सिन्नर ~ गोंदेश्वर मंदिर

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in भटकंती
26 Oct 2018 - 11:48 pm

गोंदेश्वर

सीमोल्लंघन
काल नासिक ला निघालो तेंव्हाच विचार केला की गोंदेश्वर ला जमल्यास जाऊन यायचे. नाही हो करत करत, ठरवले जायचेच. आणि जेंव्हा सिन्नर मध्ये प्रवेश करून मंदिराच्या आवारात आलो, तेंव्हा एकदम आश्चर्यचकित झालो. अप्रतिम कोरीव काम आणि मंदिर बघून मनोमन त्या अनामिक कलाकारांना नमस्कार केला. सूर्य अस्ताला जात होता, आणि एकदम सुंदर वातावरण होतं. काय अप्रतिम दगडी मंदिर समुह.. बाजूला सूर्य मंदिर आणि त्यात कलत्या सूर्याची किरणे पडत आहेत..कमाल architecture.. नंदी च्या २-3 varities तुटलेल्या अवस्थेत होत्या पण मुख्य नंदी अप्रतिम आणि थोडा लांब नेहेमी असतो त्या पेक्षा..
शंकराच्या पिंडीचा आकार एकदम मोठ्ठा. इतकं शांत नि सुंदर वाटत होतं..हे मंदिर शिव पंचायतन ह्या प्रकारातले आहे. साधारण 11व्या शतकातील मंदिर आहे.
बाहेर पडलो आणि एकदम सुंदर नजारा, एक बाजूला चंद्र उगवत होता आणि दुसऱ्या बाजूला सूर्य मावळत होता..
विचार केला दोन्ही एक फ्रेम मध्ये बसवलं तर किती छान होईल. एक विचार आला..आपल्या आयुष्यात पण अशाच गोष्टी घडत असतात, काही नव्याने सुरुवात होतात आणि काही संपत असतात.दोन्ही जर आपल्या आयुष्याच्या फ्रेम मध्ये घेतल्या, तर जगणं अजून सुंदर होईल..
काही अशाच इतर फ्रेम्स घेऊन निघालो ते परत निवांत येण्यासाठी..
~ योगेश पुराणिक

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

27 Oct 2018 - 7:19 am | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यशोधरा's picture

27 Oct 2018 - 11:15 am | यशोधरा

वा! सुंदर फोटो!

MipaPremiYogesh's picture

27 Oct 2018 - 8:01 pm | MipaPremiYogesh

सुंदर फ्रेम. फोटो कसे अपलोड करायचे!?

ब्लॅागरवर फोटो / फ्रेमस टाकले आहेत का?
तिकडच्या फ्रेम्स इकडे आणणे फार सोपं असतय.
जायचं कसं? नाशिकपासून किती दूर आहे?

MipaPremiYogesh's picture

29 Oct 2018 - 4:24 pm | MipaPremiYogesh

ata photo disat ahet i guess?

Pune nashik highway la ahe. Nashik chya alikade 40km var.

थोडं अजून लिहिण्याचा प्रयत्न केला असतात तर आवडलं असतं.

मी ह्या मंदिरावरच काही अल्पसे लिहिण्याचा प्रयत्न केला होता.

MipaPremiYogesh's picture

27 Oct 2018 - 8:00 pm | MipaPremiYogesh

नक्कीच वल्ली सर..माझा तुमच्या इतका अभ्यास नाहीये. पण नक्कीच प्रयत्न करीन.

अतिशय त्रोटक लिहिले आहे. लेख सुरू होता होता संपतो.

MipaPremiYogesh's picture

27 Oct 2018 - 8:03 pm | MipaPremiYogesh

नक्कीच प्रयत्न करीन. प्रचतेस सरांनी खूप छान लिहिले आहे ऑलरेडी आणि माझा इतका अभ्यास नाहीये. पण अभिप्रायाबद्दल धन्यवाद मी प्रयत्न करीन.

यशोधरा's picture

27 Oct 2018 - 9:02 pm | यशोधरा

वरून तिसरा आणि शेवटचे दोन फोटो मस्त आहेत!

छान लिहलय... असेच लिहीत रहा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwari

MipaPremiYogesh's picture

27 Oct 2018 - 8:05 pm | MipaPremiYogesh

अभिप्रायाबद्दल धन्यवाद ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Oct 2018 - 8:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही अल्बमचा दुवा दिलेला आहे. तसे केल्यास मिपावर फोटो दिसत नाही. दर फोटोचा वेगळा दुवा फोटोंचे दुवा किंवा स्लाईड शो टाकणे जरूर असते.

चित्रगुप्त's picture

28 Oct 2018 - 10:35 pm | चित्रगुप्त

मला अगदी पहिला आणि अगदी शेवटला हे दोन्ही फोटो खूप आवडले. विशेषतः पहिल्या फोटोत दोन्हीकडे गवताची किनार असलेला मातकट रस्ता मंदिराकडे आपल्याला खेचत नेतो. तिथले मंदिर, आडव्या भिंती आणि झाडझाडोर्‍याची झुरमुट यात आपली नजर गुंतते आणि त्याहीपलिकडे पाहू जाता एकदम निखळ आकाश अवघी जागा व्यापून आपल्याला शून्यात नेते....

MipaPremiYogesh's picture

29 Oct 2018 - 4:23 pm | MipaPremiYogesh

dhanywad saglyanna. Mhanje photos disayla lagle ka ata?

Suhas ji - Me baghato ani tase photo takaycha prayatna karto.