सोशल मेडीया, चॅट ॲप अन असले फोरम: एक तुलना

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
6 Apr 2019 - 8:45 am
गाभा: 

निमित्त: एक पोवाडा लिहीला होता. नकळत मिपावरील जुने अन नविन दिवस आठवले अन तुलना केली.

माझ्याच धाग्यांना मी शक्यतो उत्तरे देत नाही. धागा वर आणत नाही. तत्राप या व्हाटस मुळे लोक अशा फोरमवर कमी येत आहेत. अन कवितांनातर गिर्हाईकच नाही. मालाला उठाव नाही पण उत्पादन अधीक.

आवाहन: बंडूंनो अन बंड्यांनो, व्हा ॲ च्या जमान्यात अशा वेबसाईट्सवरच लिखाण कायमचे राहते. व्हा ॲ वर प्रतिसाद, लेख पटकन मिळतात पण ते लवकर वाहून जातात. व्हा ॲ हे पी हळद अन हो गोरी आहे. अन येथील लेख प्रतिसाद हे व्यायम केलेले शरीर आहे.

मी अजूनही काही जुने लेख वाचतो ( इतरांचेदेखील). बुकमार्क करतो. ते वाचल्यानंतर आनंद मिळतो. प्रतिसाद वाचून उभारी मिळते. व्हा ॲ वर असे होते काय?

तर मंडळी विचार करा. व्हा ॲ वापरा पण येथेही येत चला. मिपावर एक काळ असा होता की अगदी दुसर्या मिनीटाला प्रतिसाद येत होता. असो.

आणखी एक. प्रतिसादांची चिंता करु नका. लिहीत रहा. प्रतिसाद म्हणजे जो देगा उसका भला नही देगा उसका भला. आत्मानंदासाठी लिहीत रहा.

याचा दुरगामी परिणाम म्हणजे आपली भाषेविषयक आवड तिव्र होते. मते ,तत्वे पक्की होतात. एखादा विषय आवडू लागतो. मी सामाजिक विश्लेषक नाही पण आपल्या जडणघडणीत लिखीत साहित्याचा, वाड्मयाचा वाटा मोठा असतो.
वाचत तर रहाच पण लिहीतही रहा.

मी काही तत्वज्ञ नाही. नाहीतर हा लेख म्हाणजे नाकापेक्षा मोती जड असा व्हायचा.

याद्वारे फोरम अन चॅट ॲप यांची तुलनाही करता येईल.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Apr 2019 - 9:13 am | आनन्दा

दवणे चावले की काय?
बाकी नावावरून हा लेख पण निवडणुकीच्या धुळवडीवर असल्यासारखेच वाटले होते, त्यामुळे जराशी नोराश झाली मात्र.

बाकी मी दिलाय बरका प्रतिसाद. कितव्या मिनिटाला ते जरा माजून घ्या.

अवांतर
तुम्ही कोणता कंपू चालवत नाही का?

पाषाणभेद's picture

6 Apr 2019 - 10:00 am | पाषाणभेद

दवणीय लिहायचे आहे अजून. निवडणूकीचा वृत्तांत लिहीला तरी चालेल. ४२ मिनीटे लागली प्रतिसादाला. आम्ही म्हणजेच कंपू.
बघता काय सामील व्हा.

शाली's picture

6 Apr 2019 - 10:51 am | शाली

अगदी पटले.
या निमित्ताने माझ्या लेखाची जाहिरात करुन घेतो.
स्वानंदासाठी

दुर्गविहारी's picture

6 Apr 2019 - 9:48 pm | दुर्गविहारी

खरं आहे. ईथल्या साईटवरचे लिखाणच काय अप्पावर फॉरवर्ड म्हणून येते यातच मि.पा. सारख्या संस्थळाचे महत्त्व अधोरेखित होते.

चित्रगुप्त's picture

7 Apr 2019 - 8:17 am | चित्रगुप्त

खरोखर मननीय लेख आहे.
नऊ वर्षांपूर्वी मी जेंव्हा मिपाकर झालो, तेंव्हा परिस्थिती खूपच वेगळी होती. सगळे लेख, कविता वगैरे वाचनीय वाटायचे आणि सतत मिपावर यावे, वाचावे, भरभरून विचारपूर्वक प्रतिसाद द्यावे, आणि मुख्य म्हणजे अफाट कल्पना लढवून काहीतरी अद्भुत लेखन करावे, ही ऊर्मी सतत जागृत रहात असे.
सध्यातरी माझ्या बाबतीत हे सर्व ओसरल्यासारखे झाले आहे. अर्थात यात वाढत्या वयानुसार आलेली शिथिलता हे कारण असेलच, तरी बहुतेकांचा रिकामा वेळ आता कायप्पात जात असतो. त्यातली क्षणिक करमणूक आणि बहुशः खोटी असलेली माहिती, शुभप्रभात, हॅप्पी दिवाळी-दसरा-नववर्ष- अमूक डे आणि तमूक डे ... या सर्व फालतूगिरीत जो तो गुंतलेला दिसतो.

