मी (शतशब्दकथा )

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
14 Mar 2018 - 7:04 pm

"चहा झालाय का ग ? " आल्या आल्या श्रीरंग मधूरावर ओरडला

"अोरडायला काय झाल ? 'मी' तुमचच कपाट लावत होते. काय तो पसारा ..'मी' आहे म्हणून काय ते घर टिकलयं..नाहीतर उकीरडा करुन ठेवला असता सगळा ."

"जास्त बोलू नको आता.. आधीच ऑफिसच टेंशन.. तिथे सगळेजण टिपूनच बसलेत 'मी' केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला. .."

"पप्पा तुम्हाला ना घरी कसं वागायच काहीच कळत नाही. ऑफिसचा राग घरी का आणता? " राघव श्रीरंगला म्हणाला

" वा..'मी' तुला या जगात आणलो आणि मला अक्कल शिकवतो ? अभ्यास कर जा.."

खोलीच्या कोप-यात बसलेले आजोबा अग्निहोत्राची शांतपणे आहूती देत होते '"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम , प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम "

kathaaप्रकटन

प्रतिक्रिया

इदं न मम चा जमाना राहिला नाही आजोबा

त्या श्रीरंगाला दोन थोबाडीत हाणायला हव्यात

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2018 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

बोबो's picture

20 Mar 2018 - 11:47 pm | बोबो

छान आहे