मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
2 May 2019 - 11:42 am
गाभा: 

चर्चा ह्या सत्रात मुळ विषयावर न लिहता टिंगलटवाळी करणाऱ्या वर मिसळपाव चे काही बंधन नाही आहे का? काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात. तर काही जण धागा च कापून टाकावा असे लिहितात. मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती चा विषय काठला की विरोध करतात. महाराष्ट्रात संस्कृती व भाषा टिकण्यासाठी लिहिल्यास विरोध करतात म्हणजे हे नेमके आहेत तरी कोण?शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी अशाच विरोध झाला होता. पण आता महाराष्ट्राच्या प्रगती साठी हे मावळे आई भवानी ची शप्पथ धेऊन मुळीच घाबरणार नाहीत.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

2 May 2019 - 12:30 pm | विजुभाऊ

थट्टा , चेष्टा , खिल्ली , टिंगल टवाळी या एकाचा भावाच्या शब्दांना वेगवेग्ळ्या अर्थछटा आहेत.
थट्टा माफक असते , चेष्टा खिल्ली या जिव्हारी लागू शकतात.
मात्र टिंगल किंवा टवाळी या निव्वळ एखाद्याचे खच्चीकरण करण करणयासाठीच असतात
मिपावर थट्टा चेष्टा मस्करी या होतातच.
मात्र त्या करताना वैयक्तीक मानहानी न होता माफक हसू यावे या प्रकारची असएल तर काहीच हरकत नाही.
टिंगल किंवा खिल्ली उडवताना मात्र त्याची परिणिती वैरभावात होउ नये याचे भान राखून करावी.

टर्मीनेटर's picture

2 May 2019 - 1:03 pm | टर्मीनेटर

मिपावर टींगलटवाळी होत नाही... प्रत्येकाला आपआपले मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे... वाचकांचे आपआपले निकष असतात... एखादी गोष्ट नाही पटली तर त्यावर व्यक्त होण्याचा त्यांना अधिकार आहेच... अर्थात तोही सभ्य भाषेत... जर कोणी असभ्य भाषेत तुमच्यावर टीका टीप्पणी केली असेल तर असा धागा काढायचा तुमचा अधिकार अबाधित आहे...

तुम्ही चालू ठेवा.धागे काढत रहा..

उडतील ते कावळे, राहतील ते मावळे.

स्वामि १'s picture

2 May 2019 - 4:50 pm | स्वामि १

आम्ही मराठी माघे हटणारच नाही
धन्यवाद

उगा काहितरीच's picture

2 May 2019 - 5:03 pm | उगा काहितरीच

साहेब,
इथे सगळेच मराठीच लोक येतात.

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 9:10 pm | चौथा कोनाडा

आम्ही मिपाकर मागे हटणारच नाही

धन्यवाद !

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 1:32 pm | चौथा कोनाडा

मला वाटलं :

मिसळपाव वर टिंगलटवाळी करून घेण्यावर मात कशी करावी ?

असा धागा आहे.

भंकस बाबा's picture

2 May 2019 - 1:49 pm | भंकस बाबा

तुम्ही चालत रहात तर लवकरच धागे काढणारे शतकवीर बनाल.
शुद्धलेखनाच्या चुका नाहीत हो या, कधी मोकळा होतो धागा काढून एकदाचा असे होते तुम्हाला, अन्यथा आपले लिहिलेले एकदा तपासायचे तरी कष्ट घ्याल तुम्ही!
असो , तुम्हाला शुभेच्छा

व्यवहारात पण जुलाब लागला की असेच होते की हो

सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:00 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:00 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:00 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:02 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:04 pm | सतिश म्हेत्रे
सतिश म्हेत्रे's picture

2 May 2019 - 2:13 pm | सतिश म्हेत्रे

असे अजुनही काही बरेच आहे. :)

सोप्पय !
दुर्लक्ष.

