लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ?
लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी
* मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे . म्हणजे वेंग म्हणजे उंचावरील जागा होऊ शकेल (संदर्भ मोल्सवर्थ)
* तामिळ அங்கு अंकु (दिशादर्शक) कन्नड आणि संस्कृत ಅಂಕ अंक Point किंवा spot हे स्थलदर्शक शब्द दिसताहेत म्हणजे मूळ शब्द venku मधून व हे उच्च्चारणं गळून गेले असल्याने वेंग हा शब्दाचा स्थलवाचक अर्थ विस्मरणात गेला असण्याची शक्यता अधिक वाटते .
* स्थल नामांची उदाहरणे
** गुजरात : वेंगणी
** महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले
** दक्षिणेत बरेच (असंख्य) आहेत वानगी दाखल काही
** तामिळनाडू : Vengarai , Vengalam , Vengalur, Vengayavellore , Vengikkal , Venganur
** केरळ : Vengappally
** तेलंगणा : Vengalpad , vengalpuram, venglaipalle , venglaipet
** आंध्र प्रदेश : Vengampeta, vengam palle
* लक्षात घेतलेले मुद्दे
* बेंगलुर हे वेंगलूर शी मिळते जुळते आहे व चे उच्चार परिवर्तन ब मध्ये होणे बऱ्याचदा दिसते
* तसेच तामिळ मधे क आणि ग हे उच्चार हि एकमेकांची जागा घेताना दिसतात तेव्हा वेंकटेश मधील वेंक चे मूळ उच्चारण वेंग राहिले असू शकते
* वंग (बंगालचे मूळ उच्चारण ) आणि आंध्रच्या गोदाकृष्णा खोऱ्या दरम्यानचा वेंगींनाडू हे दोन्ही प्रदेशवाचक आहेत .
* वि+अंग - व्यंग शब्द व्युत्पत्ती उजवे डावे म्हणतात त्यातील गौणकत्व दर्शक अर्थाने डावे वरून व्यंग असा हा शब्द हिंदीतून आला असावा . त्यामुळे चर्चित वेंग आणि वेंक शब्दाशी संबध नाही (माझे व्यक्तिगत मत)
* वांगे असाही वनस्पतीवाचक शब्द भारतात काश्मिरी ते तेलगू बऱ्याच भागात वापरात आहे . aubergine हे वांग्यासाठीचे उच्च्चारणं अरब व्यापाऱ्यांनी जगभर प्रचलित केले असावे. वनस्पतीवरून स्थलनामे येऊ शकतात पण तसे झाले तर वनस्पती नावाची व्युत्पत्ती द्यावी लागते . व्यापारी लोक कडून प्रदेशनावारून वास्तूचे नाव प्रचलित होण्याची शक्यता नाकारता येत नाही . किंवा वांगे शब्दाची व्युत्पत्ती स्वतंत्रही असू शकेल .
* वेंग शब्दाचे मराठीतील अर्थ मिठीत अथवा कडेवर घेणे इथे बसू शकता नाहीत आणि वेंग आणि वेंक शब्दास दक्षिणी भाषांतील अर्थ विस्मरणात गेला असल्याची शक्यता दिसते .
* मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे . म्हणजे वेंग म्हणजे उंचावरील जागा होऊ शकेल
* तामिळ அங்கு अंकु (दिशादर्शक) कन्नड आणि संस्कृत ಅಂಕ अंक Point किंवा spot हे स्थलदर्शक शब्द दिसताहेत म्हणजे मूळ शब्द venku मधून व हे उच्च्चारणं गळून गेले असल्याने वेंग हा शब्दाचा स्थलवाचक अर्थ विस्मरणात गेला असण्याची शक्यता अधिक वाटते .
* *महाराष्ट्रात अंकाई, अंकलगे, अंकलगी (दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक) , अंकले, अंकली, अंकलखोप या नावाची गावे दिसतात त्यामुळे या थेअरीस अप्रत्यक्ष दुजोरा मिळतो ?
* वेंक + कट पाप नाशी (ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग वर दिसलेली ) आख्यायिका योग्य मानली तर वेंग पासूनच्या इतर गावांच्या नावांच्या व्युत्पत्ती नीटशा लागू शकत नाहीत त्या पेक्षा वेंग (वेंक) +कूट चढून जाण्याचा डोंगर आणि त्यावरील ईश = वेंकुटेश - वेंकटेश हि संगती अधिक व्यवस्थित लागते
(अवांतर: तर ‘वेग’ गती वाचक शब्द बालकास वर अंगावर घेणे किंवा वर चढण्यास सांगणे येंगणे , वेंघणें ते वेग अशी शक्यता असू शकेल ?)
