पावसाळ्यातील मासे

Primary tabs

sandeepa's picture
sandeepa in पाककृती
18 Jul 2018 - 5:24 pm

सध्या जोरात पावसाळा चालू आहे. नदीचे मासे आणि त्यांच्या पाककृती बद्दल माहिती हवी आहे कृपया खवय्यांनी मार्गदर्शन करावे....

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Jul 2018 - 6:07 pm | प्रचेतस

नद्यांना पूर आल्याने वाहून गेलेले मासे समुद्रात गेलेत.

प्रसाद_१९८२'s picture

18 Jul 2018 - 8:38 pm | प्रसाद_१९८२

सध्या नद्यांना भरपूर पुर आल्याने, नद्यातील सर्व मासे समुद्रात वाहून गेले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2018 - 6:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम नदीतील मासे कोणकोणते त्यांची नावं एकदा समजून घेऊ.

१) राहु - रोहू ( चवीला चवदार)
२) वामट (लांब सापासारखा दिसणारा) एकच काटा आणि सिंपली ग्रेट, जितका शिजवाल तितका चांगला लागतो.

बाकी नंतर सांगतो.

-दिलीप बिरुटे

sandeepa's picture

18 Jul 2018 - 8:04 pm | sandeepa

धन्यवाद.....

नूतन सावंत's picture

18 Jul 2018 - 10:17 pm | नूतन सावंत

मरळ, काटेरी मासे(नाव माहीत नाही)अशा आणि वर बिरुटेसरांनी सांगितलेली नावे असलेले मासे समुद्रात सापडणाऱ्या माशांप्रमाणेच बनवायचे.

मासे समुद्रात सापडणाऱ्या माशांप्रमाणेच बनवायचे.

मिठाचा काही फरक पडत नाही का?

उगीचच अशी समजूत आहे की खाऱ्या पाण्यातल्या माषयांमध्ये काही प्रमाणात मीठ असेल की काय.

नूतन सावंत's picture

10 Aug 2018 - 11:51 pm | नूतन सावंत

नाही,असा काही फरक पडत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

19 Jul 2018 - 10:02 am | सोमनाथ खांदवे

ऑ !! जो तो नावच सांगतोय ? ,

आर !!! त्यांनी पाककृती बी ईचारलीय.

शाली's picture

19 Jul 2018 - 5:57 pm | शाली
sandeepa's picture

20 Jul 2018 - 12:56 pm | sandeepa

धन्यवाद.....

जागुतैचे धागे बघितले नाय काय? माहित नसलेले मासे सुद्धा कळतील ते सुद्धा पाककृतींसकट.

धागा उघडल्यावर अंमळ निराशा झाली. शीर्षकावरून वाटले की पावसाळ्यातील माश्यांची पाकृ असतील.
मदत हव्या असलेल्या धाग्याच्या शीर्षकाअगोदर "मदत हवी: ...." असे लिहावे. किंवा मिपावर नवीन विभाग सुरु करावा "मदत" नावाचा आणि मदत हवे असलेले धाग्या ह्या विभागातून सुरु करावे. अगोदरचे सर्व मदत हवे असलेले धागे ह्या नवीन विभागात हलवावे.
जेणेकरून, नवीन कोणाला मदत किंवा माहिती हवी असेल तर तो किंवा ती ह्या विभागात संबांधित धागा सापडतो का ते शोधून बघेल आणि नंतरच नवीन धागा काढेल.

तिकडे पाखर्‍याला बोलवुन आलोय... इकडे जलपरीची वाट पहावी म्हणतो ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lucky Lips... ;) :- Lucky - No Time For Love