अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे'

Primary tabs

मनिम्याऊ's picture
मनिम्याऊ in काथ्याकूट
15 Jan 2019 - 4:25 pm
गाभा: 

मला बर्याच दिवसांपासून 'अरेबिअन नाइटस् - अनु. गौरी देशपांडे' वाचायची इच्छा आहे. नेटवर शोधाशोध केली असता मला कुठेही रिव्ह्यू मिळालेले नाही. हे पुस्तक 16 भागांत विभागले असुन किम्मत बर्यापैकी जास्त आहे. (त्यामुळे एकदम ओर्डर द्यायला हिंमत होत नाहीय)

तर आपल्यापैकी कोणी 'अरेबिअन नाइटस् - मूळ लेखक सर रिचर्ड बर्टन, अनु. गौरी देशपांडे' वाचले आहे का?

असल्यास प्लिज इथे रिव्ह्यू द्यावा

(खरतर हे लिखाण प्रश्नोत्तराच्या विभागात असायला हवे पण तेथे access denied येत असल्याने येथे का. कू . टाकला )

प्रतिक्रिया

पूर्ण झालं नाही वाचून. पण चांगलंय.

एक लक्षात घ्यायला हवं. अरेबियन नाईट्स हे फक्त काल्पनिक कथांसाठी म्हणून वाचू नका, कारण त्यासाठी वाचायला घेतलंत तर लवकरच कंटाळा येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर भटकंती, निरनिराळ्या संस्कृती, इतिहास, निरनिराळी गावं-शहरं.. हे सगळं बघण्याचा, अनुभवण्याचा दृष्टिकोन असला तर आवडेल.

आणिक एक, गौरीतै चांगलंच कडक लिहितात. त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता अनुवाद केलाय. त्यामुळे काही भाग अश्लील वाटू शकतो, पण त्याकडं दुर्लक्ष केलेलं बरं.

रिचर्ड बर्टनच्या टीपा जास्त माहितीपूर्ण आहेत. त्यानं घेतलेली मेहनत कळून येतेच.
शुभेच्छा! :-)

माझीही शॅम्पेन's picture

17 Jan 2019 - 4:21 pm | माझीही शॅम्पेन

शब्द आणि शब्द खरा आहे मी जवळपास १० खंड वाचले आहे , एका अदभूत जगाची सफर आहे , देशपांडे मॅडमने परखड भाषांतर केलं आहे

जबरदस्त पुस्तक आहे. कॉलेज मध्ये असताना एक खंड वाचला होता. फक्त एक लक्षात ठेवा हे फक्त प्रौढांसाठी प्रकारचे पुस्तक आहे.

सर्व १६ खंड संग्रही आहेत. चार पाच वर्षांपूर्वी अगदी स्वस्तात म्हणजे केवळ ६०० रूपयात मिळालले होते. आजही पुण्यातील दुकानांमधे शोधाशोद केल्यात बर्‍यापकी स्वस्त मिळू शकतील.

हे अरेबियन नाईट्स मात्र प्रौंढांसाठीच आहे. मुलांसाठी जर घ्याय्च असेल तर चिपळूणकरांनी केलेला अनुवाद घ्या.

मनिम्याऊ's picture

16 Jan 2019 - 11:11 am | मनिम्याऊ

सर्वान्चे आभार.

तुम्हाला जर भटकंती, निरनिराळ्या संस्कृती, इतिहास, निरनिराळी गावं-शहरं.. हे सगळं बघण्याचा, अनुभवण्याचा दृष्टिकोन असला तर आवडेल

मला मध्ययुगीन समाज संस्कृतीचं त्यातही मध्यआशिया आणि अरबजगता बद्दल फ़ार फ़ार कुतुहल आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायची जबरदस्त इच्छा आहे. तसेच भूगोल हा माझ्यासाठी खास अभ्यासाचा विषय. भलेही ओफिस मधे आधुनिक तंत्रज्ञान वापरुन काम आधुनिक भूगोलासाठी करते पण मन मात्र ऐतिहासिक भूगोलात जास्त रमतं.

रिचर्ड बर्टनच्या टीपा जास्त माहितीपूर्ण आहेत. त्यानं घेतलेली मेहनत कळून येतेच

अत्यंत अभ्यासू आणि तितकंच धाडसी व्यक्तिमत्व.

