पुणे - गोकर्ण

Primary tabs

nandan's picture
nandan in भटकंती
23 Dec 2018 - 9:29 am

नमस्कार मित्रानो

मला गोकर्ण महबलेश्वर ला जायचे आहे ..तर पुण्याहून सेल्फ ड्रायव्ह चा पर्याय सुचवाल का ? तसेच तेचून आणखीन ३ दिवस पाहण्यासारखे काही महत्वाचे ठीकाण सुचवाल का ?

किंवा अगोदर कुणी पोस्त केली असेल तर कुपया लिंक द्यावी ..मला उपयोगी पडेल प्लान करण्याकरिता ..

नंदन

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

23 Dec 2018 - 11:28 am | प्रमोद देर्देकर

हे आमचे सासर त्यामुळे जी काही महिती आहे ती सांगत आहे.
गोकर्ण समुद किनारी गेल्यावर डाव्या हाताला टेकडीवर एक रामाचे मंदिर आहे. तिथून खूप सुंदर नजारा दिसतो.
गोकर्ण मध्ये मुख्य देवळाला प्रदक्षिणा घालताना मागील बाजूस एक छोटी चौकोनी विहीर आहे ती म्हणजे रावणाने लिंग उचलत असता उलटी केली म्हणून
वाटाड्या किंवा पुजारी लोक सांगतात.
बाजारातून गेलात तर कोटी तीर्थ परिसराला भरत द्या. तिथे तलावात एक कोटी लिंग आहेत अशी दंत कथा आहे.
पुढे समुद्र किनारी मुरुडेश्वरला जा तिथे शंकराची खूप उंच भव्य मूर्ती आहे .
वरती जावू शकतो. नजारा खूप छान दिसतो.
धर्मस्थळ हे अजून एक प्रसिद्ध ठिकाण आहे. डिस्कवरी चेनेलवर एक डॉक्युमेंटरी आहे. you tube वर मेगा किचन या सदराखाली शोधा म्हंजे सापडेल.
अजून काही माहिती हवी असल्यास लिहा सासूबाईना विचारून लिहीन .

राहुल करंजे's picture

23 Dec 2018 - 2:09 pm | राहुल करंजे
राहुल करंजे's picture

23 Dec 2018 - 2:09 pm | राहुल करंजे
राहुल करंजे's picture

23 Dec 2018 - 2:10 pm | राहुल करंजे
राहुल करंजे's picture

23 Dec 2018 - 2:10 pm | राहुल करंजे
राहुल करंजे's picture

23 Dec 2018 - 2:11 pm | राहुल करंजे
चौथा कोनाडा's picture

23 Dec 2018 - 5:58 pm | चौथा कोनाडा

हे उपयोगी पडते का पहा:

गो. म. सहल

रूपेरी कर्नाटक सहल

nandan's picture

24 Dec 2018 - 8:51 am | nandan

धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

24 Dec 2018 - 1:21 pm | चौथा कोनाडा

..तर पुण्याहून सेल्फ ड्रायव्ह चा पर्याय सुचवाल का ?

ते तुमच्या कॉन्फिडन्स वर अवलंबून आहे.
ड्रायव्हिंगचा सराव आणि धाडसाची आवड असेल तर या पर्यायाच जरूर विचार करा.

कोणत्या घाटाने खाली उतरणार?

श्वेता२४'s picture

24 Dec 2018 - 1:50 pm | श्वेता२४

आम्ही 2016 च्या एप्रिल महिन्यात गोकर्ण लागेलो होतो. मुरुडेश्वर छान आहे. शंकराच्या भव्य मूर्तीच्या मंदीरातील प्रदक्षिणा मार्गात गोकर्णमहाबळेश्वर लिंगस्थापनेची कथा दर्शविणारे पुतळे आहेत. छान वाटतं ते पाहायला. बाकी तो बीचदेखील छान आहे. समुद्रकिनारी असतात ते सर्व मनोरंजन प्रकार तेथे आहेत. येताना तुम्ही अंशी नॅशनल पार्क मधून या सुंदर रस्ता आहे. आम्ही मुरुडेश्वर मधून साधारण 12 वाजता निघालो आणि अंशी नॅशनल पार्कमध्ये संध्याकाळी 5.00 च्या सुमारास पोचलो. तोपर्यंत जंगल सफारीची शेवटची जीप गेली होती.येथे हत्ती सफारी करायला मिळेल. जंगल सफारीसाठी जीप उपलब्ध आहेत. खूपच रमणीय ठिकाण आहे ते. राहण्यासाठी जंगलात कॉटेज उपलब्ध आहेत. आम्हाला त्याबद्दल फारसं काही माहित नसल्याने आम्ही हत्तीवर बसण्याचा आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतला. तथापि तुम्ही आवड असल्यास एक दिवस त्याकरीता राखू शकता. किंवा येण्याच्या मार्गावर असल्याने सकाळी लवकर पोहोचून जंगलसफारीसाठी तेथे जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्यांचा लाभ घेऊ शकता.