महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

स्वामि १'s picture
स्वामि १ in काथ्याकूट
1 May 2019 - 9:23 am
गाभा: 

भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?
तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?
वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

1 May 2019 - 10:10 am | धर्मराजमुटके

भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?

होय

प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का?

होय

तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का?

होय

वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?

होय

अनन्त अवधुत's picture

1 May 2019 - 11:00 am | अनन्त अवधुत

+१ इतकेच म्हणेन

उगा काहितरीच's picture

1 May 2019 - 2:43 pm | उगा काहितरीच

+1

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 May 2019 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

महाराष्ट्रात मानवी मुल्ले

मग इतर ठिकाणी काय अमानवी "मुल्ले" असतात काय?! =)) =)) =))

दुर्गविहारी's picture

1 May 2019 - 1:31 pm | दुर्गविहारी

नेमका हाच शब्द वाचून मि.पा. च्या भाषेत सांगायचे तर डोळे पाणावले. ;-)

बाकी बुंदी पाडल्यासारखे धागे पाडणे सुरु आहे, ते चालु देत.

दोनोळी धागा उडवावा ही विनंती. अन त्यातही "१" असे लिहीले असल्याने स्वामींना विनंती आहे की त्यांनीच हा धागा उडवण्याची विनंती संपादकांना करावी अन या पुढे मोठा धागा काढावा.

आपले या वरील प्रश्नांबाबत काय मत आहे ते लिहावे, विवेचन करावे. ट्विटर प्रमाणे धागे काढू नयेत हि अपेक्षा.

शिर्षकाचा आणि धाग्यात विचारलेल्या प्रश्नांचा काय संबंध आहे?
तुम्ही विचारलेले प्रश्न हे महाराष्ट्रातील चालू घडामोडी ह्या सदरात मोडतात का?

श्वेता२४'s picture

1 May 2019 - 3:04 pm | श्वेता२४

लेखणीचा विनोदी बहर काही संपत नाही बुवा.

10 वर्षे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत 10 वर्षे मराठी विषय शिकून 10 पेपर दिल्यानंतरही तुम्हाला मराठी धड लिहिता येत नसेल तर तुम्ही मराठीचा अभ्यास नीट केला नाही असं सिद्ध होतं . मग इतिहास आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास त्यापेक्षा अधिक चांगला असेल अशी काही शक्यता वाटत नाही , तो असता तर मुळातच वर जे प्रश्न विचारले आहेत ते पडले नसते.

एरवी लेखकाने व्यक्त होणं महत्वाचं ; भाषा शुद्ध अशुद्ध याला फार महत्व नाही असं माझं मत आहे पण मराठी भाषा , मराठी भाषिक आणि महाराष्ट्र वगैरेच्या कळवळ्याच्या पोस्टी लिहिताना भाषा प्रमाण शुद्ध अशी अपेक्षा फार गैर नसावी . पोस्ट साधी दोनदा वाचायची तसदी घेतली असतीत तर 2 - 4 चुका सहज दिसल्या असत्या ... मिपा स्वतःहून सुचवतं - पोस्ट करण्यासाठी पोस्ट पूर्ण तयार आहे का की काही दुरुस्ती करायची आहे ... पण तुम्हाला डोक्यात आलं ते भराभरा खरडून पोस्टायचीच घाई ...

महाराष्ट्र सुधारणं आणि वाचवणं खूप मोठी गोष्ट आहे , स्वतःची भाषा सुधारणं ही जरा जमण्यासारखी गोष्ट आहे , थोड्या प्रयत्नांनी ... राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?

सोन्या बागलाणकर's picture

2 May 2019 - 3:27 am | सोन्या बागलाणकर

एक नंबर!

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या फार करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे.

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती आड कीतीही अडचणी आल्या तरी त्या फार करण्याची जिद्द मराठी रक्तात आहे.

अडचणी फार करणे म्हणजे वाढवणे असा अर्थ होतोय म्हणजेच मराठी रक्त अडचणी वाढवणार आहे असं आपल्याला लिहायचंय का?

एकदा नीट वाचून तरी पाहायचं अन्यथा शिवरायांवरील नाटकात झालेली स्थिती होईल.

सिंहगडावर स्वारी करण्यापूर्वी शिवाजी राजे हताश झाले होते तेंव्हा नरवीर तानाजीनी म्हणायचे होते कि

महाराज तुम्हीच असा धीर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं?

या ऐवजी तानाजी म्हणाले

महाराज तुम्हीच असा धूर सोडू लागलात तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं?

निदान प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नीट वाचून पहा.

श्वेता२४'s picture

1 May 2019 - 4:22 pm | श्वेता२४

राज्य सुधारण्याचे प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांना आपली भाषा सुधारण्याचे प्रयत्न करणं जड वाटू नये . आधी ही एवढीशी गोष्ट होते आहे का बघा तुमच्याच्याने ... मग राज्य सुधारण्याचं पाहू ... टप्प्याटप्प्याने जा , कसं ?

१ नंबर

भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का?
ह्या para मध्ये दोन पॉइंट आहेत
१) लोकशाही.
ह्या मध्ये सर्वांना मतदानाचा हक्क असतो
आणि तो देशाच्या कोणत्या कोण्यातील व्यक्ती देशाच्या कोणत्याही ही भागात राहत असेल तर वापरू शकतो

परिणाम
रोजगार असेल किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने देशातील काही राज्यातील लोकांचे प्रमाण इथे वाढले आहे ह्या मतदानाच्या हक्का मुळे ते महाराष्ट्र मध्ये राजकीय वातावरण गढूळ करतात .आणि हे राज्य सुधा आपल्याच मालकीचे आहे असे वर्तन करतात.

२)कथित कायदा

म्हणजे देशाची राज्य घटना जी राज्याच्या हिताला
जपत नाही उलट कुठे ही राहण्याच्या हक्क देवून राज्य हिताला नख लावते .
नोकरी मिळवण्ासाठी साठी मराठी लोकांना संघर्ष करावा लागतो विशिष्ट मनोवृत्ती वले परप्रांतीय स्थानिक लोकांच्या नोकरीच्या हक्का ल बाधा पोचवतात.
लोकसंख्या वाढली की शहर बकाल होतात .पाणी ,वीज,ह्या साधन संपतीवर तान येतो.
शहरांच्या प्रदूषण मुळे महाराष्ट्र मध्ये नद्या न चे पाणी प्रदूषित होते.
एकंदरीत पाणी प्रदूषण ,हवा प्रधूषण ,सामाजिक प्रधुषण ,भाषेचे प्रदूषण
दीर्घकालीन प्रदूषणाचे प्रकार आहेत ते सर्व
आणि हे सर्व लोकशाही आणि घटना ह्या मुळे महाराष्ट्राचे मध्ये होत आहे

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.
अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत
ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे.
काही ही झाले तरी छत्रपती शिवबा चे मावळे शांत राहणार नाहीत.

प्रसाद_१९८२'s picture

2 May 2019 - 11:29 am | प्रसाद_१९८२

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
---
मुंबईची लोकसंख्या आहे साधरण २ करोड.
व तुम्ही म्हणताय बेरोजगार लोकांची संख्या आहे ४०० लाख (४ करोड) हे कसे काय शक्य आहे ?
--
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.
--
मुंबईची एकुण लोकसंख्या जर दोन करोड असेल तर ८ करोड लहान मुले आली कुठून ?

--
तुम्ही जवळच्या काळात राहुल गांधीचे भाषण ऐकले आहे का ?

