घरकामातील आटोपशीरपणा

परिधी's picture
परिधी in काथ्याकूट
18 Apr 2018 - 10:20 am
गाभा: 

"काय बाई त्या तनुजाचा स्पीड कामाचा! कधी करते न कसं करते कळतही नाही!"

"कारटे हात भराभरा चालवत जा ग.. किती हळू हळू करते काम!"

"तू राहू दे बाई! तुझ्या दोन पोळ्या होईपर्यंत सरलाबाई दहा पोळ्या करून, पोळपाट, ओटा साफ करून अजून काय करायचं का ताई म्हणून विचारतात"

"ओ बहिणाबाई, आईला जरा मदत करत जा, नाहीतर जेवायचे वांधे होतील नवरोबाचे!"

थोड्याफार फरकाने अशा प्रकारची वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो असतो.. स्त्रियांनी घरकाम करावे की नाही, घर दोघांचं दोघांनी सांभाळायचं असत इ. चावून चोथा झालेले विषयावर चर्चा न करता, उत्सुकता म्हणून एक प्रश्न मिपाकरांसमोर मांडत आहे, तो असा,

खरोखरच काही व्यक्तींचा कामाचा उरक प्रचंड असतो. तर काही अगदी हळूबाई/हळूबाबा असतात. हा कामाचा स्पीड कसा काय येतो? तो प्रत्येकाचा मूळचा गुण असतो कि असा स्पीड आत्मसात करता येऊ शकतो? जर आत्मसात करता येत असेल तर त्यासाठी काय करावे? स्त्री वि पुरुष अशा वादात न पडता केवळ जर एखाद्याला हे स्किल शिकायचे असेल तर ते कसे शिकावे यावर निकोप चर्चा मिपाकर करतील अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

हे केवळ घरकामापुरतेच मर्यादित नसावे तर प्रत्येक प्रकारच्या कामाच्या बाबतीत एक तर काम पटापट उरकणारी पण कामाचा दर्जा यथातथाच असणारी, आणि काम हळू करणारी पण चांगलं करणारी माणसं असतात. तर चर्चा त्या दृष्टीने झाल्यास उत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Apr 2018 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

कोणतेही काम समाधानकारक पद्धतीने करण्यासाठी, "अपेक्षित असलेली किमान गुणवत्ता आणि घेतलेला वेळ", या दोघांचे महत्व समान असते.

कंजूस's picture

18 Apr 2018 - 1:10 pm | कंजूस

लवकर उरकून जायचय कुठे?

वाचलेल्या वेळ अनेकप्रकारे सत्कारणी लावू शकतो. एखादा छंद जोपासता येईल, व्यायाम करता येऊ शकतो..काहीच नाही तर झोपा काढायच्या :)

प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2018 - 3:28 am | प्रसाद गोडबोले

लवकर उरकून जायचय कुठे?
>>>
वीकडे ला ऑफीसला जाय्चं असतं म्हणुन जरातरी गडबड करावी लागते पण वीकेन्डला मात्र खरंच कशाला गडबड करा ? निवांत प्रत्येक क्षण अस अंतर्बाह्य उपभोगत आरामात सारी कामे करावीत !

अवांतर :

सगळ्यात भारी आरामात कराय्चे काम म्हणजे टबबाथ ! बडे आरामसे !

