तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
14 May 2018 - 4:07 pm

तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय

माझं मन बी बोन्साय केलंय

पयलं व्हतं त्ये धरणावाणी

त्यात मॉप व्हतं पाणी

रंगीत मासळी पवत होती

मस्त लव्हाळं झुलंत होती

दिवसा खोखो नि रात्री कबड्डी

जल्ला स्पीड म्हणू कि जेट्टी

चाबूक घेऊन खाली तू आली

काय ठाऊक तू खाऊन आली ?

फटक्यात जिंदगी स्मशान केली

ती चमचमती दुनिया बी गेली

त्या समद्यास्नी मारून टाकलंय

मॉप पाणी बी आटवून टाकलंय

समद्या भावनांना पेटवून टाकलंय

माझं मन बी बोन्साय केलंय

पयला होतो म्या ताडावाणी

दिस रात एक मज होते

मनी तारे लखलखत होते

खायचो कोंडा अन प्यायचो पाणी

चउत भाकरीने बाजार जो केला

आत्ता जन्माचा उरलो अडाणी

फगस्त तुझ्याचसाठी झुरतोय

गप गुमान कामावर जातोय

तू सांगशिल त्येच करतोय अन घरामन्दिचं मुरतोय

राणी मुरून अर्धा झालोय

आता म्या पण बोन्साय झालोय

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

आता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताइतिहासविडंबनसुभाषितेसमाजजीवनमानआईस्क्रीम

प्रतिक्रिया

एमी's picture

14 May 2018 - 8:28 pm | एमी

लॉल
आपल्याला आवडतात ब्वॉ खिल्जीच्या कविता :D:D

खिलजि's picture

15 May 2018 - 1:05 pm | खिलजि

धन्यवाद अॅमीजी , काल हि कल्पना , एकदम चालीत म्हणून दाखवली बायकोला . ज्जाम उखडली बघा . घरात किती काम असते आणि मी कसा दिवस घालवते तुझ्या दोन कॅलेंडरबरोबर , ते किती त्रास देतात , हि सर्व पुढील कवितेची शिदोरी तिने हातात दिली आहे . आता एकेक कल्पना शब्दात बंधने आले . आपला अभिप्राय मला सुखद वाटला . धन्यवाद वाचल्याबद्दल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सिद्धार्थ ४'s picture

15 May 2018 - 3:26 pm | सिद्धार्थ ४

अजुन येउ द्या