टर्मीनेटर's picture

2 May 2019 - 12:02 pm | टर्मीनेटर

बहुतेक स्वामीजींनी राज ठाकरेंची भाषणे जास्त ऐकली असावीत... मुंबई राहुद्यात बाजूला... महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी देखील ताळमेळ नसलेली ही आकडेवारी त्यांनी कुठून मिळवली हा संशोधनाचा विषय आहे.
स्वामीजी आपण महान आहात _/\_

विजुभाऊ's picture

2 May 2019 - 1:22 pm | विजुभाऊ

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.
अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत
ह्या विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे.

ह्या कारणामुळे स्थलांतर कसे कय होईल?

असे प्रश्न धागाकर्त्यांना विचारायचे नसतात... :)
ते नवीन धागा काढतील... उत्तरात नविन प्रश्न का विचारले जातात ह्या संबंधी....

विविध कारणांनी महाराष्ट्रात परप्रातीयांचे स्थलांतर होत आहे हे आपण रोजच बघतच आहात. आपण बेसावध न राहावे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2019 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

आख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटीच्या आसपास आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्यापैकी, एकट्या मुंबईत...

मुंबईत ५५%पेक्षा जनता झोपडपट्टीत राहते. 400 लाख बेरोजगार आहेत
८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत.

...हे इतके सगळे आहे !

म्हणजे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ "मुंबईतील बेरोजगार आणि शाळेत न जाणारी लहान मुले" यांचीच बेरीज १२ कोटी होते.
मग, (अ) ते सोडून मुंबईतले इतर लोक आणि (आ) मुंबईव्यतिरिक्त महाराष्ट्रातले लोक, कुठे गायब झाले आहेत... डार्क मॅटरमध्ये ?! =))

म्हणजे, कमालच आहे, नाही का ?!

८ करोड लहान मुले पूर्ण महाराष्ट्र मध्ये सुधा नाहीत .
काही वाटेल ते लिहू नका

स्वामि १'s picture

2 May 2019 - 12:41 pm | स्वामि १

भारतातील ८ करोड लहान मुले विविध कारणांनी शाळेत जात नाहीत .(महाराष्ट्रात नव्हे भारतात)
400लाख बेरोजगार हा ही भारतातील आकडा आहे महाराष्ट्रातील नव्हे.
Google search मधून आकडे घेतले आहेत

चुकी बद्दल माफी असावी

इरसाल's picture

2 May 2019 - 1:43 pm | इरसाल

चुकीला माफी नाही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 May 2019 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

ते जरा... चुकीsssला माsssफी नाsssही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!... असं अजून मस्तं दिसेल ! ;) =))

टर्मीनेटर's picture

2 May 2019 - 3:02 pm | टर्मीनेटर

.

इरसाल's picture

2 May 2019 - 3:53 pm | इरसाल

भावना कळली बास्स्स्स्स्स्स्स........................

झेन's picture

2 May 2019 - 9:51 pm | झेन

काय चाललयं काय ?

एकदा मराठी माणूस, मराठी रक्त, महाराजांचे मावळे लिहिल्यानंतर तूम्ही लोक टींगलटवाळी थांबवायलाच तयार नाही. कायतर म्हणे मराठी शुध्दलेखन, मुंबईची- महाराष्ट्राची लोकसंख्या. आता मराठी माणूस थांबू शकत नाही. अजून धागे काढतच राहील.

धन्यवाद झेन, तुम्ही, राजेश 118 व इतर मराठी प्रेमी एकत्र आल्यास मराठी व महाराष्ट्रा द्वेषीचा नायनाट करू शकतो
कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे.

प्रसाद_१९८२'s picture

3 May 2019 - 11:58 am | प्रसाद_१९८२

आप आगे बढो, हम आपके साथ है !

देवनागरी वापरलीत तरी मराठीत लिहा, स्वामी१ ना हिंदी सहन होणार नाही! काय समजलेंत!!! ( किंवा कदाचित त्यांना पाठिंबा देताय म्हणून दुर्लक्ष करतील म्हणा. काही सांगता येत नाय! )

महासंग्राम's picture

8 May 2019 - 12:34 pm | महासंग्राम

खिक्क

प्रसाद आपण एकत्र येणे गरजेचे आहे. चुका आपल्या कडून भरपूर झाल्या आहेत, मान्य आहे पण चुकीची सुधारणा होउ शकत नाही का? हार मानुन चालणार नाही. आपल्या मराठी माणसाकडे कर्तबगारी होती म्हणून १०० वर्षे भारतावर मराठ्यांनी राज्य केले पण आज मराठी माणसाची नेमकी कुचंबणा कोठे होत आहे हे शोधायला पाहिजेच.

भंकस बाबा's picture

3 May 2019 - 1:22 pm | भंकस बाबा

तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे मराठी मावळ्याचे बाहू( आय मीन बोटे) स्फुरण पावू लागले आहे. आता भविष्यात मिनिटाला एक धागा या गतीने जिल्ब्या पडल्या तर पहिल्यांदा तुमचा शालश्रीफळ देऊन जाहिर सत्कार करण्यात येईल

हलकेच घ्या

मराठी व महाराष्ट्राची प्रगती चा ध्यास घेतलेले मावळे आपली लेखणी कधीच थांबणार नाहीत. आपण किती ही त्रास दिला तरी मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळे धागे टाकले जाणारच.

उगा काहितरीच's picture

4 May 2019 - 9:33 am | उगा काहितरीच

स्वामिजी साष्टांग दंडवत,

तुमचा ध्यास वगैरे पाहून मी तर पुरता प्रभावित झालेलो आहे.
आता माझे हात पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी शिवशिवत आहेत. मला मार्गदर्शन करण्याची कृपा करा. मी , एक सामान्य मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी माझं घर-दार, नोकरी वगैरे सांभाळून काय काय करू शकतो ?

आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत
उका.

आपण नोकरी सांभाळून मराठी माणसासाठी व महाराष्ट्रा साठी लहान लहान सवई अमलात आणू शकतात.
आपल्या घरासाठी व कुटूंबासाठी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आपण अनेक व्यहवार व खरेदी करत असतो व ह्यात बरीच लहानमोठी पैशाची उलाढालु होत असते हे पैसे किंवा व्यहवार आपल्या मराठी माणसा कडेच किंवा महाराष्ट्रातच होत राहीले तर आपल्याच माणसांची व महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सुधारणा होत राहील.
उदाहरण म्हणजे आपणास सूर्यफूलाचे (Sunflower oil) तेल विकत घ्यायचे असल्यास आपण ते मराठी दुकानदाराकडूनच घ्यायचे पुन्हा ते तेल महाराष्ट्रातील Product आहे का तपासून घ्यायचे.
महाराष्ट्रातील उत्पादन घेतल्या ने महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे सूर्यफूलांची विक्री वाढेल व अर्थातच मराठी व महाराष्ट्राला आर्थिक मदत होईल.
आता आपण म्हणाल मी नोकरी करतो मला काय फायदा? पण उदाहरण म्हणून महाराष्ट्रात राहात असलेले गुजराती, KGN, मुसलमान व केरळ मघिल नागरिक आपापसात संपूर्ण खरेदी व व्यहवार आपापसातच करतात व आज ते मराठी माणसा पेक्षा आर्थिक परिस्थितीत मजबूत आहेत. व त्यांना खरेदी करताना सवलत देतात व
अर्थात फायदा आपणा सर्वांना होतो.

