मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 10:53 am

https://www.misalpav.com/node/42929

“डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”.....

टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला ....

ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!”

टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे . क्वचित किंवा Rare साईड इफेक्ट्स म्हणजे संपूर्ण अंगाला खाज येणे, सांध्यांना सुज येणे , डोळ्यांचा त्रास म्हणजे Colour vision ह्याशिवाय यकृत/Liver वर परिणाम होऊन काही दिवस औषधे थांबवून परत सुरू करता येतात....

पण टिबी आणि त्याच्या औषधांचे भयंकर साईड यांचा आपल्या लोकांवर ईतका काहीतरी मोठा गैरसमज आहे की बरेचदा ह्याचं निवारणच टिबीपेक्षा अवघड काम असतं.

_________________॰_______________

“टिबी नही है”.......

म्हणताक्षणी बापलेकांनी भरल्या डोळ्यांनी दोघांनी नमस्कार केला आणि धन्यवाद म्हणाले, खर त्या मुलाचा टिबी बरा होऊन २ वर्षे झालेली पण हा टिबीच आहे ह्या भ्रमात होते आणि ह्या सगळ्याचा खूपच त्रास होता...

त्याच्या श्वासाची तपासणी केल्यावर दमा आहे हे सांगितलं आणि ही टिबीची लक्षणं नाहीत हे समजावून सांगीतलं .....

त्यांना असलेल्या दम्यापेक्षा नसलेल्या टिबीची भितीच जास्त होती !!

मला तर जास्त आनंद त्यांच्या मानगुटीवर बसलेल्या टिबीच्या भुताला उतरवल्याचा होता :))

_________________॰_______________

औषध बदलून दिलं तरी सर्दी कमी होत नव्हती , पेशंट फोनवरून सांगत होता आणि मला जाणवत होतं की काही तरी गडबड होते आहे ....

नाकात टाकायचे ड्राॅप्स कसे घेता हे विचारल्यावर पेशंट म्हणाला की तुम्ही सांगीतल्याप्रमाणे पाण्यात २ ड्राॅप्स टाकतो आणि पाणी गरम करून वाफ घेतो. डोक्याला हात मारायची माझी पाळी होती कारण नाकात २ ड्राॅप्स टाकून नंतर गरम पाण्याची वाफ घेणे अश्या क्रमाने करायची क्रिया लिहून दिल्यावरही ही पेशंटनी गडबड करून दाखवली होतीच.

ही हसवणारी घटना मला हे शिकवून गेली की पेशंट बरेचदा चुका करतात आणि आपण डाॅक्टर्स कधी कारणीभूत नसलो तरी communication gap मुळे असं होऊ शकतं...!

__________________॰______________

“हा दमा आहे”....... रिपोर्ट बघत पेशंटशी बोललो , त्यावर त्यांनीच प्रतिप्रश्न केला “मी तर नियमीत व्यायाम करतो, तरी मला दमा झालाच कसा ?”.

हा एक गैरसमज आहे की व्यायाम केला तर दमा होऊ शकत नाही किंवा दमा असतांना तुम्ही व्यायाम किंवा शारिरीक श्रमाच्या गोष्टी करू शकत नाही...

त्या पेशंटला समजावतांना हेच म्हणालो दम्याचा आणि तुमच्या क्षमतेचा काहीही संबंध नाहीये कारण बरेचसे खेळाडू (पि.टी. उषा, सौरव गांगुली, ईयान बोथम,पि.कश्यप, शोएब अख्तर ) अभिनेते (अमिताभ बच्चन , प्रियांका चोप्रा) ही लोकं दमा असतांनाही यशस्वी का होऊ शकली ? कारण दम्याचं योग्य निदान आणि योग्य उपचार केवळ ह्यामुळेच !

“त्यासाठी तुमचा नियमीत व्यायाम चालू द्या आणि नियमीत उपचारांनी दम्यावर योग्य नियंत्रण आणून औषधं कमी किंवा बंद देखील करू...!” हे सांगीतलं.

_______________•________________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियाअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

6 Nov 2018 - 11:18 am | शैलेन्द्र

अल भारी झालाय भाग

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Nov 2018 - 11:22 am | भ ट क्या खे ड वा ला

मस्त जमलाय .
यशस्वी दमेकरी माहीत नव्हते इतक्या संख्येने असतात हे

देशपांडेमामा's picture

6 Nov 2018 - 12:04 pm | देशपांडेमामा

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल

देश

Nitin Palkar's picture

6 Nov 2018 - 4:43 pm | Nitin Palkar

सुंदर.... नेहमी प्रमाणेच.

स्मिता.'s picture

6 Nov 2018 - 5:08 pm | स्मिता.

नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते.
डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

वन's picture

19 Nov 2018 - 11:59 am | वन

आणि उपयुक्तही .

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2018 - 12:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा भागही आवडला
पैजारबुवा,