घटना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Apr 2019 - 6:03 am

,

पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते

माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ?

नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली

उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला

काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली

कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला

सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला

सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली

सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता

तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला

वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली

इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले

अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले

जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना

"साप डाल तडका " खायला मिळाला असता

मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चूटपूट लागली

विनोद

प्रतिक्रिया

mrcoolguynice's picture

29 Apr 2019 - 1:24 pm | mrcoolguynice

पावशेर डाळ वाया गेली

पावशेर डाळीचे वरण कितीतरी जास्त होईल हो काका !

खिलजि's picture

29 Apr 2019 - 1:54 pm | खिलजि

अकु काका , तुम्ही वोटिंग करता का ?

नाही म्हणजे , मी आपलं सहजच इचारलं

हि घटना खरी मानायची कि खोटी ?

त्याच काय आहे , आज आमच्या मुंबैत इलेक्षन हाय

सर्वाना सुट्टी आणि आम्हालाच न्हाय

साप डाळीत होता कि पाण्यात

ते तुम्ही नीट लिवलंच न्हाय

त्वरा करा,, चला उठा

लवकर टंकून टाका बरं

मराठी कथालेखक's picture

29 Apr 2019 - 2:00 pm | मराठी कथालेखक

एका वेळेला पावशेर डाळ.. खादाडच दिसतायत साने गुरुजी !!

काका मला तुमचे निरागस लेखन फार आवडते .. माझ्या प्रतिसादांना सकारात्मक आणि हलके घ्या .. आणि लिहीत राहा .. मी तुमचा फ्यान हाय

श्वेता२४'s picture

30 Apr 2019 - 11:28 am | श्वेता२४

राजनंदिनी वाचली.... ;)

मी तर नागनंदिनी सोसायटीत साप कुकर लावत होता, त्यात काकू जाऊन पडल्या अशी पण कल्पना केली. मज्जा आली!!

श्वेता२४'s picture

1 May 2019 - 3:05 pm | श्वेता२४

काय भारी कल्पना! आवडली