थाई रेड एग करी

केडी's picture
केडी in पाककृती
16 May 2018 - 4:32 pm

TEC-1

साहित्य

६ उकडलेली अंडी
१ पाकीट थाई रेड करी पेस्ट (मी रिअल थाई ची वापरली)
४०० मिली नारळाचं दूध
१ कांदा उभा चिरून
१ वाटी मशरूम, चिरून
१ वाटी बेबीकॉर्न, चिरून
१ वाटी रंगीत ढोबळी मिरच्या, चिरून
अर्धी वाटी ब्रोकोली
१ चमचा सोया सॉस
१ चिमूट साखर
१ चमचा लाल तिखट (ऐच्छिक)
गवती चहाची पानं, ठेचून (असल्यास)
२ चमचे तेल
१ चमचा कॉर्नफ्लॉर
अर्ध्या लिंबाचा रस
मीठ चवीनुसार

कृती

हि पाककृती खरं तर अगदीच झटपट केली. पर्वा अचानक वळव्याची एक जोरदार सर येऊन गेली आणि मग काहीतरी कंफोर्ट फूड खायची इच्छा "इकडून" आली. बरेच दिवस थाई करी पेस्ट घरी पडून होती, मग ती वाया जाऊ नये, म्हणून जवळच्या भाजीवाल्याकडून मिळतील त्या भाज्या आणल्या, घरी नारळ होताच, त्याचं दूध काढून घेतलं.

[पाककृती घाईघाईत केल्यामुळे इतर छायाचित्र नाही काढली, तरी क्षमस्व, प्लेटिंग अचानक सुचलं, आणि जमेल तसं केलंय]

भांड्यात तेल गरम करून त्यात करी पेस्ट २ ते ३ मिनिटे परतून घ्या. ह्यात सगळ्या भाज्या टाकून, भाज्या ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. ह्यात थोडं पाणी घालून, गॅस मंद करून, झाकण ठेवून भाज्या ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. सोया सॉस, साखर घालून मग नारळाचं दूध घाला. वापरत असल्यास गवती चहाची पानं घाला. चव घेऊन, तिखट वाढवायचं असल्यास १ चमचा तिखट घाला. मंद गॅस वर उकळी येऊ द्या. करी दाट करायची झाल्यास १ चमचा कॉर्नफ्लॉर १ ग्लास पाण्यात घोळवून ते टाकून, करी दाट करून घ्या. उकडलेली अंडी उभी चिरून करी मध्ये सोडा. चव घेऊन मीठ घाला.

वाढताना, करी गरम करून, गॅस वरून काढून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून, गरमागरम भात बरोबर सर्व्ह करा!

TEC-2

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

16 May 2018 - 5:22 pm | चाणक्य

सोप्पी पाक्रु दिसतीये. बघतो करून.

फोटो बघूनच वारल्या गेलो आहे. आता विदाउट अंडे ही करी खाणे आले.

सविता००१'s picture

16 May 2018 - 5:57 pm | सविता००१

किती सुरेख दिसतेय डिश आणि म्हणतो आहेस की प्लेटिंग अचानक सुचलं, आणि जमेल तसं केलंय..

निशाचर's picture

17 May 2018 - 1:24 am | निशाचर

वांगं छान लागतं. नाही तर फ्लॉवर आहेच.

खरंच सांगतोय, अंधार पडायच्या आत फोटो काढायचा होता, त्यामुळे मनात आलं आणि पटकन प्लाटिंग करून टाकलं, थोडा आराखडा मनात होता.

कधी कधी असे प्लाटिंग पटकन जमून जाते, कधी कधी फार विचार करत बसावं लागतं, किंवा कधी तरी कुठेतरी बघितलेलं अचानक डोळ्यासमोर येतं...

आता काही आठवड्यांपूर्वी झुणका, मिरची ठेचा आणि भाकरीचं हे प्लाटिंग केलेले, हे मात्र बरेच दिवस डोक्यात होत, त्यामुळे पटकन जमलं. अजून एक फोटो आहे, पण तो सध्या देत नाही, कारण तो मिपा फूड फोटोग्राफी साठी दिलाय, त्यामुळे सध्या इथे देणे योग्य ठरणार नाही.

[तू माझा तो वरण भाताचा फोटो पाहिलेला आहेच, तो देखील डोक्यात होता बरेच दिवस..]

Zhunka   Zunka2

बाकी अंड्यां ऐवजी सोया चंक्स, टोफू, पनीर, छोटे बटाटे असे वापरून बघ.....

सविता००१'s picture

17 May 2018 - 10:28 am | सविता००१

"तू माझा तो वरण भाताचा फोटो पाहिलेला आहेच, तो देखील डोक्यात होता बरेच दिवस.."
हो. सगळे फोटो पाहिलेत तुझे. कसले भारी असतात एकेक.
हा वरचा झुणका-भाकरीचा माझ्या फूड जॉइंट करता वापरला तर चालेल का तुला? नाहीतर तसाच झुणका-भाकरी ठेचा करून मी तसाच फोटो काढीन :( मला खूप आवडलाय रे हा फोटो.
बाकी धन्यु. तुझ्या या रेसिपीत माझ्या ४ होणार...सोया चंक्स, टोफू, पनीर, छोटे बटाटे अस वेगवेगळं वापरून.
जय हो!

