डेस्कटॉपवरील युद्धजन्य परीस्थिती

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
27 Mar 2019 - 4:41 pm
गाभा: 

माझ्या साधारणतः सहावर्षे जुन्या एच पी लॅपटॉपवर मासॉची खिडकी क्रमांक १० कार्यप्रणाली कार्यरत असते. अगदी अलिकडे पर्यंत मी फाफॉ किंवा क्रोम ही ब्राऊजर्स गरजे प्रमाणे वापरत असे. एक्सप्लोरर आणि आताचे एज वापरून जमाना झालेला होता.

गेल्या दोन - एक महिन्यात केव्हातरी खिडकी १० आपोआप अद्ययावत झाली, आणि आमच्या संगणकावरच्या फाफॉ आणि क्रोमने दम तोडला -म्हणजे काही केल्या साईट्स डाऊनलोडच होत नव्हत्या एवढा वेग कमी झालेला. मासॉने उपलब्ध केलेले एज उघडले तर चालायला तर लागले. मनात विचार केला मासॉ एवढी सर्वीस पुरवते त्यांचाच ब्राऊजर वापरावा असा काही हट्ट असेल तर पुरवूया हट्ट आपणही कशाला मनाला लावून घ्यायचे म्हणून एजवर धकवायला लागलो. मी इतर गूगल सेवा जसे शोध, ड्राईव्ह , युट्यूब नाही म्हटलेतरी बर्‍यापैकी वापरतो. प्रत्येकवेळी गूगलची आलेली क्रोमवापरण्याची विनंती आम्ही नाईलाजाने नाकारली.

पण एवढ्यावर समस्या सुटली नसावी आमचा लॅपटॉप संगणक बराच आवाज करून आंतरजालाचा वेग कमी होऊन बंद पडण्याच्या स्थितीवर आला. मासॉची कोणतीतरी प्रणाली सतत कार्यरत होती. जरासे आंजा शोधले त्यातले काही गमणे आमच्या अतंत्रज्ञ बुद्धीस झेपणारे नव्हते. बाहेरून तांत्रिक सेवा घेण्यापुर्वी मासॉची रिसेटवाली काही सिस्टीम आढळली म्हटले ती वापरून खिडकी रिसेट करून पहावी. रिसेटींगच्यावेळी खिडकीशी संघर्षरत प्रणाली वगळल्या जातील अशी काहीशी सुचना आली. आमच्या संगणकावर इतर काही प्रणालीही फारशा नव्हत्या. अँटी व्हायरस जबाबदारी सुद्धा मासॉच्या डिफेंडरच्याच कृपेवर आहे. केवळ अशात न वापरलेले फाफॉ आणि क्रोम होते ते गिळंकृत करून खिडकी १० रिसेट होऊन शांत झाली.

काल कोणत्याशा वेबसाईटवर उपलब्ध युट्यूब डायरेक्ट युट्यूबवर बघावे म्हणून युट्यूबच्या आयकॉनवर क्लिककेले तर युट्यूब महाशयांनीको क्रोमचीच अँटी मालवेअर वापरून पहाण्याची अप्रत्यक्ष सुचना देत नकार दिला . तेव्हा क्रोम पुन्हा डाऊनलोड करण्याचा उद्योग केला. पण खिडकी १० ने प्रोग्राम रन करण्याबद्दल आम्हाला दम भरला म्हणून युट्यूब नाहीतर नाही म्हणून आम्ही नाद सोडला. पण काल क्रोम डाऊनलोड केल्या पासून खिडकी पुन्हा तापावयास लागली आहे.

आता तसे आम्ही अतंत्रज्ञ त्यामुळे मासॉ आणि गूगलचे आपापसातले सुप्त युद्ध आमच्या संगणकावर खेळ्ले जात नाही आहे ना या शंकेने आमचे मन घेरले आहे. हे केवळ आमच्या मनाचे आभासी खेळही असतील म्हणून मिपाकर खास करून जाणकारांपाशी मन मोकळे करत आहे. कुणास या बद्दल असे अनुभव आले येत असल्यास त्याची चर्चा या निमीत्ताने व्हावी किंवा आमची आभसी अंधश्रद्धा निर्मुलीत व्हावी म्हणून धागा काढत आहे.

* अनुषंगिका व्यतरीकत आवांतरे व्यक्तीगत टिका आणि तथाकथित शुद्धलेखनाचे डोस टाळण्यासाठी; धागा विषयास अनुसरून चर्चा सहभागासाठी अनेक आभार.

प्रतिक्रिया

जसजशी खिडकी अद्ययावत होते, तसतसे तुम्हाला अखिडकी softwares/ applications इत्यादि अद्ययावत करावी लागतात. तशी तुम्ही केली का?

तुमच्या लॅपटॉप चे config काय आहे?

