वाढदिवस लक्षात ठेवणे गरजेचे आहे का ?

खिलजि's picture
खिलजि in काथ्याकूट
2 May 2019 - 7:41 pm
गाभा: 

नमस्कार ,, मी येथे नवीन चर्चेला वाचा फोडत आहे .. त्याच काय आहे , जवळजवळ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .. मी आधीही कधी कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवला नाही आणि पुढेपण ठेवेन असे वाटत नाही ... येणारा दिवस आपला असे मानून पुढे धाकाला असतो रहाटगाडे .. त्यामध्ये लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे म्हणजे महापाप .. ते मी कशाला ठेवू .. पहिली दोन तीन वर्षे मी विसरलो म्हणौन दणकून सडकून चपापून भांडणे झाली .. इतकी कि जे जवळचे आप्त आले होते ते घाबरून पुढच्या वाढदिवसाला यायचं कि नाही हा विचार करू लागले .. त्यामध्ये माझ्या आईचा पहिला नंबर होता .. तिने बिचारीने माझ्या लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवला आणि पहिली तीनेक वर्षे यथायोग्य मला आदल्या दिवशी कळवायची तसदी घेतली .. ती गोष्ट हिला तिने ( आईने ) मस्करीमध्ये सांगितली मग काय .. हिनेपण पुढच्या वाढदिवसाला आईने मला कळवू नये याची यथायोग्य काळजी घेतली आणि तो दिवस आला .. बुद्धी कुशाग्र बनवण्याचा दिवस .. माझ्या लग्नाचा वाढदिवस ...
मी नेहेमीप्रमाणे सकाळी उठून कामावर गेलो आणि संध्याकाळी उशिरा आलो .. घरी आई अली आहे ते मला संध्याकाळीच माझ्या मोठ्या मुलाने सांगितलं पण मला पुढे काय होणार आहे याची सुतराम कल्पनाही नव्हती ...
मी नेहेमीप्रमाणे घरी आलो आणि थेट हिने माझ्यावर आक्रमण केलं . थोडावेळ मी भांबावून गेलो आणि जेव्हा मला कळलं कि सालं आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो विसरलो म्हणून हे सर्व चाललंय तर माझं पण टाळकं सटकलं .. पण तिने मला जेव्हा हे सांगितलं कि पहिले तीन चार वाढदिवस तुम्हाला आई सांगत होत्या तेव्हा मात्र मी खजील झालो ..
मग तडक खाली गेलो आणि खात्यात होते तेव्हढे रुपये काढले आणि थेट एक सोन्याचा हाराचा सेट खरेदी केला ... चांगलाच फटका बसला होता तोही विनाकारण .. फटका बसला पण एक चांगला परिणाम हा झाला कि आमची हि पार शांत झाली .. कारण तिला त्या नेकलेसच्या सेट बरोबर मी खात्यातली उरलेली शिल्लकची पावतीही दिली होती .. फक्त सत्तावीस रुपये बाकी होते आणि चक्क सात दिवस अजून पुढे काढायचे होते.. दुसऱ्या दिवशी तिने मला सांगितले कि मला तुम्ही काही दिले नाही तरी चालेल पण माझा अगर लग्नाचा वाढदिवस विसरलात तर ते मला चालणार नाही .. मिपाकरांनो विश्वास ठेवा माझी बायडीने आजपर्यंत काहीच मागितले नाही .. मी फक्त वाढदिवस ( तेही दोन्ही ) लक्षात ठेवतो .. किंबहुना ते आता मरेपर्यंत कधी विसरले जाणार नाहीत असे वाटतेय ..