थोडे विचार पूर्वक लिहावे .
ज्या धाग्यावर चर्चा होते त्या धाग्यावर प्रतिसाद
जे देतात त्यांची एक पद्धत असते ती समजून घ्या.
पहिला ते धागा वाचतात पण धागा नावडता असेल तर पूर्ण न वाचताच प्रतिसाद दिला जातो त्याचा सुर टिंगल करण्याचा असतो .
दुसरे धाग्यातील चुका फक्त शोधल्या जातात आणि प्रतिसाद दिला जातो त्याचा सुर टवाळी च असतो .
आणि शेवटी धागा वाचला पण जातो समजून पण घेतला जातो आणि चुका काय आहेत ह्याचा सुधा विचार करून प्रतिसाद दिला जातो.
तो प्रतिसाद तुम्हाला न दुखवता तुमच्या चुका दाखवून देण्या कडे कल असणारा असतो .

मराठी कथालेखक's picture

2 May 2019 - 3:30 pm | मराठी कथालेखक

बरं .. तुमच्याकरिता शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करुयात.. आता ठीक ?
...काय म्हणताय ? आशयाकडेही दुर्लक्ष करायचं का ? बरं .. ..ते ही करुयात..

नाखु's picture

3 May 2019 - 12:49 pm | नाखु

धागा विषय, शुद्धलेखन, वाक्यरचना,आशय,अपेक्षा,चर्चा हेतू,मिपाकर लेखकू (असामान्य),प्रतिसादी मिपाकर (सामान्य) आणि फक्त वाचनमात्र मिपाकर (अतिअतिसामान्य) यांच्याकडेच दुर्लक्ष केले पाहीजे.....

अखिल मिपा उन्हाळी धागा भुईमूग लागवड आणि सदाबहार पापड, कुरडई सांडगे कुटीरोद्योग संघाचे "मिपाचे आंगण, हक्काचे वाळवण" या निवेदनातून साभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2019 - 3:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर सर्वसाधारण शुद्ध मराठीत, सरळ भाषेत, तर्कदृष्ट्या योग्य लेखन केले तर, टिंगल-टवाळी न होता, उत्तम चर्चा होते, असा अनुभव आहे. मिपावर आहात तर स्वतःचे सोडून इतर लेखन व त्यावरचे प्रतिसाद वाचत असालच... नसाल तर जरूर वाचा... त्यामुळे मिपाचा/मिपाकरांचा स्वभाव कळेल. चांगल्या लेखनाची मिपावर नेहमीच उत्तम दखल घेतली जाते व स्तुतीही केली जाते, हेसुद्धा कळेल.

निष्काळजीपणे अशुद्ध भाषा वापरलेले, अतर्क्य/बेछूट दावे असलेले, एकांगी दावे असलेले, इत्यादी लेखनाचा सतत मारा केल्यावर, मिपावरच काय इतर कोणत्याही मंचावर टिंगल-टवाळी झाली नाही, तरच आश्चर्य असेल. :)

तेव्हा, वरील वस्तूस्थिती ध्यानात ठेवा आणि टिंगल-टवाळी टाळा.

राघव's picture

2 May 2019 - 5:40 pm | राघव

जर आपण स्वतःच्या लेखनात सुधारणा करत गेलो, तर मिपाकर उत्तम प्रतिसाद देतात असा माझाही अनुभव आहे. फक्त स्वतःच्याच धाग्यांवर नव्हे, तर इतर धाग्यांवर सुद्धा. अगदी जशास तसंही मिळतं! इतरांचं जुनं लेखन उघडून बघीतलं तर भरपूर विदा मिळेल! :-)

आणि नाव मिसळपाव आहे. ते थोडं का होईना ते झणझणीत असणारच!!

