कोकण सफ़र भाग २ - दिवेआगर, आंजर्ले, हर्णे, पाळंदे

Primary tabs

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
10 May 2018 - 6:15 pm

दिवस दूसरा-

सकाळी ७ ला उठून भरपेट नाश्ता करुन १० वाजता निघालो, आजचा प्रवास ८० किमी बागमांडलाची जलफेरी धरून. साधारण ४ तास लागतील अस अंदाज होता पण ख़राब रस्त्यामुळ ५ तास लागले.

.
श्रीवर्धनचा बीच जो रस्त्यात लागतो.

.
श्रीवर्धनच्या आधी शेखाडी जवळ.

.
शेखाडी जवळ

.
५ भरभक्कम देह वाहून नेणारा रथ अणि सारथी अर्थात मी !!

आंजर्लेला आमचा मुक्काम होता सोनकुटीर या होमस्टे मधे. अप्पास बीच रिसोर्ट आमचे पाहिले प्राधान्य होते ते अणि नंतर सगळच फुल झाल्याने आम्हाला इथे मुक्काम करावा लागला. चिकुच्या बागेत पर्यटकासाठी वेगळ्या रूम काढलेल्या. मालक गुजराती जैन धर्मीय. त्यामुळ जेवण करायला आम्हाला दूसरी खानावळ शोधत फिरावी लागली. मस्तपैकी जेवण करुन थोडा वेळ इकडे तिकडे हिंडून आम्ही समुद्राकडे निघालो.
सोबतच्या ४ मित्रांना ट्रिपच्या प्लान विषयी काहीच माहित न्हव्ते, मी नेतोय तिकडे येत होते बिचारे. समुद्रावर जाताना त्यांना कासव महोत्सवाबद्द्ल सांगितले. ते सरप्रायिस ठेवले होते. जेवताना त्या काकाना आज कासव दिसण्याची शक्यता आहे का विचारले होते, ते म्हणाले हो. हे कासव प्रकरण आधीच त्यांना सांगुन घेउन आलो असतो अणि आयत्या वेळेला जर कासव दिसला नसता तर मला नको नको ते ऐकावे लागले असते. तर कासवाची अंडी ७ च्या सुमारास तपासली जाणार होती आमच्याकड़े
वेळ होता म्हणून समुद्रात शिरलो

.
आंजर्ले समुद्र किनारा.

.

.

.

.

.

.

.

आंजर्लेचा समुद्र किनारा खुप सुंदर अणि शुभ्र होता. गर्दी जवळ जवळ न्हवतीच. पण लाटा मात्र जोरदार होत्या. वाटर स्पोर्ट्स नावाचा प्रकार इथे न्हवता. ते एक बरे झाले.
आमचा एक डोळा त्या कासवांची अंडी होती त्या तिथे होता, आता तिकडे वर्दळ दिसत होती म्हणून म्हणून आम्ही तिकडे कूच केले.

.

कासवची अंडी ही अश्या प्रकारे जालीमधे बंदिस्त केली होती. इथे दिवसरात्र २ राखणदार असतात. कासव किनार्याला येउन अंडी घालून निघून जाते, त्यानंतर त्या अंड्याना धोका असतो तो कुत्री, पक्षी, कोल्हे, अणि माणुस यांपासून. माणसे ती अंडी अणि लहान कासव चविष्ट लागतात म्हणून आवडीने खातात.

.

अंडी ही अश्या प्रकारे जतन केली जातात.
ज्या अंड्यातुन पिल्ली बाहेर येण्याची शक्यत जास्त आहे किंवा जी अंडी तयार झाली आहेत ती वालुवर टोपली खाली ठेवली जातात. बाकीची रेतीच्या खाली.
त्या दिवशी ६ पिल्ले तयार होती. त्यांना एका पाटीत घालून समुद्राच्या पाण्यापासून साधारण १०० मीटर अंतरावर ठेवली जातात जेणेकरून ते स्वतः चालत चालत समुद्रात जातील. अणि त्या नुकत्याच जन्मलेल्या पिलाना समुद्र कुठे आहे हे ही आपोआप समजते.

.

