भाग ३...अवजड सामानाची रवानगी बोटीवरून…!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
1 Feb 2019 - 1:02 pm
गाभा: 

भाग ३...
अवजड सामानाची रवानगी बोटीवरून…!

1

महाराजांच्या आखणी प्रमाणे जे सामान ओलेचिंब झाले, नैसर्गिक आपत्ती येऊन बुडाले किंवा चाच्यांच्या तावडीत सापडून गमवावे लागले तरी चालेल अशा बोजड साधन संपत्तीचे ‘लोढणे’ जमिनीवरून वाहून नेण्यातील गैरसोई आणि धोके लक्षात घेऊन या भागातील मालवाहू जनावरांना रस्ता बदल करून अशा वाटेने ‘दमण’ या त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील बंदरात नेऊन तेथून दाभोळ च्या खाडीत आतवर आणायचे असा निर्णय घेणे योग्य आहे असे मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना लक्षात येते. 1669 साली महाराजांनी एक करार करून मालवाहतुक करायला जहाजे पैसै भरून दमण ते मुंबई बेटापर्यंतच्या सुमारे 200 किमी पट्टीतील समुद्रात पोर्तुगीजांची परवानगी मिळेल अशी सोय केली होती.

2

दमण पर्यंतच्या वाटा कशा निवडाव्या ? पूर्णा नदीच्या अरुंद पात्रातून जायला कमी त्रास होईल. वाटेतील रामनगर आणि जव्हार संस्थानाच्या अखत्यारीतील जमिनींचा भाग आहे त्यावरून जावे लागेल. मात्र धनसंपत्तीने लादलेल्या जनावरांकडे पाहून त्यांना ते वाटेतील मिळालेले ‘घबाड’ असे वाटून लोभाने ते जीवतोडून हल्ला करू शकतात. यासाठी त्यांच्या सेनेच्या केंद्रांना चुकवत चुकवत, अदिवासी भागातील बोली भाषेतील वाटाडे व मालवाहतूकदारांकडून कामे करवून घेतले गेले असेल.

3

धर्मपूर पर्यंत त्यांच्या वाटेत कोणाचा धोका उत्पन्न झाला नाही असे मानले तर बारडोली ते धरमपेठ 100 किमी अंतर पार करायला 4 ते 5 दिवस लागले असावेत. त्यानंतर दिशा बदलून वापी गावाला पोचल्यावर. तांडे तिथेच थांबवून घोडदळाने पुढे कूच करून दमणच्या जाऊन तेथील परिस्थिती पाहून बंदरात किती जहाजे उभी आहेत. तांड्यांसोबत आणलेल्या मालाला न्यायला किती जहाजे लागतील. त्यातील व्यापारी किती? आरमारी किती? याचा शोध घेण्यासाठी महाराजांच्या विश्वासातील सरदार आनंदराव मकाजी गेले असावेत. पोर्तुगीजांनी तसे सहकार्य करावे यासाठी पुर्वीच्या कराराची प्रत दाखवून जहाजे मिळवणे, बंदरावरील धक्क्यावर बोट भरायच्या तंत्राला अवगत तेथील हमालांना कामाला बोलावले गेले असेल. यानंतर जहाजावरच्या कप्तान आणि त्याच्या क्रू म्हणजे अन्य चालक मंडळींना पैसे चारून पुढील प्रवासासाठी धान्य, भाजीपाला वगैरे भरून शिडे सांभाळणारे, दिशा ठरवणारे, वल्ही मारणारे वगैरेची माहिती काढून, पायदळाच्या पथक सैनिकांचे वजन वजा करून किती सामान प्रत्येक जहाजावरून नेता येईल यावर विचार केला असेल.
*काही (दहा) जहाजे अशा कामांसाठी वापरली गेली असे त्या वेळच्या पत्रातून सांगितले गेले होते. एका जहाजात किती सामान भरले जात असे यावर जहाजाचा आकडा ठरेल. वजनाचा अंदाज बोटीचा लोड मास्टर ठरवत असावा. सोने-चांदीच्या दागदागिन्यांचे, जरीवर्क, लाकडीसामान बनवणारे कारागीर, कलाकुशल पकडून आणलेल्या लोकांना आणि वाटेत चाचांच्या हल्ल्यापासून सामानाच्या रक्षणासाठी जितके मावतील कदाचित1हजार पेक्षा जास्त मराठे सैनिक जहाजात असू शकतात. जहाजे कुठे जाणार आहेत ते मुद्दाम सांगितले गेले नसावे. कारण काही जहाजे त्यानंतर हा काफिला कुठवर जातो याचा माग काढायला पाठवली गेली होती.
ह्या जहाजांची पाठवणी केल्या नंतर सूरतेवरून थेट दमणपर्यंत आलेल्या मालवाहतूकदारांना त्यांचे मालवाहू प्रवास भाडे चुकते करायला आणि वर भरपूर मानधन देऊन परतवले असेल. पर्यंत साधारणपणे ८ दिवस झाले असावेत. दिनांक २५ ऑक्टोबर नंतर त्या तांड्यांसोबत गेलेल्या घोडदळाने सरदार मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवाजी महाराजांच्या सोबतच्या तांड्याला मिळायला मुल्हेरची वाट पकडली असावी.

4

…. भाग 4 पुढे चालू...

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

1 Feb 2019 - 1:33 pm | विजुभाऊ

हा विचारच केला नव्हता कधी

चित्रगुप्त's picture

1 Feb 2019 - 6:24 pm | चित्रगुप्त

जबरदस्त लेखमाला. छत्रपतींच्या जीवनातल्या किंवा इतर ऐतिहासिक-पौराणिक घटनांबद्दल त्याकाळी प्रत्यक्षात कसे काय घडले असावे याबद्दलचे संशोधन आणि लिखाण व्हायला हवे. हा विषय हाती घेतल्याबद्दल अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा.

दुर्गविहारी's picture

2 Feb 2019 - 7:46 pm | दुर्गविहारी

खुपच अभ्यासपुर्ण लिखाण. वाचत आहे. काही संदर्भ सापडले तर नक्कीच प्रतिसादात देईन.

सातमाळाचा घाट व डोंगराळ चढाचा लांबचा मार्ग निवडण्यामागे महाराजांचे काय नियोजन असेल?
विचार वाचायला आवडतील