" सब्बाथला टब्बाथ सब्बाथला टब्बाथ " असा दंगा करत पोरगा टब मध्ये जाऊन बसला की आपणाही टबमध्ये बसावे , पाण्यात कुठे साबणाचे फुगे कर , कुठे
तोंडावर पाणी ऊडव , कुठे हळुच शॉवर सुरु कर , कुठे स्विमिंग कर असले खेळ करत किमान १५ २० मिनिट सहज जातात , " बास आता सर्दी होईल चल बाहेर पटकन " असे फर्मान गृहखात्याकडुन आले की पोराला बाहेर हकलावे . " मी स्वतःच्या पोराला शिस्त लाऊ शकते , सासुबाईंच्या नाही" असलं काही ऐकु आलं तरी त्याच्या कडे दुर्लक्ष करावं . मोबाईलवर भीमसेनजींच्या आवाजातील राग शुध्द केदार लावावा , आता तब्बल ३०-४० मिनिटांची निश्चिंती , लाईट घालवावी अन कोमटपाण्यात जाऊन , डोळे मिटुन बसुन रहावे . हळुहळु पाणी गार होत जाते किंव्वा अपले शरीर त्याला अ‍ॅडजस्ट होत हाते , डोळ्याच्या पापण्या गार पडत आहेत असे वाटायला लागते , हळु हळु आता दाराच्या फटीतुन येणाराही प्रकाश पुरेसा जाणवायला लागतो, भीमसेनजींनी लावलेला सुर , तबल्याचा ताल , पाठीमागे चालु असलेला तंबोरा आत कसं सारं स्पष्ट जाणवाय्ला लागतं,

ओशोचं वाक्य मनात चक्कर मारुन जातं - There is nothing to achieve, there is nowhere to go. You are alrteady perfect and you are already complete ! Be at peace !! ,

मध्येच मार्कस मनात डोकाऊन जातो ...“ No retreat offers someone more quiet and relaxation than that into his own mind ! "

जणुकाही आपण ह्या टबमधल्या पाण्यात विरघळुन जात आहोत असे वाटते , मग माऊली आठवतात -
सांडूनि मीठपणाचा लोभु । मीठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।
तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥

हळुहळु पाण्यावरचे तरंग शांत होत जातात , मनात चालणारे विचार अगदीच शांत होतात असे नाही पण किमान संथ होत जातात. सकाळीच तुडुंब नाष्टा केला असल्याने हलकीशी तंद्री लागते , गाणं कधी संपतं ते आपल्याला कळत नाही . निव्वळ सुख ! अहाहा !!

बाथरुम मधील दरवाजा उघडतो, लाईट लागते , आपलं मन मात्र त्या निर्विकल्प अवस्थेच्या बाहेर यायला तयार नसतं. " बाबा , गाणं संपलं , दुसरं लाव "
डुबुक !!
त्या डुबुक आवाजाने आपली तंद्री मोडते , साहेबांनी मोबाईल टब मध्ये टाकलेला असते __/\__ पोराला बाहेर पाठवलं की दार लॉक करायचं असा आपण कानाला खडा लावतो अन उर्वरीत दिवस मोबाईल वाळवण्यात जातो !

बास बास , पुढच्या जन्मी तर आपण पाणघोडा व्ह्यायचं फिक्स केलं आहे !!

दिमित's picture

20 Apr 2018 - 9:54 am | दिमित

>>There is nothing to achieve, there is nowhere to go. You are already perfect and you are already complete ! Be at peace !!

एक न॑बर!!!

>>बास बास , पुढच्या जन्मी तर आपण पाणघोडा व्ह्यायचं फिक्स केलं आहे !!
म्हणजे हिप्पोपोटेमस का कायस म्हणतात ते का? :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2018 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी !

बास बास , पुढच्या जन्मी तर आपण पाणघोडा व्ह्यायचं फिक्स केलं आहे !!

हे एकदम ब्येष्ट !!! =)) =))

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2018 - 10:57 pm | टवाळ कार्टा

यात वाईन घुसवा....सोबत असेल तर मग क्काय ;)

टवाळ कार्टा's picture

18 Apr 2018 - 2:04 pm | टवाळ कार्टा

आळशी माणसांचा सल्ला घ्या....कोणतेही काम कमीत कमी श्रमांत आणि कमीत कमी वेळेत करण्याचे उपाय असतात त्यांच्याकडे :)

पिलीयन रायडर's picture

18 Apr 2018 - 2:33 pm | पिलीयन रायडर

खूप काम असेल तर आपोआप ते उरकावं लागतं. मग येतो स्पीड. पण तरीही मला वाटतं की एक मूळ स्वभाव असतो. काहींचा हातच असा असतो की उरक उत्तम आणि काम सुद्धा व्यवस्थित. पण काही लोक दिवस घालवूनही तेच काम पूर्ण किंवा धडपणे करू शकत नाहीत.

