गाये तो गाये कहा

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
19 Jan 2019 - 2:09 pm

गाये तो गाये कहा

मला गाण शिकायच आहे खर पण आवाज साथ देत नाही. तस लहानपणी मुलीला झोपोवताना अंगाई गीत म्हणून तीला झोपवले होते नाही अस नाही पण त्यातही ती जास्त गाण ऐकायला नको म्हणून कदाचित लवकर झोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विचारल तर सांगेल ही एखाद वेळेस.

माझी गाण म्हणण्याची हौस मी गणपतीच्या आरती म्हणतात तेंव्हा भागवून घेतो. भक्त संकटी नानाSS म्हणताना आमच्या सोसायटीतल्या नाना नाडकर्णीना बघत नाना तला ना (पहीला ना नाही दूसरा ना ) ओढ़त ओढ़त म्हणतो. तो इतरांच्या आवाजात आवाज मिसळून म्हटल्या मुळे चालून जातो. आरती म्हणताना आपली गायनाची हौस भागवून घ्यावी या स्पष्ट मताचा मी आहे. यात तुमचा आवाज एक्सपोज होण्याची शक्यता फार कमी असते आणि आरती म्हणणारे आणि ऐकणारे सेम असल्या मुळे अडचण होत नाही.

माझ्या बाबाना गाण ऐकण्याची फार आवड होती. ती आवड माझ्यात यावी अशी त्यांची इच्छा होती. कधी कधी ते मला जबरदस्ती ने गाण ऐकायला घेऊन जात आणि आम्ही कार्यक्रमाला लवकर जाऊन पहिली किंवा दुसरी रांग पकड़त असू. गाण्यात "जागा घेणे " म्हणजे लवकर जाऊन पहिली दूसरी सीट पकड़णे अशी पुढे कित्येक वर्ष माझी समजूत होती आणि ती अगदी परवा परवा पर्यन्त कायम होती. शून्य प्रहरात ( म्हणजे शाळेत जायच्या थोडेसे आधी ) मी शून्यात बघून (म्हणजे आरशात स्वत: कडे बघून ) गाण म्हणणयाचा सराव करीत असे. आमच्या शाळेच्या समूह गीताच्या स्पर्धेत मी साधारण तिसऱ्या फळीचा भिडू असे. आमच्या शाळेत आम्ही एकदा " वेडात मराठे वीर दौडले सात " हे वीर रस पूर्वक गाणे म्हटले होते. माझे आणि माझ्या सरख्या आणिक दोन विरांचे गाणे पाठ नसल्याने आमच्या हातात गाण्याचा कागद होता. तेंव्हा अचानक काय झाल माहीत नाही पण अचानक जोराचा वारा आला आणि तो गाण्याचा कागद वारयावर उडाला आणि मी आणि माझ्या बरोबरचे दोन वीर "वेडात मराठे वीर दौडले सात " म्हणत आठवे , नववे आणि दहावे वेडे बनून त्या कागदाच्या मागो माग दौड़त निघालो. आमच्या बाई ते बघून डोळ्यात पाणी येई पर्यंत हसत होत्या. आणि तेंव्हा पासून माझे गाणे ( आणि माझ्या पासून गाणे ) सुटले ते कायमचेच

संगीतविरंगुळा

प्रतिक्रिया

मलाही प्रचंड आवड आहे , हि हौस मी मी मस्त गाडी वर किंवा सायकलवर हेडफोन लावून गाऊन पूर्ण करते .कधी कधी चुकून एकदा बाजूचा गाडीवाला वळून बघतो ,पण काही फरक पडत नाही ( तसा पण पुण्यात मुली फुल्ल स्कार्फ घालून असतात, कुणाला काळात कोण होतं ) हेडफोन कधी पूर्ण आवाजात नसतात कारण आजूबाजूचा आवाज हि ऐकायचा असतो , म्हणून शक्यतो in-ear हेडफोन वापरात नाही on-ear हेडफोन वापरते . खरतर पुण्याच्या गर्दीत हेडफोन लावून चालल्यावर बाजूच्या हॉर्न चा आवाज थोडा कमी येतो, नाहीतर सतत तो आवाज ऐकून डोकं दुखायला लागते .

थोडी अजून माहिती .
परदेशात karaoke म्हणून ऐक प्रकार असतो विषेशतः दक्षिण कोरियात , तिथले लोक कराओके मध्ये जाऊन गातात , ऑफिसची पार्टी असो किंवा घराच काही कार्यक्रम ,किंवा मित्र भेट , ते लोक मनसोक्त गातात कराओके मध्ये .अगदी म्हातारी माणसेसुद्धा . तिथे गाणे गाऊन ते लोक स्ट्रेस कमी करतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2019 - 1:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

खुसखुशित ! अजून लिहा.

चित्रगुप्त's picture

18 Dec 2022 - 2:58 am | चित्रगुप्त

अजून लिहा हो मूखदूर्बळपंत. तुमच्या लेखांचे फ्यान हैत इथे.