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 9:12 pm | चौथा कोनाडा

+१००१

अभ्या..'s picture

2 May 2019 - 6:13 pm | अभ्या..

स्वामी म्हाराज व्हा तुम्ही पुढे, कापा करंगळी थोडीशी ह्या मिपापेश्वराच्या माथ्यावर, घ्या शपथ.
घुमु दे नाद मराठी आंजाच्या कानाकोपर्‍यात, थरथरु दे सार्‍या मराठी सायटींचे बुरुज, थरकाप उडू दे ह्या दिग्गज पातशाह्यांचा. दिल्लीचे तख्तही हादरु दे तुमच्या रणगर्जनेने. बंगाल, माळवा दोआब न बुंदेलखंडाच्या सार्‍या गनिमांना पळवून लावायचेय आपल्याला. पार लोटून टाकू त्यांना ह्या नर्मदेपार. तुमच्या कीबोर्डाच्या एका की ला लाभू दे बळ मुलुखमैदान तोफेचे, माउसाच्या क्लिकला धार येऊ दे त्या भवानी तलवारीची. जमा करा आपले थोडेसे सैन्य. त्याचाच सेनासागर होणार आहे एक दिवस. तुमचे सगळे मावळे एक मुखाने गर्जतील "हरहरस्वामीम्हादेव"

भंकस बाबा's picture

2 May 2019 - 7:14 pm | भंकस बाबा

अहो ह्या प्रीत्यर्थ अजुन डजनावारी धागे यायचे.
मग अभ्याभाऊ तुम्हीच गोंधळून जाल की कोणत्या आघाडिवर लढु .
आताशी महाराष्ट्र धागा 1 चालू आहे, धागा 25 आला की आपण आपआपल्या घरी तुतारी फुंकुन रौप्यमहोत्सव साजरा करू.

चौथा कोनाडा's picture

2 May 2019 - 9:13 pm | चौथा कोनाडा

:-) हा .... हा ... हा ....

अभ्या.. _/\_

उपयोजक's picture

4 May 2019 - 8:28 am | उपयोजक

हे असं काहीतरी तिरकस लिहिता अन् स्वामिंना प्रेरणा मिळते.

:(

चौकटराजा's picture

9 May 2019 - 9:35 am | चौकटराजा

अभ्या , तुला अमोल कोल्हे डसला काय ?.... )))

तेजस आठवले's picture

2 May 2019 - 7:03 pm | तेजस आठवले

तुमच्या अशुद्धलेखनाला विरोध आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापने आधी झालेला विरोध ह्यांचा परस्परसंबंध उलगडता का जरा.
माझी ह्या धाग्यावरून निवृत्ती.

खिलजि's picture

2 May 2019 - 7:19 pm | खिलजि

खाली उरलीया लंगोटी

काखेत कासोटी

हाती घेऊनिया करवंटी

मुखे बोलतो मराठी

कोण खेचतो त्याला ओढू खाली

वाहुनिया शिव्यांची लाखोली

दोन लावूनी कानाखाली

थेट बनावे मवाली

सोडूनि द्या बाणा सनातनी

जरी नाव लेवूनीया ते स्वामी

ऐसे सुचवितो एक मिपाकर

ओळखावा अंदाज पुरोगामी

कोणतीही ध्येयासाठीची तळमळ येश देते.

मूळ धाग्यापेक्षा सर्व प्रतिसादात मजा आली. धागाकर्त्याने या सर्व प्रतिसादांची योग्य दखल घेऊन आत्मपरिक्षण करावे आणि काळजीपूर्वक, विचारपूर्वक, बालीशपणा टाळून समजूतदारपणाने धागे लिहावेत आणि काहीही प्रकाशित करण्यापूर्वी अनेकदा वाचून सर्व चुका दुरुस्त करून मगच प्रकाशित करावे म्हणजे आपोआपच टिंगल वगैरे बंद होइल.
निंदकाचे घर असावे शेजारी.
या निमित्ताने ओपी नय्यर यांचे " अगर वो मुझसे रूठे है तो मेरीही खता होगी" ही ओळ असलेले हे गाणे ऐका:

https://www.youtube.com/watch?v=AZjPVYxvlrk

.

