आणि माझी मान खाली गेली....

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
13 May 2019 - 11:58 pm
गाभा: 

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 12:18 am | शशिकांत ओक

सादर लेखनात जरा नाविन्य आणायची प्रयत्न केला आहे...
पुर्वी मला विविध रंग वापरून लिहायला आवडत होते. आता ते मागे पडले...
गूगल माय ड्राईव्ह वर ड्राफ्ट लिहून पब्लिश टू वेब च्या एमबेड ची लिंक मिसळपाव वरील कोडचा वापर करून हे साध्य झाले आहे. या नव्या धाग्यात याचा वापर करून मोबाईलवरून वाचकांना सोईचे व्हावे म्हणून आकार लहान ठेवला आहे.
आपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल... आणखी सुबकता यावी म्हणून काय करता येईल यावर सूचना केलेल्या आवडतील.
मसाजिस्टवर 24 तासात 929 क्लिक्स...! पाहून व वाचून बरे वाटले...

आनन्दा's picture

14 May 2019 - 7:36 am | आनन्दा

Kaka he mobile friendly nahee ajibat

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 8:04 am | शशिकांत ओक

मोबाईल उभा धरला तर नीट दिसत नाही. मी आडवा करून पाहिला. तर डावा ते उजवा असा स्क्रोल करायला मिळतो त्यातून बातमीपत्राचे कात्रण व्यवस्थित दिसते आहे. पहा प्रयत्न करून आणि कळवा.

जालिम लोशन's picture

14 May 2019 - 12:43 am | जालिम लोशन

खरी ओळख वापरु नका. रात्र वैर्‍याची आहे. कार्यकर्त्या नावाखाली गुन्हेगारांची चलती आहे. कुठली ही सामाजिककृती गनिमी काव्याने करा.

शशिकांत ओक's picture

14 May 2019 - 8:06 am | शशिकांत ओक

सावधानता बाळगा असा सल्ला दिला म्हणून...

उपयोजक's picture

14 May 2019 - 9:44 am | उपयोजक

तंत्रकरामत!

शंकासुर's picture

14 May 2019 - 9:52 am | शंकासुर

आपण केलेला प्रयोग नक्कीच स्तुत्य आहे. पण हा मिपाच्या साईट मधील त्रुटी सुद्धा ठळकपणे दर्शवतो.

आपण केलेला प्रयोग नक्कीच स्तुत्य आहे. पण हा मिपाच्या साईट मधील त्रुटी सुद्धा ठळकपणे दर्शवतो.

या बद्दल धन्यवाद

मसाजिस्ट धाग्याला उद्देशून अभ्या नामक सदस्याचे विचार काही वेगळे होते ते आपल्याला माहित व्हावे म्हणन इथे सादर करत आहे.

शिस्त म्हनून असते... उगी मराठीत १५०० फॉन्ट उपलब्ध आहेत म्हनून रॅन्डमली ते वापरले की सजावट होत नाही. त्याचेपण एक शास्त्र असते.

आपण म्हणता ते बरोबर आहे. विशेषतः हवाईदलातील सदस्याला तिचे महत्व काय याचा परिचय असावा लागतो.