उरक हा मल्टिटास्किंग करता येतं का ह्यावर अवलंबून असतं. एका वेळी एकच काम करणाऱ्या कडे शक्यतो उरक असेल असं वाटत नाही. जसं की बायका स्वयंपाक करताना एकीकडे कुकर लावतील, दुसरीकडे भाजी फोडणीला देऊन वाफ काढतील आणि भाजी होईस्तोवर ओटा आवरून घेतील असे काहीसे. किंवा भाजीच्या फोडणीत आधी कोशिंबिरीची फोडणी काढून घेतील / तळण करून घेतील आणि त्यात भाजी करून ते तेल वापरून टाकतील. ह्याला आधी विचार हवा की कोणती कामं एकात एक होऊ शकतात. कोणती भांडी परत वापरली जाऊ शकतात. काय रात्रीच तयारी करून ठेवता येऊ शकतं. कशाची आठवड्यात एकदा तयारी केली की जमतं.

एकंदरीत हात बसला आणि विचार असला की उरक येतो.

एकंदरीत हात बसला आणि विचार असला की उरक येतो.

प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेकट याशिवाय इलाज नाही असे दिसते..

टवाळ कार्टा's picture

19 Apr 2018 - 6:40 pm | टवाळ कार्टा

प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेकट याशिवाय इलाज नाही असे दिसते..

अँड वीमेन आर ऑलवेज परफेक्ट ;)

राघव's picture

18 Apr 2018 - 6:14 pm | राघव

अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे हा उरक असतो. काही अगदी बॉर्न टॅलेंट असतात तेवढे सोडून दिलेत तरीही भरपूर गोष्टी याला हातभार लावतात.

साधारणपणे, ज्या व्यक्तीचा कामातला उरक चांगला व कामही चांगले, त्यांच्या कामाच्या पद्धतीचे निरिक्षण केल्यास काही खास मुद्दे लक्षात येतात -
- जे काम करायचे ते चांगलेच हा एक स्थायीभाव असतो. त्यातूनच स्वतःच्या कामात आणिक सुधारणा करत राहण्याची वॄत्ती जाणवते. One may say these people are good critic of their own work!
- कामासाठी लागणारी सर्व साधने, कच्चा माल [कामापरत्वे बदलणारा] हातासरशी उपलब्ध होईल असे नियोजन असते. जर तसे नसेल तर तेच आधी केले जाते.
- दुसर्‍यांच्या कामात लुडबुड जरी करत नसलेत तरी गरज पडली तर मदतीला स्वतः तत्पर असतात. त्यामुळे या लोकांना कामात मदत करायला इतरेजन बर्‍यापैकी साथ देतात. अर्थात् उगाच कुरकुर करणारा दुर्लक्षीत राहतो.
- आपला वेळ कसा वाचेल याचा अदमास घेऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जातो. अगदी लिहून काढले नाही तरी डोक्यात फिट असते. अंगाबाहेर बोंगा करण्याची खाज/खोडी यांना नसते. आपल्याला असणारा वेळ आणि ताकद याचा अचूक अदमास यांना असतो.
- दुसर्‍यांचे काम बघून त्यातून चांगले ते उचलण्याची, तसेच दुसर्‍याच्या कामातल्या चुका शोधून दाखवण्यापेक्षा त्या सुधारायला मदत करण्याची वृत्ती असते.
- स्वतःची टिमकी मिरवण्याची सवय नसते. त्यामुळे माणसं दुखावण्यापेक्षा त्यांना जोडण्यात रस असतो.
.
.
.
- यातील बर्‍याच जणांना/जणींना नवनवीन कल्पना सुचतात व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याकडे ओढ असते.

