उत्सव...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
31 Oct 2018 - 10:10 am

आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले.
... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला.
‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’
फोन कट झाला. तो आनंदाने उचंबळत होता.
‘टाॅमी सापडला!’ तो आनंदाने ओरडला, आणि मुलं त्याला बिलगली.
... पुढच्या क्षणाला घरात आनंदोत्सव सुरू झाला!!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

31 Oct 2018 - 10:18 am | अनन्त अवधुत

टोचली हि कथा.

श्वेता२४'s picture

31 Oct 2018 - 10:48 am | श्वेता२४

पण असंही होऊ शकतं. घरातल्या माणसांपेक्षा किंवा एकंदर माणसांपेक्षा प्राण्यांवर जास्त प्रेम करणारे व त्यांचा मान व किंमत ठेवणारे लोक पाहिले आहेत.

मोजकेच पण खोल खोल रुतणारे लिहिलेत राव ... स्वीकारा या खिलजीचा मनाचा मुजरा ...

सविता००१'s picture

31 Oct 2018 - 5:47 pm | सविता००१

असंही होउ शकतं? ..
बापरे

चित्रगुप्त's picture

31 Oct 2018 - 9:23 pm | चित्रगुप्त

र्‍हदयस्पर्शी कथा. असे एक घर प्रत्यक्षात ठाऊक आहे, आणि नक्कीच अनेक आणखी असतील.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2018 - 1:26 am | मुक्त विहारि

कथा मनाला भिडली...

मूकवाचक's picture

1 Nov 2018 - 9:19 am | मूकवाचक

मनाला भिडणारी कथा.

(काही पालक आपल्या पाल्यांसाठी 'विषारी' असतात (Toxic Parent). त्यांना नारसिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Narcissistic Personality Disorder), बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर (Borderline personality disorder) सारखे मनोविकार असू शकतात. या विकारांमधे रूग्ण व्यक्तीचे आयुष्य बहुतांशी सुरळीत चालू राहते, मात्र तिच्या कचाट्यात सापडलेल्या व्यक्तींची घुसमट आणि होरपळ होते. अशा पालकांची मुले आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्यावर त्यांना टॉमीचा जास्त लळा लागलेला असेल तर तो कृतघ्नपणा म्हणावा का असा प्रश्न पडला. असो.)

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2018 - 9:13 am | प्रकाश घाटपांडे

आशयपुर्ण कथा.

सुबोध खरे's picture

1 Nov 2018 - 9:38 am | सुबोध खरे

असं एक घर माहिती आहे जिथे सासर्यापेक्षा कुत्र्याला जास्त मन आणि प्रेम मिळतंय.
अशा घरांमधे जायला नकोच वाटतं.

सुबोध खरे's picture

1 Nov 2018 - 9:38 am | सुबोध खरे

असं एक घर माहिती आहे जिथे सासर्यापेक्षा कुत्र्याला जास्त मन आणि प्रेम मिळतंय.
अशा घरांमधे जायला नकोच वाटतं.

मार्मिक गोडसे's picture

1 Nov 2018 - 10:13 am | मार्मिक गोडसे

ही कथा व्हॉटसअप वर बऱ्याच दिवसांपासून फिरत आहे.