Rajesh188's picture

2 May 2019 - 9:29 pm | Rajesh188

मस्करी खूप झाली आता मूळ पोस्ट चा
अर्थ लावून त्याची उत्तरे द्या.
मोडक्या तोडक्या भाषेत सुधा काही अर्थ
आहे त्या विषयी सुधा बोलायचे कष्ट
घ्या .
तावडीत सापडल कोण म्हणून जास्त
तुटून पडायची गरज नाही
ह्या राज्याच्या समस्या ज्या निर्माण
झाल्या आहेत आणि त्याला परप्रांतीय जबाबदार आहेत त्या साठी बुध्दीचा वापर करा

भंकस बाबा's picture

2 May 2019 - 10:57 pm | भंकस बाबा

तुमचा दूसरा अवतार स्वामी तर नाहीं ना?
फक्त तुम्ही आणि तुम्हीच स्वामींचे चाहते आहात , म्हणून विचारले.

अभ्या..'s picture

2 May 2019 - 11:15 pm | अभ्या..

असं इचारतायसा जणू की लगीच त्येनी म्हणनारेत "व्हय मीच त्यो"
तुमच्या भाषेत पाकिस्तान आर्मी आणि आयएसआय हैत ते.

भंकस बाबा's picture

2 May 2019 - 11:47 pm | भंकस बाबा

यक डाव सपष्ट झाल्ल तर आपला गोलपोस्ट नक्की होतो, नायतर आपुन फिरताव मैदानाला चक्करा मारित
एक संका
या धाग्यावर नक्की चर्चा करायची का?
नाय तुमासनी अनभव दांडगा महुंन ईचारले!

अभ्या..'s picture

3 May 2019 - 12:13 am | अभ्या..

पण चर्चा बिर्चा काय नाय करायची.
त्येनी म्हणतेत टिंगल टवाळीवर मात कशी करायची,
आधी हु तर द्यावी टिंगल टवाळी शिस्तीत. मग ते मात बित बघता यील.
काय म्हनता?

Rajesh188's picture

2 May 2019 - 11:11 pm | Rajesh188

लेखनात चुका असतील ,आकडेवारीत चुका असतील पण भावणे मध्ये कधीच चुका नसतात.
हा धागा स्वामी नी का काढला इतिहास बघा .
मूळ गंभीर विषय सोडून कोण शुद्ध लेखनावर टोमणे मारत आहे .
कोण आकडेवारी वर कोटी करत आहे .
ठराविक मर्यादे पर्यंत योग्य आहे .
पण स्वामी चा मूळ प्रश्न दुर्लक्षित करणे सर्व
आशय समजून हे काही पटत नाहि

अनन्त अवधुत's picture

3 May 2019 - 11:37 am | अनन्त अवधुत

तर सगळे दावे बुडीत खात्यात जातात.
लेखन स्पष्ट आणि शुद्ध नसले तर भावणा पन पोचत नाही. ति शूद्धलेखनात हरपते.
मग भावणा आनी आकडे, हे सगळेच जर वाचकाने शोधायचे; तर लिहायचे तरी का कष्ट घेता??
स्वतःचा लेख (४ ओलीच तर असतात) पारकाशीत कारण्याआधी एकदा वाचला तरी चुका दस्तूर करता येतात.

तळटीप : आक्षराला हासो नये आणि भावना पोचवून घ्या.

मराठी कथालेखक's picture

3 May 2019 - 1:43 pm | मराठी कथालेखक

मस्त... प्रतिसाद आवडला..

रमेश आठवले's picture

3 May 2019 - 2:30 am | रमेश आठवले

टवाळा आवडे विनोद असे समर्थांनी म्हटले आहे. तरी जेहत्ते प्रत्येक मिपाकरानी स्वतः कोण ते ठरवावे.

सुबोध खरे's picture

3 May 2019 - 10:01 am | सुबोध खरे

मला एक राहून राहून प्रश्न पडत आला आहे कि सर्व जण मावळेच का व्हायची जिद्द धरतात.

आपण शिवाजी महाराज व्हावे हि जिद्द का धरत नाहीत? ( इंग्रजीत म्हण आहे NOT FAILURE BUT LOW AIM IS CRIME)

इथेच आमची गुलामी वृत्ती दिसते आहे?