याचा अर्थ उपरोक्त सगळे मुद्दे नसलेल्यांचा कामात उरक नसतो असं मात्र नाही. पण अशांना स्वतःच्या कामातून तो आनंद मिळत नाही हे खरे. :-)

स्वगतः इथं बोलायला काय जातंय रे राघवा.. स्वतःच्या कामांकडे एकदा नजर टाकलीस तरी पुरे! ;-)

माझ्या ओळखीत एक काकू आहेत त्या म्हणतात कि सकाळी उठलं कि डोक्यात कामाची लिस्ट तयार पाहिजे (कुठलं पातेलं कुठला चमचा वापरायचा इथपासून आणि ते सुद्धा क्रमानुसार). अगदी २ मिन्ट रिकामी मिळाली कि ओट्या वरचं आवर्तात. त्या काकूंचं किचन एका छोट्या ऑफिस डेस्क एवढंच आहे, तरीही अतिशय उत्तम जेवण सतत बनवतात. पटापट तरीही एकदम स्वच्छ आणि चविष्ट. कधी जमेल देव जाणे :प

पिलीयन रायडर, राघव आणि वीणा३ खूप छान मुद्दे सांगितलेत. सर्व प्रतिसादांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे वेळेचं नियोजन ज्यांना जमत ते अंगावर कितेही काम पडले तरी विनासायास हसतमुखाने करू शकतात..

नाही.. अगदी विनासायास नाही.. सायास पडतातच.. कदाचित कधी-कधी त्रासही होत असेल.. पण ते निभावून नेण्याचा आत्मविश्वास असतो. :-)

पिशी अबोली's picture

19 Apr 2018 - 5:02 pm | पिशी अबोली

कामाचा उरक असलेले लोक सुखी असतात का?

सुचिता१'s picture

19 Apr 2018 - 5:55 pm | सुचिता१

माझा अनुभव तर नाही. जास्त काम अंगावर पडतं. पण नीट नेटकं काम करायची सवय च होऊन जाते . त्यामुळे निभावता येतं.

मला वाटत, अंगातिल आळ्स हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आळ्स ज्यांच्या अंगात नाहि ते सगळि कामे आवडिन करतात.
मग ते काम चांगल करायचा त्यांना कटांळा नसतो. एक काम झाले की दुसरे करण्याचा त्याना कंटाळा नस्तो, त्यामुळे हळुह्ळु
करण्याचा प्रश्न्च नाहि. दुसरे म्हण्जे स्वभाव, व्रुशभ राशिचि माणसे काम अतिशय नीट्नेटके करतात. उतावळा माणुस सगळि
कामे घिसाड्घाईने करेल. वय हा पण एक महत्व्वाचा मुददा आहे.

अमित खोजे's picture

19 Apr 2018 - 8:08 pm | अमित खोजे

मला वाटते एखादे काम जेव्हा आपण "माझे" आहे असे समजून करायला घेतो तेव्हा त्यातील सराईतपणा आणि सौंदर्यदृष्टी आपोआप येत जाते. आता वीणा ताईंच्या काकू! आपल्याला एकदम छोट्याश्या जागेत रोजचा स्वयंपाक करायचा आहे - हि परिस्थिती त्यांनी मनाने संपूर्णपणे स्वीकारली आहे. जेव्हा आपण एखादी परिस्थिती संपूर्णपणे मनाने स्वीकारतो तेव्हा आपण पुढचा विचार करायला लागतो. मग त्या छोट्याश्या जागेत आपल्याला ४-५ माणसांचा स्वयंपाक कसा करता येईल याच्या क्लृप्त्या आपोआप सुचत जातात. सरावाने - तीच तीच कृती परत परत करण्याने - मग कमी भांड्यांमध्ये तोच स्वयंपाक कसा करता येईल याची कल्पना सुचते. आणि आपोआप हाताला उरक येतो कारण एका कृतीनंतर पुढची कृती काय करायची आहे याची कल्पना अगोदरच असते.