सर्व १६ खंड संग्रही आहेत. चार पाच वर्षांपूर्वी अगदी स्वस्तात म्हणजे केवळ ६०० रूपयात मिळालले होते. आजही पुण्यातील दुकानांमधे शोधाशोद केल्यात बर्‍यापकी स्वस्त मिळू शकतील.

खूप खूप आभार प्रचेतसजी

फक्त एक लक्षात ठेवा हे फक्त प्रौढांसाठी प्रकारचे पुस्तक आहे

त्याची कल्पना आहे. शेवटी काय घ्यावे काय सोडावे हे आपले आपणच ठरवावे.

कंजूस's picture

16 Jan 2019 - 3:24 pm | कंजूस

मला इंग्रजी पुस्तक १०० रुपयांत मिळाले होते.

--
लौंडा (चाइल्ड पोर्नोग्राफीचे मूळ) आणि फसवणाऱ्या बगदादमधल्या हौरी यांची माहिती लहान मुलांसाठी नाही.

>>शेवटी काय घ्यावे काय सोडावे हे आपले आपणच ठरवावे.>>

म्हणजे लहान मुले पाचवी -आठवी यांना अजून समज नसते.

गरीबी ही अगदी साडेचार हजार वर्षांपासूनही जुनी असल्याचे पुरावे आहेत. अन्यथा जनानखाने नसतेच. गरीबांच्या मुली,मुलेच असत तिथे. आणि राखायला हिजडे.

चित्रगुप्त's picture

16 Jan 2019 - 11:06 pm | चित्रगुप्त

लहानपणी चिपळूणकरांच्या 'सोवळ्या' 'अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा' ची अनेक पारायणे केली, नंतर खूप वर्षांनंतर दिल्ल्लीच्या तुलसी सदन ग्रंथालयात गौरी देशपांडे यांनी अनुवादलेल्या रीचर्ड बर्टन यांच्या 'ओवळ्या' अनुवादाचाही आस्वाद घेतला.

.

शरद's picture

19 Jan 2019 - 11:48 am | शरद

पुण्यात माझ्याकडे १६ भाग आहेत. कोणाला वाचावयास पाहिजे असतील तर संपर्क करा. (२५६७१३८४)
शरद

jinendra's picture

19 Jan 2019 - 11:07 pm | jinendra

पुण्यात किंवा कोल्हापूर मध्ये कुठे विकत मिळतील का?
मी पण बरेच वर्ष शोधतो आहे, कृपया जाणकारंनी माहिती द्यावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2019 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

इंग्लिश भाषेतील सर्व १६ खंड, खालील संस्थळावर, पीडीएफ फाईल्सच्या स्वरूपात, मिळतील...

http://www.burtoniana.org/books/1885-Arabian%20Nights/

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2019 - 6:48 pm | टवाळ कार्टा

ठ्यांकू :)

jinendra's picture

21 Jan 2019 - 3:36 pm | jinendra

मी काही फाईल्स download केल्या आहेत.
पण old इंग्लिश जमत नाही वाचायला. त्या मुळे मराठी मधील बघत होतो. आभारी आहे.

इरसाल's picture

21 Jan 2019 - 2:45 pm | इरसाल

अक्षरधारा.कॉम वर आहेत मराठी २८०० ला घरपोच.

jinendra's picture

21 Jan 2019 - 3:29 pm | jinendra

मी चेक करतो.
आभारी आहे.

jinendra's picture

22 Jan 2019 - 7:23 pm | jinendra

पुस्तके ऑर्डर केली आहेत. आपला खूप आभारी आहे.

इरसाल's picture

23 Jan 2019 - 1:11 pm | इरसाल

पुस्तके हातात मिळाल्यावर सांगा कसे आहेत म्हणजे मलाही ऑर्डर करायला बरे.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2019 - 3:34 pm | टवाळ कार्टा

जड असतील बहुतेक ;)

मनिम्याऊ's picture

22 Jan 2019 - 9:48 am | मनिम्याऊ

सर्वान्चे आभार. पुस्तक घ्यायचे नक्की केलय

jinendra's picture

22 Jan 2019 - 7:26 pm | jinendra

सर्वांचे आभार.