.
* Kannad ಅಂಕ anka Point (Google translate )
* Tamil அங்கு anku There (Google translate )
* Sanskrit अङ्क spot (Spoken sanskrit dictionary )
* वेंघणें (p. 451) vēṅghaṇēṃ v c (वेंग) To climb : also to mount or ascend. (molsworth http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/app/molesworth_query.py?qs=वेंघणें&searchhws=yes)
* महाराष्ट्र : अंकाई, अंकलगे, अंकलगी (दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक) , अंकले, अंकली, अंकलखोप
* काही अधिक नोंदी
** १ वेगेंत धरणें ; वेंग मारणें ; हातांनीं कवटाळणें . २ उराशीं धरणें ; आलिंगन देणें ; मिठी मारणें . वेंगणें - सक्रि . १ वळसा घालणें ; प्रदक्षणा घालणें . झाडाला वेंगून जा . = झाडाला वळसा घालून जा . २ वेंघणें पहा . वेंगळणें , वेंगाळणें - क्रि . ( कों . ट्रान्सलिटरल डॉट ऑर्ग गुगल वरून वेबसाईट उघडले नाही .
Venginadu is a region spread over the mandals of Godavari and Krishna districts. https://en.wikipedia.org/wiki/Vengi
बंगाल मधील वंग आणि वेंगी नाडू मध्ये उच्चार साधर्म्य आहे . वंग आणि वेंगीनाडू शब्दाचा अर्थ केवळ स्थान होतो कि हे दोन्ही प्रदेश पूर्वेस आहेत म्हणून पूर्वेकडचा प्रदेश असा काही राहिला असेल
** वेंगचु – v, 1. सिसक_सिसक_कर_रो तेलगू हिंदी अनुवाद (संदर्भ हिंदी विक्शनरीतील तेलगू -हिंदी शब्दावली )
** वंकट vāṅkaṭ -- (a) curved; intricate, difficult. (हिंदी विक्शनरी )
** वंकिम vaṅkim -- (a) slightly curved/bent; hence वंकिमता (nf). (हिंदी विक्शनरी )
** वंग vāṅg -- (nm) the eastern Indian state of Bengal; (हिंदी विक्शनरी )
* स्थलनामासाठी नीटशी संगती लागत नाही म्हणून संबंध नाही असे काही संदर्भ
** वेङ्घर Pride of beauty ( Spoken Sanskrit dictionary) शब्द कसा तयार वापर होतो ते एक्सप्लेन करण्यात अपयश
** वेंग (p. 450) vēṅga f ए Embrace, clasp, hug, the comprehension of the arms extended circularly and meeting in front. v मार, घाल. वेंग मारणें To gather up within the embrace of the arms (grass, leaves &c.)वेंग) A term for a female monkey having a young one clinging to her breast.; वेंगेवर घेणें To take and carry on the hip (a child &c.) molsworth ; वेंगटणें or वेंगडणें (p. 450) vēṅgaṭaṇē or ṃvēṅgaḍaṇēṃ v c Formations from वेंवें, or from वेडावांकडा.; वेंगडी The muscles as affected by cramp or spasm
** - venge लॅटिन to प्रोटेक्ट -वेग veg -- (nm) speed, velocity; momentum.
प्रतिक्रिया
5 Jun 2018 - 8:34 pm | Ram ram
माझ्या लहानपणी यंगला, यंगणे हे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वर चढणे या अर्थाने क्रियापद वापरले जाई. तसेच चाक फिरण्याला बिंगणे म्हटलं जात असे.
6 Jun 2018 - 1:50 pm | माहितगार
तेलंगणा Yenka, Yenkathala Yenkepalle , Yengalaguda, Yengampalle
कर्नाटक Yenkanchi
महाराष्ट्र येनगाव, Yengalwadi, Yenkapalli , येकांबंदा, येंगाडा, येंगलखेडा , येंगडदेव ( वर्धा 534190)
आपल्या प्रतिसादाने या अभ्यासण्यास मदत झाली . अनेक आभार
5 Jun 2018 - 9:25 pm | समर्पक
वेंकटेश किंवा व्यंकटेश हे "वैकुंठेश" पासून तयार झाले आहे असे मानतात. त्यामुळेच वेंकटेश प्रमाणेच केवळ वेंकट अथवा वेंकटप्रसाद ही सुद्धा अपभ्रंश लक्षात घेता अर्थपूर्ण नावे आहेत.
