डोंबिवलीत २८ जानेवारीला सायकल प्रेमींचे संमेलन

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
5 Jan 2018 - 8:30 am

प्रिय मिपाकरांना,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

तसा आमचा पिंड कट्टेकर्‍याचा. साधे ठाकुर्लीला जायचे असेल तरी आम्ही तिथे कुणी मिपाकर आहेत का? ह्याचाच शोध घेतो.

ह्या वर्षी पण असा एखादा कट्टा लवकरात लवकर करावा, असा मानस होताच.

सुदैवाने, एक निमित्त पण मिळाले.

==============================

पर्यावरणपूरक सायकलिंगला चालना देण्यासाठी, ह्या अनोख्या पहिल्या महाराष्ट्र सायकल मित्र संमेलनाचे आयोजन डोंबिवलीत २८ जानेवारीला करण्यात आले आहे.

सायकल विषयक संबधित घटकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी हे संमेलन भरवण्यात येणार आहे.

या संमेलनाची सुरुवात डोंबिवली शहरातील ५ वेगवेगळ्या ठिकाणांहून सकाळी साडे-सहा वाजता निघणार्‍या सायकल फेरीने होणार आहे.

संमेलनाचे उद्-घाटन सकाळी ९ वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे.

==========

माहितीचा स्त्रोत ====> ५ जानेवारी २०१८ तारखेचा लोकसत्ता.

=========

बाहेरगावाहून येणार्‍या ४ मिपाकरांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था माझ्याकडे केली जाईल.

प्रथम संपर्क करणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.

कृपया व्यनि द्वारे संपर्क साधावा, ही विनंती.

आपलाच,

(कट्टेकरी) मुवि.

(स्वगत : बरेच कट्टे इतरत्र केले, ह्या निमित्ताने एक कट्टा डोंबिवलीत करायला हरकत नाही.)

मौजमजाबातमी