माहितगार's picture

27 Mar 2019 - 10:17 pm | माहितगार

पॅव्हेलीयन जी सिरीज आय ३ बीट ६४

केवळ २ च फाफॉ आणि क्रोम व्यतरीक्त काहीच नाही आणि ते आपोआप अद्ययावत होण्याच्या मोडवरच होते जशी खिडकी अद्ययावत झाली त्यांना अद्ययावत सोड इंस्टॉलची संधिच मिळालेली नाही.

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 6:43 pm | आनन्दा

तुमच्यात राम नाही बहुतेक!

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 6:44 pm | आनन्दा

रामाची भक्ती वाढवा..
मासॉ 10 ला किमान 8अब्ज पाहिजे.

माहितगार's picture

27 Mar 2019 - 10:08 pm | माहितगार

__/|__ धन्यवाद ह्यावर काम करून बघतो . अनेक आभार.

माहितगार's picture

27 Mar 2019 - 10:08 pm | माहितगार

__/|__ धन्यवाद ह्यावर काम करून बघतो . अनेक आभार.

माहितगार's picture

27 Mar 2019 - 10:10 pm | माहितगार

३ अब्ज दिसतोय वाढवून बघतो .

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 11:09 pm | आनन्दा

3 तर नुसते उभे राहायलाच लागतील..
तुम्ही कुठे राहता?

पुण्यात असाल तर माझ्याकडे पडून आहे, लावून बघूया..

गामा पैलवान's picture

28 Mar 2019 - 2:53 am | गामा पैलवान

माहितगार,

मला वाटतंय की मनःपूतस्मृती ( = random access memory ) पेक्षा ही राशीपेटीची ( = data storage) समस्या वाटते आहे. तुमची राशीपेटी चुंबकीय तबकसूची ( = magnetic hard disk ) प्रकारची दिसते आहे. जमल्यास बदलून ठोसदशासाधन ( = SSD = solid state device ) वापरून पहा म्हणून सुचवेन. ही पेटी मला लई आवडली : https://www.amazon.in/Western-Digital-WDS240G2G0A-240GB-Internal/dp/B076... किंमतही बरीच कमी आहे. २४० अब्जांत खिडकी व्यवस्थित बसेल याच पेटीची धाकली बहीण १२० अब्जांची आहे. तीसुद्धा चांगली आहे.

वर आनन्दा यांनी सुचवल्याप्रमाणे पुण्यात असाल तर उरुसंगणक घेऊन त्यांच्याकडे एखादी चक्कर मारा. बरं पडेल.

आ.न.,
-गा.पै.

माझ्या अनुभवानुसार मासॉ 10 -2018 ला 3 अब्ज फक्त रांगायला पुरते.
उभे राहायला 4 तरी हवी, आणि पळायला 8.

बाकी ठोसदशासाधन मी पण सुचवणार होतो, पण म्हणलं आधी मूलभूत प्रश्न सोडवू.

अवांतर-
1. मनःपूतस्मृती आवडला
2. हा उरु वाला नाही, त्यांनी उचलला तर उरावर पडण्याची भीती अधिक, तेव्हा मीच जाणे योग्य, कसे?

गामा पैलवान's picture

28 Mar 2019 - 1:46 pm | गामा पैलवान

आनन्दा,

हा उरुपटू नसून पटलपटू आहे, हे विसरलोच होतो! :-)

मन:पूतस्मृती वाढवण्यासाठी डब्बा उघडावा लागेल. याउलट बाह्य ठोसदशासाधन हे मात्र नेहमीचे सरळ-वर्षा-जोड ( = universal serealised bus = usb connection ) वापरून कार्यान्वित करता येईल.

योग्य तोडगा ठरवण्याच्या आधी कार्यप्रबंधक ( = task manager ) वापरून स्थायीस्मृती तबक ( = hard disk ) अथवा केंद्र प्रक्रियक ( = cpu ) कोण खिडक्या मंदावतंय हे शोधून काढावं म्हणतो.

आ.न.,
-गा.पै.

स्नेहांकिता's picture

28 Mar 2019 - 2:47 pm | स्नेहांकिता

स्थायीस्मृती तबक की तबकडी ?

प्रचेतस's picture

28 Mar 2019 - 3:03 pm | प्रचेतस

इतर कशानं नाही ओढवलं तरी मराठीचं मरण अशा जड भाषेने ओढवणार हे निश्चित.

गामा पैलवान's picture

28 Mar 2019 - 7:12 pm | गामा पैलवान

काहीही हं प्रचेतस!

साक्षात माऊलींनी म्हंटलंय की मराठी भाषा म्हणजे 'अमृतातेही पैजा जिंके'. मग मराठी कसली मरतेय!

उपरोक्त जड भाषा तर कडू जहर आहे. एकदा का अंगवळणी पडलं की काम फत्ते. मग आपण मायमराठीस 'हलाहलेही लीलया ड्रिंके' म्हणून नावाजायला मोकळे.