6 Jun 2018 - 9:24 am | माहितगार
हेही शक्यय पण वैकुंठ शब्दाची व्युत्पत्ती काय काय देतात हेही बघावे लागेल
* दुसरे वेंकटेश शब्दाबद्दलची माझी थेअरी व्हॅलीड रहाण्यासाथी ट हे अक्षर नसलेली नुसते वेंक पासूनची बरीच गावे मिळावयास हवीत , वेंकटेश नसलेली नुसते वेंक पासूनची गावे डाटाबेसमध्ये शोधणे जटील आणि वेळखाऊ काम आहे . (आणि दाक्षिणात्य भाषातील बर्याच शब्दांचे अर्थ माहित नसणे हि दुसरी अडचण आहेच)
** पहिल्या प्रयत्नात मिळाली ती खालील प्रमाणे
*** तेलंगाणा Venkur Venkepalle, venki gari thanda , Venkiryal
*** केरळ Venkurinji Venkulam
*** महाराष्ट्र Venkute (जिल्हा अहमदनगर )
*** तामिळनाडू Venki-dusamuthiran , Venkodu, Venkolla, Venkuzhy, Venkulamkarai
6 Jun 2018 - 10:23 am | माहितगार
वैकुंट नावाची गावे कशाला असतील असा विचार करत होतो पण थोडीशी निघाली
* Vaikunthpura Samadara B.O 387120 Kheda KHEDA GUJARAT
* Vaikuntapur Gulmadugu B.O 504109 Sarangapur ADILABAD TELANGANA
* Vaikuntalakshmipuram Kakulapadu B.O 521106 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH
* Vaikuntashram Kothapalli B.O 521111 Bapulapadu KRISHNA ANDHRA PRADESH
* Vaikuntapura Masige B.O 577139 Sringeri CHICKMAGALUR KARNATAKA
* Srivaikuntam Srivaikuntam H.O 628601 Srivaikuntam TUTICORIN TAMIL NADU
6 Jun 2018 - 1:18 pm | पुंबा
व्यंकटेश हे नाम व्यंकटगिरी ह्या स्थानावरून पडले आहे. हा पर्वत वाकडा असल्याने तो व्यंकटगिरी व तिथे असलेला देव तो व्यंकटेश.
: संदर्भः व्यंकटेशस्तोत्र हा माधव आचवलांचा 'पत्र' या संग्रहातील लेख..
7 Jun 2018 - 10:26 pm | आर्य
वेंम (पाप) + कट (नाश) + इश (देव) = वेंम-कटेश = व्यंकटेश / वेङ्कटेश
(जे खळांची व्यंकटी सांडो - जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जावा)
तसेच तिरु या तमीळ शव्दाच अर्थ श्री आहे आणि या डोंगरावर राहणारा देव हिच व्युत्पत्ती
व्यंकटगिरी, वेंकटाद्रि, वेंकटाचल, व्यंकटरमण, मलयप्पा / तिरुमला (तिरु +मलय) - तिरु+पती -श्रीनिवास /श्रीवारी इ.
8 Jun 2018 - 1:38 pm | माहितगार
सहमत आहे .
* आपण पसायदानाचा संदर्भ दिल्यामुळे मूळ तामिळ संदर्भ काही मिळतात का ते शोधण्याचा पुन्हा एकदा जरा अधिक प्रयत्न केला .
सिलापाथीकरम ( Silappatikaram ) हा तामिळ ग्रंथ (इस सुमारे पहिले ते तिसरे शतक ) आहे. (यातही पुराणासारखी अतिरंजने असल्यामुळे ऐतिहासिक पुरावा मानला जात नाही ) त्यात
असे वर्णन येताना दिसते .