सर्वत्र महाराष्ट्रात मराठी बोलायचे, जर गरज पडली तर इग्रजीत बोला. पण हिंदी ला विरोध करा. हिंदी ने मराठी वर प्रतक्षात व अप्रत्यश्यात आक्रमक केले आहे व त्यामुळे मराठी भाषा नष्ट होत आहे.
आपण ही प्रगती साठी उपाय सुचवावेत. अनेक विषय अजून पुढे सांगितले जातील.

श्री गावसेना प्रमुख's picture

5 May 2019 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख

तुमची कल्पना ही मराठा उद्योजक महासंघाची ढापलेली आहे.
..

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती साठी कोणाही कडून प्रेरणा घेतली तरी चालेल पण मराठी माणूस महाराष्ट्रात दिल्ली व परप्रातीयांच्या गुलामगिरीत राहीला नाही पाहिजे

अभ्या..'s picture

5 May 2019 - 10:13 am | अभ्या..

KGN मधले नागरिक म्हणजे कोण?

स्वामि १'s picture

5 May 2019 - 11:09 am | स्वामि १

कच्छ समाजातील एक जात असून ह्यांचे सर्व व्यवहार त्यांच्या समाजातच होतात व एकमेकांना सहकार्य करतात. जैन समाजाची संपूर्ण भारत भर syndicate व्यहवार होतात व आज भारतातील तो श्रीमंत समाज आहे. ह्या दोन्हीनी समाजाचे आपापले गुप्त planning आहे.

काहीतरी बिनबुडाचे लिहू नका, KGN म्हणजे अजमेरच्या ख्वाजा गरीब नवाज सलीम चिष्टीना मानणारे मुस्लिम त्यांच्या दुकानावर आपण कसे श्री लिहितो तसे लिहितात. त्यात सिंडिकेट वगैरे काही नसते. कच्छी गुर्जर क्षत्रिय व्यवसायात असतात पण त्यांच्या फक्त आपापसात रोटीबेटी साठी केजीके समाज असतो. जरा खऱ्या व्यवसायाची अन निदान आवश्यक ज्ञानाची पूर्ण माहिती करून घ्या, स्वतः एखादा लहानसा का होईना व्यवसाय करून दाखवा अन मग मराठी लोकांनी कसे व्यवसाय करावेत ह्यावरचे दिवे पाजळा.

महासंग्राम's picture

8 May 2019 - 12:35 pm | महासंग्राम

मी KGF वाचलं चुकून

इरसाल's picture

3 May 2019 - 1:03 pm | इरसाल

कोणी ही कितीही गोंधळ घातला तरी आपण मराठी व महाराष्ट्रा च्या प्रगती साठी प्रयत्न करतच राहायचे.

नक्की काय करणार आहात जरा सांगाल का म्हणजे जमलं तर आम्हीपण हातभार लावु.

धन्यवाद इरसाल, आपण सकारात्मक प्रतिसाद दिलात.
मराठी माणसे हुषार, कर्तबगार व जाणकार आहेत, होती व भविष्यात ही ती कर्तबगार राहणारच. पण आजची मराठी माणसाची स्थिती पाहून वाइट वाटते.
आज महाराष्ट्रातच मोठ मोठय़ा पदावर सदनी अधिकारी मराठी नाहीत. मग हे असे का? महाराष्ट्रात मराठी अधिकारी मिळत नसतील तर ते निर्माण झाले पाहिजेत ही तळमळ व तरतूद सरकार व घटणेत पाहिजे.
मराठी माणूस माघे पडत असेल किंवा चुकत असेल किंवा आळशी होत असेल तर त्याला समज व शिक्षणाची तरतूद महाराष्ट्राच्या घटणेत नाही आहे.
दिल्लीतील राज्यकर्ते व परप्रातीय महाराष्ट्रातून भरपूर पैसा कमावतात पर मराठी माणूस पोरका आहे. मुंबईत व महाराष्ट्रात भरपूर पैसा आहे पण मराठी माणसा कडे नाही आहे.

आपण काय करायचे विचारलेत, आपले स्वगत.

प्रथम आपण एकमेकांशी कधीच भांडयचे नाही, मतभेद चर्चेने सोडले जातात

लोकजागृती करणे हा ही प्रथम कारेक्रम होउ शकतो
मराठी संस्कृती जपली पाहिजे

अजून ही बरेच आहे.
आपण प्रतिसाद दिला बरे वाटले
एक एक ऊपाय व मात्रा हळूहळू पुठे येत जातील व आपणही मार्ग सुचवू शकता
धन्यवाद

१)सर्व मराठी माणसांनी एकत्र या.
२)आपापसात वैर ठेवू नका व भांडू नका. काही वेळेस आपल्या मघे मुद्दामहून भांडणे लावली जातात
३)सर्वत्र मराठीतूनच बोला, गरज पडल्यास इंग्रजीतून संवाद करा. इंग्रजी ही अंतरराष्टीय भाषा आहे व ती शिकलीच पाहिजे. हिंदी ला विरोध करा हिंदी भाषा हळूहळू मराठी भाषेवर आक्रमक करीत आहे.
४)महाराष्ट्रातील उत्पादने खरेदी करा त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व महाराष्ट्राची अर्थ वेवस्था सुधारेल.
५)आपली खरेदी व आर्थिक व्यवहार मराठी दुकानदार /ठेकेदार कडून करा

अजून अनेक मार्ग सांगला येतील. आपणही मराठी च्या प्रगती चे मार्ग सुचवू शकता.
परप्रातीयांच्या आक्रमणा पासुन सावध राहा

भंकस बाबा's picture

5 May 2019 - 5:20 pm | भंकस बाबा

एक छोटीशी शंका
मांजराच्या (आय मीन राजसाहेब, बारामतीचे काका-पुतणे, झालेच तर आपले वंचित आंबेडकर) गळ्यात घण्टा कोण बांधणार?
हे सर्व तयार झाले तर मराठीचे झेंडे अटकेपार लावले जातील याची खात्री बाळगा.
स्वामी तुम्ही या लोकांना भेटण्याचे कष्ट घ्याच. तुमच्यातली तळमळ का मळमळ या लोकांना दाखवून द्याच.
करणार ना तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी ?

श्वेता२४'s picture

3 May 2019 - 1:07 pm | श्वेता२४

ते एकाच विषयावर निरनिराळे धागे काढत राहतील तुम्ही (शक्य झाल्यास टिंगलटवाळी न करता) प्रतिसाद देत राहा. ;D:D:D

कोणीही कितीही अडचणी आणल्या, शुद्ध लेखनाच्या चुका काढल्या, कितीही टिंगलटवाळी केली तरी मराठी माणसाचा प्रगती चा ध्यास घेतलेले मराठी केव्हाच थांबणार नाहीत.

चांदणे संदीप's picture

4 May 2019 - 10:40 am | चांदणे संदीप

आमच्या भागात, म्हणजे जिथे मी सध्या राहतो तिथे, साधारण दुर्लक्ष करण्यासाठीचे इक्सप्रेशन असे आहे, "याssडंय ते!"

=))

Sandy

अभ्या..'s picture

4 May 2019 - 1:15 pm | अभ्या..

आमच्याकडे त्यालाच एक छिद्र जोडायची पध्दत आहे. ;)

जालिम लोशन's picture

7 May 2019 - 3:53 pm | जालिम लोशन

म्हण आठवत नाहिका? स्वामी तिन्ही जगाचा. .. . .. . .

सोन्या बागलाणकर's picture

8 May 2019 - 3:48 am | सोन्या बागलाणकर

अरारारा!
हसून हसून पडलो अभ्यारौ!