जेव्हा मी नवीन नवीन स्वयंपाक शिकत होतो तेव्हा माझे याच्या अगदी उलट व्हायचे. प्रत्येक गोष्ट आठवून किंवा पुस्तकात बघून करावी लागायची त्यामुळे आपोआप वेग कमी असायचा. आता थोडा वाढला आहे पण माझ्या आई किंवा बायको इतका नक्कीच नाही.

पौगंडावस्थेत जेव्हा घर आवरणे, स्वयंपाक शिकणे या गोष्टी आई शिकायला सांगते तेव्हा ते काम 'माझे' आहे हेच मुळात मुलांनी/आपण स्वीकारलेले नसते त्यामुळे मग अळंटळं करणे, उशीर लावणे या सर्व गोष्टी होतात.

बाकी सर्व गोष्टी सारख्या ठेऊन शारीरिक क्षमतेप्रमाणेसुद्धा कामाच्या वेगात फरक पडू शकतो.

अंगात आळशीपणा असला कि कामाचा वेग सुद्धा वाढतो.

उगाच १०० प्रकारची भांडी, पंधरा प्रकारच्या भाज्या इत्यादी विकतच घेऊ नये. घर छोटे आणि गरजेपुरते घ्यावे. वापरात नसलेले रूम्स बंद करून ठेवावेत. वापरात नसलेले फर्निचर झाकून ठेवावे. आठवड्याचा मेनू अतिशय छोटा, स्वस्त पण पोषक ठेवावा. टेकनॉलॉजि चा भरपूर वापर करावा.

आठवड्यातून एकदा वगरीए साफ सफाई करण्या ऐवजी कुठेही कचराझाला कि ताबडतोप साफ करायची सवय घालून घ्यावी.

पुरुषांना घरकामाची सवय किंवा रुची अनेकदा असत नाही अश्या वेळी उगाच त्यांच्या मागे लागण्यापेक्षा अमुक अमुक कामे आपण करावी असे स्पष्ट सांगावे. प्रत्येक कामात पुरुषांना गती नसते पण जिथे जास्त अक्कल लागत नाही अशी कामे ते सहज करू शकतात. उदाहरणार्थ कचरा बाहेर फेकणे, डिशवॉशर भरणे, बाथरूम मधील कचरा साफ करणे इत्यादी.

पण घरकाम आटोपशीर करण्याचा नंबर १ उपाय :

जास्त सामान, खाद्य पदार्थ घरांत घेऊच नयेत..

माहितगार's picture

20 Apr 2018 - 1:16 pm | माहितगार

..प्रत्येक कामात पुरुषांना गती नसते पण जिथे जास्त अक्कल लागत नाही अशी कामे ते सहज करू शकतात. ...

:))

सुचिता१'s picture

23 Apr 2018 - 12:25 am | सुचिता१

अक्कल लागत नाही अशी कामे ते सहज करू शकतात.

खरं आहे. :) :)

रायनची आई's picture

20 Apr 2018 - 3:13 pm | रायनची आई

खूप उपयोगी धागा काढला आहे.
प्रत्येकाचेच एकेक मुद्दे पटण्यासारखे आहेत. खासकरून वर अमित खोजे यानी लिहील्याप्रमाणे जेव्हा एखादे काम आपण आपलीच जबाबदारी (ownership) आहे समजून केले तर त्रागा, कटकट न वाटता होईल..
आणि साहना यानी म्हटल्याप्रमाणे फार फाफटपसारा न वाढवणे हेही उपयोगी वाटतय..