हे सगळ आपण पाहू शकतो फोटो वेगैरे काढू शकतो फक्त काही अटी असतात, फ़्लैश बंद करायचा, त्यांना हात लावायचा नाही, त्यांच्या चालायच्या मार्गात यायचे नाही, आरडाओरडा कमी करायचा. ते स्वयंसेवक त्यांना एका पाटीत घालून घेउन आले, तिकडे एक चौकोनी रेशा आखल्या होत्या. कासवाना त्या चौकोनात सोडले अणि बाकी प्रेक्षक त्या सीमारेशेबाहेरून फोटो वेगैरे काढू शकत होते.

.

एवढी एवढी ती पिल्ले अणि त्या रेतीतुन १०० मीटर अंतरावर असलेल्या समुद्रात जाण्यासाठी बरच कष्ट करत होती. आमचे दोन्ही कैमरे १८-५५ च्या बेसिक लेंस वाले असल्याने पाहिजे तसे फोटो मिळाले नाहीत.

.

.
स्वयंसेवकाचे एक छायाचित्र.

एकंदरीत दिवस चांगला गेला अणि सार्थकी लागला.

आंजर्लेतील काही छायाचित्रे

.

.

.

.

दिवस ३रा
एकूण त्या सोनकुटीर मधली व्यवस्था आम्हाला आवडली नाही, होमस्टेच्या नावाने लोज दिला होता. स्वच्छता न्हवतीच वर अणि मालकाची अरेरावी ती वेगळीच.आदल्या दिवशी दिवेआगरमधे जावयासारखा आदरातिथ्य झोडपून झाल्यावर हे आम्हाला मान्यच न्हव्ते. २ दिवस रहायचे प्लान होता अंजर्ल्यात पण बोजा बिस्तारा गोला करुण गाडीत भरला म्हटले चला पुढच्या बीचवर जाऊ. त्याआधी कड्यावरचा गणपती पहायला गेलो.

.
मंदिरात फोटो काढले नाहीत.

.

.
कड्यावरून दिसणारे दृश्य

कड्यावरचा गणपती पाहून पुढे हर्णेच्या रस्त्याला लागलो, मित्रांनी आता सुट्टीच्या दिवशी रहायची सोय आयत्या वेळी कशी होणार असे विचारले म्हटले चला रे बघू.
नाहीच जमले कुठे तर मंदिरात नाहीतर येष्टी स्टैंड वर झोपू.

.
वाटेत हा नजारा. खाली दिसतोय तो आंजर्लेचा किनारा.

.
खाली दिसतय ते हर्णेगाव अणि समुद्रात सुवर्णदुर्ग किल्ला.

.
आई अणि बायको चक्क ४ दिवस मित्रांसोबत उंडारण्याची मुभा देते तेव्हा- आनंद पोटात माझ्या माईना.

हर्णेमार्गे पाळंदेच्या थोड़े पुढे आलो अणि एक मस्त स्पॉट दिसला तिथेच बाजूला होटल देखिल होते, सरळ गाड़ी घातली अणि चौकशी केली रूम मिळाली. होमस्टे न्हवता पण होटल मस्त होते . ओजानुप निवास. जेवण देखील सुंदर अणि व्यवस्था भारी.

सामान टाकुन आधी जेवायला गेलो.

.

.

.

.
होटलच्या खिडकीतुन दिसणारा नजारा.

जेवल्यावर सुवर्णदुर्ग अणि हर्णे मधला बाजार पहायला निघालो.
१५० रुपये प्रत्येकी भरून एक नाव केली अणि किल्ल्यावर निघालो. २० मिनिटे लागली.

.

.
किल्ल्याजवळ

.

किल्ला फिरायला फक्त अर्धा तास दिला होता त्यात आमचा २०% देखील पाहून झाला नाही.
किल्ल्यावर बघण्यासारखे जास्त काही नाही पण तिथून दिसणारा नजारा सुंदर होता.

.
किल्ल्याचे प्रवेशद्वार

.
वाटेत पडलेली तोफ.

.
मारुतीराया

.
कुठेतरी सापडलेले गोमुख इथे प्रवेशद्वाराच्या पायरीवर ऐडजेस्त केले होते.

.

.

.

त्यानंतर हर्णेमधील मासेबाजार

.

.

.

.

.
शेती असो की मासेमारी आमची गरज लागतेच.

.

