना brand सकट आणायला सांगते. ज्यांना परवडत नाही ते विकत घेत नाहीत. ग्रामिण भागातही जागृकता आहे. जिथे दुकानच नाही तिथे फक्त पर्याय वापरले जातात.

उगा काहितरीच's picture

26 May 2019 - 6:53 pm | उगा काहितरीच

मागची पिढी या बाबतीत जरा लाज बाळगून आहे. पण नवीन पिढी नाही लाजत. काही वर्षांपूर्वी मी पॕड आणताना दुकानदाराने पेपरमधे गुंडाळून वगैरे दिले होते. आज डी- मार्ट /मॉलमधे बिनधास्त ट्रॉलीमधे ठेवून हिंडता येते.
न लाजता बाकी सामान ( डाळ, तांदूळ, ब्रेड वगैरे ) ज्या प्रमाणे आणता येते त्याच प्रमाणे पॕड आणता येतात की ! पण म्हणून काय उगाचच सेल्फी काढून वेगळी वागणूक का द्या ?

दादा कोंडके's picture

26 May 2019 - 10:05 pm | दादा कोंडके

ही असली हुच्चभ्रू कॅम्पेन्स म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असला प्रकार असतात.

अत्रुप्त आत्मा's picture

27 May 2019 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा

मेडिकल दुकानदार नेपकीन देताना पेपर मधे गुंडाळून किंवा काळ्या पिशवीत का देतात? मला कोड आहे. मी तसे न घेता उघड उघड आणले तर आमची होममिनिस्टर उखडते! :-| नक्की लोचा कात आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 May 2019 - 6:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

मेडिकल दुकानदार नेपकीन देताना पेपर मधे गुंडाळून किंवा काळ्या पिशवीत का देतात? मला कोड आहे. मी तसे न घेता उघड उघड आणले तर आमची होममिनिस्टर उखडते! :-| नक्की लोचा कात आहे?

तसे करणे अवैध नसले तरी, नवीन खरेदी केलेल्या अंडरवेअर्स, दुकानापासून घरापर्यंत, सगळ्या जगाला दिसतील अश्या आणल्या जात नाहीत... कोणी तसे केले तर तो चेष्टेचा विषय बनेल, हेवेसांन. हेच कारण इथे (स्त्रीसुलभ लज्जेला जमेस धरून, जरा जास्त तीव्रतेने) असते.

अवैध नसलेली प्रत्येक गोष्ट सार्वजनिकपणे करणे योग्य/शहाणपणाचे होईलच असे नाही. काही गोष्टींसाठी एखादी सामाजिक सीमा बाळगणे जास्त योग्य असते.

टवाळ कार्टा's picture

27 May 2019 - 4:08 am | टवाळ कार्टा

बाकी जाउद्या....मिपाकरपण अज्जून इतके मोकळे नाहीयेत

vcdatrange's picture

28 May 2019 - 12:33 am | vcdatrange

हा प्रतिसाद भावला. . .

समीर वैद्य's picture

28 May 2019 - 4:01 am | समीर वैद्य

प्रतिसादातील भाषेमुळे कोणास मानसिक दुखापत झाल्यास क्षमस्व

जसे सुरक्षित शारीरिक संभोग करावा ह्याचा प्रसार करण्यासाठी सुरक्षित संभोगाची स्वचित्रे टाकणे उपयुक्त नाही तसेच ह्या विषयासाठी सॅनिटरी नॅपकिन सोबतचे स्वचित्र कामाचे नाही.
प्रत्येक विवाहित पुरुषाने जर एवढी खात्री केली की त्याची बायको/जीवनसाथी आणि वयात येणारी/आलेली मुलगी, कपड्यांचा बोळा न वापरता व्यवस्थित सॅनिटरी नॅपकिन वापरत आहे तर बराचसा फरक पडेल असे मला वाटते.

काही चूक वाटल्यास जरूर निदर्शनास आणून द्यावी. चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन.

धन्यवाद.

चिनार's picture

28 May 2019 - 11:40 am | चिनार

सहमत..
सेल्फी काढून फेसबुकवर टाकून प्रसार नाही पण विषयाचे गांभीर्य कमी होईल.
तसेही आपल्या फेसबुकवरील मित्रांच्या घरी सॅनिटरी नॅपकिनचा वापर होत नसण्याची शक्यता कमीच आहे.
जिथे प्रसार करणे आवश्यक आहे तिथे जरूर करावा.

