खिलजीचा माफीनामा

खिलजि's picture
खिलजि in जनातलं, मनातलं
6 Feb 2018 - 12:34 pm

खिलजी एक असे पात्र जे इतिहासात त्याच्या कुकर्मामुळे प्रसिद्ध झाले . प्रत्येक पटावर ते पात्र जन्माला येतच असते . नियतीचा अलिखित नियम आहे . मी देखील परत आलोय . पण माझ्या परतीचे कारण मात्र वेगळे आहे . मी परत आलोय ते फक्त माफी मागण्यासाठी. मी माफी मागणारही होतो पण त्यावेळेला मला संधीच मिळाली नाही . मी कैक धडका दिल्या , पण जेव्हा जेव्हा मी माझे नाव किंवा आडनाव टंकले त्या वेळेस माझ्या हाती अपयशच आले . असो ...
जिच्यासाठी उपवास व्रत वैकल्ये केली , ती माझी आई ६ जानेवारीला देवाघरी गेली. जाईपर्यंत चूल आणि मुलांची काळजी करणारी बाई, अशीच निघून गेली ... चितेवर पहुडली असताना , नातेवाईक तिच्या अंगावरचे दागिने काढत होते तेव्हा विरक्तीची पुसट कल्पना माझ्या मनाला शिवू लागली होती . ह्या मोहपाशात अडकून पडण्यापेक्षा , जे जे आधी घडलेले आहे , कुणी दुखावले गेले असेल कळत नकळत , त्यांची माफी मागणे क्रमप्राप्त आहे. म्हणून मी माझी पूर्वीची ओळख लपवून , या मंडळात पुन्हा प्रवेश केला .
शक्य झाल्यास मला माफ करा ..

आपला नम्र

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

6 Feb 2018 - 3:07 pm | दुर्गविहारी
टवाळ कार्टा's picture

6 Feb 2018 - 3:07 pm | टवाळ कार्टा

RIP _/|\_

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2018 - 3:11 pm | मराठी कथालेखक

ओळख लपविल्यावर माफ कसे करणार ..

ओळख लपवलेली नाही आहे त्यांनी.
शेवटी स्वतःचे पूर्ण नाव लिहिले आहे.

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2018 - 6:50 pm | मराठी कथालेखक

अहो पुर्वीची ओळख लपवली आहे ना.. मग पुर्वी कुणाला दुखावलं होतं ते कसं कळणार

पैसा's picture

6 Feb 2018 - 3:15 pm | पैसा

तुमच्या आईच्या आत्म्यास शांती मिळो. सध्या चुका माफी वगैरे बाजूला टाका. आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत. इतकेच.

सुखीमाणूस's picture

6 Feb 2018 - 3:18 pm | सुखीमाणूस

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2018 - 4:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमच्या आईच्या आत्म्यास शांती मिळो. आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.

चुकले असो नसो, पण माफी मागण्याइतका स्वभावातला उदारपणा दाखवला आहात यातच सगळे काही आले. इतका मनाचा मोठेपणा दाखवण्याचे धैर्य फार थोड्या लोकांत असते.

मिपा आपलेच आहे. आता खेळीमेळीने मिपाकरांशी सुसंवाद सुरु करा. सुस्वागतम् !

मुक्त विहारि's picture

6 Feb 2018 - 5:59 pm | मुक्त विहारि

+ १

दुर्गविहारी's picture

6 Feb 2018 - 4:13 pm | दुर्गविहारी
दुर्गविहारी's picture

6 Feb 2018 - 6:27 pm | दुर्गविहारी

मि.पा. गडबडल्यामुळे प्रतिसाद अर्धवट आलेला दिसतो. तुमच्याबध्दल खरचं वाईट वाटते. या वैयक्तिक दु:खातून बाहेर येण्यास परमेश्वर तुम्हाला बळ देवो. शक्य झाल्यास पुन्हा कविता लिहा, मात्र आठवड्याला एक, दोन आणि मि.पा. सारख्या प्रगल्भ मंचाला योग्य अशाच कविता पोस्ट करा. चांगल्याचे ईथे नेहमीच कौतुक होते, तेव्हा आपणच आपली मर्यादा सांभाळायची हे लक्षात ठेवा.

सस्नेह's picture

6 Feb 2018 - 4:16 pm | सस्नेह

दु:खद घटनेबद्दल खेद आहे. तुमच्या आईस श्रद्धांजली.
माफी मागण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा इथले रीतीरिवाज समजून घ्या आणि सर्वांशी हसून खेळून रहा, असे सुचवते.
स्नेहा.

मुक्त विहारि's picture

6 Feb 2018 - 5:59 pm | मुक्त विहारि

+ १

नाखु's picture

6 Feb 2018 - 6:30 pm | नाखु

आपल्या आईंना विनम्र श्रद्धांजली

मिपाकर वाचनकट्टा मंडळी

मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ तुम्हास मिळो. आमच्या सर्वांच्या सहवेदना आपल्यासोबत आहेतच.
मिपासारख्या दिलदार व्यासपिठावर जेवढा विधायक, सकारात्मक सहभाग नोंदवता येईल तेवढा नोंदवा. लोक आपलेच आहेत.

पगला गजोधर's picture

6 Feb 2018 - 4:28 pm | पगला गजोधर

मातृवियोगाचे दु:ख सोसायचे बळ तुम्हास मिळो. सहवेदना आपल्यासोबत आहेतच.

तरीही माफ करा, परंतु एक प्रश्न विचारतो.

तुम्हाला "खजीलजी" असं नावं धारण करायचे होते का मिपावर ? परंतु टंकनचुकीमुळे ते "खिलजी" असे झाले ?

manguu@mail.com's picture

6 Feb 2018 - 11:04 pm | manguu@mail.com

सद्गती मिळो.

मिपासोबत रहा.