तुमहाला काय वाटते , या मुली किंवा स्त्रिया ,, या दिवसासाठी एव्हढ्या का हळव्या असतात ? त्याने काय सध्या होते .. मला तर तो एक साधा नेहेमीसारखाच दिवस वाटतो .. मी प्रत्येक दिवस मस्त मजेत कसा जाईल एवढाच बघतो .. काही जास्त अपेक्षा नाहीत कि काही नाही .. पण या मुळींच असे काय असते कि त्यांना त्या विशेष दिवसाचे एव्हढे महत्व वाटते .. तुम्हाला काय वाटते ते कळवा जरूर .. विषय गंभीरपण असू शकतो .. मला एक ते दीड लाखाला वाढदिवस पडला .. इतर कुणावर असा प्रसंग ओढवला का कि अजून काही वेगळे झालेय ऐकायला आवडेल आपल्याला ...

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

2 May 2019 - 8:09 pm | चित्रगुप्त

मस्त उपाय केलात. जिगरबाज आहात राव. मानलं तुम्हाला.
मीपण वर्षभर लक्षात असणारी वाढदिवसाची तारीख नेमक्या त्या दिवशीच विसरतो. हे ह्याप्पीबड्डेचे खूळ अलिकडे फारच बोकाळले आहे. अमूक डे अन तमूक डे हे सर्व गिफ्टा बनवणार्‍या/विकणार्‍यांनी माजवलेले पाखंड आहे, असे आमच्या हिच्या 'ह्यांचे' मत.

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 9:17 pm | चौथा कोनाडा

ह्याप्पीबड्डेच्या संसर्गजन्य रोगा पासून बचाव कसा करायचा ही २१ व्या शतकातली फार मोठी समस्या आहे !

शब्दानुज's picture

2 May 2019 - 11:28 pm | शब्दानुज

वाढदिवसाला जरूर शुभेच्छा द्याव्यात. अगदी शत्रू असला तरी द्याव्यात. वाढदिवशी शुभेच्छा मिळालेला माणूस क्षणापुरता 'जगी सर्व सुखी असतो.' तो माणूस आपल्यासाठी महत्वाचा आहे , त्याच्या आनंदात आपला आनंद आहे अशा गोष्टी आपण अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांमधून व्यक्त करत असतो.

तुमच्या मोबाईलमधले कॅलेंडर अॅप यासाठी उपयोगात आणा. यात आपण वर्षातील कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेसाठी रिमांडर सेट करू शकता.

म्हणजे उद्या जर लग्नाचा वाढदिवस आला तर आदल्या दिवशी तुम्हाला तसा रिमांडर मिळेल.

तुम्ही सगळ्या मित्रांच्या वाढदिवसाच्या नावाने रिमांडर सेट करु शकता

तुमच्या अॅपमद्धे ही सोय नसेल तर गुगल कॅलेंडर वापरा.

मोबाईल फॉरमॅट मारताना या डाटाचीपण काळजी घ्यावी.

शब्दानुज's picture

2 May 2019 - 11:37 pm | शब्दानुज

बाकी तुमच्या जागी मी असतो तर ख-या सोन्याच्या हाराठिकाणी तसाच खोटा हार दिला असता. त्या दिवसापुरता प्रश्न मिटवला असता.

दुस-यादिवशी कुठेतरी बाहेर खायला घेवून मग खरी गोष्ट सांगितली असती की हार खोटा होता पण माझ प्रेम २४ कॅरेट आहे वगैरे वगैरे....

मग सोन्याच्या ख-या दुकानात घेऊन जा. तूला तो हार दाखवतो आणि पाहिजे तर घे असे बायकोला म्हणा. मुद्दाम हाय फाय दुकानात न्यायचे. तिथली हाराची किंमत ऐकून बायको नको म्हणते की नाही बघा.

मग एखादा कानातला वगैरे देऊन विषय स्वस्तात मिटवायचा.

हा प्रकार जर कोणी करून पाहणार असेल तर होणा-या घटनेस वा दुर्घटनेस तोच जबाबदार राहिल.

