पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)

अनिकेत कवठेकर's picture
अनिकेत कवठेकर in तंत्रजगत
15 Mar 2018 - 2:51 pm

(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील पृथ्वी किंवा स्थायूंचे गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली स्थायूद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे. असो.)

पृथिवीत्वाभिसम्बन्धात् पृथिवी |
Earth is that which is comprised in the class ‘Earth’.
सर्व स्थायुद्रव्ये ही पृथ्वी या वर्गात मोडतात.

रूपरसगन्धस्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथकत्वसंयोगविभागपरत्वापरत्वगुरुत्वद्रवत्वसंस्कारवती |
It has the qualities of – colour, taste, odour, touch, number, dimension, isolation, distance, proximity, gravity, fluidity and the ability to apply force.
स्थायुद्रव्यांना रंग, चव, वास, स्पर्श(तापमान), संख्या, मोजमापे, वेगळेपणा असतो. ती लांब किंवा जवळ जाऊ – येऊ शकतात, त्यांच्यावर गुरुत्वबल कार्य करते, ती प्रवाही असतात व दुसऱ्या द्रव्यांवर बाह्यबळ लावू शकतात.

एते च गुणविनिवेशाधिकारे रूपादयो गुणविशेषा सिद्धा: |
These qualities have been described in the section Gunaviniveshadhikar (of the Vaisheshik Sutras).
वैशेषिक सूत्रांच्या गुणविनिवेशाधिकार नावाच्या भागात हे रंग इत्यादि गुण सांगितले आहेत.

(वैशेषिक सूत्र) गुणविनिवेशाधिकार (२/१/१)
रूपरसगन्धस्पर्शवती पृथिवी |
स्थायूंना रंग, चव, वास व स्पर्श असतो.

चाक्षुषवचनात् सप्त सङ्ख्यादय: |
In the section Chakshushvachan seven properties have been described.
चाक्षुष नावाच्या वैशेषिक सूत्रात सात गुण सांगितले आहेत.

(वैशेषिक सूत्र) चाक्षुषघटितसूत्र (४/१/१) –
संख्यापरिमाणानि पृथक्त्वं संयोगविभागौ परत्वापरत्त्वे कर्म्मच रूपिद्रव्यसमवायाच्चाक्षुषाणि |
चाक्षुषघटितसूत्रात म्हटलंय की संख्या, परिमाण, वेगळे असणे, जवळ येणे व दूर जाणे, मोठे-लहान असणे, हालचाल करणे, रंग असणे हे गुण केवळ डोळ्यांनीच किंवा चक्षुंनीच जाणवू शकतात. म्हणजेच या गुणांचा व डोळ्यांचा समवाय संबंध असतो.

पतनोपदेशाद् गुरुत्वम् |
The mention of Patana (falling) implies gravity.
स्थायूद्रव्ये पडतात याचाच अर्थ त्यांच्यावर गुरुत्व काम करते.

अद्भि: सामान्यवचनाद् द्रवत्वम् |
The mention of Earth as possessing certain points in common with Water indicates fluidity.
पृथ्वीद्रव्याचे काही गुण जलद्रव्यासारखेच असून त्यात प्रवाहीपणा हा गुणधर्मही येतो.

उत्तरकर्मवचनात् संस्कार: |
The mention of one action following upon another indicates the ability to generate movement through application of force.
एकामागोमाग दुसऱ्या हालचालींचा उल्लेख असल्याने स्थायु हे बळ लावून गती निर्माण करतात हे लक्षात येते.

क्षितावेव गन्ध : |
Only the solids have smell.
गन्ध हे केवळ स्थायूंनाच असतात.

रूपमनेकप्रकारं शुक्लादि |
They have different colours including white.
स्थायूंना पांढरा इत्यादि अनेक रंग असतात.

रस: षड्विधो मधुरादि : |
They have six different tastes starting with the sweet taste.
स्थायूंना गोड इत्यादि सहा वेगवेगळ्या चवी असतात.

गन्धो द्विविध: सुरभिरसुरभिश्च |
They have two types of smells ie desirable and undesirable.
हवासा आणि नकोसा असे स्थायूंचे दोन प्रकारचे वास असतात.

स्पर्शोऽस्या अनुष्णशीतत्वे सति पाकज: |
Their touch is neither hot and nor cold. The temperature change is brought out because of cooking.
त्यांचा स्पर्श ना थंड असतो ना उष्ण. त्यातला बदल हा पाकक्रियेमुळे घडतो.

सा च द्विविधा – नित्या चानित्या च |
Earth is of two kinds – eternal and evanescent.
स्थायूंचे दोन प्रकार आहेत – टिकाऊ आणि तात्कालिक अस्तित्व असणारे.