मुख्य म्हणजे प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आणि अगदी स्वस्त डाटा आल्याने संगणक वा लॅपटॉप वापरणेच मुळात फार कमी झालेले आहे, परिणामी सकस लिखाण करणे, मन लावून वाचणे, यथायोग्य प्रतिसाद देणे हे दुर्मिळ होत चालले आहे.
पाषाणभेदांनी या समस्येवर नेमके बोट ठेवले असल्याने आज या सर्व गोष्टींची जाणीव अधिकच टोकदार झाली, परिणामी बर्‍याच काळानंतर लॅपटॉप उघडून हा प्रतिसाद लिहायला बसलो, आणि बर्‍याच काळापासून अर्धवट राहिलेल्या माझ्या लिखाणाकडे आता पुनश्च वळायचा निश्चय केला आहे.
मनापासून आभार पाषाणभेद भाऊ.

आपल्यासारखीच माझी परिस्थिती होती. व्हा ॲ वर काहीच प्रॉडक्टिव्ह लिखाण होत नाही. म्हणून गेल्या आठवड्यात येथे जास्त येत गेलो अन खरोखर लेख, कविता, पोवाड्याचा फायदा झाला.

मला आणखी एक मुद्दा अधोरेखीत करायचा आहे की कायप्पा , फेबू वर लिखाण वाहून जाते. तेथे आपलेच लिखाण अन त्यावरील प्रतिसाद पुन्हा पुन्हा पाहणे दुरापास्त असते. तसे एखाद्या अशा फोरमवर होत नाही. ( अर्थात तो फोरम बंद नको व्हायला. तसे आपण ब्लॉग किंवा इतर फोरमवर बॅक अप घेवू शकतोच.)

आपण बारकाईने या पोस्टचा विचार केला तसेच तो इतरांनी करो अन प्रत्येकाचे लिखाण वाढो हि इच्छा.

चौथा कोनाडा's picture

7 Apr 2019 - 4:30 pm | चौथा कोनाडा

+१

चित्रगुप्तसाहेब, पहिला परिच्छेद मला तंतोतंत लागू पडतो. (अर्थात वेळे अभावी मी इथं थोडंच लिहू शकलोय)
नुसतं वाचनमात्र राहायला ही खूप मजा यायची. प्रतिसाद, वाद- विवाद, मते-मतांतरे, कंपुगिरी इ वाचायला धमाल यायची !

स्वस्त डाटा आल्याने संगणक वा लॅपटॉप वापरणेच मुळात फार कमी झालेले आहे,

बरोबर

पाषाणभेदांनी या समस्येवर नेमके बोट ठेवले आहे

+१

लिखाणाकडे आता पुनश्च वळायचा निश्चय केला आहे.

तुम्हाला शुभेच्छा !
मी ही आजकाल नेटानं प्रयत्न करतो लिहायचा. प्रतिसाद जास्त येवो अथवा कमी.
शेवटी मिपा सारखं संस्थळच शाश्वत वाटतं ! कायप्पा हे अळवावरचं पाणी, तर फेबु म्हणजे नुसताच लोंढा. पाणी वाहण्याचा आवाज फक्त !

पाषाणभेद, अगदी योग्य लिहिलंय ! धन्यवाद !
.

उपेक्षित's picture

7 Apr 2019 - 7:14 pm | उपेक्षित

अगदी अगदी मनातल बोल्लासा पाषाणभेद, पूर्वी (काही वर्ष) वाचनमात्र होतो तेव्हा मजा यायची वाचक म्हणून, तेव्हा राजकीय चर्चा सुद्धा सकस असायच्या आत्ता सारखे हमरीतुमरी नसायची शिवाय त्या धाग्यावरील वाद तेवढ्यापुरती ठेवायची बहुतेक पब्लिक.

बरीच चांगली मंडळी येयीनाशी झाली नंतर त्याच त्याच सदस्यांचे नाव पहिल्या पानावर बघून कंटाळा येऊ लागला.

असो....

कुमार१'s picture

8 Apr 2019 - 9:43 am | कुमार१

लेखाशी सहमत धन्यवाद.

मी संस्थळांवरच जास्त वावरतो.

WA ची बिलकूल आवड नाही. फक्त व्यावसायिक कामासाठीच ते वापरतो. बहुतेक परिचितांना सांगितले आहे की मला काहीही fwd करायचे नाही. मी कोणालाही तसे काही पाठवत नाही.

फेबु फक्त ऐकून माहीत आहे !
शुभेच्छा