कैरीचे अनेक प्रकार

तनमयी's picture
तनमयी in पाककृती
9 Apr 2019 - 12:43 pm

Submitted by तनमयी on 8 April, 2019 - 17:20
कैरीचा मौसम आला की मी अनेक प्रकारे त्याच्या पाककृती बनवते.
ह्या दिवसात भाज्या मिळत नाहीत किवा चव हीन लागतात ,जेवण जात नाही .
अश्या वेळेला कैरीची चटणी असली कि पोळी संपते डब्यातली.
तर मग आपापल्या रेसिपीज share करा .
माझ्या काही रेसिपीज खालीलप्रमाणे.

१) कैरीचे लोणचे

पाककृती: कैरी बारीक चिरून ठेवावी.
मोहरी डाळ/मोहरी पूड ,मेथी पूड ,जीर पूड,, लाल तिखट ,मीठ गरम तेलात कालवून न जळता हिंग व बडीशोप घालावी
थंड झाल्यावर कैरी टाकावी.
१२ तास झाल्यावर खाण्यास घ्यावी. ८ दिवस टिकते हे लोणचे नंतर फ्रीज मध्ये ठेवावे.baalkairya असल्याने instant लोणचे
आहे .जास्त दिवस नाही टिकत. दोन चार कैयांचे करावे

२)मेथी आंबा / कैरीची लुन्जी :

पाककृती : कैरी चे साल काढून कापून घ्यावी
तेलात मोहरी, मेथ्या तडतडल्यावर मेथी पूड ,जिरे पूड,तीळ पूड ,कडिपत्त , अख्या लाल मिरच्या ,मिरची पूड,गुळ
मिठ घालावे
कैर्या घालाव्या .अर्धा कप पाणी घालावे .शिजवून थोडे translucent झाल्यावर गस बंद करावा.
5 दिवस टिकते .

३)कांदा कैरी

कैरी ,कांदा याचं समप्रमाणात कीस घ्यावा.त्यात साखर ,मीठ तिखट कालवून ghyave
तेलात मोहरी हिंग हवे असल्यास लाल मिरच्या टाकाव्यात.गस बंद करावा .
त्यात वरील कीस टाकावा
शिजवू नये .

४) डाळ कैरी

हरभर डाळ भिजवलेली घ्यावी .त्यात आंबट पण नुसार कैरी चे तुकडे ,मिरच्या हिरव्या,, कोथिंबीर optional ,मीठ साखर
टाकून mixer करावी. वरतून मोहरी,हिंग तडका द्यावा.

५)कैरी भात
पुलिहोरा/चिंच भात/लिंबू भात प्रमाणे अप्रतिम लागतो
फोडणीत मोहरी ,लसून, भिजवलेली डाळ, शेंगदाणे ,कडीपत्ता, हिंग, लाल मिरच्या घालाव्या .हळद , मीठ टाकून कैरीचा कीस घालावा .
शिजवून घ्यावा .नंतर मोकळा शिजवलेला भात घालून परतून घेवून कोथिंबीर पेरावी.

६)कैरी चे वरण
फोडणीत मोहरी ,लसून,कडीपत्ता, हिंग, लाल मिरच्या/हिरव्या मिरच्या घालाव्या .हळद ,तिखट , मीठ,गुळ टाकून कैरीचा कीस/फोडी घालाव्या .
थोडे शिजवल्यावर तुरीची शिजवलेली डाळ घालून उकळून घेवून कोथिंबीर पेरावी.हवे असल्यास थोडा खोबरे कीस घालून पण छान लागते.

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

9 Apr 2019 - 3:47 pm | विनिता००२

वा! करुन बघायला हवे :)

उगा काहितरीच's picture

9 Apr 2019 - 9:21 pm | उगा काहितरीच

मस्त ! सगळेच प्रकार भारी आहेत. मला यातील शेवटचा प्रकार प्रचंड आवडतो. गरम गरम भातावर असे वरण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! यात पन्हे मिसींग आहे पण. उकडलेली कैरी , साखर /गुळ टाकून घुसळून घ्यायचे , यात थोडी वेलची, थंडगार पाणी/बर्फ ... अहाहाहा !

रात्री अंगणात जेवायला बसल्यावर असे पन्हे होत असे ! हम्म् !-(नॉस्ट्याल्जिक) उका .

तनमयी's picture

10 Apr 2019 - 10:31 am | तनमयी

तुम्हीच टाका रेसीपी पन्ह्याची .
आणि कोणाला दुसर्या कैरीच्या रेसीपी येत असतील टाकणे .

श्वेता२४'s picture

10 Apr 2019 - 12:00 pm | श्वेता२४

कैरी किसून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ, मिरची पावडर व गुळ घालावा. त्यावर मोहरी, जिरे, हिंग व हळद याची चुरचुरीत फोडणी द्यावी. या सगळ्या मिश्रणात दाण्याचे कूट व थोडी कोथिंबीर वरुन घालावी व मिक्स करुन घ्यावे. ही चटणी चवीला अत्यंत चविष्ट लागते. पण यात कैरी किसूनच घ्यावी. आंबटपणानुसार गुळाचे प्रमाण वाढवावे. चव आंबट,गोट,तिखट अशी चटपटीत लागते.

सविता००१'s picture

15 Apr 2019 - 4:57 pm | सविता००१

सगळया पाकृ मस्त आहेत.
पन्हे सोपे आहे की. कैर्‍या उकडून त्यांचा गर किती आहे ते मोजून त्यानुसार गूळ घालायचा चिरून. (साखर पण चालते. पण चालते. खरं पन्हं गुळाचंच मस्त लागतं. खमंग.) २ कप गर असेल तर पावणे दोन कप गूळ पुरतो. पण हे कैरीच्या आंबट पणावर अवलंबून आहे. चवीला किंचित मीठ, वेलदोड्याची पावडर आणि केशर घालायचं. आणि थंडगार पाणी. बास.
उन्हाळ्यातलं स्वर्गसुख म्हणजे पन्हं आणि आंबेडाळ. विषय संपला. :)

मदनबाण's picture

15 Apr 2019 - 10:17 pm | मदनबाण

छान पाकॄ !
बाकी आज कैरीमुळे मिपावरच्या भूत़काळात गेलो... कोणे एके काळी या मराठी आटपाट नगरात कैर्‍यांनी लगडलेल्या झाडाचा फोटो देउन इथल्या उत्साही मिपाकर मंडळींना चक्क त्या कैर्‍या मोजायला लावल्या होत्या ! :)

[११ वर्ष १ महिना जुने फळ ] :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Zindagi Se Koi | The Kroonerz Project | Ft. Bhavya Pandit | Anurag Mishra

रविकिरण फडके's picture

18 Apr 2019 - 9:58 pm | रविकिरण फडके

1. तुमचं नाव तन्मयी आहे की तनमयी? हे दुसरं नाव कधी ऐकलं नाही म्हणून ही विचारणा. की ते मुद्दाम घेतलेलं नाव?
2. कैरीचं रायतं कसं विसरलात?

वा ...तोन्डाला पाणी सुटले कैरीच नाव वाचून