आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
22 Mar 2019 - 8:17 pm

आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था

इतर लेख
आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख
आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती

आकाशदर्शन कार्यक्रम करणाऱ्या संस्थांविषयी हा वेगळा धागा काढत आहे.

१) खगोलमंडळ -Head office - शीव, साधना विद्यालय ,बुधवारी. नोंदणीकृत सहकारी संस्था.
शाखा - मो ह विद्यालय ,ठाणे आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, होत्या. यांचे आकाशदर्शन कार्यक्रम वांगणी - पाटोळे बाईंच्या फार्मवर. आठ इंची पितळी दुर्बिण आहे.

२) हेमंत मोने यांचे कार्यक्रम मुरबाडच्या अलिकडे दहा किमिवर हिंदू सेवा संघाची मोठी जागा आहे तिथे होतात.

३) मराठी विज्ञान परिषद ( चुनाभट्टी मुंबई कुर्लाजवळ) - यांचेही कार्यक्रम हिंदू सेवासंघ जागेत होतात. नोंदणीकृत सहकारी संस्था.

४) बोरिवली येथे एक नवीन संस्था टिआइएफआर येथून निवृत्त झालेल्या लोकांनी चालू केली आहे. जरा सधन संस्था आहे. C -8 दुर्बिण आहे. मान्यवर तज्ञांना भाषणांसाठी बोलावतात.

५) पुण्याची ज्योतिर्विद्या संस्था कार्यक्रम करतेच.
हेड ओफिस - टिळक स्मारक मंदिर. नोंदणीकृत जुनी सहकारी संस्था.

६) नांदेड येथील एका कॅालेजात C -8 वर वेधशाळा बांधली आहे. ( पृथ्वीच्या अक्षास समांतर दुर्बिण बसवलेली असते. )अभ्यासासाठी उपलब्ध.

६) पुणे यूनिवर्सिटी आवारात 'आयुका' नावाची युजिसी ग्रांट ( केंद्रिय मदत) मिळणारी संस्था आहे तिथे मोठ्या टेलिस्कोप विद्यार्थ्यांना बनवायला शिकवतात, करवून घेतात. श्री परांजपे आणि विनया कुलकर्णी बरेच वर्ष मार्गदर्शन करत होते.

७) नेहरू प्लानेटेअरिअम, वरळी मुंबई येथे विविध कार्यक्रम होत असतात. भायखळा रेल्वे स्टेशन पश्चिम ते नेहरु प्लॅनेटेरिअम / तारांगण ची बस असते . रेसकोर्सनंतरचा 'नेहरु विज्ञान केंद्र' हा स्टॅाप वेगळा आहे. तारांगण हा शेवटचा स्टॅाप.

मिपाकर आणि वाचक यांना , त्यांच्या मुलांना हा छंद वाढवायचा झाल्यास माहिती मिळावी यासाठी प्रयत्न आहे. वरील संस्थांची अधिक माहिती, फोन नंबर ( कार्यक्रम अपडेट्स) अवश्य द्यावी. अनुभव लिहावेत.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Mar 2019 - 9:18 pm | यशोधरा

चांगली माहिती. धन्यवाद.

तुषार काळभोर's picture

30 Mar 2019 - 12:25 pm | तुषार काळभोर

वीस वर्षांपूर्वी आठवी नववीमध्ये आमचे विज्ञानाचे सर आम्हा दोन तीन जणांना घेऊन आयुकात जायचे.
आयुका हा माझ्या शैक्षणिक काळातला सर्वात सुंदर अनुभव होता.

मुळात मला खगोलशास्त्र खूप आवडायचं. तिथे होणारी व्याखानं, प्रेझेंटेशन्स, प्रात्याक्षिकं. हा सगळा भारावून टाकणारा अनुभव होता.

सगळ्यात विशेष म्हणजे जयंत नारळीकर.
सर्व ग्रुप्स इंग्रजी माध्यमांतील उच्च मध्यमवर्गीय ते श्रीमंत मुलांचे आणि त्यांच्या तशाच उच्चभ्रु शिक्षकांचे असायचे. फक्त आम्ही तिघे निम्न-मध्यमवर्गीय घरातील मराठी माध्यमातील विद्यार्थी.
पण जयंत नारळीकर आवर्जून आधी पूर्ण व्याख्यान मराठीत आणि मग परत एकदा इंग्रजीत करायचे. त्यांचं बोलणं अतिशय शांत, सुहास्य वदन आणि मृदू असायचं. आणि मराठी एकदम अस्खलित! मराठी बोलताना इंग्रजीचा एकही शब्द वापरत नसत. त्यानंतर होणारं इंग्रजीतलं व्याख्यानही तसंच. तेव्हा काही कळत नसायचं पण ते परिपूर्ण असल्याचं जाणवायचं.
(असं बोलणं मी फक्त अमिताभ बच्चन यांचं पाहिलंय. त्यांचं इंग्रजी आणि हिंदी, दोन्ही एकदम परिपूर्ण, प्रवाही आणि विद्वत्तेची झाक असणारं असतं)

पण ते जाणं निमंत्रित असायचं.

आयुकामध्ये सामान्य जनतेला खुला प्रवेश असतो का, नक्की कल्पना नाही. बहुधा काही विशेष कार्यक्रम खुले असतील.

तुषार काळभोर's picture

30 Mar 2019 - 12:34 pm | तुषार काळभोर

http://scipop.iucaa.in/skywatch.html

Sky Watching at IUCAA : Fridays from Sunset to ~8:30pm.