श्वेता२४'s picture

3 May 2019 - 1:00 pm | श्वेता२४

माझा व माझ्या नवऱ्याचा वाढदिवस एकाच महिन्यात 5 दिवसांच्या फरकाने असतो. तसेच 80 टक्के मित्रमंडळींचा वाढदिवस त्याच महिन्यात असतो. त्यामुळे त्या महिन्यात आम्ही सर्वच सावध असतो व आज कुणाचा वाढदिवस आहे हे चाचपून पाहतो. असो. तर आमच्या दोघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात असतो. नवऱ्याचा वाढदिवस आधि असल्याने माझे म्हणणे असते की एकाच दिवशी दोघांचा संयुक्त वाढदिवस करु. नवरा तात्पुरता हो म्हणतो आणि माझ्या वाढदिवसाला परत केक आणला जातो, सगळ्याना बोलवणे-पार्टी वगैरे. मला हा अवास्तव खर्च वाटतो. गेल्यावर्षी म्हणाले आता आपण मोठे झालोत. काय गरज आहे वाढदिवस साजरा करण्याची? आता फक्त मुलाचा वाढदिवस साजरा करु मोठ्याने. हो म्हणाला आणि नंतर वर्षभर ऐकवत राहिला की माझा वाढदिवस केला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी नेहमीप्रमाणे सगळ्यांना बोलवून त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. आमच्या लग्नाचा वाढदिवस मात्र दोघांच्याही लक्षात असतो. सहसा विसरत नाही कारण तारीखच तशी आहे. लग्नाचा वाढदिवस आम्ही कधीच सेलिब्रेट करत नाही पण स्वताच्या वाढदिवसाबाबत मात्र नवरा एकदम आग्रही आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या तर लोक नाराज होतात.पण मलाही यामागे नेमकी काय मानसिकता आहे ते कळत नाही. हा खरच एवढा इगोचा विषय असण्याचे कारण काय?

मराठी कथालेखक's picture

3 May 2019 - 1:51 pm | मराठी कथालेखक

हा खरच एवढा इगोचा विषय असण्याचे कारण काय?

माझा अनुभाव इगो नाही दुखावला जात पण वाईट वाटतं खरं.. खास करुन जवळच्या लोकांनी शुभेच्छा दिल्या नाहीत तर. मी सरळ एक गोष्ट करतो ती म्हणजे मी पण अशा लोकांना शुभेच्छा देत नाही अगदी तारीख पक्की लक्षात असली तरी..

उगा काहितरीच's picture

3 May 2019 - 2:01 pm | उगा काहितरीच

माझा व बायकोचा पाठोपाठच आहे. तिचा ११ तारखेला माझा १२ तारखेला. :) तिचा विसरला तर लगेच बदला घ्यायची संधी असते तिच्याकडे. अजुनतरी विसरला नाही म्हणुन विसरल्यावर काय होते ते माहीत नाही. ;)

मराठी कथालेखक's picture

3 May 2019 - 2:00 pm | मराठी कथालेखक

"समोरच्याने आपल्यासाठी वर्षातला एक /दोन (लग्नाचा वाढदिवस धरुन) दिवस तरी लक्षात ठेवून त्या दिवशी भरभरुन शुभेच्छा द्याव्यात" ही अपेक्षा / भावना असते.. त्यात काही गैर म्हणता येणार नाही.

तिने मला सांगितले कि मला तुम्ही काही दिले नाही तरी चालेल पण माझा अगर लग्नाचा वाढदिवस विसरलात तर ते मला चालणार नाही

तुमच्या पत्नीने ती अपेक्षा नेमक्या शब्दात बोलून दाखवली आहेच. तुमचा (किंवा आणखी कुणाचा) दृष्टीकोन वेगळा असू शकतो पण जोडीदाराची साधी इच्छा पुरवायला हवी.
मी लग्नाचा वाढदिवस विसरत नाहीच.. आम्ही दोघेही बहूधा त्या दिवशी सूटी घेतो आणि जवळपास कुठेतरी फिरायला / जेवायला जावून साजरा करतो. एकमेकांचे वाढदिवसही आम्ही विसरत नाही .. आमचे वाढदिवस लागोपाठ दोन दिवस जोडूनच येतात.