परमाणुलक्षणा नित्या, कार्य्यलक्षणात्वनित्या |
The earth in the form of atoms is eternal and that which is in the form of products is evanescent.
अणुरूपात स्थायू हे अनंतकाळापर्यंत राहतात, पण नेहमीच्या बघण्या-वापरण्यातील स्थायूंचे अस्तित्व हे तात्कालिक असते.

सा च स्थैर्य्याद्यवयवसन्निवेशविशिष्टाऽपरजातिबहुत्वोपेता शयनासनाद्यनेकोपकारकरी च |
The evanescent earth is qualified by such an arrangement of its component particles as tends to make it solid or rigid; it comprises many sub-classes; and supplies many useful things, in the shape of beds, chair and the like.
तात्कालिक अस्तित्व असणाऱ्या स्थायूंमधील घटकांची एक विशिष्ट योजना असल्यानेच त्यांना स्थायूचा आकार येतो. त्यांचे अनेक प्रकार असतात व त्यांच्याद्वारे आपल्याला बिछाना, खुर्ची अशा अनेक गोष्टी मिळतात

त्रिविधं चास्या: कार्य्यम् | शरीरेन्द्रियविषयसंज्ञकम् |
The products of Earth are of three types – in the form of body, the sense organ and the object of perception.
स्थायूपदार्थांचे तीन प्रकार आहेत – शरीरे, इन्द्रिये व जाणिवेला कळणाऱ्या विविध वस्तू.

शरीरं द्विविधं योनिजमयोनिजञ्च |
The bodies are of two types – those born from the womb and those that are not so born.
शरीरे दोन प्रकारची असतात, मातेच्या गर्भातून जन्माला येणारी व तशी न येणारी.

तत्रायोनिजमनपेक्ष्य शुक्रशोणितं देवर्षीणां शरीरं धर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायते |
Such of the latter kind as belong to Gods and the Rishis are born independent of the semen and the ovule, out of atoms acted upon by certain meritorious deeds.
यातील दुसऱ्या प्रकारची शरीरे ही देवता व ऋषी इत्यादिंची असून ती पित्याचे शुक्राणू व मातेचे शोणित यांच्या संगमातून जन्माला आलेली नसतात, किंबहुना त्यांची शरीरे ही पुण्यकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.

क्षुद्रजन्तूंनां यातनाशरीराण्यधर्मविशेषसहितेभ्योऽणुभ्यो जायन्ते |
While those that belong to the little insects and the like, which serves as the bodies fitted for experiencing certain punishments, are born out of atoms acted upon by non-meritorious deeds.
तसेच किडामुंग्यांची शरीरे ही त्यांना काही विशिष्ट पापांची शिक्षा म्हणून लाभलेली असतात आणि तीही अतिसूक्ष्म कणांवर झालेल्या पापकर्मांचे फळ म्हणून आकाराला येतात.

शुक्रशोणितसन्निपातजं योनिजम् |
The body born of the womb is produced from the semen and the ovule.
मातेच्या गर्भाद्वारे जन्माला येणारी शरीरे ही शुक्राणू व शोणित यांच्या पासून निर्माण झालेली असतात.

तद् द्विविधम् जरायुजमण्डजञ्च |
This again is of two kinds – viviparous and oviparous.
गर्भातून जन्माला येणारी शरीरेही दोन प्रकारची असतात – जरायुज किंवा सस्तन आणि अण्डज किंवा अंडी घालणारे.

मानुषपशुमृगाणां जरायुजम् |
The former belongs to the man, the cow and other quadrupeds.
माणूस, गायी आणि इतर चार पायांचे प्राणी हे जरायुज किंवा सस्तन वर्गात मोडणारे आहेत.

पक्षिसरीसृपाणामण्डजम् |
The latter to birds and reptiles.
पक्षी व सरपटणारे प्राणी हे अंडी घालणारे किंवा अंडज आहेत.

इन्द्रियं गन्धव्यञ्जकं सर्वप्राणिनां जलाद्यनभिभूतै: पार्थिवावयवैरारब्धं घ्राणम् |
The sense organ that which makes the odour perceptible is the olfactory organ, this belongs to all animals, and is made up of earth molecules not affected by the molecules of water and other substances.
वासाची जाणीव करून देणारे इंद्रिय गंधेंद्रिय आहे. ते सर्वच प्राण्यांमध्ये असते. ते स्थायूद्रव्याच्या अणूंचे बनलेले असून त्या अणूंवर जल तसेच इतर द्रव्यांचा काहीही परिणाम होत नाही.