नाखु's picture

5 May 2019 - 8:10 am | नाखु

अगदी दिवसाच चांदण्या दाखविल्यास रे,बाकी असे धागे वाचल्याने खोटं खोटं हसायला हास्यक्लबात जायची गरज पडत नाही,असे आमच्या ह्यांचे मत...

मिपा सार्वकालीन माई

नावातकायआहे's picture

4 May 2019 - 7:50 pm | नावातकायआहे

का कोण जाणे. "नाडी" ची आठवण आली. :-)

नाखु's picture

5 May 2019 - 2:07 pm | नाखु

मागे आहेत हेच सत्य तुम्ही दाखविलेत.

परवाच बसमध्ये कंडक्टर ओरडला मागे कोण राहलयं,तर सात आठ जण म्हणाले आम्ही राहलोयत तिकिट काढायचे.

मी अंदाज काढला की त्या आठांपैकी पाच जण मराठी होते.
अशा मागे राहणार्या लोकांमुळे महाराष्ट्राची प्रगती होत नाही.मी गर्दी असल्याने त्यांचे संपर्क क्रमांक घेउ शकलो नाही,अन्यथा तुमच्या पर्यंत पोहोचवले असतेच.

मागच्याच गल्लीत राहणारा खालमान नाखु

फुटूवाला's picture

5 May 2019 - 2:14 pm | फुटूवाला

जागतीक हास्य दिन ईथेच साजरा होणार बहुतेक... :))

धन्य आहात तुम्ही आणि ती तुमची पी एम टी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2019 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

बरेच दिवस चाललेल्या राजकिय रणधुमाळीच्या धाग्यांच्या भडीमारामुळे, मिपाकर हसायचे पार विसरून गेले होते. त्या पार्श्वभूमीवर, असले धागे व त्यावरचे प्रतिसाद, मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात गार हवेच्या झुळूका आहेत ! याबद्दल संबंधिताचे आभार मानावे तितके कमीच ! ;) :)

Rajesh188's picture

5 May 2019 - 10:25 pm | Rajesh188

खऱ्या आयुष्यात एकदा वेडा लोकांवर दगड मारत असेल तर लोक shahnya सारखी
काही प्रतिसाद न देता बाजूने जातात .
पण mipa वर उलट दिसतेय ज्यांना वेडा ठरवले जाते आहे तो दगड मारत नाहीत तर कथित हुशार ठरवलेल्या वेड्या वर दगड मारत आहेत
गंगा उलटी वाहते आहे

भंकस बाबा's picture

5 May 2019 - 10:29 pm | भंकस बाबा

आयडिला पंख लागायची वेळ नजिक आली आहे वाटते!

वामन देशमुख's picture

6 May 2019 - 4:22 pm | वामन देशमुख
वामन देशमुख's picture

6 May 2019 - 4:24 pm | वामन देशमुख

सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणी सगळे चांगले कारागीरच आहेत.
*उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात.

सिंगल हजेरी ....
म्हणजे सकाळी नऊ ते पाच पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा *ड़बल हजेरी* .... म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार.

या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात.
*विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो.
ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात..... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते.
तेव्हा प्रश्न पडतो... *मराठी सूतार गेले कुठे सगळे?*

समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात.
उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात *राबत* असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते.
तेव्हा मला प्रश्न पडतो...
*मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?*

कारण *मेहनतीची तयारी* नाही आणी हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले.

वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियनवाला म्हणाला की मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय *कौशल्य* ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे.

मला प्रश्न पडला
*मराठी तरूण गेले कुठे..?*

माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते.

इकडे मला प्रश्न पडतो.. *मराठी तरूण काय करतो...?*

परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही..दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही..पानवाला हजाम बाहेरचा.(हे भाईंदर /वसई /विरार/ पालघर सारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती)

माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे......चोरापोरापायी जातात.
पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही...
मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं *भाडेपट्ट्यावर* घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात.

अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते. आहे आणि पुढेही लागणार आहे.
*तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे...??*

तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की... *मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात*
*सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात.* *राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.*
*नाचायचे, मारामारी , फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि "मी कुठला धंदा करु याचा विचार" यातच दिवस काढ़तो*

ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ?.

पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, *पंधरा सोळा तास* राब राब राबतात ...

माझ्या मराठी बंधूनो
खर सांगा ... विचार करून सांगा *आपल्याला ....आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??*
मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे।पण कुठे
*गल्ली बोळात* टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात.
गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात.
वाढदिवसाला *फ्लेक्स लावून भावी* आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात.
मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात.
सणावाराला *दादागिरी करून* वर्गणी जमा करायला आपलेच असतात.

शाळा, कॉलेज, मध्ये तोढफोड करायला आपलेच असतात।
कोण म्हणतं मराठी माणसाचा अस्तित्व नाही????????

*बघा अजूनही वेळ गेली नाही*
विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा.
फक्त बार रेस्टऔरंट मध्ये *संध्याकाळी बसून* गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या *नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाही*
सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित.
उघडा डोळे वाचा नीट !

दादरला काही टॉप स्वस्तात मिळाले म्हणून 5 टॉप खरेदी केले. जवळच एक नवीन टेलरचे दुकान निघालेले म्हणून गेले त्याच्याकडे. आमच्याकडचे इतर प्रस्थापित (सगळे मराठी आहेत)टेलरलोक शक्यतो टिपा मारणे, बाह्या लावून देणे अशी 'फडतूस' कामे करत नाहीत. पण हा नवखा होता म्हणलं बघू विचारुन. तर म्हणाला एका टॉपला टिपा मारणे व बाह्या लावणे याचे 80 रु. होतील. तेही 4 दिवस लागतील. मी त्याला म्हणलं 200 रु. च्या एका टॉपला 40 ऐवजी 80 रु. ? काहीच कमी करायला तयार नाही. शेवटी नाईलाजाने एक टेलर जी लांब राहते तिथे गेले. नेमके ते दुकान बंद पडले होते. पण जवळच दुसरे दुकान कोणीतरी तुरु केले होतेे. बाई हिंदी होती. मराठी समजत नव्हते. तिला काय करायचे ते समजावून सांगितले. एका टॉपचे 30 रु. घेतले आणि सगळं काम संध्याकाळीच करुन दिलं. आमच्या इथे मराठी सुतार, इलेक्ट्रीशिअन, प्लंबर. अशा कामांना कोणी ओळखीचे मराठी लोक येत नाहीत. एखादेवेळेस आला तर नंतर कारणे सांगतात. पण आता याच कामांसाठी हिंदिवाले ओळखिचे झालेत. ते फोन केला की त्याच दिवशी येतातही आणि कमी किमतीत कामे करुन देतातही. मराठी लोकांनी आपल्याला निर्माण झालेले हे आव्हान ओळखून धंदा करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. मोडेन पण वाकणार नाही चे दिवस गेले आता. मुळात मराठी माणसाला रोजगार मिळवणे आणि तो टिकवणे (धंद्याच्या बाबतीत) हे फारसं कळलेलं नाही. ज्याला कळलं ती मराठी माणसे व्यावसायात यशस्वी झाली व टिकून राहीली. नुसतंच मराठी माणूस वाकणार नाही, अन्याय सहन करणार नाही असल्या भंपक घोषणा देण्यापेक्षा ही मानसिकता मराठी माणसाच्या अवनतीला कारणीभूत आहे हे मान्य करावे व या मानसिकतेतच बदल करायची गरज आहे हेही मान्य करावे. आणि जर तसे होणार नसेल तर हिंदि भाषिकांच्या महाराष्ट्रात सामावून जाण्याला ही असली मराठी माणसेच जबाबदार असतील.