जालिम लोशन's picture

3 May 2019 - 2:37 pm | जालिम लोशन

हि सगळी कार्ड आणी गिफ्ट विकणार्‍या कंपन्यांची चालबाजी आहे बिचार्‍या भोळ्या बहुतांशी बायका व काही पुरुष त्याला बळी पडतात.

लग्नाचा आणि बायकोचा वाढदिवस लक्ष्यात ठेवायची सोपी युक्ती आहे
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फक्त एक वर्ष तो विसरायचा.

खिलजि's picture

3 May 2019 - 3:36 pm | खिलजि

अहो चित्रगुप्त साहेब , चांगलीच शिकली होती त्यावेळीस माझी .. त्यामुळे झालं काय कि तो लग्नाचा वाढदिवस चांगलाच लक्षात राहिला .. तारीख तर अजूनपर्यंत विसरलो नाही आहे .. तो महिना उजाडला कि माझी मोजदाद सुरु होते ..

ते आनंदा साहेब म्हणतात त्याप्रमाणेच , तुम्हाला बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवायचा असेल तर तो एकदा तरी विसरून बघावा त्याप्रमाणे ..................................

........................

ओह शुक शुक

कुणी आहे का तिकडे ?

कुणी असा किंवा अशी

जगत असेल क्षण

प्रत्येक क्षणात रमवत असेल मन

साजरा करत असेल वाढदिवस हरेक दिवशी

द बेस्ट वे टू रिमेम्बर युअर वाईफ्स बर्थडे इज टू फर्गेट इट जस्ट वन्स !!

खिलजि's picture

4 May 2019 - 3:25 pm | खिलजि

तात्पर्य , एकदा तो दिवस विसरून दाखवावा

यावर कुणाचेही दुमत नाही .. असो , नारीशक्तीचा महिमाच अगाध आहे आणि पुढे तो अजून वाढत जाईल यात शंका नाही

वामन देशमुख's picture

5 May 2019 - 12:04 pm | वामन देशमुख

आम्ही शक्यतो सगळे वाढदिवस लक्षात ठेवतो आणि साजरेही करतो. तिचा वाढदिवस, माझा वाढदिवस, आमच्या लग्नाचा वाढदिवस, साखरपुड्याचा वाढदिवस, पाहण्याच्या कार्यक्रमाचा वाढदिवस हेही साजरे करतो.

वामन देशमुख's picture

5 May 2019 - 12:07 pm | वामन देशमुख

आणि हो, शक्यतोवर दोन-दोनदा साजरे करतो, म्हणजे एकदा तिथीने आणि दुसऱ्यांदा दिनांकाने.

बिपीन सुरेश सांगळे's picture

5 May 2019 - 2:01 pm | बिपीन सुरेश सांगळे

एक प्रसंग आठवतो
एकदा एका वयस्कर माणसाला जन्म तारीख विचारली
त्याने ती सांगितली
मग त्याच्या बायकोची तारीख विचारली
तो म्हणाला आठवत नाही हो
पण हळूच म्हणतो कसा
प्लिज माझ्या बायकोला सांगू नका हं , की मला तिची तारीख आठवत नाहीये ते

nanaba's picture

6 May 2019 - 2:24 am | nanaba

आपल प्रेम असलेल्या माणसा करता जरा कष्ट घ्या यला?
especially when u know it matters to her!

वाढदिवसाचा दिवस मोकळा ठेवतो येणाऱ्यांसाठी. दोनचार दिवस अगोदरच सोयीच्या शनिवारी कुठे छोटी सहल काढतो. विसरत वगैरे अजिबात नाही.