त्यानंतर मुरुड्चा किनारा प्रसिद्ध आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला, अणि लक्षात आले की सगळी कॅश संपली आहे एटीएम बंद आहेत. मग मुरुड जवळ एका स्थानिक शिवसैनिकाने मदत केली, म्हणाला तिकडे बार आहे तिथे तुम्ही कार्ड स्वायिप करुण कॅश घ्या. माझे नाव सांगा. मग का्य ८०० ची खरेदी करुन ७००० कॅश घेतली.हुस्श्हह.
पण मुरुड चा किनारा खुपच गर्दीचा वाटला, अगदी गाड्या पार्क केल्या होत्या बीचवर, वाटर सपोर्ट फुल जोमाने चालू होते, मधेच घोडा गाड्या अणि ऊंटही तुरु तुरु पळत होते. भरपूर गर्दी.
म्हटले चला आपल्या होटल समोर चांगला बीच आहे तिकडे जाऊ.

पण तिथ पोहोचे पर्यंत अंधार पडल्याने फोटो घेणे जमले नाही.

.
बर्यापैकी आलेला एक फोटो.

दुसरया दिवशी १० वाजता मुंबईसाठी पाळंदे सोडले, रमत गमत ७ वाजता घरी.
४ दिवस मांसाहारी खाण, राहणे, डिजेल, फिरणे, ३ डजन हापूस एवढ्याचा खर्च प्रत्येकी ३८०० रुपये.

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

10 May 2018 - 11:44 pm | दुर्गविहारी

मस्त लिहीलयं. अंजर्ल्याजवळचा किनारा सुंदर आहे आणि कासव महोत्सव पहायला मिळणे म्हणजे , "चेरी ऑन द केक".
बाकी हर्णे गावाचा फोटो दिलाय ते गाव हर्णे नसून पाजपांढरी आहे. डोंगरावरचा घाट उतरून खाली आलो कि हर्णे समोर दिसते. वर डोंगरावर एक पॉईंट केला आहे, तिथून हर्णेची दुर्ग चौकडी कनकदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला आणि सुवर्णदुर्ग दिसतात.
सुवर्णदुर्ग मी अद्याप पाहिला नाही. बाकी हर्णेचा मासळी बाजार पहाण्यासारखा असतो.
एकंदरीत ट्रिप स्वस्त आणि मस्त झाली आहे. बाकी हॉटेलचे संपर्क क्रमांक दिले असते तर बरे झाले असते.

सतिश पाटील's picture

11 May 2018 - 10:32 am | सतिश पाटील

चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद.
ओजानुप निवास मु. सालदुरे पो. असुद .ता. दापोली दूरध्वनी क्रमांक-09545299993, 09921647288 निलेश खेडेकर.
बाकी अंजर्ल्याचा मुक्काम ठीक न्हवता.

प्रचेतस's picture

11 May 2018 - 9:29 am | प्रचेतस

आंजर्ले गावच्या पाखाडीतून कड्याच्या गणपतीला चालत साताठ मिनिटात पोहोचता येतं. पाखाडी हळूहळू चढत जाऊन कातळावरुन कड्याच्या गणपतीला भिडते. सुंदर पायवाट आहे. आंजर्ल्याला लाटा भरपूर असतातच शिवाय गर्दीही त्यामानाने खूपच कमी असते. आंजर्ल्याच्या शेजारीच श्री. ना. पेंडश्यांचे मुर्डी हे गाव आहे. आंजर्ले, मुर्डी, आसूद, दापोली परिसर श्री.नांं.च्या कादंबर्‍यांतून सतत डोकावत असतो. हर्णे गावातून फिरताना माश्यांच्या वासामुळे जाणे मात्र अवघड होते.
सुवर्णदुर्गाचे फोटो भारी, फारसं कुणी जात नाही किल्ल्यावर.

कंजूस's picture

11 May 2018 - 10:26 am | कंजूस

भारी भटकंती फोटो छान!

सुंदर फोटो. मजा आली सर्व पहाताना.

टवाळ कार्टा's picture

11 May 2018 - 5:52 pm | टवाळ कार्टा

नुसती जळजळ....बाईकने जाता येईल का?

सतिश पाटील's picture

12 May 2018 - 10:24 am | सतिश पाटील

बाईकने तर अजुन मज्जा येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2018 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं सफर ! फोटो सुंदर ! कोकणचे असे फोटो बघितले की बॅग भरून चार दिवसांसाठी निघायची इच्छा उचंबळून आली नाही तरच नवल !