अत्रन्गि पाउस's picture

21 Apr 2018 - 10:23 am | अत्रन्गि पाउस

कोणतेही काम करतांना
कामाचे तपशील, गरज, उद्देश आदी निश्चित करायला ८० %
काम कसे करायचे ह्याचे डिझाईन : १५ %
प्रत्यक्ष काम : ५ %

ह्यातील टक्के वारी थोडीशी इकडे तिकडे
पण ह्यात री वर्क शून्य किंवा अगदी कमी

ह्यात काम तर नीट होतेच, पण वेळही भरपूर वाचतो ...

धर्मराजमुटके's picture

21 Apr 2018 - 6:34 pm | धर्मराजमुटके

घरकामातील आटोपशीरपणा ही गृहिणींसाठीचा प्लस गुण धरला तरी त्याचे तोटे देखील कधी कधी जाणवतात. एरवी नको असलेल्या अशा आटोपशीर गृहीणी लग्नप्रसंग, घरातील एखादे कार्य यावेळी सगळ्यांना एकदम हव्याहव्याश्या वाटतात. एकदा त्यांना घोड्यावर बसवले आणि त्यांचे अंगावर काम लोटून दिले की आळशी बायका मेकपक करुन, सेल्फीज काढून मिरवायला मोकळ्या ! आटोपशीर गृहिणी मरतात बॅकएंडला !

अभ्या..'s picture

21 Apr 2018 - 9:02 pm | अभ्या..

आळशी बायका मेकपक करण्यात किंवा सेल्फ्या काढताना आळस करत नाहीत का?
;)

अर्धवटराव's picture

24 Apr 2018 - 2:19 am | अर्धवटराव

कामाचा आटोपशीरपणा, टापटीप, सौंदर्य का काय ते... सगळे गुण घेऊनच जन्माला आल्यागत वागते आमची सौ. त्याच्या एकदम विरुद्ध म्हणजे अस्मादीक. अहो, कामं पडलेली असताना भूक न लागणे वगैरे प्रकार होतात तिच्या बाबतीत. मला आजवर कळलं नाहि कि भूक न लागणे म्हणजे नेमकं काय. सहाना मॅडमचा सल्ला तंतोतत पाळला जातो आमच्या घरी. चिरंजीव बिचारा आईचं ऐकावं का बापचं अनुकरण करावं यात कन्फ्युज असतो. टाइमपास करायचं त्याचं स्कील तसं वाखाणण्याजोगं आहे. पण 'तुझ्या आजीने केलेली चुक मी करणार नाहि' असली काहि भयानक दमदाटी झाली कि चिरंजीव पुढचे १० मिनीट आईच्या वळणावर जातात.
या विकेण्डचीच गोष्ट. सकाळी उशीरा उठणे, कितीही लेट झालं तरी जेवणाअगोदर चहा, नाष्टा, कॉफी हा क्रम न चुकवणे, दुपारी भरपूर खेळ, संध्याकाळी फिरायला जाणे... असा भरगच्च कार्यक्रम आटपुन संध्याकाळी थोडा निवांत झालो, आणि श्रमपरिहार म्हणुन बीअर + तंदुरी चिकन असा माफक बेत आखायला गेलो तर मेथी निवडायच्या कामगिरीवर नेमणुक झाली आमची... आणि त्याचं पारितोषीक काय, तर फक्त एक थँक्यु. मग कसा टिकुन रहाणाअर कामाचा उत्साह.

मराठी कथालेखक's picture

24 Apr 2018 - 8:07 pm | मराठी कथालेखक

मोशन स्टडी / Therblig याबद्दल माहिती करुन घ्या.
LEAN /JIT / 7 wastes ची तत्वे पण रंजक आहेत ती ही जाणून घ्या.. फायदा होईल.
अनावश्यक हालचाली, अनावश्यक पसारा कमी करत गेलात की तुमची कामे वेगाने होईल तुमचा turn around time कमी होईल.