People are welcome to register for the sky show conducted on Friday evenings. Every week, we invite about 30 members of general public to participate in this. Please inform us your interest on the email or phone numbers given below. We will assign a date for your visit according to a wait list and let you know. There is no ticket and no fees are charged for any IUCAA public programme.

The event includes an introduction to the sky and identification of various stars and constellations. You can view celestial objects through a 6-inch or an 8-inch automated telescope. IUCAA graduate students also participate in this public interaction and your queries are answered.

We gather at the IUCAA Science centre 2nd floor terrace. In the winter 'Sunset' is taken to be around 6 pm while in the summer it means 7 pm. This does not include a visit to the IUCAA main campus, but those interested may visit the IUCAA Science Park by themselves before the Skywatch.

Once invited, please find your way to the IUCAA Main Gate (instructions here) on the specified date and time. You may request the security guards to inform us of your arrival. We will receive you and culminate the visit as per arrangements.

For Appointments:

Please send us a letter/e-mail with the following information :

Name of the requesting person/organization (if any)
Number of persons in group
Preferred date
Contact Telephone number / mobile / e-mail
Some words about the group (i.e. age, education, language preference)

For all Visits, please contact:
Samir Dhurde [ scipop@gmail.com ]
020-25604603

Note: IUCAA is closed on Saturdays, Sundays & Central Government Holidays.

तुषार काळभोर's picture

30 Mar 2019 - 12:34 pm | तुषार काळभोर

http://scipop.iucaa.in/Amateurs/telemaking.html

अंदाजे वेळ आणि खर्च -
2 inches / 50 mm refractor ~ 5 work hours, approx. Rs. 3,500
4 inches / 100 mm reflector ~ 25 work hours, approx. Rs. 11,000
6 inches / 150 mm reflector ~ 60 work hours, approx. Rs. 15,000

अजय देशपांडे's picture

30 Mar 2019 - 9:04 pm | अजय देशपांडे

मला अशी माहिती हवी आहे की 10 x eyepice ची focul लेन्थ किती असते

कंजूस's picture

31 Mar 2019 - 10:43 am | कंजूस

दहा सेंमी. (१०० मिमि)
Lens power in Diopter = 100 / lens focal length in centimetres.

------
पण टेलिस्कोपच्या बाबतीत -
टेलिस्कोपच्या बरोबर जे तीन कॅामन आइपिसेस देतात त्या आइपीसवर ९/,१६/,२५मिमि असे लिहिलेले सापडेल.
चार आणि सहा इंची टेलिस्कोपस असतात. ( असेच म्हणतात, आतल्या आरशाचा व्यास - diameter 4",6" )
या आरशाची फोकल लेंथ साधारणपणे १०० -१२० सेंमी ( १००० - १२००मिमि ) असते.

समजा १००० मिमि फोकल लेंथ आरशाची प्रतिमा २५मिमि च्या आइपिसने पाहिली तर ४०पट ( १००० भागिले २५ = ४०)मॅग्निफिकेशन मिळते. हीच प्रतिमा १० मिमि आइपीसने पाहिल्यास मॅग्निफिकेशन ( १०००मिमि भागिेले १०मिमि= १००) १०० मिळते.

हे पुढल्या साधनांच्या भागात येईलच.

http://www.tejraj.com/70-400-tabletop-telescope.html

मला दोन्ही ठिकाणी वापरता येईल, skywatch त्याचबरोबर outdoor use
कसे वाटते ?
3X Barlow बद्दल माहिती हवी होती फॉर viewing saturn रिंग

आमच्या कडे येणा-या पर्यटकांसाठी आम्ही नियमित पणे आकाशदर्शन कार्यक्रम घेत असतो. आमची वेबसाईट पहावी इच्छुकांनी
www.nisargshala.in

कंजूस's picture

5 Apr 2019 - 3:59 pm | कंजूस

@ अजय देशदेशपा,
१) डाइगोनल व्ह्युइंग - डोक्यावरचे तारे पाहायला उत्तम. पण त्याचबरोबर outdoor use म्हणजे पक्षी शोधताना बराच वेळ लागतो. स्ट्रेट व्ह्युइंग बाइनो सोपी पडते.
पण दिसल्यावर निरिक्षणास चांगली. पाणपक्षी ओके, रानपक्षी भराभर हलतात त्यासाठी कॅनन इओएस कॅम्रा उत्तम.

२) ग्लोब्युलर क्लस्टरसाठी चालेल. मेसिअरसाठी बाइनो बरी.
३)viewing saturn रिंग -
२५० मॅग्निफिकेशनची गरज असते. उगाच स्पेशल आइपिसने काही फायदा होत नाही. लाइट कमी होत जातो.
इथे प्रॅक्टिकल पॅावर १६५ मॅक्स आहे.
४) ज्या अक्सेसरीज फ्री नाहीत याबद्दल ग्यारंटी नाही. म्हणजे कॅम्रा अडॅप्ट र मॅच झाला नाही तर फोटो येणार नाही हे लक्षात ठेवणे. तो उद्देश असेल तर विचार करा.
------
५) ओलिम्पस १० गु५० (६०° व्ह्यु)
आणि (८०° व्ह्यु) उत्तम समाधान देतात. पण शनिची रिंग नाही दिसणार.

कंजूस's picture

5 Apr 2019 - 4:01 pm | कंजूस

*@अजय देशपांडे ,*