मालिका बघणारे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
4 Feb 2019 - 5:17 pm
गाभा: 

मालिका बघणारे म्हणजे बुद्दू मती व गती मंद असा सोयीस्कर समज मालिका निर्माते लेखक दिग्दर्शका नी करून घेतलेला अशी एक शंका येते
वानगी दाखल उदाहरण द्यायचे झाले तर
राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका म्हणजे तद्दन बालिश प्रकार आहे
नायीका राधा व अन्विता ह्या वर्ष सव्वा वर्षा पासून प्रेग्नेंट आहेत पण त्याचे पोट मात्र प्रेग्नेंट बाईसारखे पुढे आलेले दिसत नाही
नायिका राधा तर सर्व गुण संपन्न अशी नायिका आहे
ती मनात आले की पाच हजार कोटींचा व्यवसाय सांभाळते तर मनात आले की फ्याशन डिझाइनर बनते व साडी या विषयावर कीर्तन करते
तिचा भाऊ आदित्य तर टपोरी असून त्याने खून केले आहेत तरी पोलीस त्याला पकडत नाही
दीपिका व तिची आहे देवयानी ह्याना तर खून करण्याचा छंदच आहे
पोलीस अधिकारी विकत घेतलेत असे ते अभिमानाने सांगतात
नायक प्रेम हा काही काम न करता पाच हजार कोटी चा व्यवसाय करतो
विवाह बाह्य प्रकारणे लफडी आदीचे उदात्तीकरण जोरात केलेले आहे
राधाची आई दिवाळीचा फराळ व्यवसाय करत असते व ती पण २-३ लाखाचा व्यवसाय करत असते
प्रेम कायम चाळीतल्या खोलीत सासुर वाडी ला पडीक असतो
त्याचा ५ कोटिचा बंगाला असतो
तो दीपिका व राधा या दोघींचा पण यथेछय उपभोग घेत असतो
राधाचे पिताश्री कीर्तन करतात व राधा पेटी वाजवत असते
श्रावणी काकू हे एक पात्र आहे जे तोंडाला येईल तसे वाट्टेल ते बकत असते
चाळीतले चाळकरी व दामुअण्णा पूर्ण हुकलेली पात्रे आहेत
व ते अशक्य आहेत
सर्व मिळून दर्शकाचा अंत व सहन शक्तीची परीक्षा घेतात

प्रतिक्रिया

तुम्ही कशाला अमची परीक्षा घेताय?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Feb 2019 - 6:12 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे बोललास रे अवी. ती राधिका सुभेदार लोणची बनवून ३०० कोटींची उलाढाल करते.'तुला पाहते रे' ही पण अशीच एक मालिका. एक घराणे श्रीमंत दाखवायचे. दुसरे घराणे अतिशय गरीब. अगदी ५० वर्षापुर्वी दादर्/गिरगावात राहणार्या शहरी मध्यमवर्गाची आठवण व्हावी. "लंडनला जाणार' हे ऐकल्यावर घरातली सर्व मंडळी चकित होऊन हाता-पायाची सर्व बोटे तोंडात घालतात..स्वयंपाक घरात अगदी पितळेची भांडी दाखवतात. घरी कुणी पाहुणा आला की एक पाण्याचा तांब्या हातात देतात. तो पाहुणापण न आलेला घाम पुसतो.. गेला तो काळ.. सांगायला हवे ह्या सिरियलवाल्यांना कुणीतरी.

दीपक११७७'s picture

4 Feb 2019 - 7:41 pm | दीपक११७७

माई ( भिक्षुकाच्या आवाजात)

खरं बोलते आहे!