आ.न.,
-गा.पै.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Mar 2019 - 7:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रतिसाद वाचुन दम लागला ...कायतरी मारामारी वगैरे चाललेय (ठोस बिस) असे वाटायला लागले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Mar 2019 - 12:12 am | डॉ सुहास म्हात्रे

मला तर असे वाटतेय की, हे वरचे प्रतिसाद स्क्रिनवर पाहिल्यामुळेच त्या संगणकाला घेरी येत असावी ! =)) =)) =))

चौकटराजा's picture

30 Mar 2019 - 7:52 pm | चौकटराजा

हापिसात ग्रुप मध्ये काही टेंशन असल्यास हा धागा त्यांना दाखीव !

पैलवान's picture

28 Mar 2019 - 4:13 pm | पैलवान

बहुधा ३२-बीट ओएस असल्यास ४+ जीबी रॅम ३जिबी अशी डिटेक्ट होते.
बाकी ८ जीबीमध्ये १० एकदम स्मूथ चालते. जित्की जास्त तितकी मस्त!

कंजूस's picture

28 Mar 2019 - 4:22 pm | कंजूस

आता पटकन सांगून टाका माहितगारांना की कोणती कळ फिरवून कोणता मंत्र म्हटला की दारे खिडक्या सताड उघडतील ते.

दगडावर पडून वीट झाल्यास उत्तरदायित्वास नकार.

यशोधरा's picture

29 Mar 2019 - 3:39 pm | यशोधरा

दगडावर पडून वीट झाल्यास उत्तरदायित्वास नकार.

. हे भारी =))

हार्डवेअर/ सॉफ्टवेअर सगळं अपडेट लागतंय बघा पयलं.
खिडकी अधिकृत आहे की अनधिकृत?

एकुलता एक डॉन's picture

29 Mar 2019 - 3:48 pm | एकुलता एक डॉन

विंडोवस १० पेक्षा ७ वापरावे

हेच म्हणतो ६४ बीट, मिनीमन ८ जिबी रॅम असायलाच हवे.

अँटी व्हायरस जबाबदारी सुद्धा मासॉच्या डिफेंडरच्याच कृपेवर आहे.

Avast आणि Avira किंवा Bitdefender यांचे चकटफु अ‍ॅन्टीव्हायरस आवृत्ती जालावर उपलब्ध आहे ती वापरावी,बेसिक असले तरी चांगली सुरक्षा देतात.
एसएसडी असेल तर डिस्कच्या निर्म्यात्याने जे सॉफ्टवेअर दिले असेल ते वापरुन परफॉर्मन्स ऑप्टीमायझेशन करावे... एसएसडी चा कार्यक्षम कालावधी वापरण्यासाठी काही सेटिंग्स ओएस आणि रजिस्टरीत करावी लागतात, गुगल पंच केल्यास अनेक साइट्स मिळतील.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |

कंजूस's picture

29 Mar 2019 - 7:06 pm | कंजूस

मॅासॅाच्या दुकानात Edgium browser ( Edge on Chrome) थोड्याच दिवसांत येणार आहे. तो आल्यावर काही प्रगती होते का पाहावे.

गोंधळी's picture

30 Mar 2019 - 12:43 pm | गोंधळी

खि. १० ची एक प्रमुख समस्या म्हणजे स्व-अद्ययावतीकरण चा पर्याय अक्षम करता येत नाही. हा पर्याय कधीही चालु होतो व प्रणाली संथ करतो.

गामा पैलवान's picture

30 Mar 2019 - 1:13 pm | गामा पैलवान

त्याकरिता मी हे वापरतो : https://www.thewindowsclub.com/windows-update-blocker

-गा.पै.

चौथा कोनाडा's picture

30 Mar 2019 - 12:57 pm | चौथा कोनाडा

एकंदरीत खिडकी १० विरोधात "चले जाव" चळवळ करावी लागणार

चौकटराजा's picture

30 Mar 2019 - 7:54 pm | चौकटराजा

सर्वे पयशावाले दिसताय ! समद्यांच्या खिडक्या पावतीसकट घ्येतल्येल्या ?

गामा पैलवान's picture

31 Mar 2019 - 1:44 pm | गामा पैलवान

चौकटराजा,

लाख बोललात मालक! :-) विकतचं दुखणं कोण घेणार ! ;-)

गंमत अशीये की जे लोकं विनापावती घेतात त्यांना असले प्रश्न पडंत नसतात. कायद्यानं वागणाऱ्याच्या मागे पोलीस ! किंवा भित्यापाठी ब्रह्मराक्षस !! किंवा खरीदल्या खिडकीची रखडपट्टी !!! सुज्ञास अधिक सांगणे नलगे! ;-)

आ.न.,
-गा.पै.