आम्ही कुणाचे तरी चाकरच होण्याची जिद्द धरतो आहोत.कुणीतरी आम्हाला हुकूम द्यायचा कि मग आम्ही शिर तळहातावर ठेवून लढणार?

झेन's picture

4 May 2019 - 5:42 pm | झेन

मराठी लोकांची प्रतिमा एकनिष्ठ सेवक अशी होण्याला आपणच कारण आहोत. बहुतेक सराठी लोक उच्चपदावर ,परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न बघतात स्वतः मालक बनण्याचे नाही.

जसवंतसिंहांच्काया पुस्तकात राजस्थान मधील लोकगीतांबद्दल वाचलं होतं, गर्भवतीला उद्देशून त्या स्त्रिया गातात की गुणवानाला जन्म देवू नकोस थनवानाला दे कारण धनवानाच्या दारी दहा गुणवान असतात.

आज जगभर जेवढे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, केरळी लोक व्यवसाय करतात तेवढे मराठी नाही दीसत. बाकी शिवाजी महाराज जन्माला यावे, पण शेजारी हे आहेच.

आज जगात किंवा भारतात ज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे त्यांचेच वर्चस्व आहे. मराठी माणसाने महाराष्ट्र व मुंबईत असलेल्या प्रचंड पैशाच्या उलाढालीत लक्ष केंद्रित करायला हवे, आपला व्यवसाईक पातळी ऊच्चावली पाहिजे.

सर्व जण मावळेच का व्हायची जिद्द धरतात.

शिवाजी महाराज ऑलरेडी आहेतच, "लाव रे तो व्हिडियो" वाले. कमी आहे ती मावळ्यांची. बाकी शुद्धलेखन वगैरेवाले बाजारबुणगे ढिगाने सापडतील, असे 'ह्यांचे' म्हणणे.
-- माईसाहेब मावळेगावकर.

चौथा कोनाडा's picture

8 May 2019 - 4:52 pm | चौथा कोनाडा

शिवाजी महाराज ऑलरेडी आहेतच, "लाव रे तो व्हिडियो" वाले.

हा .... हा ...... हा ....

रविकिरण फडके's picture

3 May 2019 - 10:57 pm | रविकिरण फडके

"काही जण केवळ शुद्ध लेखनावरून मुळ विषयाला बाधा आणतात"

पण धागाकर्ता जेव्हा इतकं अशुद्ध लिहितो की मूळ विषयालाच बाधा येते - खड्यांनीच जेवण नकोसं व्हावं तसं - तेव्हा वाचकांनी काय करावं, हेही कृपया प्रस्तुत लेखकाने सांगावं.
दुसरं म्हणजे, मिपा हा मराठी कट्टा आहे, निदान तिथे तरी मराठीची बूज राखावी, ही अपेक्षा गैर आहे का?

असो! शुद्धलेखनाचा आग्रह धरणं हेही आता कुठल्यातरी वर्चस्ववादाचे लक्षण आहे, विनाकारण दोष काढणे वा टिगलटवाळी करणे आहे, त्याचा उद्देश विषयाकडून लक्ष दुसरीकडे वळविणे आहे, असा जर काही लोकांचाही समज असेल, तर ह्यापुढे काही न लिहिणे हेच योग्य.

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती हा विषय आहे तो फिरून फिरून प्रतेक धाग्यात येत राहीलच

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2019 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

एक दिवस तुम्हालाच या टिंगल टवाळीचा कंटाळा येईल व तुम्ही दूर जाल.मग मात कशी करावी प्रश्नच उरणार नाही.

सर्व चर्चेत आमचा मुळ धागा मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती हाच आहे व ती साध्य झाल्या शिवाय मराठी माणसे थांबणार नाहीत. आपण ही प्रगती साठी उपाय सुचवावेत.
धन्यवाद.