तूमचं बरोबर आहे पण हे सगळं ज्यांना खरंच कळकळ आहे त्यांच्यासाठी. आवेश आणि आस्मिता फुलवून खेळ करणारे दरवेशच आवडतात त्यांना काय सांगणार.

मराठी माणूस, महाराजांचा मावळा, रमाबाईंची लेकरं, जगाचा पोशिंदा, जातधर्म ह्या गोष्टी, कुठे आर्ची मिळते का बघणे हे सोडून कुठे त्या परप्रांतीयांसारखी लोकांसारखी मेहनत करायला सांगता मराठी माणसांना.

कधी अनवाणी ऊन्हातून ज्योत घेवून पळणाऱ्या, टिनपाट भाई-दादांसाठी मारामारी करणाऱ्या, केसेस अंगावर घेणाऱ्या बेकार मुलांना सांगायचा प्रयत्न सुध्दा करू शकत नाही. मी पदवीधर आहे मला सरकारने नोकरी दीलीच पाहीजे असली दीवास्वप्न घेवुन जगणारे मराठी तरुण बघितले कि आपणच गल्ली चुकलो असे वाटते.

Rajesh188's picture

6 May 2019 - 6:35 pm | Rajesh188

हिंदी भाषिक लोकांची संख्या वाढण्यासाठी
तुम्ही जी कारण दिली आहेत .
मराठी तरी काम करत नाही आळशी,दारुडा,आहे.

अभ्यास काय आहे तुमचा महाराष्ट्र विषयी.आज अमेरिकेत सुधा मराठी तरुण विजयाची पताका उंच फडकवत
आहेत.
क्रिकेट,संगीत,राजकारण,संरक्षण क्षेत्र,सर्वच ठिकाणी मराठी लोकांनी ठसा उमटवला आहे
उत्तम डॉक्टर्स,इंजिनिअर,मराठी तरुण आहे
आणि त्या मराठी तरुणांना तुम्ही दारुडे म्हणताय
आपल्या अल्प अभ्यासावर .
पहिले शीख लोकं मुंबई मध्ये टॅक्सी चालवायचे त्यांची जागा up ,Bihari I घेतली ती काय शीख लोक कष्टाळू नव्हते, महणून
जरा अभ्यास करा

यशोधरा's picture

6 May 2019 - 9:04 pm | यशोधरा

अमेरिकेतून त्या मराठी तरुणांना हाकलले नाही अजून अमेरिकन लोकांनी आणि सरकारने? महाराष्ट्रातून परप्रांतीयांना हाकलून द्यायचंय, त्याप्रमाणे?

Rajesh188's picture

6 May 2019 - 8:07 pm | Rajesh188

MEDICAL DIALOGUES

HomepageProfession
Md Team
10.41 lakh Registered Doctors in India, Maximum in Maharashtra: Health Minister

It is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service giving an approx doctor-population ratio of 1:1596 much below the WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000

New Delhi: Recently, through a written reply to a question in Rajya Sabha, Minister of State ( Independent Charge) Smt Anupriya Patel informed about the Registration of Allopathic Doctors with various medical councils across the country.

The minister informed that as per information provided by Medical Council of India, there are a total 10,41,395 allopathic doctors registered with the State Medical Councils/Medical Council of India as on 30th September, 2017.

Assuming 80% availability, it is estimated that around 8.33 lakh doctors may be actually available for active service. It gives a doctor-population ratio of 1:1596 as per current population estimate of 1.33 billion. However, WHO norms prescribes that there should be 1 doctor amongst the population of 1,000.

As per records, Maximum number of registered medical practitioners have their registrations in Maharashtra with 153513 registered doctors. This is followed by Tamil Nadu and Karnataka who also account for more than 1 lakh registered doctors each.

माझे गावचे पोलिस फोजदार आहेत मुंबई मध्ये
पण जेव्हा ते गावी सुट्टीवर येतात तेव्हा मी त्यांना अगदी घरच्या गुरांचे शेन काढण्या पासून सर्व काम करताना bagto

माझे मित्र आहेत बालपणीचे सैन्यात ते जेव्हा सुट्टीवर असतात तेव्हा सुट्टी संपेपर्यंत शेतातील आणि घरातील कामे करताना बघतो
माझे मित्र,नातेवाईक,जी काही मी मराठी माणसं बागितली त्यात कोणीच दारुडे,kamchor,
उगाचच नेत्या chya पाठीमागे पळणारे नाहीत.
उलट,प्रामाणिक,मेहनती,आणि सज्जन आहेत.
मग ठराविक लोकांनाच Maharashtra मधील तरुण कामाचा नाही असा साक्षात्कार होतो हे काही समजत नाही.
मुंबई मध्ये मराठी माणूस कमी नाही झाला बाकी लोकांची संख्या वाढली आहे .
ते कष्टाळू मेहनती आहेत म्हणून संख्या वाढली नाही
तर त्यांच्या राज्यात रोज १०० रुपये सुधा कमवण्याचे साधन नाही म्हणून त्यांची संख्या इथे वाढली आहे
हे सत्य नाकारून मराठी तरुण कसे कामाचे नाहीत हे सांगण्या पाठीमागे कोणती. मनोवृत्ती आहे .

भंकस बाबा's picture

7 May 2019 - 12:09 am | भंकस बाबा

आपल्या मुंबईत किती मराठी लोक गाड्या लावून मसाला डोसा , पानीपुरी, दाबेली असे पदार्थ विकतात? बिर्यानी हा पदार्थ फक्त मुसलमान लोकांनी बनवायचा आहे असा गैरसमज मराठी माणूस का बाळगतो? मी काही वर्षासाठी कर्जतजवळील एका गावात राहिलो होतो. तिथे घराघरातून म्हशी पाळल्या जात होत्या. पण हे लोक त्यांचे दूध उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी जाऊन मोठ्या तबेलेवाल्याला देत. आता तुम्ही अनुभव घेतला आहे ना? मग मुंबईत किती मराठी लोक तबेल्याच्या दुधाचा धंदा करतात? चहाची टपरी, पानवाला मराठी बघितला आहे का हो?
एक वेळ अशी होती कि कोळीनी घरोघर जाऊन मासे विकत, तिथे आता भय्ये व मुसलमान का झाले? या मुसलमानानी तर मराठी लोकांना पळवून नाही लावले?
रोजगार म्हणजे सरकारी नोकरी या मांनसिकतेतून बाहेर पड़ा. मी मुंबईत ज्या ऑफिसमधे काम करतो तिथे एक शेट्टी मसाला डोस्याचा धंदा लावतो. त्याच्या हाताखाली मराठी पोरे काम करतात. त्यातल्या एकाही पोराने हिमंत करून दुसरीकडे गाडी टाकन्याचे साहस केले नाही. कारण ती मानसिकता नाही हो आपल्या मराठी मुलांकडे!