मागे ब्रेस्ट कॅन्सर अवेयरनेससाठी अशीच एक टूम निघाली होती. उच्चभ्रू महिलांनी अक्षरश: त्यादिवशी घातलेल्या अंर्तवस्त्राचा रंग फेसबुकवर जाहीर केला होता म्हणे. अर्थात मी हे डोळ्यांनी पाहिलेले नाही.

पुण्यात मागे ब्रेस्ट कॅन्सर अवेयरनेससाठी पुणे ते लवासा अशी कार रॅली काढली होती. त्यासाठी नॉमिनेशन्स होते. वोटिंग झालं होतं. कंपनीतील बायका आम्हाला व्होट करा म्हणून मागे लागल्या होत्या आमच्या.
पण आक्ख्या रॅलीत कॅन्सर अवेयरनेससाठी नेमकं काय केलं ते कळलंच नाही.

सिम्बॉलिक म्हणून ठीक सेल्फी वगैरे.

पण त्यातून टार्गेट होणारा वर्ग पाहता ही घनदाट आणि सदाहरित जंगलात जाऊन तिथे वृक्षारोपण करण्याची मोहीम वाटते.

उजाड वैराण जागी, शहरांत वगैरे वृक्षारोपण आणि मुख्य म्हणजे संवर्धन यांची गरज आहे.

मासिक पाळी आज येत नाही माणूस जन्माला आला तेव्हा पासून येतेय .
पहिल्या स्त्रिया सुती कपडा वापरत असत आणि आता sanitary napkin वापरता त.
सुती कपडा वापरणे हे सुध्दा आरोग्यदायक च आहे .
फक्त मासिक पाळीत हिंदू धर्मात स्त्रिया वर काही बंधन आहेत त्याविषयी काहीतरी लेखकाला सांगायचे आहे पण वळसा घालुन सांगायचं प्रयत्न चालू आहे कारण पोस्ट ला धार्मिक रंग यायला नको म्हणून .
पण मासिक पाळी chya वेळी स्त्री ला विश्रांती मिळावी हा सुद्धा हेतू धार्मिक karnat असू शकतो नेहमीच अंध श्रद्धा अंध श्रद्धा म्हणून ढोल बडवून काही तरी वेगळं सांगतोय ह्याचा आव आणायची काही गरज नाही .
परिस्थिती नुसार आता कोण्ही शिवाशिव वैगेरे पाळत नाही .
त्या मुळे फोटो वैगरे takne म्हणजे अती केलं आणि हस झालं
ह्या म्हणी प्रमाणे होईल

सतिश गावडे's picture

28 May 2019 - 5:55 pm | सतिश गावडे

आपण प्रगत विचारांचे आहोत हे "दाखवण्यासाठी" लोक काय करतील याचा नेम नाही.

आदिजोशी's picture

28 May 2019 - 10:09 pm | आदिजोशी

फेसबूकवर/इंस्टावर मोहीमा राबवून जर असल्या गहन प्रश्नांची उत्तरं शोधता आली असती तर आज अख्खे जग समस्यामुक्त झाले असते. इथे फोटोबाजी करण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे जाऊन काम करा. आम्ही पुरुष मित्र येऊ मदतीला नक्कीच.

एफ. वाय. आय.: आम्ही वोट दिलं असलं तरी सेल्फी प्रदर्शन केलं नाही. तसंच ज्यांनी केलं त्यांनी वोट दिल्यामुळे ते केलं. तस्मात, पुरुष मुळातच सॅनिटरी पॅड वापरत नसल्याने पुरुष मित्रांनी पॅडसोबत फोटो टाकायचा संबंध काय?

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 11:25 pm | जालिम लोशन

sanitation and improper disposal of sanitory pad day.

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 11:27 pm | जालिम लोशन

Menstrual Hygiene Day:

प्रमोद देर्देकर's picture

29 May 2019 - 1:46 pm | प्रमोद देर्देकर

आम्हा डॉक्टरांमध्ये देखिल असलेला हा बडगा>>>>
v. c. दातरंगे तुम्ही कोणत्या विषयावर डॉ आहात ? ? ?