भूतबाधा की मनाचे खेळ?

गावठी फिलॉसॉफर's picture
गावठी फिलॉसॉफर in काथ्याकूट
28 Mar 2019 - 9:54 am
गाभा: 

मी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही. त्या गोष्टींकडे चाणाक्ष पणे पाहिलं तर सर्व काही लक्षात येते.

ही घटना साधारण 5 6 दिवसांपूर्वी ची आहे. म्हणजेच होळीच्या तिसऱ्या दिवसाची. मामाचे गाव आमच्या गावापासून खूपच जवळ. धरणाच्या वरच्या बाजूला मामाचे गाव तर माझे गाव धरणाच्या खालच्या साईडला. मामाची छोटी मुलगी 10वीला आहे. तिचा शेवटचा पेपर संपला म्हणून ती आमच्याकडे आली होती. मला ही मामाला भेटायचे होत म्हणून मी तिला थोडं थांबवलं आणि साधारण रात्री साडेसात दरम्यान तिला घेऊन निघालो.

मामाच गाव आडवळणी आहे. जायला यायला डोंगरा साईतून रिंग रोडन जावं लागतं. जाताना नदी साईटला त्यांच्याच गावचा स्मशानभूमी आहे. गर्द झाडी आणि उतार त्यामुळे तिथे एकट्या अर्ध्याला चालायला भीती वाटते. माझी बाईक आता त्या ठिकाणी आली. आणि बरोबर पुलावरच(स्मशानभूमी साईटला) धक्के खाल्ल्यागत वाटायला लागली. मामाची मुलगी जाम घाबरली. मी थोडा पुढे गेल्यावर थांबलो. तेव्हा मला समजलं गाडीला रिजर्व लागला होता. गाडीतील पेट्रोल संपलं किंवा रिजर्व लागला तर गाडी असच करती. पण मी थांबल्यामुळे आणि अफवांमुळे ती खूप भ्यायली आणि रडायला लागली. तिला समजवलं आणि पुढे निघालो. रस्त्यात आणि घरी पोचल्यावर भूत, प्रेत, चकवा असल्या सर्व गोष्टी(लोकल अफवा) समजल्या.

अगोदरच मी लेट गेलो होतो. त्यातल्या त्यात जेवण आणि मामाच्या गप्पा. यामुळे तिथून निघायला मला साडेदहा वाजले. गावचे साडेदहा म्हणजे गाववाल्यांचा झोपायचा टायमिंग. घरबाहेर चार टवाळ कार्टी सोडली तर कुणीही नसत. मी ज्या वाटेने गेलो त्याच वाटेने येणे होतंच. झाला माझा प्रवास सुरु. जाताना मामाची पोरगी तरी होती...... येताना मात्र तिने सांगितलेल्या हॉरर अफवा आणि भीतीचे दडपण माझ्यासोबत होतं.

मी येताना आता त्या नदीच्या एरियात पोचलो. वळणे आणि सरळ रोड यामुळे अपर डिपर चाललं होतं. सरळ रोड आला. साधारण खड्डे होते. अप्पर टाकला...... अप्पर टाकता क्षणी पुढे कवठ्या महाकाळ चे अद्ययावत व्हर्जन बाभळीच्या झाडाला लटकत होतं. आणि लाईट मूळ चमकत होत. गाडी फिरवून रिटर्न मामाकडे जायचं अस ठरवल पण थोडा विचार केला. भूत काय फिल्म मधल्या भुतांसारखी थोडी असणार?? गाडी हळू घेतली. लांबूनच निरीक्षण केले. तो काळा भावला होता. नदी, थंडी, भारी वातावरण आणि साधारण लाल माती यामुळे अमच्याकडे स्ट्रॉबेरी जास्त पिकते. आणि ते स्ट्रॉबेरी वाले शेतात भावले, कपडे वैगेरे असलं अडकवत असतात. आणि त्यातल्या कुणीतरी तर रस्त्यावरच भावलं अडकवलेलं.

थोडा विचार केला, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला म्हणून भूत वैगेरे अफवा यावर परत एकदा विश्वास बसला..... तरीपण खर सांगतो माजी जाम फाटली होती.

तसाच पुढं गेलो. आता नदीचा पूल आला होता. स्मशानभूमी चा परिसर आला. परत अप्पर टाकला. पुढे पाहतो तर काय...... एक मुलगी हॅट घालून रस्त्याच्या बाजूने चालली होती. काही समजायच्या आत तिच्याजवळ पोचलो. ती मुलगी नव्हती कोणतरी दुबळा पतला मुलगा होता. कदाचित भिजवणी किंवा शेतात डुकरांच्या मुळे राखणीला आला असावा. आता मात्र मी पुरता भिलो होतो....... वैज्ञानिक दृष्टीकोन गेला तेल लावत..... जय श्रीराम बोललो...... आणि बाईकचा स्पीड वाढवला आणि जे सुटलो परत मग वळून पाहिलं नाही.