सुबोध खरे's picture

7 May 2019 - 9:41 am | सुबोध खरे

http://www.misalpav.com/node/40590
मागे मी चेलिया मुसलमानांबद्दल एक लेख लिहिला होता त्यात त्या समाजाचे लोक आपल्याच समाजातील गरीब मुलांना कसा हात देऊन आपली प्रगती करत आहेत हे लिहिले आहे. मराठी माणसांबद्दल असे कुठे होताना दिसत नाही. आपली माणसे निर्भीड आणि निष्पक्ष पणा कसा चांगला आणि आम्ही सर्वांचा उद्धार करणार अशा काहीतरी मनोवृत्ती मध्ये वावरत असतात.
याउलट बृहन्महाराष्ट्रात( महाराष्ट्राच्या बाहेरील) मराठी माणसे आपल्या लोकांना धरून चांगली प्रगती करताना दिसतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

भंकस बाबा's picture

7 May 2019 - 10:08 am | भंकस बाबा

माझे एक मित्र श्री गोपाल पुजारी मुंबईत आले तेव्हा एका होटेलात फडके मारायचे काम करीत. हळूहळू पाणी देणे, वेटर अशी प्रगति करत त्या धंद्यातल्या खाचाखोचा शिकुन घेतल्या. चर्चगेटमधे सिंडिकेट बैंकेचे कैंटीन चालवायला घेतले. चारकोप कांदीवलीला तुलसीविहार हे रेस्टोरेंट उभे केले. त्यात गावावरुन अनेक लोकांना आणून कामधन्द्याला लावले. आजही आपल्या स्वतःच्या होटेलात ना बसता कैंटीन चालवतात व त्यांच्या गावाकडील जे शिकाऊ उमेदवार आज होटेलात गल्ल्यावर बसून होटल चालवतात. मराठी माणूस असा विचार करताना फार कमी दिसतो.

आपण चेलीया मुसलमान च्या आसपासातील सहकार्या बद्दल सांगितले. असेच सहकार्य किंवा Syndicate जैन, केरळ, गुजराती पटेल व (बराचशा महाराष्ट्र बाहेरून आलेल्या) मुस्लिम समाजात उघड पणे व गुप्त पणे धंद्यात व्यहवारी सहकार्य असते पण असे मराठी मध्ये नाही आहे. असे गुप्त सहकार्य मराठी मध्ये का नाही?

सर्वांच्या चर्चेत निच्छित होते की हल्ली मराठी माणूस आळशी होत चालला आहे व तो सकारात्मक कामाशिवाय इतर निरर्थक कामा कडे लक्ष घालतो व ते सत्यच आहे. Rajesh 118 नीं सांगितले की मराठी माणूस कर्तबगार व हुशार आहे व तशी उदाहरणे ही दिली व तेही तितकेच सत्य आहे. मराठी माणूस माघे पडायला तो स्वःताच कारणीभूत आहे. मग ही होत असलेली चुक सुधारणारा कोणी तरी पाहिजेच ना? ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?

महासंग्राम's picture

7 May 2019 - 10:00 am | महासंग्राम


ही चुक संपूर्ण मराठी समाजाकडून होत आहे मग ह्या तुन मार्ग काय काढायचा?

आता तुम्हीच सांगा सकारात्मक उपाय ?

खरंच आहे सर्वात पहिल्यांदा "त्या" मराठी माणसाने हे रिकामटेकडे पणाचे उद्योग असणारे धागे काढणे बंद केले पाहिजे.
कोणत्यातरी संकेतस्थळावर वायफळाचे मळे पिकवण्यापेक्षा त्याच माणसाने स्वतःचा एखादा उद्योग उभा करून तो पुढे आणला पाहिजे.

तुम्हाला कुठे "तो" मराठी माणूस दिसला तर त्याला पकडून पकडून हे ऐकवा.

महाराष्ट्र बरोबरच अमेरिका, ब्रिटन,गल्फ मधले देश,austriliya,न्यूझीलंड,अशा जगातील सर्वच
देशातील नागरिकांना सुधा आपण संदेश पाठवला पाहिजे की कामे करा ,मेहनत करा
तुम्ही आळशी असल्या मुळे बाकीच्या देशातील
म्हणजे बांगलादेश,भारत,पाकिस्तान,नेपाल,आफ्रिकन देश ह्या सर्व देशातील कामसू लोकांना तुमच्या कडे येवून तुमची अर्थ व्यवस्था चालवावी लागत आहे .
समाज कार्य आणि विश्वबंधुत्व म्हणून ते हे काम करत आहेत.त्यांनी तरी तुम्हाला किती दिवस सेवा म्हणून हे काम करायचे .
आणि महारष्ट्र नी सुधा परप्रांतीय लोकांच्या भोळे पणाचा फायदा घेवून
सर्व राज्याचा बोजा त्यांच्या वर न टाकता स्वतः काम केले पाहिजे .
भारतात महाराष्ट्र आणि जगात वरील सर्व
देशाची सेवा सेवा करता करता त्यांना स्वतःच्या राज्याकडे सुधा लक्ष द्यायला वेळ न मिळाल्यामुळे
त्यांचे स्वतःचेच प्रदेश अनेक अडचणींना तोंड देत आहेत .तरी कृपया अजून जास्त सेवेची त्यांच्या कडून अपेक्षा ठेवू नका

उगा काहितरीच's picture

7 May 2019 - 11:05 am | उगा काहितरीच

तुम्हाला खरंच असं वाटते का की त्या त्या भागातल्या लोकांनी त्यांच्याच भागात राहुन प्रगती करावी ? असं नसतं हो. आदीमानवापासुन आज पर्यंत स्थलांतर होतच आलंय हो. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतातच तसेच याचे पण असणारच. मराठी व्यक्ती बेंगलोर, दिल्ली, अमेरीकेत गेली तर भारी आणी हिंदी व्यक्ती मुंबईत आली तर समस्या !
जाऊ द्या तुमच्या बेसीक मध्येच काहितरी गफलत वाटतेय.

तुम्चा सर्व्या जगाला आसलेला निरोप वाचुन लई म्हंजी लई म्हंजी लईच मराटी आसल्याचा आबिमान वाट्ला. आख्ख्या जगाचे तारणहार आसलेले स्वामि Rajesh188 ह्येंचा जयजयकार हाये!

आता आपन सगळ्ये सगळ काय ते टाकून देऊन आदीमानवा सारके आपापल्या जमिनिवर शिकार आणि वनस्पती गोळा कराय्ला लागू (त्येच त्ये, हंटर-गॅदरर का काय म्हंतात त्येच). आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?

उगा काहितरीच's picture

7 May 2019 - 11:37 am | उगा काहितरीच

ळॉळ ! असं काही नका लिहीत जाऊ साहेब ! ऑफिसमधे आहे. हसु अजिबात कंट्रोल नाही होतंय. :D :D :D

Rajesh188's picture

7 May 2019 - 1:52 pm | Rajesh188

विनाकारण हसत जावू नका.
Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल .आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं

उगा काहितरीच's picture

7 May 2019 - 2:58 pm | उगा काहितरीच

विनाकारण नाही हो साहेब,

आपल्या हद्दीत दुसरा कोनी घुस्ला रे घुस्ला की त्येला चांगला पोकल बांबूने फोकलवून काढू. म्हंजे कसं जगभर चांगभलं व्हईल. काय म्हंता?

हे वाचलं आणि हसु आलं बघा.

Konhi ऑफिस मध्ये बागितल तर गैरसमज होईल

धन्यवाद! आपल्या बहुमोल सल्ल्याबद्दल. यापुढे निश्चित काळजी घेतल्या जाईल.

आणि बचाव साठी माझी पोस्ट वाचून दाखवलं तर हस होईल तुमचं

नाही हो असं काही नाही. अर्ध्याअधीक लोकांना कळणारच नाही. कारण आजबाजुचे लोक पश्चीम बंगाल, केरळ, कर्नाटक, आसाम आणि पॅरीसचे आहेत. त्यांना मराठी नाही वाचता येत. ज्यांना वाचता येते त्यांना तुमच्या पोस्ट दाखवुन मी स्वतःचे हसे करुन नाही करुन घेणार. काळजी नसावी.

