पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने....

सत्य धर्म's picture
सत्य धर्म in जनातलं, मनातलं
15 Feb 2019 - 8:25 pm

पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने...

काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते.
या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका.
आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही. हजारो वर्षांपासून आपल्या देशाने कित्येक आक्रमणे पाहिली आणि परतवूनसुद्धा लावली पण हे करत असताना आपल्या संपन्न आणि पवित्र भूमीचे कित्येक तुकडे पडले पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची काही उदाहरणे आहेत. या हल्ल्यामागची विचारधार जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता हजारो वर्षे पाठीमागे जाऊन इतिहासाची पाने चाळावी लागतील. मुस्लिम धर्माच्या स्थापनेपासूनच ही आक्रमणे आपल्यावर होत आहेत. इतिहासाचा खोलात संदर्भ न घेता फक्त उदाहरण सांगायचे झाले तर गझनीचा मेहमूद, मोहम्मद घोरी, अलाउद्दीन खिलजी,बाबर, औरंगजेब यांनी केलेले हल्ले सर्वश्रुत आहेत हे सर्व हल्ले आणि त्यामागची विचारधारा हि स्फटिकाप्रमाणे साफ आहे हे सर्व हल्ले हिंदुस्तानी लोकांची संपत्ती लुटण्यासाठी आणि धर्म थोपवण्यासाठी झालेले होते त्या त्या काळच्या राजकारण्यांचे यश किंवा अपयश म्हणा पण हे सर्व हल्लेखोर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
आताचा पाकिस्तान आणि बांगलादेश ही त्याची निष्पत्ती म्हणावी लागेल. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता ज्यामुळे हिंदू, हिंदुस्थान आणि हिंदुत्व टिकले आणि तरले जर शिवाजी महाराज नसते तर सद्यस्थितीत हिंदुस्थानाचे चित्र काहीतरी वेगळेच असते थोड्या विषयांतराबद्दल माफी.
सदर हल्ल्याचा अन्वयार्थ माझ्यामते तरी वरील विषयास अनुसरून होतो थोड समजवून घ्यायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे होईल
मुद्दा नंबर १ - मुस्लिमांना फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे होते ते 1947 मध्ये दिले आताचा बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) आणि पाकिस्तान हा त्यांना धर्मावर आधारित दिला त्यांनी तात्काळ धर्मावर आधारित देश अशी मान्यता बनवून हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार घडवून आणला. अजून सुद्धा तिथे राहिलेली हिंदूंची मंदिरे तोडणे असले प्रकार चालू आहेत. याच गोष्टी शांतिदुताकडून जगभर चालु आहेत.
यामागची विचारधारा काय असेल?
मुद्दा नंबर २ - त्यांना हवी ती आर्थिक मदत त्या काळानुसार दिली गेली त्यानंतर पण त्यानि आपल्यासोबत युद्ध केलेच.
हे सर्व फक्त आपली जमीन बळकावण्यासाठी नव्हते हे निश्चित.
यामागची विचारधारा हा शोधाचा विषय होऊ शकतो.

मुद्दा नंबर 3 - पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे हिंदूंची मोठ्या प्रमाणात कत्तल आणि नरसंहार त्यांनी घडवून आणला प्रार्थनास्थळे नष्ट केली यामुळे आत्ता पाकिस्थान मध्ये हिंदू धर्मीय नगण्य राहिले आहेत आणि काही भारताच्या आश्रयाला येत आहेत. तिथं असणाऱ्या स्थानिक संघटनांना तिथे असणारे सरकार आणि ISI हे पाठिंबाच देत आले आहेत.
यामधून त्याची विचारधारा स्पष्ट होते.

मुद्दा नंबर ४ - हिंदुस्तान हे सर्वसमावेशक राष्ट्र असल्यामुळे आपल्या इथे आपण सर्व धर्माना सामावून घेतले परंतु काही लोकांचे लांगुलचालन केल्यामुळे देशसोबत गद्दारी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. याचाच नमुना आपण मागील काही वर्षात देशविरोधी घोषनांमधून पहिला आहे. काही राजकारणी लोक याना सपोर्ट करतात त्यामुळे आजची घटना घडण्यापर्यंत मजल गेली.