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

28 Mar 2019 - 10:46 am | शाम भागवत

:)

शशिकांत ओक's picture

28 Mar 2019 - 11:24 am | शशिकांत ओक

मी चकवा, भूत बित यावर शक्यतो विश्वास ठेवत नाही.

सगळ्यांचं असचं असतं... "शक्य" होतं तितकं अविश्वासी बनता येतं...
पण अशक्य जालं की
लेखकांच्या भाषेत "माझी फाटली होती" अशी तारांबळ उडते...

खरे तर मागे परतून त्या मामांना बाईकवरून योग्य त्या ठिकाणी पोचायला मदत करायचे काम करायला हवे होते...

गावठी फिलॉसॉफर's picture

28 Mar 2019 - 12:05 pm | गावठी फिलॉसॉफर

माजी भीती कमी झाल्यानन्तर मला जाणवलं की, कदाचित त्या मुलग्याला मदत हवी असेल.

मी वर बोलल्या प्रमाणे भिजवणी करायला आला असावा.

पण त्या मुलाचे पाय उलटे होते का हे पाहायला हवं होतं.

गावठी फिलॉसॉफर's picture

28 Mar 2019 - 11:02 am | गावठी फिलॉसॉफर

गाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते

शशिकांत ओक's picture

28 Mar 2019 - 11:15 am | शशिकांत ओक

गाडीच स्पीड जास्त होत. पाय बघत बसलो असतो तर पाय गळ्यात आले असते

नंतर सगळं सुचतं...
वैज्ञानिकता, दृष्टी - कोन, मनाचे खेळ कि काय...

सोन्या बागलाणकर's picture

28 Mar 2019 - 11:50 am | सोन्या बागलाणकर

काय कळलं न्हाय बा म्हंजी भूत व्हतं का नव्हतं?

काय राव, भावला न पोराला बघून घाबरला! आसं भूतबीत काय नसतं बघा, समदे आपल्या जीवाचे खेळ.
हा समदा पिच्चरवाल्यांचा खुळचटपणा हाय.

आता फुडल्या टायमाला नारबाच्या वाडीवाली ट्रिक करा, समदी कापडं काढा बघा भूत पळतं का न्हाई.

गावठी फिलॉसॉफर's picture

28 Mar 2019 - 12:09 pm | गावठी फिलॉसॉफर

परत अशी भूत भेटली की नारबाची वाडी ट्राय करतो.

आनन्दा's picture

28 Mar 2019 - 1:41 pm | आनन्दा

एखादं खट्याळ भूत असेल तर काढलेली कापडं घेऊन पळून जाईल.
तेव्हा जरा सावधान.

चौकटराजा's picture

28 Mar 2019 - 2:05 pm | चौकटराजा

मला १९७३ चे सुमारास एक भूत चक्क मी झोपेतून अर्धा जागा झालो त्यावेळी दिसले होते . नंतर १९८८ ते २०१५ पर्यंत त्या भुताने व मी एका लेन मध्ये चिंचवड मध्ये काढले . भुताची दोन्ही मुले सध्या अमेरिकेत आहेत .

सोन्या बागलाणकर's picture

29 Mar 2019 - 8:01 am | सोन्या बागलाणकर

वपुंची "दोंदे" आठवली =))

दुर्गविहारी's picture

28 Mar 2019 - 7:49 pm | दुर्गविहारी

:-)

ट्रेड मार्क's picture

29 Mar 2019 - 3:04 am | ट्रेड मार्क

ज्यांना अनुभव आलेले नसतात त्यांच्या दृष्टीने भूतपिशाच्च, करणी, काळी जादू वगैरे सगळं अंधश्रद्धा असते ज्यांना काही अनुभव आलेले असतात आणि कुठल्याच मार्गाने त्याचं स्पष्टीकरण सापडत नाही ते लोक या सगळ्यावर विश्वास ठेवतात.

महासंग्राम's picture

30 Mar 2019 - 2:10 pm | महासंग्राम

एक सूचना : सध्या माणसेच जास्त भयानक झाली आहे सबब आम्ही या भूतलावरून गायब झालो आहोत.

सूचना संपली

मसणवट्या वरचा खविस
शाखा : ओंकारेश्वर स्मशान

गोंधळी's picture

30 Mar 2019 - 6:12 pm | गोंधळी

अगर आप भगवान पे विश्वास करते हो तो भुत पे भी विश्वास करना होगा.

सिरुसेरि's picture

30 Mar 2019 - 6:54 pm | सिरुसेरि

ओ भुत , कल आना .