क्षण कण कण..

यशोधरा's picture
यशोधरा in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

क्षण कण कण..

काळोखाची चाहूल,
एकांडा पक्षी,
घरट्याच्या शोधात.

बहराशी फटकून,
शिशिराच्या आठवणीत,
निष्पर्ण चिनार.

निजल्या आसमंतात,
एकुलती जाग,
कोणत्याशा खिडकीत.

विस्मृत समाधी,
सभोवताल पाचोळा,
सुकलेला फुलोरा.

आकाशाचा भरवंसा,
समुद्राच्या साथीने,
गलबताचा प्रवास.

एकुलता सोबती,
लवलवत्या चितेचा,
नि:शब्द नदीकाठ.

म्हातारपण थकतं,
एकाकी शांतता,
आठवणी धुरकट.

धडाडते आगगाडी,
अंधाराला चिरत,
क्षणासाठी उजळत.

चकाकत्या इमारती,
मोडक्या घरकुलाशी,
फटकून, तुटक.

विझलेली आस,
फाटक्या झोपडीत,
चाचपडते स्वप्न.

देशोधडीचं नशीब,
खपाटीचं पोट,
हतबल सटवाई!

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 3:41 pm | टर्मीनेटर

धीरगंभीर कविता _/\_

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 6:34 pm | यशोधरा

टर्मिनेटर, तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही एकसंध कविता नव्हे, तर हायकू आहेत - तीन ओळींच्या छोटेखानी कविता. फक्त त्यातील विषयाचे सूत्र समान आहे.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 9:42 pm | तुषार काळभोर

सर्व तिनोळी स्वतंत्रसुद्धा छान आहेत.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Nov 2018 - 4:33 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

फार सुंदर, यशो तै, __/\__

मूकवाचक's picture

8 Nov 2018 - 2:16 pm | मूकवाचक

+१

पद्मावति's picture

6 Nov 2018 - 4:48 pm | पद्मावति

एकेक कडवं खणखणीत. फार सुरेख.

अनन्त्_यात्री's picture

6 Nov 2018 - 5:29 pm | अनन्त्_यात्री

हायकू!

एकटेपणा,थकलेलं शरीर यालाच सर्वजण भितात हे खरं आहे.
ते कवितेत नेमकं पकडलय.

हायकू आवडल्याबदल सर्वांचे खूप आभार आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा!

नाखु's picture

6 Nov 2018 - 7:41 pm | नाखु

आवडले, सूत्र सकारात्मक ठेवून दुसरी बाजू लिहाच!!
ते तुम्हाला नक्कीच शक्य आहे.

समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचकांची पत्रेवाला नाखु

असं ठरवून काही लिहीत नाही. जेव्हा आणि जसं सुचेल तसं लिहिलं जातं.
कवी शैलेंद्र ह्यांचं एक गीत आहे, त्या गाण्यावर माझा नितांत विश्वास आहे..

सबसे मधुर वो गीत जिन्हें
हम दर्द के सुर में गाते हैं
जब हद से गुज़र जाती है ख़ुशी
आँसू भी छलकते आते हैं

काँटों में खिले हैं फूल हमारे
रंग भरे अरमानों के
नादान हैं जो इन काँटों से
दामन को बचाए जाते हैं

जब ग़म का अन्धेरा घिर आए
समझो के सवेरा दूर नहीं
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं

पहलू में पराए दर्द बसा के
(तू) हँसना हँसाना सीख ज़रा
तूफ़ान से कह दे घिर के उठे
हम प्यार के दीप जलाते हैं..

सविता००१'s picture

6 Nov 2018 - 7:46 pm | सविता००१

सगळ्या हायकू आवडल्या.
एक समान आणिअनामिक एकाकीपण वाटलं सगळ्या हायकूंमध्ये

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 9:05 am | प्राची अश्विनी

जबरदस्त लिहिलंस ग! सगळेच हायकू आवडले. सटवाई तर विशेष.

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2018 - 2:18 am | पिवळा डांबिस

दिवाळीचा फराळ
पानात यशोकाकू
वाढते हायकू
:)

यशोधरा's picture

8 Nov 2018 - 8:42 am | यशोधरा

=))

प्रचेतस's picture

8 Nov 2018 - 9:00 am | प्रचेतस

=)) =)) =))

चांदणे संदीप's picture

8 Nov 2018 - 9:40 am | चांदणे संदीप

सर्व हायकूंनी एक चित्रपट डोळ्यासमोरून फिरवला. अतिशय उत्तर रचना.

वर प्रतिसादात तुम्ही उल्लेख केलेल्या कवी/गीतकार शैलेन्द्र यांच्या गीताबद्दलही आभार. ___/\___

Sandy

मित्रहो's picture

9 Nov 2018 - 3:33 pm | मित्रहो

हायकू मस्त जमलाय. परत परत वाचावेसे वाटले. खूप सुंदर

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2018 - 2:05 pm | स्वाती दिनेश

सुंदर!
एक समान आणिअनामिक एकाकीपण वाटलं सगळ्या हायकूंमध्ये
सविताशी सहमत.
स्वाती

सौन्दर्य's picture

23 Nov 2018 - 7:06 am | सौन्दर्य

कविता ह्या मानवी मनाचा जणू आरसाच. तुमच्या ह्या हायकू अतिशय सुंदर आणि मनाला वेढणाऱ्या आहेत. कवी शैलेन्द्र ह्यांचे गाणे देखील एकदम विषयाला धरून आहे. एकूण सर्वच आवडलं.

पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप आभार! _/\_

आवडलंय.. पण जरा सकारात्मक पण लिही की गं.. सध्या सगळं नकारात्मकच झालंय, जगणंसुद्धा.

अवांतरः
हायकू मधली तिसरी ओळ अगदी भिन्न असते आधीच्या दोन ओळींच्या.. पण अर्थाला तितक्याच समर्थपणे समेवर भेदते.. होय ना गं?

प्रशांत's picture

7 Jan 2019 - 1:23 pm | प्रशांत

फारच सुंदर

अर्धवटराव's picture

7 Jan 2019 - 6:30 pm | अर्धवटराव

शांत रसाला किती वेगवेगळी चव असु शकते. अप्रतीम.