गामा पैलवान's picture

6 May 2019 - 11:21 pm | गामा पैलवान

खिलजि,

तुमचा हा प्रश्न समर्पक आहे :

या मुली किंवा स्त्रिया ,, या दिवसासाठी एव्हढ्या का हळव्या असतात ? त्याने काय सध्या होते .. मला तर तो एक साधा नेहेमीसारखाच दिवस वाटतो

या हळवेपणाचं कारण असंय की बायका व पुरुष आजिबात समान नाहीत. स्त्रीपुरुष समानता हा स्त्रीवादी व भंपक अपप्रचार आहे.

वाढदिवसाला बाईचं वय एका वर्षाने वाढतं. याचा आंतरिक अर्थ ती म्हातारी झाली असा होतो. म्हातारपणास पुरुषांपेक्षा बाई जास्त घाबरते. तिच्याकडे नवऱ्याने लक्ष दिलं नाही तर ती कावरीबावरी होते. बायकोचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे 'ती म्हातारी होऊनही आपल्याला आवडते' असं सांगणं आहे.

आ.न.,
-गा.पै.

खरं तर प्रत्येक दिवस हा वाढदिवस असतो.

कसे?

आता बघा, आजचा दिवस हा तुमच्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस आहे (तुम्हाला उदंड आयुष्य लाभो).
आणि आयुष्याचा पहिला दिवस म्हणजे वाढदिवस, बरोबर?

या न्यायाने आज तुमचा वाढदिवस आहे, प्रत्येक दिवस हा वाढदिवस आहे.

कळळं ?

सुबोध खरे's picture

7 May 2019 - 9:51 am | सुबोध खरे

लोक इतक्या साध्या गोष्टी विसरतात?

मी माझ्या बायको मुलांचा भावांचा आणि आईवडिलांचा वाढदिवस आणि लग्न दिवस कधीच विसरलो नाही. भेट दिलीच पाहिजे असे नाही.
परंतु आम्ही (मी माझा भाऊ वहिनी आमची मुले आणि आईवडील असे १० जण आमच्या वाढदिवशी एकत्र जमतो आणि साजरा करतो ( घरी किंवा हॉटेलात जाऊन).
बाकी वाढदिवस साजरा केला पाहिजे का?

याचे उत्तर ख्रिसमस, रामनवमी, गोकुळाष्टमी, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, गांधी जयंती, हे साजरे केलेच पाहिजेत का?

किंवा आपल्या आई वडील आजी आजोबा यापैकी कोणी दिवंगत असेल तर त्यांचे वर्षश्राद्ध केलेच पाहिजे का?

या उत्तरातच आहे

टवाळ कार्टा's picture

7 May 2019 - 5:19 pm | टवाळ कार्टा

हा सहज त्रिशतकी धागा झाला असता
#पुमिराना कॉम्प्लेक्स आला राव

चौथा कोनाडा's picture

8 May 2019 - 5:07 pm | चौथा कोनाडा

वाढदिवस लक्षात राहतात.
वेळ आणि आर्थिक बजेट (मोस्टली लो-कॉस्ट) नियोजन करून, एकत्र येऊन, बऱ्याचदा रात्री हॉटेलमध्ये जेवण, सुट्टी असेल तर बाहेर फिरणे इ. ने साजरे करतो.
हे छोटे छोटे आनंद बरंच सुख देऊन जातात.

अभ्या..'s picture

8 May 2019 - 5:14 pm | अभ्या..

राष्ट्रीय दिन असल्याने शक्यतो विसरत नाही.
घरात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी जयंतीचे निमित्त साधून तीन वाढदिवस असल्याने आम्ही आडनावासहित भलतेच देशप्रेमी आहोत ह्याची नोंद घेण्यात यावी. त्यात ह्या दिवशी ड्राय डे ठेवून मायबाप सरकारने आमच्यावर अनंत उपकार केले आहेत(आमची आम्ही शेपरेट आदल्या दिवशीच आणून ठेवितो आणि पितो ह्याचीही नोंद घ्यावी)
बाकी गिफ्ट बिफ्ट देण्याची सवय आम्हास नाही. ;) कुणाला असल्यास त्याचे स्वागतच करु.