हॅलो, फूड जॉईंट, कधी? कुठे!!!???

मला फुकट खायला घालणार का, तर वापर... :-) :-)
:-))

जोक्स अपार्ट, व्यनि करून जॉईंट चा पत्ता दे, नक्की भेट देईन .....

If your friends own a business, support them by buying their product..... not by asking something for free all the time

सविता००१'s picture

17 May 2018 - 11:47 am | सविता००१

अरे अजून खूप नवीन आहे. धडपडतेय.
सगळ्यांनाच सांगायचय
पहा व्यनि

सुबोध खरे's picture

23 May 2018 - 7:51 pm | सुबोध खरे

If your friends own a business, support them by buying their product..... not by asking something for free all the time
+१००

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 8:20 pm | manguu@mail.com

baby potato चे केले जाईल

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2018 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ! तुम्ही एक रेस्तराँ टाका राव... खात्रीने हीsss गर्दी होईल !

डॉक, आभारी आहे, सध्या तरी मनुष्य प्राण्या पेक्षा श्वान खाद्य निर्मिती सुरू केली आहे, त्याला बर्यापैकी प्रतिसाद मिळतोय, पण पुढे मागे नक्कीच रेस्टॉरंट काढणार....

पिलीयन रायडर's picture

16 May 2018 - 10:56 pm | पिलीयन रायडर

अरे वा! ह्याबद्दल अजून माहिती द्या की.

केडी's picture

17 May 2018 - 6:45 am | केडी

फेसबुकवर @ShvaanDogFood ह्यावर सर्च करून भेट द्या....सध्या फक्त पुण्यात ...बाकी माहिती सदर पानावर आहेच, पण तुम्हाला व्यनि पाठवतो...ह्याची सुरवात २ वर्षांपूर्वी झाली, ह्या बद्दल मी मागे इथेच लिहिलंय
श्वान खाद्य पुराण

आत्ता भौ भौ
पुढेमागे वा वा

जेपी's picture

17 May 2018 - 12:18 am | जेपी

मस्त.
मी यात आप्पे ट्राय करून पाहतो.

निशाचर's picture

17 May 2018 - 1:22 am | निशाचर

रेड करी आणि वाफाळता भात, मस्तच!

चवदार वाटतेय पाककृती. थाई करी पेस्ट कुठे मिळेल पुण्यात?

केडी's picture

17 May 2018 - 7:00 am | केडी

मी ही वापरली
Real Thai Red Curry Paste (Pack of 2), 50g https://www.amazon.in/dp/B06Y26C1C3/ref=cm_sw_r_cp_apa_i_jQn.AbETHYX6T

प्रसाद गोडबोले's picture

17 May 2018 - 3:09 am | प्रसाद गोडबोले

सुंदर फोटो . पण थाई करी मध्ये अंड्याला मजा नाही , तिथे प्रॉन्सच पाहिजे !

नक्कीच, पण ही झटपट केली, हाताशी असतील आणि लगेच मिळतील अश्या गोष्टी वापरून, नाहीतर साग्रसंगीत थाई करीत जलचर हवेतच!

पद्मावति's picture

17 May 2018 - 1:02 pm | पद्मावति

खुप मस्तं पाकक्रुति.

धाग्याच्या शीर्षकावरून वाटलं की, कुठल्या तरी थाई लाल अंड्याची करी असावी. मनात प्रश्न पडला की, हे लाल रंगाचे थाई अंडे कुठून आणायचे. (हं घ्या).

बाकी करी आवडलेली आहे, घरी बनवून बघेल, आणि मार्क्स यांनी सांगितल्या प्रमाणे, अंड्या ऐवजी कोळंबीची करी बनवेल.

फोटो सुद्धा छान आहे. फोटोवरची signature जरा छोटी ठेवा. पाकृ पेक्षा signature लक्ष वेधत आहे

केडीचे प्रेझेंटेशन भारीच असते हे निर्विवाद.
सध्याची सिग्नेचर टाकायची स्टाईल जबरदस्त आहे. एकच लंबर ग्राफिक वर्क. त्यामुळे एकदम हायली प्रोफेशनल टच आलाय.

केडी's picture

18 May 2018 - 7:41 pm | केडी

आभारी आहे हो!
_/\_

रातराणी's picture

19 May 2018 - 2:12 am | रातराणी

चान चान
आता मी पाकृ धाग्यांवर असेच खवचट प्रतिसाद देणार आहे.
दुत्त दुत आहेत सगळे.

कहर फोटो... नवर्‍याला दाखवते रेसिपी.. त्याला हे असे प्रकार करुन पाहायला फार आवडतं ;)