Rajesh188's picture

7 May 2019 - 1:47 pm | Rajesh188

मी जी पोस्ट केली आहे त्याला संदर्भ आहे .
इथे सर्वच जन असे सांगत आहेत की महाराष्ट्रात वाढलेले परप्रांतीय लोकांचे प्रमाण ह्याच एकच कारण आहे मराठी कामचुकार,व्यसनी लोक.

हे कारण खरे असेल तर अमेरिका,ब्रिटन,आणि जेवढे प्रगत देश आहे त्या देशातील जनता कमचोर आणि व्यसनी आहे असे समजायचं का .
खरे कारण अप्रगत देश आपल्या जनतेच्या गरजा भागवू
शकत नाहीत म्हणून एक पर्याय म्हणून आपण तिथे नोकरी करायला जातो हे आहे .
आणि हाच नियम महाराष्ट्र ल सुधा लागू आहे

अभ्या..'s picture

7 May 2019 - 3:21 pm | अभ्या..

ए बास कर ए आता, ना आगा ना पिछा, बिनबुडाचे काहीही लिहायचे, ना मुद्दा ना एक ठाम भूमिका, कैतरी लिहिता बसायचे अन चार लोक चांगले सांगतात त्याकडे दुर्लक्ष करून परत एकेक प्रतिसाद रेटत राहायचे.
किती ती फालटूगिरी.
दुसऱ्या संस्थळावर अकलेचे वाभाडे काढूनही शहाणपण न येता इथे अक्कल पाजळायची असेल तर बाकी साऱ्या सुज्ञ मिपाकरांना माझी हात जोडून विनंती आहे. हे चर्चा किंवा संवाद करायच्या लायकीचे रसायन नाहीये. ह्याच्या नादी लागू नका. विषयाचा किंवा चर्चेचा बट्ट्याबोळ आपल्या हवेत बाण टाइप प्रतिसादाने करत राहायचा हाच एकमेव अजेंडा ह्या आयडींचा आहे.
धन्यवाद

महासंग्राम's picture

7 May 2019 - 4:21 pm | महासंग्राम

शांत गदाधारी भीम शांत

Rajesh188's picture

7 May 2019 - 6:12 pm | Rajesh188

बुद्धिमान माणसांनी असे अशिक्षित लोकांसारखे रागावू नये.
असतात माझ्या सारखी लोक बिचाऱ्या ना काहीच (न्यान) नसते .
आपण जाणते समजावून सांगावे .
राग आणि blood pressure ह्याचा जवळचा संबंध आहे असे एका तुमच्या सारख्या शाण्या लोकांचे तोंडून ऐकले होते .
तेव्हा control Kara mi नाही लिहीत
आता .
पण तुम्हाला जे आवडते तेच वाचत जा न
आवडणारे दिसले की डोळे बंद करून घ्यायला विसरू नका.
डोळे बंद केले की न आवडणारी मते नष्ट होतात
अशी एक अंधश्रद्धा आहे

राजेश१८८ बोलतात ते बरोबर आहे, मराठी माणसे कतृवात व हुशार आहेत म्हणूनच भारतात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रगतीशील आहे. पण परप्रातीयाचे प्रचंड लोंढे आल्याने व प्रतेक राज्यातील आपापसात भाषेचे गुप्त वाटाघाटी व syndicate मुळे मराठी माणूस बाहेर फेकला गेला किंबहुना मराठी माणसाला दुर ठेववे गेले. काही वेळेस मराठी माणसाला एखादे विशिष्ट पक्ष देउन शांत बसउन ठेवले. त्यात मराठी माणसाने खूप मोठी चुक केली म्हणजे महाराष्ट्र व मुंबईच्या अर्थ व्यहवारात कघिच लक्ष घातले नाही. किंबहुना त्यांना हेतुपूर्वक बाहेर ठेवले. हे आज आपण बदलले पाहिजे. मुंबई व महाराष्ट्रा ची अर्थ (पैसा) व्यवस्था मराठी माणसाच्या हातात आणली पाहिजे.

भंकस बाबा's picture

7 May 2019 - 10:29 am | भंकस बाबा

कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा.
हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय?
धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे.
पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात.
काहीतरी मुद्देसुद मांडा हो!

भंकस बाबा's picture

7 May 2019 - 10:30 am | भंकस बाबा

कमीत कमी धाग्याच्या आशयाला तरी चिटकून रहा.
हे बाकीच्या देशातील लोक तिकड़ूंन हाकलून दिल्यावर भारतात आल्यावर तुम्ही त्यांना आपल्या घरी भांडी घासायला ठेवणार आहात क़ाय?
धागा चिंतनपर विषयावरून विनोदाकडे वळतो आहे.
पण तुम्हाला क़ाय? दर दोन वाक्याआड प्रगति झाली पाहिजे एवढे टंकले की तुम्ही मराठी माणसावर फार मोठे उपकार केले आहेत असा आव आणत आहात.
काहीतरी मुद्देसुद मांडा हो!

Rajesh188's picture

7 May 2019 - 12:37 pm | Rajesh188

स्थलांतर होण्याची मुख्य ढोबळ कारणांचा आपण विचार केला तर
1) उत्तम शिक्षणासाठी जे आपल्या प्रदेशात उपलब्ध नसते किंवा आपल्याच प्रदेशात संधी मिळत नाही
२)लग्न झाल्या मुळे स्त्रियांचे स्थलांतर( सुधारित राज्यात राहणारा नवरा हा हट्ट हे उप कारण)
३) शिक्षित लोकांना त्यांच्या शिक्षणाला पूरक नोकऱ्या chya सुविधा नसल्या मुळे दुसऱ्या प्रदेशात स्थलांतर करावे लागते.
४) कामगार आणि कष्ट करणारा वर्ग हा त्यांचा कष्टाला जास्त भाव जिथे मिळतो त्या प्रदेशात स्थलांतर करतात
ही काही ठराविक करणे झाली.

ज्या प्रदेशात ही लोक जातात त्या प्रदेशाला आपण प्रगत प्रदेश म्हणुया जिथे सर्व प्रकारच्या लोकांची प्राथमिक गरजा भागण्या ची क्षमता असते.
आणि प्रगत प्रदेशाला आपली मनुष्य शक्तीची गरज भागवण्यासाठी खूप अप्रगत प्रदेशांचा लोकांचा समज असतो
पण अप्रगत प्रदेशातील लोकांना प्रगत प्रदेशमध्ये जाणे हा एकमेव पर्याय असतो.