** वेंगदम मधील वे चे एकारांत उचचारानं दीर्घ असल्या बद्दल येथे चर्चा दिसते
* 'वेंगदम' चे उल्लेख डोंगरा बद्दल असल्याचे उल्लेख आपण म्हणता तसे मलाई , वराई , आणि kunRu बद्दल आहेत याचे निश्चित संदर्भ प्राचीन तामिळ साहित्यातून येताना दिसताहेत . मूळ तमीळ इंग्रजी लिपी आणि अनुवादासहीत या दुव्या वरील चर्चेत उपलब्ध
हि देवता वैष्णव आहे कि शैव यावर ११ व्या शतकाच्या सुमारास वाद होऊन वैष्णव प्रसारक रामानुजानी पुढे आणलेल्या चमत्कारानंतर वैष्णव असल्याचे निश्चित केले गेले असे काही संदर्भ आंतरजालावर दिसतात (संदर्भ ). पण बहुधा स्थानिक ग्राम देवता राहिली असावी कि ज्यामुळे देवतेस स्वतः:चे विशिष्ट नाव दिसत नाही . बालाजी हे बहुधा पांडुरंगा प्रमाणे भक्तांचे नाव असावे ( माझा व्यक्तिगत कयास चुभूदेघे), श्रीनिवास हा शब्द श्री चे निवास असा स्पष्टच दिसतो तर वेंकटेश्वर हे पर्वतीय ईश्वर एवढाच बोध करते .
पौराणिक भक्त कविनी वेंकटेश शब्दाचा आधी श्रद्धेतून अर्थ पापनाशक असा लावून मग नंतर त्याची सोयीचा समास विग्रह केला नाहीना अशी जराशी साशंकता वाटते कारण वेन्क / वेम म्हणजे पाप आणि कट म्हणजे नाश अशी व्युत्पत्ती ब्रह्माण्ड पुराणात असल्याचा उल्लेख इंग्रजी विकिपीडियावर Nanditha Krishna (2000). Balaji-Venkateshwara, Lord of Tirumala-Tirupati. या पुस्तकाच्या पृष्ठ ४९ चा हवाला देऊन केल्याचे दिसते (गुगल बुकावर पुस्तकाचा पूर्वदृष्य उपलब्ध नसल्यामुळे खात्री करता आली नाही )
वेन / वेट वेन्क या पैकी एखादा शब्द पाप या अर्थाने इतरही संस्कृत साहित्यात तपासले जाण्याची गरज असावी . स्पोकन संस्कृत डिक्शनरीवरील प्राथमिक शोधात तरी मला तसे दिसले नाही पण संस्कृत भाषेचे जाणकार यावर अधिक प्रकाश टाकू शकतील
हेच पुराणिक उल्लेखातून ज्ञानेश्वर कालीन मराठीत व्यंकटी शब्द आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही
तामिळ अथवा संस्कृत भाषांना त्यांचे त्यांचे ड्यू क्रेडिट देण्यास हरकत नसावी . वराई सारखा शब्द प्राचीन तामिळ मध्ये डोंगरासाठी वापरला जाणे आणि मराठीत वर हा शब्द वापरात असणे ग्राम नामात आढळलेले साम्य संस्कृत प्रमाणे प्राचीन प्रोटो पंचद्रविड जीकाही भाषा राहिली असेल तिचाही मराठी भाषा आणि प्रदेशावर संस्कृत प्रमाणे प्रभाव दिसून येतो असे वाटते ..
* त्या टेकडी/डोंगरास ' वेंगदम' हा प्राचीन तमीळ साहित्यातील उल्लेख सापडल्यामुळे मी धागा लेखातून पुढे ठेवलेल्या थेअरीस बळकटी येत असावी , पण तरीही माझी मांडणी अचूकच असल्याचा दावा नाही कारण माझ्याही माहितीस मर्यादा निश्चितच पडतात.
माहितीपूर्ण चर्चा सहभागासाठी आभार
ईतर संदर्भ
* Devotion to Mal (Mayon)
9 Jun 2018 - 10:16 am | माहितगार
* 'वेंगदम' आणि वेंकटेश शैव की वैष्णव या रामानुज कालीन वादाचा उल्लेख रा.चि. ढेरे यांच्या Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur
By Ramchandra Chintaman Dhere ग्रंथात येताना दिसतो आहे.
* वेंकलपारा नावाच्या टेकड्या केरळातही दिसताहेत, वेंक / वेंग उच्चारण समावेश असलेल्या नावच्या टेकड्यांची उदाहरणे दक्षिणेत आणखी काही मिळावयास हईत असे वाटते.
9 Jun 2018 - 12:16 pm | माहितगार
ज्यांना तिरुपती आणि एकुणच मंदिरांच्या इतिहासात रस आहे त्यांच्यासाठी गूगलबुक्सवर प्रीव्ह्यू उपलब्ध असलेले The Lord of Vengadam: A Historical Perspective By S R RAMANUJAN हे पुस्तक रोचक असावे.