लेखनतंत्राचा विकास होत गेला तसा त्यावर विविधांगांनी विचार करून ते वापराच्या काही रुढी, परंपरा, नियम किंवा परिपाठ रुजले. मान्यता पावले. पेपर, नियतकालिके, पुस्तक छपाई यात एक सूत्रता आली वगैरै कोणालाही मान्य होण्यासारखे आहे....
लेखकांनी आपले कथन हस्तलिखित कागदावर प्रकाशकाला, पेपर, नियतकालिकाच्या हाती दिले की त्यांचा छपाई, जाहिरात, वितरण, आणि विक्री अशा प्रत्येक पुढील पायरीवरील कारवाईवर ताबा नसल्याने मानधन मिळालेच तर ते स्वीकारून नव्या जोमाने लेखनात गुंतवून घ्यायला मोकळा, असे घडत असावे.
ही पद्धत आता हळूहळू बदलत आहे हे आपण जाणताच. पुर्वीच्या काळातील व्याकरणाचे नियम ढिले होत गेले. ह्रस्व-दीर्घाची अनिवार्यता विस्कळीत झाली. अनुस्वारांचा अति वापर कमी होत संपुष्टात आला. (9वारी) सकच्छ का (5वारी) विकच्छ साडी? असे वाद नाटकांचा विषय होत होते ते संपुन आज साडी ही समारंभात वापरायपुरती शोभेची उरली. वाहनावरून लीलया संचार करायला सोईचा ड्रेस गाजावाजा न होता रुळला. 4 ओळी चारोळ्या झाल्या. त्यांना राजकीय प्रतिष्ठा आली. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. हे सर्व व्यवसायात दिसत आहे.
आज ब्लॉग वरून मला काही लिहायची सुरसुरी आली की मिसळपाव सारख्या नवीन दालनातून माझ्या विचारांना वाचकापर्यंत मांडायला फोरम, वाचक वर्ग मिळत आहे. त्याला आकर्षक वाटेल असे विषय थोडक्यात पण प्रभावीपणे धाग्यांच्या जंजाळात मांडले जात आहेत. वाचकांनी आपले मत सादर करून विषयवस्तूला साजेल असा प्रतिसाद मिळवता येत आहे. ट्रोलिंगचा मान वाढला आहे. जरा वावगे म्हटले, फोटोची सरमिसळ केली तर सुप्रिम कोर्टातून बोलावणे यायची संधी उपलब्ध आहे. इतके या सर्व गोष्टींचे भान ठेवून लेखन केले असेल तर तो माल मार्केटिंगची तंत्रे अवगत करून सादर करायला यायला हवा. हे जे मी लिहित आहे ते नवे नाही पण एकत्रितपणे विचार व्यक्त करायला संधी मिळते आहे म्हणून बोटांच्या दाबाने लेखन करत आहे. असो.
माझी मुलाखत नुकतीच छापून आली म.टा.त. त्याचा फाँट काय असावा, कितव्या पानावर, कोणच्या दिवशी, कोणच्या सदरात, ते योग्य दिसेल याची काळजी मी करू शकत नव्हतो. ना गरज होती... आपण म्हणता तसे पेपरवाल्यांच्या नीती-नियमांचा, शिस्तीचा तो भाग होता.
मात्र इथे माझे लिखाण मलाच टाईप करावे लागते आहे. फोटो टाकायला करावी लागणारी उसाभर, त्याच्या सादरीकरणात नेटकेपणा आणणे मलाच शक्य आहे. म्हणून त्या साठी मी असे काही प्रयोग माझ्या कुवतीनुसार केले तर ते वावगे ठरू नयेत. आपल्या ते फारसे रुचले नाहीत असे आपण नोंदता तेही योग्य आहे.
...

त्यांचा आणखी एक आक्षेप होता तो तिथे जाऊन वाचावा ही विनंती.

.

ट्रम्प's picture

17 May 2019 - 4:05 pm | ट्रम्प

छान लिहले आहे !!
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मोबाइल आडवा धरून डेस्कटॉप मोड़ मध्ये व्यवस्थित वाचता येते !!
बाय द वे कित्ती दिवस तो भूयारी मार्ग रेंगाळला होता , अबब !!!
ओक साहेब प्रॉब्लम क़ाय आहे स्वतःला अतीशहाणे समजणारे मतदान साठी बाहर पड़त नाही , मग मुळीक सारख्या नां निवडून येन्या साठी गठ्ठा मतदान करणाऱ्या झोपड़पट्टीवर अवलंबून राहावे लागते .
मुळीक भाजप चा आमदार आणि त्याचा भावु नगरसेवक , मग क़ाय हिम्मत आहे कारपोरेशन ची झोपड़पट्टीवर कारवाई करण्याची !!!!

शशिकांत ओक's picture

17 May 2019 - 6:53 pm | शशिकांत ओक

आपण यावरून जात येत असाल तर वाट वाकडी करून भेटायला या सवडीनुसार.

ट्रम्प's picture

21 May 2019 - 11:01 pm | ट्रम्प

धन्यवाद !!!
मी कायम भाजप चा कट्टर मतदाता आहे . 2014 च्या लोकसभा आणि विधानसभे च्या निवडणूक मध्ये जनतेने मोदींच्या प्रेमापाई अक्षरशः निष्क्रिय लोकांना निवडून दिले त्याचेच मूळीक हे उदाहरण .
माझे काही मित्र आहेत लोहेगांव मध्ये ते सांगतात मुलिक म्हणतो लोहेगांव मधील लोकांनी मला मतदान च केले नाही मग त्यांचा विकास का करु ?
हे आहे त्या आमदाराचे रिपोर्ट कार्ड =)

शशिकांत ओक's picture

21 May 2019 - 11:35 pm | शशिकांत ओक

काही जे अपेक्षित आहे त्यात सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची मानसिकता बदलायला सुरू होईल.
गिरीश बापट जेंव्हा पुणे जिल्हा पालक मंत्री म्हणून मीटिंग्ज घ्यायचे तेंव्हा अनेक आमदार, नगरसेवक मुद्दाम गैरहजर राहात असल्याचे वाचनात आले. अशा काहींना पुढच्या निवडणुकीत डच्चू दिला तर बरे...
मुळीक यांनी मला भेटायला बोलावले होते त्यात काय काय झाले ते फोन वरून बोललेले बरे!

