खग्रास सूर्यग्रहण : अविस्मरणीय अनुभव

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 4:41 pm

ग्रहण बघण्याची खरी मजा ही खग्रास सूर्यग्रहणातच येते. मी २४/१०/१९९५ चे ग्रहण पाहिले होते. त्याची काही क्षणचित्रे लिहीत आहे.

१.‘खग्रास’ (म्हणजे ९९% अंधार) चा भौगोलिक पट्टा हा मर्यादित असतो. अन्य लांबच्या ठिकाणाहून ते खंडग्रास दिसते.
२. म्हणून एकटे जाण्याऐवजी माहितगार चमू बरोबर जावे. युवाशक्तीचे अभ्यासू लोक तारखेच्या आधीच इच्छीत ठिकाणाची पाहणी करून येतात.
३. त्यामुळे आमचे राहण्याचे ठिकाण हे त्या मैदानापासून अगदी जवळचे निवडले होते.

४. जे एकटे दुकटे लोक फत्तेपूर सिक्रीला राहिले होते त्यांना त्या सकाळी हॉटेल पासून जाम एकही वाहन मिळत नव्हते. ग्रहण आपली वेळ कधीही चुकवत नाही !!! तो निसर्ग आहे, माणूस नव्हे ! त्यामुळे अशा लोकांचे सहलीचे पैसे अक्षरशः पाण्यात गेले.

५. ते ग्रहण सकाळी ८ वा होते. त्यामुळे अंधाराचे प्रमाण ७०% च्याआसपासच राहिले. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता.

६. पण, त्यावेळेस पक्षी घरट्याकडे परतू लागले . तसेच बारीक थंडीही वाजू लागली. खग्रास काळ ३ मिनिटेच होता. जास्तीत जास्त तो साडेसात मिनिटेच असू शकतो.

७. खास चष्म्यातून सूर्याचा ‘करोना’ पाहिला. डोळ्यांचे पारणे फिटते.

८. त्या मैदानावर फक्त आमचा चमू होता. तेथील खेडवळ लोक जमले होते पण त्यांना याबद्दलचे काहीच ज्ञान नव्हते. फक्त आम्ही ४० जण असल्याने त्यांनी पटकन शेगडी आणून चहाचा धंदा करून घेतला.

९. एकून खग्रास पैकी बरीचशी समुद्रावर होतात. त्यामुळे आपल्याला जमिनीवरून पाहायला फार थोडी उरतात.

१०. १९९९ चे गुजरात मधून दिसले होते. ते पावसाळ्यात होते त्यामुळे दिसण्याच्या आशा नव्हत्या. पण मस्त दिसले असे वाचले होते. रस्त्यावरच्या ट्रकना दु. ३ वा. दिवे लावायला लागले होते.
११. आता भारतातून ५०-६० वर्षे तरी बहुतेक नाही. ज्या ठिकाणी ते होते तिथेच पुन्हा व्हायला अंदाजे ३५० वर्षे लागतात.
१२. अजून काही लाख वर्षानी चंद्र, सूर्य आणि पृथ्वी मधली अंतरे बदलतील. त्यानंतर मात्र ‘खग्रास’ बंद होतील. फक्त खंडग्रास राहतील.
इतरांचे अनुभव वाचण्यास उत्सुक

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

1 Feb 2018 - 5:40 pm | मराठी_माणूस

एक खग्रास सुर्यग्रहण १९८० च्या सुमारास (तारीख आठवत नाही ) कोल्हापुरला पाहील्याचे आठवते . साधारण दुपारची वेळ होती. पण संध्याकाळ सारखा प्रकाश अंधुक झाला होता. पक्षी सैर भैर होउन उडत होते. रस्त्यावर कडकडीत बंद असतो तसा शुकशुकाट होता.

कुमार१'s picture

1 Feb 2018 - 8:38 pm | कुमार१

बरोबर. तेव्हा बरेच लोक ते पाहायला दक्षिण भारतात गेले होते

एकदा ८०% इतके ग्रस्त झालेलं खंडग्रास सूर्यग्रहण पाहिलं होतं, बाकीची पाहिली ती त्यापेक्षा कमीच. संपूर्ण खग्रास अवस्थेचं दर्शन अजून घ्यायचं आहे.

प्रचेतस, एकदा तरी आयुष्यात बघाच.
आता परदेशावर नजर ठेवावी लागेल.
शुभेच्छा

जगलो वाचलो तर २०३४ चं खग्रास सूर्यग्रहण लडाखमधून बघता येईल.

जगातील सर्वात सुंदर प्रकाश अर्थात ध्रुवीय प्रदेशातील ऑरोरा आणि जगातील सर्वात सुंदर दृश्य अर्थात सूर्याभोवतीचा मुकुट (corona) आणि डायमंड रिंग आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष बघायचीच आहे.

जगातील सर्वात सुंदर प्रकाश अर्थात ध्रुवीय प्रदेशातील ऑरोरा >>> हे रोचक दिसतंय. यावर कोणी प्रकाश टाकेल का ?

प्रचेतस's picture

3 Feb 2018 - 10:32 am | प्रचेतस

धन्यवाद. दोन्ही निवांतपणे बघतो

सूर्य आणि त्याबद्धल मिळणार्‍या विविध माहितीचा शोध मी अधुन मधुन घेत असतो... त्यातही युएफओ शिप्स त्याच्या कक्षात एनर्जी रिफिलिंगसाठी येतात या विषयावर देखील बर्‍याच काळ टाळके खपवण्याचा उध्योग केला आहे आणि करतो आहे.

दोन वर्षापूर्वी तू-नळीवर अपलोड झालेला असाच एक व्हिडियो हल्लीच माझ्या पाहण्यात आला होता.

सुर्या बद्धल मोठ्या प्रमाणात डेटा तुम्हाला या संकेतस्थळावर मिळेल :- https://helioviewer.org/
तू-नळीवर बराच शोध घेतल्यावर मला एक मस्त चॅनल मिळाला आहे :- UFONEARSUN - myunhauzen74 [ https://www.youtube.com/user/myunhauzen74/videos ]
या चॅनलवर सूर्यावर बरेच वेगळ्या प्रकारचे व्हिडियोज आहेत. मला विशेषतः सोलार फ्लेअर्स चे व्हिडियोज पहायला आवडतात.
या चॅनलवरील असाच एक व्हिडियो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italiano

गामा पैलवान's picture

4 Feb 2018 - 9:03 pm | गामा पैलवान

मदनबाण,

इथे पृथ्वीएव्हढी अनामिक वस्तू सूर्याकडून (ऊर्जा खेचतांना?) दिसते आहे : http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2114830/Mysterious-planet...

वरील घटना २०१२ ची आहे. अशाच वस्तू आजूनहीही नित्यनेमाने सापडतात.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

5 Feb 2018 - 7:58 pm | गामा पैलवान

कशावरून आपली पृथ्वीच एक युएफो नाहीये?

-गा.पै.

मदनबाण, उपयुक्त माहितीबद्दल आभार

खग्रास अजून बघितलंच नाहीय.

सूड, काय बी करा पन आयुष्यात येकदा तरी बघाच. ☺

कुमार१'s picture

20 Apr 2022 - 12:48 pm | कुमार१

२०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे.
लोकसत्तामधील या बातमीचे शीर्षक बघा:

सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, आयुष्य खूप अवघड होईल!

https://www.loksatta.com/astrology/surya-grahan-2022-not-do-these-work-d...
संपूर्ण बातमीमध्ये दिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

परंतु शीर्षक मात्र झेपले नाही.