जयपूर आणि उदयपूर बद्दल माहिती

सान्वी's picture
सान्वी in भटकंती
5 Feb 2019 - 12:23 am

नमस्कार,
पहिल्यांदाच या विभागात लेखन करत आहे.
आम्ही म्हणजे आम्ही दोघे व आमचे सव्वा वर्षांचे चिरंजीव पुढच्या आठवड्यात जयपूर आणि उदयपूर ला जाणार आहोत. जाणकार मिपाकरांनी व ज्यांनी या आधी ही ट्रिप केली असेल त्यांनी जरा आपले अनुभव सांगावे. २ दिवस जयपूर आणि २ दिवस उदयपूर असा प्लॅन आहे. राहण्याची सोय यजमानांच्या ऑफिस हॉलिडे होम मध्ये झाली आहे. प्रश्न फक्त हा आहे की प्रत्येकी 2 दिवसात कुठले must watch स्पॉट्स करावे? सोबत लहान बाळ आहे त्यादृष्टीने सांगावे. जयपूर चे हवामहाल न उदयपूर चे सिटी पॅलेस तर ऑलरेडी आहे लिस्ट मध्ये . तसेच शॉपिंग कुठे व कसली करावी?

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

5 Feb 2019 - 11:24 pm | चौथा कोनाडा

नुकतीच २ दिवसीय (२ दिवस, १ रात्र) फ़क्त उदयपुर सहल केली. अहमदाबादला मुक्काम असल्यामुळे सकाळी तिथून निघून (२७० किमि, ५ तास प्रवास) दुपारी २ला हॉटेलवर पोहोचलो. दिड दोन तासात जेवण करून आवरून फ़तेहसागर तलाव पाहिला. बोटींग केले. फार काही भारी वाटलं नाही. शेजारीच डोंगरावर महाराणा प्रताप यांचा पुतळा होता (बहुधा स्मारक) हाताशी वेळ अतिशय मर्यादित असल्यामुळं आणि आमच्या गाईडनं नाही पाहिलं तरी चालण्या जोगं आहे हे सांगितल्यामुळं हे ठिकाण पाहणं टाळलं.

आता संध्याकाळ झाली होती सहेलियोंकी बाडी ही बाग पाहिली. (मुक्त प्रवेश) खुप मस्त आहे. भरपूर फोटो काढले. गाईडने त्याच्या मस्त कहाण्या सांगितल्या मुळळं ही भेट खुप मनोरंझक झाली.
मग शॉपींग केले (दुलई कम बेडशीटस घेतल्या, मऊ आणि तलम आहेत) हे सर्कारी होते, अम्ही गेलो तेंव्हा शुकशुकाट होता.

रात्री नटराज डायनिंग येथे राजस्थानी-गुजराथी थाळी (रू २५०). खुप गर्दी होती, वेटर्सना आमच्या कडे पहायला वेळ लागत होता. एकंदरीत ही अन लिमिटेड थाळी छान होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ला लेक पॅलेसला पोहोचलो. हा पॅलेस आतून पहायला रू ३०० तिकिट आहे. पॅलेस आतून पाहणे हे नंतर नंतर कंटाळवाणे होते व वेळही जातो म्हणून साधी परिसर प्रवेश फ़ी रू ३० प्रति डोके हे तिकिट काढ्ले. खुप मजा आली. चिक्कार फोटो काढले ( हसू नका प्लिज, फोटोज, सेल्फ़ी काढणे आजकाल अन्न वस्त्र निवारा यांच्या इतकीच बेसिक नीड झाली आहे.)

या पॅलेसच्या पलीकडच्याच बाजूला चारशे वर्ष पुरातन जगदिश मंदिर, या वरचं शिल्पकाम अपरतिम आहे. अर्धापाऊण तास पुरतो, गर्दी नसेल तर.

जगदिश मंदिर पॅलेस वेगळे. हा सिटीलेक च्या मधोमध असलेले हॉटेल आहे. अत्यंत महागडे. इथं मोठी मोठी डेस्टिनेशन लग्नं होतात. येजहैदि या सुपर हिट हिंदी सिनेमाचं शुटिंग इथंल आणि आख्ह्या उदयपुर परिसरात झाले होते. हे ठिकाण अर्थातच आम्ही पाहिले नाही.
दुपारी ४-४:३० ला अहमदाबादला परत जायला निघालो. येताना राजस्थान-गुजरात सीमेवरचे श्यामलाजी कृष्ण मंदिर पाहिले. या वर सुध्दा सुंदर शिल्पकला आहे. अहमदाबादला घरी पोहोचायला रात्रीचा एक वाजला.

तुमच्याकडे ही तसा मर्यादित वेळ असल्यामुळं न दमता (कन्सिडरींग, सव्वा वर्षांचे चिरंजीव) मोजकी ठिकाणं पाहणं उत्तम !

अनिंद्य's picture

6 Feb 2019 - 3:05 pm | अनिंद्य

किल्ले-महाल- म्युझियमचा ओव्हरडोस होईल थोडा उदयपूर + जयपूर एकत्र घडले तर.

जयपूरचे जंतरमंतर मात्र गाईड घेऊन बघा.

शाकाहारी असाल तर जयपूरची खाद्यभ्रमंती जबरदस्त. साजूक तुपातल्या मिठाया - माखनीया लस्सी - प्याज कचोरी - चाट प्रकार हटके असतात. २ दिवसात किलोभर ह्या प्रमाणात वजन वाढते :-)

स्त्रीवर्ग स्थानिक बांधणी-लेहरीया ड्रेस / साड्यांवर मेहेरबान असतो. त्यासाठी बापू बाजार, जोहरी बझार -बडी चोपड ह्या प्रचंड गर्दीच्या भागात अनेक दुकाने आहेत. घासाघीस न होणाऱ्या जरा मोठ्या दुकानातून दिलखुष शॉपिंग होऊ शकते.

प्रवासाला शुभेच्छा !

अनिंद्य आणि चौथा कोनाडा खूप धन्यवाद तुमच्या विस्तृत आणि माहितीपर प्रतिसादासाठी. कमी वेळात चांगलं आणि मोजके पाहण्याचच ठरवलं आहे.

चौथा कोनाडा's picture

6 Feb 2019 - 5:19 pm | चौथा कोनाडा

कमी वेळात चांगलं आणि मोजके पाहण्याचच ठरवलं आहे.

+१