विषयस्तु द्व्यणुकादिक्रमेणारब्धस्त्रिविधो मृत्पाषाणस्थावरलक्षण: |
The object appearing in the order of the diad and the rest is of three kinds, the clay, the stone and the vegetable.
नेहमीच्या वापरातील वस्तूंचे रेणू हे दोन, तीन तसेच त्याहीपेक्षा अधिक अणूंच्या एकत्र येण्यातून बनलेले असतात आणि ते तीन प्रकारचे असतात – चिकणमाती, दगड व पाने-फुले.

तत्र भूप्रदेशा: प्राकारेष्टकादयो मृत्प्रकारा: |
To the first kind belong the various parts of the Earth’s surface, and such products of clay as bricks and walls.
त्यातील पहिल्या प्रकारचे स्थायू म्हणजेच माती ही पृथ्वीच्या विविध प्रदेशांमधील सर्वात वरच्या थरांमध्ये मिळते. शिवाय विटा व भिंती इत्यादींमध्येही ती असते.

पाषाणा उपलमणिवज्रादय: |
To the second belong the minerals, the various kinds of stones and gems, the diamond and the like.
दुसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये म्हणजेच पाषाणांमध्ये खनिजे, विविध रत्ने, हिरे, माणके व अन्य मोडतात.

स्थावरास्तृणौषधिवृक्षलतावतानवनस्पतय इति |
And of the third kind are the grasses, herbs, trees with their flowers and fruits, creepers, spreading plants such trees as bear fruits without flowers, and so forth.
तिसऱ्या प्रकारच्या स्थायूंमध्ये गवत, औषधी वनस्पती, झाडे – त्यांची फुले व फळे, वेली, फुलांविनाच फळे येणाऱ्या वनस्पती व अन्य तत्सम प्रकार मोडतात.

मूळ संस्कृत पुस्तक : विकी लिंक

मूळ कथा: विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

प्रतिक्रिया

यातील काही संकल्पना ह्या आजच्या पदार्थविज्ञानाच्या अनुषंगाने कालबाह्य नक्कीच आहेत. परंतु वर सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे तात्कालीन अभ्यास साधने व पद्धतींच्या परिप्रेक्ष्यात राहून त्याकडे पाहिले पाहिजे. अणूस्वरूपात पदार्थांचे गुणधर्म हे सर्वात किमान आकारात राहू शकतात. मोठ्या प्रमाणात पदार्थाची दृश्य रूपे बदलू शकत असली, उदा. बर्फ, पाणी, वाफ, तरी अणूच्या पातळीवर (येथे आधुनिक संदर्भात रेणू) पाण्याचे गुणधर्म हे कायम विशिष्ट असेच असतात. ह्या आधुनिक शास्त्रीय अभ्यासपद्धतीचा पाया एका अर्थाने वैशेषिक तत्वज्ञानात काही प्रमाणात सापडतो असे म्हणायला हरकत नाही. ही भारतीयांना फारच अभिमानास्पद बाब आहे.

पुभाप्र.

रूपरसगन्धस्पर्शसङ्ख्यापरिमाणपृथकत्वसंयोगविभागपरत्वापरत्वगुरुत्वद्रवत्वसंस्कारवती |
It has the qualities of – colour, taste, odour, touch, number, dimension, isolation, distance, proximity, gravity, fluidity and the ability to apply force.
स्थायुद्रव्यांना रंग, चव, वास, स्पर्श(तापमान), संख्या, मोजमापे, वेगळेपणा असतो. ती लांब किंवा जवळ जाऊ – येऊ शकतात, त्यांच्यावर गुरुत्वबल कार्य करते, ती प्रवाही असतात व दुसऱ्या द्रव्यांवर बाह्यबळ लावू शकतात.

गुरुत्व = ग्रॅव्हिटी ?? हे कसे काय अनुवादले आपण ?

गुरुत्व म्हणजे "मोठे"पणा ना ?
म्हणजे "लघु" च्या विरुद्ध तो "गुरु", बरोबर ?

अनिकेत कवठेकर's picture

8 Apr 2018 - 5:53 pm | अनिकेत कवठेकर

यातील परत्व अपरत्व म्हणजे लहान व मोठे पणा आहे. गुरुत्व बरोबर लघुत्व शब्द असता तर तुमचं बरोबर ठरलं असतं.

खूप विचार करत होते तेव्हा हे निश्चित परंतू पाप-पुण्य-कर्म यांचा अतोनात भडिमार करकरून कुणास स्वतंत्र विचार करण्याची कुवत ठेवलीच नाही.