महासंग्राम's picture

7 May 2019 - 9:30 am | महासंग्राम

शुद्धलेखन हाच एकमेव तरणोपाय दिसतोय महाराष्ट्राचा उद्धार करावयास. आधी लगीन शुद्धलेखनाचे मग प्रगतीचे (महाराष्ट्राच्या )

टिंगल टवाळी होईल असे, दिवसाला एक, ह्या प्रमाणात धागे काढू नयेत. धागे काढणे सशुल्क असते तर आपण कीबोर्डवर इतक्या प्रचंड प्रमाणात बोटे चालवली असती का, ह्याचा विचार करून त्या जाणिवेनंतर जे धागे निघतील, त्यांची कदाचित टवाळी होणार नाही.

आनन्दा's picture

4 May 2019 - 1:23 pm | आनन्दा

व ताई,

ते बोटे तितकीच चालवतात कीबोर्डवर.

फक्त मध्ये मध्ये माउस क्लिक करून धागे प्रकाशित करतात.

एकूण ऐवज बघितला तर अकुंच्या एखाद्या कथे इतका ऐवजच यांच्या 4 धाग्यांमध्ये पडतो.

आता बोला, कशावर पैसे लावणार?

यशोधरा's picture

4 May 2019 - 4:01 pm | यशोधरा

कशावरही लावण्याइतके आणि लावण्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे :)

ट्रम्प's picture

4 May 2019 - 3:47 pm | ट्रम्प

तुमच्यातील उदय होऊपाहणाऱ्या नवलेखकाचा काही विघ्नसंतोषी मिपाकर अस्त करु पाहत आहेत !!! पण त्यांचा तो कट तुम्ही कदापि यशश्वी होऊ देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे .
फक्त कुठल्याही परिस्थितित प्रतिसादा पेक्षा धागा लहान होऊ देवू नका .
मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या प्रगती चा विचार करणारे विद्वान खूप कमी आहेत , त्यामुळे टिंगल टवाळी कडे दुर्लक्ष करून आपले मोठे मोठे धागे वाचायला भेटतील अशी अपेक्षा आहे .

महासंग्राम's picture

7 May 2019 - 9:35 am | महासंग्राम

ट्रम्प महोदय, सदर धागाकर्ते महाराष्ट्राचा सर्वार्थाने उत्कर्ष करावयाचा विचार मनी धरितात हे थोरच. पण प्रत्यक्ष कृतीचं काय ? तसा प्रश्न हि त्यांना सभ्य भाषेत विचारला पण त्यांना फक्त सोयीचे उत्तर देण्यात रस आहे, सबब टिंगल-टवाळी योग्य ठरते.

ट्रम्प टॉवर वर बसलेला,
स्पायडरमॅन
न्यूयॉर्क बुद्रुक

चौथा कोनाडा's picture

4 May 2019 - 5:08 pm | चौथा कोनाडा

बऱ्याच प्रतिसदकांनी शुद्धलेखनाच्या चुका केल्या आहेत.
धागाकर्त्याचे नांव स्वामी नसून स्वामि आहे याची नोंद घ्यावी.
सूचना संपली _____
प्रतिसाद क्र ५० सुजलाम सुफलाम !

स्वलिखित's picture

6 May 2019 - 9:44 pm | स्वलिखित

टाईमपास चित्रपटातील डायलॉग आठवले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 May 2019 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>मिसळपाव वर टिंगलटवाळी करण्यावर मात कशी करावी

मात नै करायची कोणावर, फाट्यावर मारणं म्हणतात, ते करायचं.
लेखनाचं आणि व्यक्त व्हायचं, लै दळण पण नै आणायचं दळायला.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

7 May 2019 - 5:12 pm | टवाळ कार्टा

#वाटाणा :D

बिरुटे मास्तर आणि टका आले प्रतिक्रिया द्यायला म्हणजे स्वामींचे हात वरपर्यंत पोचलेत म्हणा की

टवाळ कार्टा's picture

8 May 2019 - 1:01 pm | टवाळ कार्टा

बाब्बो, मला प्रा.डॉं.च्या पंक्तीला कुठे बसवताय....ते लै शिनेर (पोचलेले) मिपाकर हैत ;)