मुद्दा नंबर ५ - राज्यघटनेनुसार प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे सर्व सोयी सवलती सुविधा या सर्वांना जवळपास सारखेच आहेत असे असताना फक्त मुस्लिमच टोकाचा कट्टरतावाद का जोपासतात हिंदुस्थानातील कित्येक मुस्लिम भारत भूमीला वंदन करणे तिरंग्याला वंदन करणे या गोष्टीला विरोध करतात काश्मिरी पंडितांना हुसकावून लावताना काय घडले हे पूर्ण हिंदुस्थानाला माहित आहे. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा यांवर वेळोवेळी बदल करण्यात आला, विरोध झाला असला तरी कालांतराने सर्व समाजाने याला मान्यता दिली. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लीम विचारवंत धर्म संशोधनासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत त्याचाच परिपाक म्हणून कुठल्याही संघटनेच्या नादी लागून आतंकवादी तयार होतात आणि हिंदुस्थानच्या सार्वभोमत्वाच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यात धन्यता मानतात.

मुद्दा नंबर ६ - हिंदू दहशतवादाबद्दल बोलले की अल्पसंख्याकांची मते मिळतात यासाठी हे राजकारणी मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवादाकडे सोईस्कर डोळेझाक करतात. कालचा हल्ला हा याचाच परिपाक नसेल? मुस्लिम दहशतवाद जगासाठी सर्वश्रुत असताना यावर बोलताना कोणीही दिसत नाही याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते.

माझ्या मते तर हा हिंदुस्थानच्या सर्वभोमत्वावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये असणारी विचारधारा ही सैन्याला मारण्याच्या पलीकडची आहे कदाचित त्यांना हिंदूंनाच मारायचं आणि हिंदुस्थान ताब्यात घ्यायचा आहे अस ही असू शकत म्हणून तर हे आतंकवादी मृत्यूनंतर जन्नत ची वाट पाहतात आणि मृत्यूला सामोरे जातात.
याचा इतिहाससुद्धा खूप मोठा आहे आणि हिंदुस्थानला त्रास देने हा एकच हेतू यामागे असू शकत नाही, यामधून आपण इतिहासाची पार्श्वभूमी अभ्यासन्याची गरज आहे अन्यथा असे कितीतरी हल्ले या मातृभूमीवर होतच राहतील आणि निष्पाप हिंदूंचे आणि आपल्या सैन्याचे बळी जात राहतील.
मुस्लिम विचारधारेचा उत्तरे देण्याचा प्रयत्न आपल्यातील विचारवंतांनी वेळोवेळी केला आहे परंतु त्यांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचले नाहीत अशा हल्ल्यांपासून आपण वेळीच सावध झालो नाही तर बाहेरील देश आणि देशातील गद्दार आपल्या डोळ्यादेखत या मातृभूमीचे तुकडे पाडतील. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढील पिढीला आपण कोणत्या नरक यातनेत सोडू याची कल्पनाही करवत नाही.

आपण सर्व सुज्ञ आहात याचा आपण आपल्या परीने अन्वयार्थ लावालआणि शोध घ्याल ही अपेक्षा.

आपला सत्य धर्म

समाजविचार

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

23 Feb 2019 - 10:05 am | आनन्दा

दुर्दैव हे आहे की त्यांना स्वतःला हे कळत नाहीये..
आपल्याला कळून काय उपयोग?

सुप्रिया ताईंना बॅग पॅक करून काश्मीरला जावे वाटतं. प्रेमाने प्रश्न समजून घ्यावा म्हणताय. या लोकांना तेव्हाच काश्मीरी लोकांचा कळवळा येतो जेव्हा सरकार काहीतरी निश्चित भूमिका घेते. त्यात धाकटी पाती डोवाल साहेबांचीच चौकशी लावायला चाललेत.

मदनबाण's picture

11 Mar 2019 - 10:45 pm | मदनबाण

आता पुलवामा. हा धागा वाचनमात्र करण्यात आल्याने इथे प्रतिसाद दिला आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kesari | Official Trailer