त्या मुळे आपण ज्या भागात जातो आणि आपली स्वप्न पूर्ण करतो तो प्रदेश आपल्या मुळे प्रगत झालंय ही भावना अत्यंत चुकीची आहे
हे माझे स्पष्ट मत आहे.
पण काही विचारवंत ,media migration चे समर्थन करताना अशा स्थलांतरित लोकांच्या मनात अशी. भावना निर्माण करतात की. तुम्ही इथे आलात म्हणून हा प्रदेश प्रगत झाला .ही फक्त भावना चेत्वण्याची एक dhurth खेळी असते.
त्यामुळं अप्रगत प्रदेशातील लोक आपल्या प्रदेशात काहीच सुविधा नाहीत ही गोष्ट विसरून जातात .त्या मिळाव्या म्हणून आंदोलन करणे, तशी मागणी लावून धरणे हे सर्व करण्या साठी परावृत्त होत नाहीत .तशी भावनाच त्यांच्या मनात निर्माण होवू नये म्हणून स्थलांतर ह्या शब्दाला सोन्याचा मुलामा चढवला जातो .
ह्यातून दोन प्रकारचं नुकसान होते
एकतर अविकसित प्रदेश अविकसित च राहतो.आणि पोट पाण्यासाठी स्थलांतर हे निरंतर चालू राहते.
दुसरे नुकसान हे होते काही ठराविक प्रदेश हा आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतो आणि अर्धिक नाड्या ह्या अश्या प्रगत प्रदेशकडेच राहतात आणि बाकी प्रदेशावर अन्याय ,अत्याचार
होण्याची शक्यता वाढते.
अमेरिका ही अशी अर्थ क्षेत्र एकवटलेला देश आहे ती कोणत्याही अप्रगत देशा वर आर्थिक बंदी खालून हुकूमत गाजवतो ही उदाहरण सर्वांना माहीतच असेल
त्या मुळे गरज असेल तर स्थलांतर करावच लागते पण जिथून हे होते त्या प्रदेशाचा विकास होणे तशी मागणी होणे खूप गरजेचं असते पण जेव्हा स्थलांतर हे लजा spad नसून गर्व करण्या सारखे हा विचारच आर्थिक विषमता वाढवत आहेत ह्याची जाणीव राहत नाही

आज जगभरात स्थलांतराला स्थानिकांनकडून विरोध होत आहे. आपण आत्ता केवळ महाराष्ट्रातीलच विचार करूया. आज मराठी भाषा व संस्कृती संपण्याच्या मार्गावर आहे व त्याला एकच कारण आहे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात परप्रातीयाचे रोज होणारे स्तलानतर.
राजेश११८ नीं योग्यच सांगितले मराठी माणूस हुशार व कतृवात आहे. १९८० साला पासून मी मुंबईत बांधकाम व्यवसायात आहे. त्या काळात इमारती च्या कारागीर मध्ये कोकणातून सुतार येत होते. नांदेड मधून गवंडी व कामगार आमच्या कडे होते व ते आळशी किंवा कामचुकार करणारे मुळीच नव्हते. नंतर Up हुन माणसे स्थलांतरित होउ लागली व ती खूप कमी पगारात काम करु लागले व इथेच मराठी माणसासाठी कुचंबणा झाली व तो आळशी व कामचोर ठरला गेला.

फुटूवाला's picture

7 May 2019 - 7:58 pm | फुटूवाला

ते राजेशभाईच्या आयडीत दोन एक्के नाहीत दोन अष्ठे हैती.
बाकी चालुद्या.

भंकस बाबा's picture

8 May 2019 - 12:20 am | भंकस बाबा

ते स्वामि बिचारे मराठी माणसाच्या उद्धारासाठी इतके तळमळीने लिहितात आणि तुम्ही त्यांच्या क्षुल्लक चुका शोधता. अशाने मराठी आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होणार?

फुटूवाला's picture

8 May 2019 - 12:36 am | फुटूवाला

:)

अठ्ठी लावलेल्या तरी आम्हाला. ईस्पिक सत्त्या मिळण्यापासून रोखू शकणार नाहीत.मराठी मानुस जागा झाला आहे फक्त कुठे जायचं ते ठरलं नाही,एकदा ठरलं की बघाच तुम्ही.

किलवर तिर्री नाखु

महासंग्राम's picture

8 May 2019 - 12:37 pm | महासंग्राम

ते घोडा चतुर- घोडा चतुर सारखं आहेत. आता आयडी बदलून लिवायचं म्हणजे तेव्हढा गोंधळ चालतुया

Rajesh188's picture

8 May 2019 - 1:41 pm | Rajesh188

आज इथे ३३% लोक आपल्या राज्यातील नाहीत
देश भर चे भिकारी आहेत तरी मराठी संकेस्थळांवर असणाऱ्या हुशार लोकांना ही
समस्या आहे ह्याची पुसटशी पण जाणीव नाही .
शिवसेना, मनसे ह्यांची प्रतिक्रिया काय असते ह्याची जाणीव असल्या मुळे 33% गैर मराठी माणसा सारखे वागत आहेत .
लढणाऱ्या मराठी लोकांनी अंग काडून घेतले की
हे कथित देशप्रेमी ची देशाचा कायदा सुधा रक्षण करू शकणार नाही

फुटूवाला's picture

8 May 2019 - 5:00 pm | फुटूवाला

आज महारष्ट्रात जी पाणि टचांई आहे याला सुद्धा हे ३३% परंपरांतीय लॉक्स कार्निबुत आहेंत...

आपले राजकीय पुढारी परप्रातीया बद्दल काहीच बोलत नाही, त्याची स्वताची पोट भरून झाली की शांत राहतात किंबहुना राष्ट्रीय पक्षा मध्ये मान डोकावून गप्प बसणारे नेते निवडले जातात व ह्या कचखाउ नेत्यांनी मराठी व महाराष्ट्रा चे नुकसान झाले आहे. सर्वच नेत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असल्याचे भासवतात. आज मराठी माणूस शहरा पासुन ते गावापर्यंत जमीनी विकत आहेत. परप्रातीय वेवसाय करतो पैसे कमावतो व मराठी काहीच प्रगती करत नाही. दुदैवाने मराठी माणसानेही प्रगती करावी अशी तरतूद किंवा प्रयत्न आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व घटणेत नाही आहे. हे आपले दुदैवं आहे.

अभ्या..'s picture

8 May 2019 - 5:20 pm | अभ्या..

चला, ह्या दुर्दैवासोबतच धाग्याची शंभरी भरली आहे असे मी याटिकानी जाहिर करतो,
शंभर प्रतिसाद येउनही दलिंदरी हटली नसल्याने नवीन मुद्द्यानिशी स्वामी अजुन एकांदा धागा काढतील त्याटिकानी मी राजेशरावासहित त्यांचे हार्दिक स्वागत करतो.
धन्यवाद, जयहिंद जयमहाराश्ट्र जय मराठी.
अरे ह्या महाराष्ट्राचे दुश्मन कोन?
जातीय आनि प्रप्रांतीय हेच दोन.

ट्रम्प's picture

8 May 2019 - 5:36 pm | ट्रम्प

देवा !!
काय दिवस आले हैत !!!
म्या जरी नवीन म्येम्बर अस्लो तरी लै दिवसा पासून मिपावरिल सगळ्या चर्च्या वाचत व्हतो .
काय यक से यक मुद्द्यावर भांडण व्हायची , आररर्र !!
पन काहीही म्हणा , @स्वामि नी सगळ्यांना कस सुसंस्कृत केलय :))

फुटूवाला's picture

8 May 2019 - 5:52 pm | फुटूवाला

माझ्या गावच्या मित्रासोबत एक घटना घटली होती तेव्हा तोही २ वर्ष मराठी अन महाराष्ट्र करत बसला होता. ऐकायची इच्छा असेल तर किस्सा सांगतो ..

भंकस बाबा's picture

8 May 2019 - 6:10 pm | भंकस बाबा

आधीच राजेशभाई आणि स्वामिनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आहेत

हलकेच घ्या

Rajesh188's picture

8 May 2019 - 6:10 pm | Rajesh188

मूळ पदार्थ मध्ये तुमच्या कडचे तिखट मीठ घालणार नसाल आणि वरती तुमच्या कडूनच लोंच्याच फोड वाढणार नसाल तर मूळ रेसिपी सांगा

नो वन's picture

15 May 2019 - 1:36 am | नो वन

सांगा, वाट पाहतोय