[शशक' १९] - वेंधळा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
13 Feb 2019 - 8:47 am

नेहमी वेंधळेपणा करतो म्हणे! एखाद्या वेळेस चावी किंवा ग्रोसरी गाडीत राहिली म्हणुन लगेच?

त्याने आठवणीने गाडी रिवर्स लावली, वायपर्स उभे करुन ठेवले. शॉवेल आणि ब्रश ट्रंकमधुन घेताना त्याला मागच्या वेळची फजिती आठवली. दोन फुट बर्फ आणि हत्यारं सगळी गाडीच्या ट्रंकेत!

रात्रभरात गुडघ्याइतका बर्फ पडला होता. अर्धा तास आधीच उठुन समीर खाली गेला.

गाडी स्टार्ट करुन ठेवावी का? एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड असेल. मागे एकाच्या गाडीत कार्बनमोनॉक्साइड पसरुन गुदमरुन गेला. नकोच, त्यापेक्षा आधी चाकं मोकळी करु.

अर्ध्या तासानं तिन्ही बाजूचा बर्फ मनासारखा साफ झाल्यावर समीरनं खिशातुन चावी काढुन गाडी अन्लॉक केली.

नेहमीचा टुकटुक आवाज आला आणि शेजारच्या बर्फाच्या डोंगराखालुन चार दिवे लुकलुकले!

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

13 Feb 2019 - 9:27 am | प्रमोद देर्देकर

काही कळली नाही .
शॉवेल म्हंजे काय
एक्झॉस्ट बर्फात ब्लॉक्ड ही कोणती वाक्यरचना ? ?

विजुभाऊ's picture

13 Feb 2019 - 9:48 am | विजुभाऊ

शॉवेल म्हणजे खोरे
बाकी वाक्य रचना " हल्ली कीनई मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला फारच डिफिकल्ट जाते. धिस इज मात्र टू मच हं " टाईप ग्लोबल मराठीत आहे हे समजून घ्यावे

प्रशांत's picture

13 Feb 2019 - 11:59 am | प्रशांत

दुसर्‍याची गाडी साफ केली

पलाश's picture

13 Feb 2019 - 9:35 am | पलाश

+१. :))

विनिता००२'s picture

13 Feb 2019 - 10:18 am | विनिता००२

हा हा

बिचारा :)

+१

एमी's picture

13 Feb 2019 - 10:55 am | एमी

:D :D
+१

अनाम's picture

13 Feb 2019 - 12:35 pm | अनाम

=)) मस्त पोपट
+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2019 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

मस्तं आहे !

किसन शिंदे's picture

13 Feb 2019 - 1:26 pm | किसन शिंदे

कंच्या तरी एनारायची असावी ही कथा

तुषार काळभोर's picture

13 Feb 2019 - 2:03 pm | तुषार काळभोर

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2019 - 2:19 pm | मराठी कथालेखक

+१

तुषार काळभोर's picture

13 Feb 2019 - 2:57 pm | तुषार काळभोर

असहकार's picture

13 Feb 2019 - 4:22 pm | असहकार
खंडेराव's picture

13 Feb 2019 - 4:55 pm | खंडेराव

एका प्रसिद्ध विनोद / व्हिडीओ चा अनुवाद आहे मराठी. तो हि जमलेला नाहीये..

ज्योति अळवणी's picture

13 Feb 2019 - 5:32 pm | ज्योति अळवणी

मस्त. पण आंग्ल शब्दांपेक्षा मराठी वाक्यरचना आवडली असती

सुधीर कांदळकर's picture

13 Feb 2019 - 7:45 pm | सुधीर कांदळकर

आवडली. पण हा फारसा वेंधळेपणा नाही. ही केवळ नजरचूक आहे. पुण्यात ग्रे सिल्व्हर रंगाची अ‍ॅक्टीव्हा उभी केली की बर्‍याच वेळा बाजूला तश्शाच अनेक अ‍ॅक्टीव्हा लागतात आणि आपण तिसर्‍याच गाडीला चावी लावायचा प्रयत्न करतो. ही गाडी तर बर्फात ह्ती. रंग/मॉडेल पण दिसणार नाही.

समर्पक's picture

13 Feb 2019 - 11:49 pm | समर्पक

.

आनन्दा's picture

14 Feb 2019 - 12:50 am | आनन्दा

+1

रिम झिम's picture

14 Feb 2019 - 4:54 pm | रिम झिम

+१

लोथार मथायस's picture

14 Feb 2019 - 5:00 pm | लोथार मथायस

+1

स्मिता.'s picture

14 Feb 2019 - 6:22 pm | स्मिता.

+१
बिच्चारा! अर्धा तास केलेले कष्ट फुकटच गेले.

भीमराव's picture

17 Feb 2019 - 8:44 am | भीमराव

रुपी's picture

21 Feb 2019 - 5:04 am | रुपी

+१

दादा कोंडके's picture

21 Feb 2019 - 1:04 pm | दादा कोंडके

मस्त!

एकविरा's picture

21 Feb 2019 - 2:49 pm | एकविरा

मस्त

पिलीयन रायडर's picture

21 Feb 2019 - 4:14 pm | पिलीयन रायडर

+1
अर्रर्रर्र

शब्दबम्बाळ's picture

21 Feb 2019 - 11:04 pm | शब्दबम्बाळ

सिरियसली??
खरच असे वाटले की यावेळी शशकला उगीचच +1 मिळत आहेत.. द्यायचे म्हणुन द्या टाईप..
एक जुनी जाहीरात ढापुन शशक??

अंतु बर्वा's picture

27 Feb 2019 - 11:58 pm | अंतु बर्वा

आता स्पर्धा पुर्ण झाली आहे तेव्हा उत्तर देण्यास हरकत नसावी. मी सहसा उत्तरे देत नाही पण ढापलेली आहे हा शब्द वापरल्यामुळे हा खुलासा - मी मागची दहा वर्ष अमेरिकेतील पुर्व किनार्यावर रहात आहे. इथे वर्षातील कमीतकमी ३ ते ४ महिने बर्फव्रुष्टी होते. हा माझा स्वता:चा १०० टक्के खराखुरा अनुभव आहे. तेव्हा नवीन होतो, नुकतीच गाडी घेतली होती आणि एकदा अद्दल घडल्यावर माणूस आपोआपच शहाणा होतो. असा अनुभव येणे अगदिच कॉमन नसले तरी इथे दुर्मिळ नाही. अर्थात बाकीचा मसाला टाकला आहे हे खरं कारण तेव्हा माझं लग्नच झालेलं नव्हतं.

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2019 - 5:07 pm | चौथा कोनाडा

सुरुवातीला काहीच समजली नाही. प्रतिसाद वाचल्यावर समजली. वाक्यरचना वेगळी हवी .

चांगली आहे कथा ! आवडली.