बबन ताम्बे's picture

26 May 2019 - 2:54 pm | बबन ताम्बे

प्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर.
आय टी पार्क, पंचतारांकीत हॉटेलं, मॉल यांची रेलचेल पण रस्ते छोटे. संध्याकाळी ऑफिस सुटली की ट्राफिकचा राडा असतो. ,नवीन एअर पोर्ट रोडला विमाननगरच्या आतून चार रोड मिळतात. संध्याकाळी क्रॉसिंगला कायम बोंब असते. ,लोकांची विमाने चुकलीत ट्राफिक जाममुळे. प्लॅनिंगच चुकलंय त्याला ट्राफिक पोलीस तरी काय करणार? विद्यमान आमदारांनी फार काही केले नाही पाच वर्षांत.

शशिकांत ओक's picture

31 May 2019 - 3:15 pm | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

31 May 2019 - 3:27 pm | शशिकांत ओक
दादा कोंडके's picture

26 May 2019 - 10:51 pm | दादा कोंडके

गंमतीशीर अनुभव. तुम्ही केलेली पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीची जाहिरात ठिकंय पण त्या केसरी आणि विणावाल्यांनी आधिच काव आणलाय. कुठलातरी प्रवासाविषयी लेख म्हणून वाचायला जावं तर यांच्या जाहिराती. सेकंड हनिमून वगैरे नाव ठेउन जेष्ठनागरीकांना उचकवत असतात. वर आवतरी मोठ्ठं समाजकार्य केल्याचं आणतात. भारतात काय पर्यटनाची ठिकाणं कमी आहेत काय? उगाच हाईप करून आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशांत का घालवा?

अहो मी पण वैतागलोय त्यांना.
एकदा काय गेलो... आमच्या बरोबर येऊन ...बार बार दखो... हजार बार देखो...यांचे सुरु होते....

मदनबाण's picture

2 Jun 2019 - 11:43 am | मदनबाण

देशात देशातील नागरिक किडामुंगी सारखे ठार केले जात आहेत [ हो ठार केले जात आहेत कारण रस्तेच तसे कंत्राटदार बनवत आहेत.] सातत्याने रस्ते अपघातात ठार केले जाणार्‍या नागरिकांचा आकडा सातत्याने वाढत आहे आणि त्यात कोणत्याही सरकारला काही करावेसे वाटत नाही हे या देशाचे आणि नागरिकांचे फार मोठे दुर्दैव आहे ! मोदी सरकारची आणि फडणवीस सरकारची ५ वर्ष उलटुन गेली तरी यात कणमात्र फरक पडलेला नाही ही अजुन वाईट गोष्ट ! पुढील ५ वर्षात अजुन किती नागरिक ठार केले जातील ? किती कुटुंब यामुळे उधवस्त होतात याचा विचार देखील त्रास दायक आहे ! खरं तर काही काळापुर्वी कल्याण मध्ये दुचाकीवर बहुधा भोईर आडनाव असलेल्या एका स्त्रीचा नवर्‍या बरोबर दुचाकीवर जाताना झालेल्या अपघाताचा व्हिडियो माझ्या पहाण्यात आला होता त्यानंतर माझं टाळकं सटकल आहे ते अजुन तसेच सटकलेल आहे ! रस्त्यावर असे कुत्र्या मांजर्‍या सारखे मरण्या पेक्षा बॉर्डरवर जाउन पाकड्यांना ठार करुन आलेले मरण मला अधिक प्रिय वाटेल, पण बॉर्डरवर ठार केलेल्या जवानां पेक्षा अधिक नागरिक देशातील रस्त्यांवर ठार केले जात आहेत... याला खराब रस्ते बनवणारे आणि त्यांना अभय देणारे जवाबदार आहेत.

अपघात निर्देशांक
खड्डय़ांमुळे राज्यात १६६ जणांचा अपघाती मृत्यू
शहरातील अपघात घटले, पण मृत्यूसंख्या तेवढीच!
पालघर जिल्ह्यत वर्षभरात १,३६० अपघात
चार महिन्यांत वीस पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू

जाता जाता :- या देशातील रस्त्यांना तरी येत्या ५ वर्षात "अच्छे दिन" येणार का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajan