उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीचा प्रवास सुखदायक असतो का?

Primary tabs

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
12 May 2019 - 3:41 pm
गाभा: 

एप्रिल व मे महिन्यात शाळेतील मुलांना वार्षिक सुट्टी असल्याने विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. प्रत्येक कुटुंब आपली आर्थिक परिस्थिती प्रमाणे सहलीचा बेत आखतात. पण सहलीचा आनंद लुटण्या एवजी प्रवासात बरीच धगधग होते. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना नको ती सहल असे वाटते. प्रत्येकांचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. काही जण स्वताची चार चाकी घेऊन जातात, काही भाड्याने, काही गाडीने काही वातानुकूलन बस तर विमान. प्रवास सुखदायक असतो असे नाही. आपले अनुभव काय आहे?

प्रतिक्रिया

बहुतेक राहुल आणि प्रियंका च्या शाळानां सूटया पडल्या वर राजीव गांधी नीं लक्षद्वीप ची सहल आयोजित केली असावी , पण भाजप मात्र ती घटना उकरुन काढून फायदा घेवू ईछीत आहे .

भंकस बाबा's picture

12 May 2019 - 8:07 pm | भंकस बाबा

नरेंद्र मोदी प्लान करत असावेत की आपल्या कुटुंबियाना घेऊन गुजरातची सहल करावी किनाऱ्याकिनाऱ्याने ! ते पण नवीन राफेल येणार आहेत ना त्याने. आता 14/ 15 विमाने लागतीलच ना? म्हणून आत्ताच माहौल बनवून ठेवत आहेत, उद्या खान्ग्रेसची बोंबाबोंब नको.
मराठी माणसाला कोकणात जायला एक वल्ह्याची नाव तरी उपलब्ध करून द्या हो कोणीतरी!

Rajesh188's picture

12 May 2019 - 8:17 pm | Rajesh188

पावसात पाऊस असतो,
थंडीत खूप थंडी मग जाणार कधी
आता सर्व सुविधा आहेत त्या मुळे त्रास होत नाही
चांगली हॉटेल्स आहेत,वातानुकूलित गाड्या आहेत

इरामयी's picture

12 May 2019 - 8:20 pm | इरामयी

+१

सासरची मंडळी, मिँत्रमंंडळी, का आणी कोण?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2019 - 9:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे.
कसंय, सुट्ट्यांमधे आक्षेपार्ह काही नाही, या मुद्द्यांवर वाईड बॉलकडे दुर्लक्ष करु नये असं वाटतं.

पंचांनी तो वाईड बॉल द्यायला पाहिजे होता, तो न दिल्यामुळे पोलार्ड चिडला. मला ते पटलं.
सामना चेन्नई जिंकेल आणि मला मानसिक त्रास होईल हे कबूल करतो.

मुंबै जिंकली तर धाग्यावर येईन.

ता. क. प्रशांतसेठ आणि नीलकांतसेठ पाहताय ना, ऊन किती भयंकर पडतंय. :)

-दिलीप बिरुटे

१) उन्हाळी ( किंवा दिवाळी ) सुटीत सहलीचा बेत कधीच करत नाही. आरक्षण न लागणाऱ्या गाड्या/बसेस/ इ ने शक्य असेल त्याने नातेवाईक/ओळखीच्यांना एक दोन दिवस भेटतो.
२) सहलीसाठी (कौटुंबिक) १५-३०सेप्टेंबर किंवा २० जानेवारी ते १५ फेब्रुवारी उत्तम काळ. शाळा कालेजला दोन चार दिवस दांडी मारल्याने काही बिघडत नाही या वेळी.

उन्हाळ्याची सुट्टी हा सहलीसाठी उत्तम कालावधी. उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असतो व आंगाची लाहीलाही होत असताना रणरणत्या उन्हात बजेट नुसार सहलीसाठी सर्वोत्तम ठिकाणे अशी आहेत:-
चांगले बजेट असेल तर विदेशातल्या या ठिकाणांना भेट द्यावी
युमा-अमेरिका-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४२ अंश से.
डेथ व्हॅली-अमेरिका-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४९ अंश से.
अहवाज़- इराण-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४७ अंश से.
डॅलॉल-इथिओपियाच्या-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४७ अंश से.
अल-अझीझिया-लिबिया-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ५५.५ अंश से.
कुवेत सिटी-कुवेत-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४४.५ अंश से.
मध्यम बजेट असेल तर भारतातल्या या ठिकाणांना भेट द्यावी
रांताचिन्हला, कुर्नुल, तिरुपती-आंध्र प्रदेश-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४५ अंश से.
तिटिलागड, भुवनेश्वर-ओडिशा-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४५ अंश से.
राजगढ, श्री गंगा नगर-राजस्थान-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४७ अंश से.
डाल्टनगंज-झारखंड, अमदाबाद-गुजरात-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४५ अंश से.
कमी बजेट असेल तर गेलाबाजार महाराष्ट्रातल्या या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी
नागपूर, चंद्रपूर, अमरावती-महाराष्ट्र-उन्हाळ्यातील सरासरी तापमान ४२ अंश से.
विशेष सूचना- वरील ठिकाणी सहलीला जाताना गरम कपडे,हातमोजे,पायमोजे,कोट,कानटोपी,मफलर आदी वस्तू बरोबर घ्याव्यात. काही लोक्स उगाचच थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा उपद्व्याप करतात.त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. प्रवासासाठी कोटी कोटी शुभेच्छा.

पाषाणभेद's picture

13 May 2019 - 12:16 am | पाषाणभेद

मी घरातच सहल करतो अन निरर्थक चर्चा करत बसतो.
घरचे कंटाळतात अन बाहेर जा म्हणतात. मग मी येथे येतो अन चर्चा करतो.
लोकांनाही काही काम नसते. आपण काडी टाकायची अन पॉपकॉर्न घेवून गंमत पहायची.

उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या सहलींंसाठी उत्तम गड्डा झब्बू!!

फुटूवाला's picture

13 May 2019 - 4:58 pm | फुटूवाला

सहलीला गेले असतील :)

सोन्या बागलाणकर's picture

15 May 2019 - 3:38 am | सोन्या बागलाणकर

स्वामि गेले सहलीला, चैन पडेना आम्हाला!

चौथा कोनाडा's picture

21 May 2019 - 4:29 pm | चौथा कोनाडा

एक, दोन, तीन, चार

स्वामिजींचा जयजयकार !