नोकरी मिळवताना 2.1 ) रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा

रानरेडा's picture
रानरेडा in काथ्याकूट
23 May 2018 - 12:31 am
गाभा: 

आधीचा भाग - http://www.misalpav.com/node/42558

कोणतीही नोकरी शोधते वेळी रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा ही पहिली पायरी असते, आणि अतिशय महत्वाची . अति महत्वाची कारण तुम्ही कोण आहात आणि उपलब्ध जागेसाठी योग्य आहात की नाही हे कम्पनीला कळण्याचे रेझ्युमे / सी व्ही / बायो डेटा हे पहिले माध्यम असते.
( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल. )

अनेकदा आपल्याला अनुभव येतो की जाहिरातीत दिलेली जागे (पोझिशन) चे वर्णन तुम्हाला लागू पडते, पण अनेकदा अशा जागांसाठी अर्ज करूनही कोठलाच कॉल येत नाही . उलट, माहितीतील कमी पात्रता असलेल्या कोणाला तरी कॉल येतो. कधी तरी असे दिसते की अर्ज न केलेल्यासुद्धा लिंक्ड इन वरील प्रोफाइल वरून कॉल येतो. अशावेळी वशिल्याला , नशिबाला किंवा ओळखीला दोष न देता आपल्या रेझ्युमे मध्ये काही दोष आहेत का? तो बरोबर आहे का? तो वाचनीय आहे का? काही माहिती अपुरी तर नाही ना? हे शोधणे गरजेचे असते.लेखक - हेमंत वाघे

सर्वसाधारणपणे कोठल्याही जाहिरातीला शेकडो नव्हे तर हजारो अर्ज येतात. नोकरी डॉट कॉम वर जेंव्हा कन्सल्टन्ट शोध घेतात तेव्हाही असे च रिझल्ट्स मिळतात. (त्यातही अनेक रिझल्ट्स चुकीचे असतात ,चुकीच्या रेझ्युमे मुळे आलेले. तर निवड करणाऱ्याकडे चॉईस भरपूर असतो, आणि इंटरव्यू चा कॉल येण्याआधी उमेदवारा चा विचारही केला जात नाही. आणि पुढेही अनेकदा इंटरव्यू ला हाच रेझ्युमे पुढे घेऊन त्या वरून प्रश्न विचारले जातात . लेखक - हेमंत वाघे

रेझ्युमे म्हणजे काय? तर एका विशिष्ठ प्रकारे ( फॉरमॅट ) मध्ये दिलेली तुमच्याबद्दलची आणि तुमच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलची माहिती ,तुमचा लेखा-जोखा. त्यात काही माहिती दिली जावी असे सर्वमान्य संकेत आहेत.

आता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की रेझ्युमे चे जे फॉरमॅट लिहीत आहे ते काही ब्रह्मवाक्य नाही. अनेक फॉरमॅट नेट वर आहेत. तसेच काही देशात किंवा विशिष्ठ कामासाठी ठराविक एक फॉरमॅट लागते किंवा काही व्यवसायात विशिष्ठ माहिती असावीच लागते ( जसे की असलेली सर्टिफिकेशन्स , काही व्यवसायात शारीरिक क्षमता - उंची वजन वगैरे ) . हा फॉरमॅट मी या व्यवसायात राहून , अनेक अर्ज करून शिकलेला आणि कमीत कमी जागेत अधिक अधिक माहिती देता यावी म्हणून बनवलेला आहे. याउपरही आपण अनेक प्रयोग करू शकता. यात मी अनेक गोष्टींच्या मर्यादा सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे. लेखक - हेमंत वाघे

रेझ्युमे - सर्वसाधारण सूचना

१) A४ आकाराच्या पानात बनवावा.

२) चारी बाजूला जागा सोडावी . डाव्या बाजूला थोडीशी जास्त.

३) साधे, सरळ, सर्वत्र उपलब्ध आणि वाचनीय फॉन्ट वापरा. उदा - Arial, Calibari, MS Sans Serif इ. अनेक फॅन्सी फॉन्ट सर्वत्र उघडत नाहीत आणि फॉरमॅटिंग बिघडते.

४) एकाच फॉन्ट च्या वेगवेगळ्या साईझ ( ८,९,१०,१२ ) आणि बोल्ड - इटॅलिक मधून व्यवस्थित काम करता येते.

४) रेझ्युमे एम एस वर्ड मध्ये बनवा. त्यात थोडे तरी एडिट करता येईल असे ठेवा ( लॉक करू नका) कारण कधीकधी कन्सल्टन्ट ला काही माहिती डिलीट करून पाठवावे लागते , किंवा काही नोट्स टाकून पाठवावे लागते . पीडीएफ नको . अनेकदा त्यात काही करता येत नाही म्हणून कन्सल्टन्ट सरळ दुसरा उमेदवार बघतो. एक्सेल, पॉवर पॉईंट मध्ये तर नकोच नको.

५) हायलाईट करताना ग्रे करू नका . अनेकदा स्वस्तात प्रिंट केले , झेरॉक्स मारले तर ते खराब दिसते.

६) कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देण्याची कला अवगत करा.

७) रेझ्युमे अनेकदा तपासून घ्या. यात स्पेलिंग मिस्टेक अजिबात नको.

लेखक - हेमंत वाघे

पुढील भागात आपण रेस्युमे चे विविध भाग आणि त्यात काय काय माहिती कशा प्रकारे द्यावी लागते हे बघू.

प्रतिक्रिया

उपयुक्त माहिती. पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

23 May 2018 - 7:43 am | तुषार काळभोर

नवागतांसोबत जाणत्यांनाही अतिशय उपयुक्त ठरेल अशी लेखमाला.

उगा काहितरीच's picture

23 May 2018 - 8:13 am | उगा काहितरीच

+१ .
अतिशय उपयुक्त मालिका. पुभाप्र ...

manguu@mail.com's picture

23 May 2018 - 7:59 am | manguu@mail.com

छान

वरुण मोहिते's picture

23 May 2018 - 8:53 am | वरुण मोहिते

नवोदितांना उपयुक्त मालिका.

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 9:07 am | टवाळ कार्टा

उत्तम

नितिन थत्ते's picture

23 May 2018 - 9:45 am | नितिन थत्ते

१. रेझ्युमेसोबत कव्हरिंग लेटर पाठवावे. ते विशिष्ट कंपनीसाठी मुद्दाम बनवून घ्यावे.
२. झेरॉक्स / प्रिंट करताना चांगल्या क्वालिटीचीच प्रिंट मारावी. माझ्या घराजवळ जो झेरॉक्सवाला आहे त्याच्याकडे ७५ पैसे , एक रुपया आणी दीड रुपया अशा दराने झेरॉक्स मिळतात. ७५ पैसेवाली झेरॉक्स अस्पष्ट व त्यावर उभ्या
आडव्या रेशा असलेली येऊ शकते. दीड रुपयावाली झेरॉक्स निश्चित चांगली असते. तशीच काढावी. वाटल्यास आणखी पैसे देऊन बॉण्ड पेपरवर काढून घ्यावी. शक्यतो रेझ्युमेची फ्रेश प्रिंट काढून पाठवावी.
३. एकूण पृष्ठसंख्या तीनहून जास्त होऊ नये. पण त्याचवेळी पृष्ठ संख्या वाचवण्यासाठी फार बारीक फॉण्ट वापरू नये.

नितिन थत्ते's picture

23 May 2018 - 9:59 am | नितिन थत्ते

वरच्या पॉइंट क्र १ साठी स्पष्टीकरण.

कव्हरिंग लेटर मध्ये "टू अमुक तमूक कं" अशा प्रकारे लिहिलेले असावे. त्यात आपला अनुभव त्या कंपनीच्या व्यवसायास कसा अनुकूल आहे ते दाखवलेले असावे.

कव्हरिंग लेटरच्या टू मध्ये कंपनीचे नाव "गाळलेल्या जागा भरा" प्रकारे लिहू नये.

रानरेडा's picture

23 May 2018 - 3:21 pm | रानरेडा

@नितिन थत्ते साहेब
कव्हरिंग लेटर हा वेगळ्या लेखाचा विषय आहे . नंतर हे येईलच . आणि मी आपल्या मुद्द्यांचा उल्लेख केल्यास चालेल का ? ( अर्थातच मी आपले नाव लिहीनच )
धन्यवाद

नितिन थत्ते's picture

24 May 2018 - 11:55 am | नितिन थत्ते

नो प्रॉब्ळेम !!

(नऊ कंपन्यांत काम केलेला) नितिन थत्ते

खटपट्या's picture

24 May 2018 - 1:33 pm | खटपट्या

रानरेडा साहेब, खूप चांगली माहीती. रेज्युमे लीहीताना बर्‍याच वेळेला रेज्युमे मोठा होतो आणि वाचणारा सर्व रेज्युमे वाचू शकत नाही किंवा त्याना तेवढा वेळ नसतो. म्हणून रेज्युमेमधे समरी नावाचा जो भाग असतो सुरवातीला तो कसा असावा, कीती मोठा असावा, त्यात काय काय असावे, नसावे या बद्दल माहीती द्या. समरीमधून उमेदवाराचे कौशल्य, अनुभव आणि बाकीची माहीती वाचणारा पटकन मिळवू पहात असतो.
याबद्द्ल थोडे लिहावे ही विनंती

रानरेडा's picture

25 May 2018 - 12:07 am | रानरेडा

समरी हा बर्याचदा सर्वात महत्वाचा भाग होऊ शकतो . यावर एक अक्खा लेख लिहावा लागेल .- म्हणजे लिहित आहे ..

दुर्गविहारी's picture

24 May 2018 - 6:43 pm | दुर्गविहारी

अतिशय उत्तम माहिती आणि धागा . खुपच चांगले काम करित आहात. पु.भा.प्र.

गावठी फिलॉसॉफर's picture

24 Jun 2018 - 9:21 am | गावठी फिलॉसॉफर

उपयुक्त माहिती